"वेळ झाली भर मध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन" सध्या सर्वत्र अशीच स्थिती आहे आणि सर्वांचीच अवस्था "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी झालेली आहे. याला कारण नुकताच सुरू झालेला कडक उन्हाळा. उन्हामुळे नकोनकोसा वाटणारा प्रवास, उष्णतेमुळे जिवाची होणारी काहिली, घामामुळे चिपचिपलेले अंग यामुळे हा ऋतु सार्यांनाच नकोसा वाटतो. पण याच दरम्यान चैत्रमासात एक जादूगार आपली जादूची कांडी सर्वत्र फिरवत असतो आणि तो जादूगर म्हणजेच "निसर्ग".
हेमंत आणि शिशिर ऋतुच्या आगमनाने झाडांवरची पानं हळुहळु गळु लागतात. एकेकाळी हिरवा पर्णसंभार मिरवणार्या या वसुंधरेची अशी विपन्नावस्था आपल्याला बघवत नाही. सगळीकडे हि धरती अशीच निष्पर्ण, उजाड आणि उदास बसुन आपल्या प्रियकराची, ऋतुराज "वसंताची" वाट पाहत असते आणि अचानक तिला त्याच्या आगमनाची चाहुल लागते. हा ऋतुराजही आपल्या आगमनाची वर्दी देण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दुताला भुतलावर पाठवतो आणि सांगतो, " गा कोकिळा, गा रे, भूलोकीच्या गंधर्वा तु अमृतसंगीत गा रे....." आणि कोकिळही या भुतलावर येऊन आपले काम चोख बजावतो. वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच त्याला भेटायला आतुर असलेल्या धरतीची लगबग सुरू होते. हळुहळु झाडांवरच्या फांद्यांना कोवळी, लुशलुशीत पालवी फुटायला लागतात आणि एखाद्या अल्लड मुलीचे नवयौवनेत रूपांतर व्हावे असे हे वृक्ष दिसु लागतात/सजु लागतात. बघता बघता या वृक्षांना कळ्या धरू लागतात, काही कालावधीनंतर त्यांचे फुलात रूपांतर होऊन संपूर्ण वृक्षच फुलांचे घोस मिरवत आपले लक्ष वेधून घेतो. काहि दिवसांपूर्वी अंगावर वस्त्रे नसलेली पुरंध्री नखशिखांत सुवर्णालंकारांनी मढवावी असेच हे वृक्ष पुष्पसंभारांनी लगडलेले दिसु लागतात. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी धरतीही नटु लागते. गडद, हळदी सोनमोहराचा शालू नेसुन, त्यावर मातकट किंवा हलक्या पोपटी रंगाची चोळी परीधान करून, शाल्मली, पंगारा, पळस यांचा लाल/शेंदरी मळवट कपाळी लावून, कानात हलक्या पिवळ्या रंगाच्या बहाव्याचे झुबकेदार कर्णफुले घालुन, अंजन, नीलमोहराचा निळसर साज गळ्यात घालुन, पायात पिवळ्या टॅबेबुयाचे पैंजण बांधून, हातात फिक्कट गुलाबी रंगाच्या कॅशियाची कांकणे लेउन, नाकात पाचुंदाची नथ आणि केसात विविध चाफ्याचा फुलांचा गजरा माळुन, बकुळीच्या मंद सुवासाचे अत्तर लावून, असा सारा साजश्रृंगार करून ती प्रियकर वसंताला भेटण्यासाठी तयार होत असते. या दोघांच्या प्रेमाचा हा उत्सव सगळ्यांनाच सुखावून देणारा असतो आणि तो पाहण्यासाठी मुद्दाम कुठे जायची गरज नसते. आपल्या आजुबाजुला, टेकड्यांवर, शहराबाहेर/गावाबाहेर, माळरानावर, डोंगरदर्यांमध्ये यांची कुठेही पाहिलं तरी यांची प्रणयराधना चालु असते. हा उत्सव महिनाभर चालु असतो. वसंताला निरोप देत, या प्रेमउत्सवाची सांगता करत, वैशाख वणव्याचे आव्हान स्विकारत पावसाळा सुरू होईपर्यंत शेवटी बहरतो तो "गुलमोहर".
या ऋतुराजाचे कौतुक सगळ्यांनाच. ऐन वसंतात लाल, पिवळ्या, निळ्या-जांभळ्या, केशरी रंगाने बहरलेले वृक्ष पाहिल्यावर छायाचित्रकाराला त्याच्या कॅमेर्यात, चित्रकाराला त्याच्या कॅनव्हॉसवर आणि गीतकाराला त्याच्या लेखणीत कैद करावेसेच वाटणार. निसर्गाच्या या रंगपंचमीची भुरळ आपल्या मराठी कविंनाही न पडली तर नवलच. मायबोलीकर दाद यांच्याच शब्दात सांगायचे तर हि "गानभूल" आपल्या कवींना देखील पडली आहे आणि ती का पडु नये? इतक्या सुंदर दृष्याला/वातावरणाला गद्यात का कैद करावे? चला तर मग असेच काही वसंतगाणी गुणगुणत या "चैत्रचाहुलीचा" आस्वाद घेऊया.
