नागवा

Submitted by पल्ली on 5 April, 2011 - 05:14

भावनांची उफ्फ उधारी
मी पुरा भांबावलो
श्वास ही माझे नसावे
कि भिकेला लागलो....
.
क्षणैक सुखाच्या कल्पनांचा
मी शिराळा शेठजी
मांडले विक्रीस नशिबा
मज विकाया लागलो....
.
पाहुनी लाचार जन्मा
मी स्वतःला हासलो
हाय इतुका मी नागवा
कि स्वतःला लाजलो.....
....................

गुलमोहर: 

भावनांची उफ्फ उधारी

क्षणैक सुखाच्या कल्पनांचा
मी शिराळा शेठजी

हाय इतुका मी नागवा
कि स्वतःला लाजलो.....

विशेष चपखल प्रभावी शब्दप्रयोग Happy

भावनांची उफ्फ उधारी

क्षणैक सुखाच्या कल्पनांचा
मी शिराळा शेठजी

हाय इतुका मी नागवा
कि स्वतःला लाजलो.....

विशेष चपखल प्रभावी शब्दप्रयोग Happy >>> सहमत

सर्वांची आभारी Happy

बरेच आले भेटाया
मी समजले विसरलेच कि!
आले तसे बसले जरा,
मला वाटले गेलेच कि!