Submitted by ऋतुजा घाटगे on 10 April, 2011 - 10:14
सांजेची वेळ, नाही काळवेळ
तुझ्या आठवणींना.
गालावरून फिरते अहर्निश, एक मोरपीस
तुझ्या आठवणींचे.
केवड्याचे पान, त्याची नसे शान
तुझ्या स्मृतीगंधापुढे.
सांवळी कृष्णकमळे, त्यांतूनही सुगंध उमले
तुझ्या आगमनाचा.
हांसरी मधुमालती, तिने जोडली नाती
तुझ्या पाऊलखुणांशी.
एक वेडी, फुले तोडी
ईशपूजेसाठी.
खरेच आहे वेडी ती, वाहिली तिने फुले सारी
अखेर तुझ्याच पायांशी !
गुलमोहर:
शेअर करा
एक वेडी, फुले
एक वेडी, फुले तोडी
ईशपूजेसाठी.
खरेच आहे वेडी ती, वाहिली तिने फुले सारी
अखेर तुझ्याच पायांशी >>>
चांगली आहे !
छान कविता...................
छान कविता...................
छान कविता..................
छान कविता..................:अओ:
वा ! छान आहे. लिहीत रहा..
वा ! छान आहे.
लिहीत रहा..
केवड्याचे पान, त्याची केवढी
केवड्याचे पान, त्याची केवढी शान
तुझ्या स्मृतीगंधापुढे. >>>>
हे जरा कळालं नाही. केवडा शानदार आहे तुझ्या स्मृतीगंधापुढे असं म्हणायचंय काय?
बाकी कविता छान..