===============================================
===============================================
कुहु कुहु कुहु येई साद, उधळीत वनी स्वरतुषार
मधुर हे तराणे, ऋतुराज आज आला........
सुमनांचे रंग रंग ऋतुरंगीत झाले,
गंधगीत रतीचंचल अवनीवर दरवळले
वारा हा भिरभिर तोडे बंध.....
प्रचि १
कोकिळा
===============================================
===============================================
ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले.......
प्रचि २
वड
प्रचि ३
पिंपळ
===============================================
===============================================
हासत वसंत ये वनी, अलबेला हा
प्रियकर पसंत हा मनी, धरणीला हा
घनवनराई, बहरुनि येई
कोमल मंजुळ कोयल गाई
आंबा पाही फुलला हा, चाफा झाला पिवळा हा
जाइ जुई चमेलीला, भर आला शेवंतीला घमघमला हा
प्रचि ४
पांढरा बहावा
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
सोनबहावा
प्रचि ८
प्रचि ९
गुलाबी कॅशिया
===============================================
===============================================
आला वसंत ऋतु आला, वसुंधरेला हसवायाला
सजवीत नटवीत तारुण्याला, आला आला आला
शतरंगांची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण,
चैतन्याच्या गुंफित माला, रसिकराज पातला
वृक्षलतांचे देह बहरले, फुलांफुलातुन अमृत भरले
वनावनातुन गाऊ लागल्या, पंचमात कोकिळ
व्याकुळ विरही युवयुवतींना, मधुरकाल हा प्रेममीलना
मदनसखा हा शिकवी रसिका, शृंगाराची कला
प्रचि १०
फिक्कट गुलाबी टॅबेबुया
प्रचि ११
पिवळा टॅबेबुया
प्रचि १२
===============================================
===============================================
ऋतुराज आज मनि आला, ऋतुराज आज वनि आला
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला
कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला
प्रचि १३
पळस
प्रचि १४
सोनमोहर (पितमोहर)
प्रचि १५
प्रचि १६
काटेसावर (शाल्मली)
प्रचि १७
पर्जन्यवृक्ष
===============================================
===============================================
वसंत वनात जनात हांसे, सृष्टीदेवी जणु नाचे उल्हासे
गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट
प्रचि १८
वरूण/वायवर्ण
प्रचि १९
प्रचि २०
कौशी
===============================================
===============================================
प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बाग दिलाचा दरवळला
प्रियकर मधुकर धावुन येईल, रसिकराज मधुरुंजी घालिल
मंजुळ गुंजनि सदा रंगविल, ह्या हसर्या फुलराणीला
प्रचि २१
कनकचंपा (रामधनचंपा)
प्रचि २२
गुलाबी तामण
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
जांभळा तामण
प्रचि २६
प्रचि २७
गुलमोहर
===============================================
===============================================
चैत्रमासातील पहिला सण
चैत्रमासातील पहिला सण "गुढीपाडवा" आणि "नूतन वर्षाच्या" सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
प्रचि २२.२३.२४ च्या फुलांची नावे कुणाला माहित आहेत का?
भन्नाट थिम सुंदर नेत्रसुखद
भन्नाट थिम सुंदर नेत्रसुखद प्र.ची. तुमच्या मुळे उन्हाळा अगदी सुखद झालाय.....तुम्हाला सुद्धा "गुढीपाडव्याच्या" आणि "नूतन वर्षाच्या" हार्दिक शुभेच्छा!!!
जिप्सी तुलाही अन सर्व
जिप्सी तुलाही अन सर्व मायबोलीकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेछा !!!
सर्व प्रचि नेहमीप्रमाणेच सुंदर...
काय बोलणार तुला तु तर.. माबोचा सचिन आहेस..
असाच आनंद देत जा आम्हाला तुझ्या कॅमेर्याच्या नजरेतुन...
वा वा ! अप्रतिम सुंदर ! काय
वा वा ! अप्रतिम सुंदर ! काय सुरेख सुरुवात आहे वर्षाची !
तुलाही खुप खुप शुभेच्छा, नववर्षाच्या
मस्त रे जिप्स्या... अगदी
मस्त रे जिप्स्या...
अगदी 'प्रसन्न' वाटलं.
जिप्सी... फारच सुंदर लिहीले
जिप्सी... फारच सुंदर लिहीले आहेस... नि फोटोज नेहमीप्रमाणे मस्तच..
