'उध्वस्त'

Submitted by नादखुळा on 2 April, 2011 - 04:12

ओल्या जखमा,
शुष्क वाळवंट,
देह निजता
न उरली खंत

खेळ सावल्या,
दूर धावल्या,
थकली उन्हे,
शोधूनी अंत..

चुकल्या दिशा,
भेटूनी वळणे,
श्वास मोजण्या
संपली उसंत..

कोसळला भार,
उन्मळूनी मुळे,
पेलण्या दु:ख
जाहले 'उध्वस्त'

मिटले शिंपले,
सांडूनी मोतीया,
निशब्द ओठांना,
लागले रक्त..
लागले रक्त..

-न्नादखुळा

गुलमोहर: 

नाद्या, काय रे भुताटकी लागली का कॉय तुला!!! रक्त काय ओठ काय... ड्रॅक्युला झालास व्हय? त्या विकु मांत्रिकासाठी आणखी एक गिर्‍हाईक... Proud