मी काढलेली चैत्रांगण रांगोळी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

chaitrangan.jpg

एक क्लोजअप...

chaitrangan1.jpg

वा. किती सुबक आहे. बॅकग्रॅउंडचा रंगही वेगळा आणि छान वाटतोय.

असा प्रकार असतो हे आजच कळले. ही पारंपारीक रांगोळी आहे का? कुठल्या पुस्तकात असते का?

धन्यवाद!

मामी : हो. ही पारंपारीक रांगोळीच आहे. कोकणात पूर्ण चैत्र महिनाभर घराच्या अंगणात ही रांगोळी रेखाटतात. यात सर्व शुभ चिन्हं, प्रतीकं यांचा समावेश असतो. काही रांगोळीच्या पुस्तकांमधे ही रांगोळी असू शकते.

आरेम्डी म्हणजे ही तीच तर नव्हे जी पुण्यातिल पहिल्या जीटीजीला प्रेझेण्ट म्हणून गुलाबाची रोपे घेऊन आली होती? Happy तीच असावी, सभासदत्वाची वर्षे तर दहा दिसताहेत.

मस्तच! खूप वर्षांनी पाहिले चैत्रांगण! कालच आठवण झाली होती. आमच्या शेजारच्या आजींनी शिकवले होते काढायला. Happy

छानच गं! आई घालायची पूर्ण चैत्र महिनाभर ही रांगोळी. पण यात जास्त चिन्हं आहेत. प्रिंट काढून ठेवीन!
खूप सुबक काढलीयेस! मन प्रसन्न झालं!

खरच सुंदर काढली आहे रांगोळी. सगळ्या प्रतिकांची नावं पण लिहिली तर खूप छान होईल. स्वस्तिक, शंख, गदा, पद्म, चंद्र, सूर्य, कमळ, तुळशी वृंदावन, धनुष्यबाण, कलश, शिवलिंग, पणती, कासव आशी सोडली तर बाकिची विचारात पाडत आहेत.
कोणाला माहिती आसल्यास लिहा ना प्लीज.

ज्ञानकमळ, परशु, ध्वज, समई, तोरण, चौघडा, नाग, उखळ/ मापटे?, गाय - वासरू, उंट, हत्ती अंबारी, गोपद्म, पाळणा, मोरपीस/ धान्याची ओंबी / लोंबी?, खण-नारळ, गुढी, सरस्वतीचे प्रतीक अशी अनेक चिन्हे दिसत आहेत. छान काढले आहे चैत्रांगण.
मला चैत्रांगणाची व चिन्हांची माहिती देणारा हा एक लेख सापडला : http://mukulgadre.blogspot.com/2010/10/blog-post_3001.html

सुंदर काढलयं चैत्रांगण. किती बारीक रेष आहे रांगोळीची.

माझ्याकडे आहे एक कागद चैत्रांगणाचा. त्यावर प्रत्येक चित्राचं नाव आहे. आज शोधून सापडला तर इथे डकवेन.

खूप खूप धन्यवाद सगळ्यांना!

यात माझ्या माहितीप्रमाणे ही चिन्हे आहेत -
तोरण, सूर्य, चंद्र, रामाचं देऊळ, गणपती, सरस्वती, त्रिशूळ, गुढी, ध्वज, परशू, समई, शंख, चक्र, गदा, पद्म, गोपद्म, ओंकार, स्वस्तिक, हळदीकुंकवाचे करंडे, मापटे, डमरू, सनई चौघडा, मोरपीस, बासरी, नक्षत्र, कासव, गाय - वासरू, नाग, हत्ती, गरूड, कमळ, धनुष्यबाण, कैरी, केळी, खण नारळ, शिवलिंग, पणती, तुळशी वॄंदावन, मंगल कलश, दोला (झोपाळा)

उरलेली जी चिन्हं आहेत त्या सर्व शुभ रांगोळ्या आहेत. मला त्यांची नावं माहीत नाहीत. कोणाला माहीती असल्यास सांगा.

माझ्या माहितीप्रमाणे ही प्रतिकं आहेत.
चैत्र म्हणजे मधुमास. वसंत ऋतू. श्रीकृष्णाने "ऋतूनाम् कुसुमाकरः" असं म्हटलंय स्वत:बद्द्ल. म्हणजे "सर्व ऋतूत जो सर्वश्रेष्ठ वसंत ऋतू, तो मीच"

संपूर्णं पानगळ झालेल्या निसर्गाला नवा जन्म मिळावा तसा बदल होतो. याचं आपल्या आयुष्याशी रूपक लावायचं तर हे, की कितीही वाईट काही घडलं तरी, कुठेतरी आशेचा कोंब असतोच. रोजचा दिवस नवीन विचार करायला लावतो.
वठलेलं झाडाला पालवी फुटते, फुलं येतात त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यात नव्या गोष्टी घडतात त्याला नव्या जोमाने सामोरे जा असा अर्थ. म्हणून वसंत ऋतू सर्वश्रेष्ठ मानायचा.

शंख, चक्र, गदा, पद्म, कलश इ सगळी शुभप्रतिकं कृष्णाची अर्थात "ऋतूनाम् कुसुमाकरः" याचीच असावीत.
इतर, म्हणजे गोपद्म, स्वस्तिक, १च्या आकड्याची सरस्वती, हे आपण नेहेमीच/शारदापूजेला/गोपूजेला वगैरे रांगोळीत काढतो.

Pages