माझा एक छोटा झब्बू.. संजय गांधी पार्कात झाडाला आलेली कोवळी पाने फुलांप्रमाणे भासत होती..
जिप्स्या तो रेन ट्री च. प्रचि
जिप्स्या तो रेन ट्री च.
प्रचि १८ पाचूम्दा नाही. पाचूम्द्याची पाने गोल असतात. हा वरूण/वायवर्ण्र वाटतो.
प्रचि २४ तामण असावा.
फोटो खूपच छान.
जिप्सी..व्वा गुढीपाडव्याच्या
जिप्सी..व्वा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायची तुझी पद्धत फारच आवडली..मन प्रसन्न झाले ( पुढे 'वत्सा,वर माग' ..असं म्हणणार न्हाईये हं मी!! )
तुझं गद्य ही फारच रसाळ आहे..सुरेख लिहितोस, आणी फोटो ... उसकी तो क्या बात है!!!
तुलाही गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा
नववर्षाच्या शुभेच्छा किती
नववर्षाच्या शुभेच्छा किती वेगळ्या आणि मस्त!! तुलाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
खुपच सुंदर यार... मला हि आता
खुपच सुंदर यार... मला हि आता फुलांचे फोटो काढायच वेड लागलय... खरच, कॅमेरा नसल्या मुळे मोबाइल वरच सुरु केलय...
आणि हो... सगळ्या माबो करांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
छान शुभेच्छा!!
छान शुभेच्छा!!
अहाहा....काय मस्त फोटो काढलेस
अहाहा....काय मस्त फोटो काढलेस रे मित्रा...
वा वा.....फारच सुंदर.......
प्रचि १ - कोकिळा असावी, कोकिळ -पूर्ण कुळकुळित काळा व लालबुंद डोळ्यांचा असतो.
सर्व फोटो केवळ अप्रतिम! वसंत
सर्व फोटो केवळ अप्रतिम! वसंत तुम्ही अगदी साक्षात समोर उभा केलात! आणि लिखाण पण छान!
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
रोमा,
यो, झब्बु मस्तच रे
प्रचि १८ पाचूम्दा नाही. पाचूम्द्याची पाने गोल असतात. हा वरूण/वायवर्ण्र वाटतो.
>>>विजयजी, पाचुंदा म्हणजेच वरूण/वायवर्ण ना?
प्रचि २४ तामण असावा.>>>>मलाही तामणच वाटतोय, मी आतापर्यंत निळा तामणच पाहिला होता. पहिल्यांदाच गुलाबी दिसला.
प्रचि १ - कोकिळा असावी, कोकिळ -पूर्ण कुळकुळित काळा व लालबुंद डोळ्यांचा असतो.>>>>धन्स, शशांक. बदल केला
जिप्सि सुरेख लिहिलसं. चित्रही
जिप्सि सुरेख लिहिलसं. चित्रही सुरेख आहेत.
मित्रा, जबरदस्त... चला
मित्रा,
जबरदस्त...
चला नववर्षाची सुरुवात सुंदर तुझ्या फोटोज् ने..
नववर्षाच्या शुभेच्छा...
मस्त रे नववर्षाच्या
मस्त रे
नववर्षाच्या शुभेच्छा...
सुंदर. अगदी कोकिळाचे कूजनही
सुंदर. अगदी कोकिळाचे कूजनही कानावर पडले.
सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
मस्तच!
मस्तच!
सुरेख फोटो !
सुरेख फोटो !
जिप्सी, तामणीचे फोटो पाहून
जिप्सी,
तामणीचे फोटो पाहून डोळे निवले अगदी.
बाकी बहाव्याला हिंदीत एक गोड नाव आहे-अमलताश. कानाला गोड लागतं.
सुंदर. सर्व मायबोलीकरांना
सुंदर.
सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नेत्रसुख...
नेत्रसुख...:-)
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!
प्रचि २५ आणि प्रचि २६ "जांभळा तामण" अॅड केले आहे.
बाकी बहाव्याला हिंदीत एक गोड नाव आहे-अमलताश. कानाला गोड लागतं.>>>>अगदी अगदी
यो रॉक्सने टाकलेला फोटो
यो रॉक्सने टाकलेला फोटो कोणत्या झाडाचा आहे?
मस्त फोटोज , जिप्सी तुला अन
मस्त फोटोज ,
जिप्सी तुला अन सर्व मायबोलीकरांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
सुंदर प्रचि सर्व
सुंदर प्रचि
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सुं द र प्रचि !
सुं द र प्रचि !
खूपच छान लिहिले आहे . आणि
खूपच छान लिहिले आहे . आणि तुला नूतन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा.:) अरे कोकिळेचा फोटो खरच
खूपच अप्रतिम .
Pages