चित्र

Submitted by UlhasBhide on 1 April, 2011 - 02:26

चित्र

आयुष्याच्या चित्रामध्ये
रंग भरावे प्रयत्न केला
चित्राला बेरंग करितसे
नियतीचा निर्घृण कुंचला

उभ्या आडव्या तिरप्या रेघा
नियतीने कोरडे ओढले
विचित्र जीवन-चित्र आगळे
निव्वळ रेघोट्यांचे जाळे

जाळ्यामध्ये रेघोट्यांच्या
पुन्हा पुन्हा ते चित्र शोधतो
गुरफटून त्या गुंत्यामध्ये
स्वत:लाच मी हरवुन बसतो

अंतरंग ना कळे जयांचे
त्या रंगांची हाव धरूनी
रंगाचा बेरंग होउनी
रंगहीनता उरे जीवनी

..... उल्हास भिडे (१-४-२०११)

गुलमोहर: 

विचित्र जीवन-चित्र आगळे
निव्वळ रेघोट्यांचे जाळे>>>>> अप्रतिम जुळणी... Happy

अंतरंग ना कळे जयांचे
त्या रंगांची हाव धरूनी
रंगाचा बेरंग होउनी
रंगहीनता उरे जीवनी

फारच निराशा आहे,

सर्वांना धन्यवाद.
----------------------------------------------------------

इतकी उदास कविता का? >>>>
मी नेहमीपेक्षा वेगळ्या भावात कविता लिहिल्याने
वाचकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे

आयुष्य विविध भाव-भावनांनी भरलेलं असतं.
औदासिन्य, विषण्णता, वैफल्य इ. भावही आयुष्यात अनुभवावे लागतातच.
अर्थातच ते काव्यातून अभिव्यक्त होणं स्वाभाविकच नाही का ?

आयुष्याच्या चित्रामध्ये
रंग भरावे प्रयत्न केला
चित्राला बेरंग करितसे
नियतीचा निर्घृण कुंचला

व्वा... विजयरावांचं मत योग्यच आहे... पण खरं तर मला ते विशेषण बेहद्द आवडलं. Happy

छान

अंतरंग ना कळे जयांचे
त्या रंगांची हाव धरूनी
रंगाचा बेरंग होउनी
रंगहीनता उरे जीवनी

>> छानच झालीय Happy

ithe english madhe kaa yetay kalat naahee, pudhe neet maraatheet lihitaa yetay !

औदासिन्यतेचा गहिरा रंग काय भरुन राहिलाय या चित्रात........
व्वा फारच छान काका...
उदासीनतेचा गहिरा रंग, औदासिन्यता...गडबडच झाली की...भरतदा धन्यवाद.

मस्त..!
उदास कवितेला 'मस्त' हे विशेषण कदाचित अयोग्य वाटेल.
पण कविता आवडली..
असे क्षण असतातच की जेव्हा पराकोटीचा 'सकारात्मक' माणूसही तितकाच 'नकारात्मक' होऊ शकतो.
फक्त एकच, की सारखंच उदासीन असू नये व लिहूही नये.
अर्थात, उल्हासकाका,तुम्ही सारखं उदास लिहीत नाहीच.. त्यामुळे,तुमच्याकडून अशी कविता
'फॉर अ चेंज' च असावी अशी अपेक्षा आहे.