आता नशा देतो न तैशी जाम पहिल्यासारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा??
'दुखणेच हे आयुष्य माझे' ठाव आहे ते मला
करतो न मीही रोजला व्यायाम पहिल्यासारखा!
फ़ुलती न त्या रुसल्या कळ्या झालेय काही ठाव ना
धसमूसळा वारा न तो बेफ़ाम पहिल्यासारखा!!!
गेली तशी आली न परतुन पाखरे खोप्यातली
ना ठेवतो ऋतुराजही मुक्काम पहिल्यासारखा??
मी विस्मरण म्हणतो तसे पण जाणतो सारेच की
मेंदूच ना देई अताशा काम पहिल्यासारखा
वाटे न मजला भरभरूनी मी जगावे या जगी
दुनियेत या नाहीच आता राम पहिल्यासारखा
जाताच तू नुरले मला कारण पुन्हा झुंजायला
नाहीच मी मग राहिलो गं ठाम पहिल्यासारखा
'प्राजू' पुन्हा फ़ुलशील का आता तशी तू सांगना
नुरला तुझा तो हासरा गुलफ़ाम पहिल्यासारखा
- प्राजु
(गुलफाम, जाम.. हे उर्दू शब्द वापरले आहेत. ते चालतात की नाही कल्पना नाही. चुकले असेल मोठ्या मनाने क्षमा कराल अशी आशा आहे.)
वाटे न मजला भरभरूनी मी जगावे
वाटे न मजला भरभरूनी मी जगावे या जगी
दुनियेत या नाहीच आता राम पहिल्यासारखा.........व्वा !!
उर्दू,अरबी किंवा बोली भाषेतील शब्दसुद्धा बहुतांशी गझलांत चपखल बसतात.आपल्या या गझलेतील उर्दू शब्दांचं परकेपण जाणवतही नाही,यास्तव वापरण्यास काही हरकत नसावी.
सुंदर गझल.
धन्यवाद कैलासदादा.
धन्यवाद कैलासदादा.
छा न
छा न
गेली तशी आली न परतुन पाखरे
गेली तशी आली न परतुन पाखरे खोप्यातली
ना ठेवतो ऋतुराजही मुक्काम पहिल्यासारखा??>>>
ह्या शेरातला आशय सर्वाधिक आवडला. लिहीत रहा.
शुभेच्छा!!
खूपच छान.. सगळे आवडलेच पण
खूपच छान..
सगळे आवडलेच पण शेवटच्या शेर मध्ये गुलफाम अगदी चपखल बसलाय.
अभिनंदन...
सॉलीड
सॉलीड
आपल्याला शुभेच्छा! अनेक
आपल्याला शुभेच्छा!
अनेक सवलती व किरकोळ तृटी जाणवल्या.
गझल अधिक सफाईदार करणे शक्य आहे आपल्याल व ते आपल्या अनेक गझलांमधून दिसतेच!
धन्यवाद !
-'बेफिकीर'
सर्वांच मनापासून आभार.
सर्वांच मनापासून आभार.
आता नशा देतो न तैशी जाम
आता नशा देतो न तैशी जाम पहिल्यासारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा??
फ़ुलती न त्या रुसल्या कळ्या झालेय काही ठाव ना
धसमूसळा वारा न तो बेफ़ाम पहिल्यासारखा!!!
गेली तशी आली न परतुन पाखरे खोप्यातली
ना ठेवतो ऋतुराजही मुक्काम पहिल्यासारखा??
'प्राजू' पुन्हा फ़ुलशील का आता तशी तू सांगना
नुरला तुझा तो हासरा गुलफ़ाम पहिल्यासारखा
मस्त लिहिलय! मजा आली!
उर्दू,अरबी किंवा बोली भाषेतील शब्दसुद्धा बहुतांशी गझलांत चपखल बसतात.आपल्या या गझलेतील उर्दू शब्दांचं परकेपण जाणवतही नाही,यास्तव वापरण्यास काही हरकत नसावी.
सुंदर गझल. >>> कैलासजींचे म्हणणे पटले.
उलटपक्षी त्यामुळे गझल आणखी खुलल्यासारखे वाटले.
रामकुमार
जाताच तू नुरले मला कारण
जाताच तू नुरले मला कारण पुन्हा झुंजायला
नाहीच मी मग राहिलो गं ठाम पहिल्यासारखा
वाह, खुपच छान ओळी !
मस्त .
मस्त .
मस्त... गुलफाम !!!
मस्त...
!!!
गुलफाम