कालच्या सामन्याच्या मानकर्यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन...
गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल.
लीलया उडुनी वानखेडेत
पेटवी लंका हनुमंत
उडे दांडकी सेहेवागाची.
बॅट कोसळे मग 'देवा'ची
चिता भडकली जणूं चिंतेची
राक्षसी करिती आकांत
कुणी पळाले हरल्या पायी
रिमोट मग कुणी टाकून देई
कुणि भीतीनें अवाक होई
वरून तो सडका श्रीशांत.
गंभीरा पण नक्की ठावे
सवे कोहली हळूच धावे
कप्ताना कर्तव्य आठवे
अचानक आला कल्पांत
या सीमेहून, त्या सीमेवर
कंदुक पळतो, नुरे भुईवर
गंभीराचा स्ट्रोक भयंकर
चालला धावा जमवीत
उडे मलिंगा, फुटे थीसारा,
मुरली पोकळ, कुणा न थारा
रडे, ओरडे तों रणदिव
कुमारा पडला चिंतेत
सहज फोर ते असे मारती
विजेपरी तें सिक्स मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करती फलंदाज
आकांक्षा मग पुन्हा उसळल्या
युवराजांच्या बाहू स्फुरल्या
पवित्र मंगल घटिका भरल्या
मातृभू बुडे उत्सवात
धोनी, भज्जी, संघच सारा
“देव” मस्तकी मिरवी प्यारा
देवाच्या अन् भारतभूच्या
नशीबीचा संपे वनवास
......पेटवी लंका हनुमंत ..... पेटवी लंका हनुमंत
>>धोनी, भज्जी, संघच
>>धोनी, भज्जी, संघच सारा
“देव” मस्तकी मिरवी प्यारा
देवाच्या अन् भारतभूच्या
नशीबीचा संपे वनवास
क्या बात है!! विडंबन निश्चीतच नाही.. "सुडंबन" म्हणूया
झकास ..!!
झकास ..!!
मस्तच एकदम !!
मस्तच एकदम !!
मस्त !
मस्त !
मस्तच...
मस्तच...
खरेच विडंबन नका
खरेच विडंबन नका म्हणू...
पाहिजे तर मूळ काव्याच्या चालीवर केलेली रचना असे म्हणा...
फारच सुंदर आणि शेवटचे कडवे तर लाजवाब...
जबरीच !! खूप आवडेश
जबरीच !! खूप आवडेश
मस्तच !
मस्तच !
या देवा...! एक नंबर विडंबन
या देवा...!
एक नंबर विडंबन हो...! (विडंबन नाहीच खरं तर..)
पण आहाहा... काय मॅच होती...
सगळ्यात आवडलं काय तर विराट कोहलीचं वाक्य !
सुंदर काव्य. 'प्रत्यक्षाहुन
सुंदर काव्य. 'प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट' असंच झालं की हे!
मस्त !
मस्त !
सहीये
सहीये
झक्कासच !!! तुमच्या आनंदात
झक्कासच
:-P!!!
तुमच्या आनंदात सहभागी आहे.
मस्तच !
मस्तच !
शेवटचे कडवे सहीच !!!!
शेवटचे कडवे सहीच !!!!
लै भारी!!!!!!!
लै भारी!!!!!!!
मस्त!
मस्त!
<<धोनी, भज्जी, संघच
<<धोनी, भज्जी, संघच सारा
“देव” मस्तकी मिरवी प्यारा>>....क्या बात है !
सही जमलंय.
सहीच आहे. मस्त.
सहीच आहे.
मस्त.
मस्त लंकादहन ..!
मस्त लंकादहन ..!
सहीये
सहीये
अप्रतिम
अप्रतिम
विडंबन निश्चीतच नाही..
विडंबन निश्चीतच नाही.. "सुडंबन" म्हणूया>>>>>> योगला १००००००००००००००००००००००००० मोदक

लै भारी सायबा !
एकदम मस्त... अगदी खरे,
एकदम मस्त...

अगदी खरे, विडंबन नसे हे तर सुडंबन..
पुलेशु!!