बोल मनाचे १

Submitted by धनेष नंबियार on 23 March, 2011 - 11:30

बोल मनाचे - १
=========

आपल्या दाताखाली
आपलेच ओठ,
अन् आपल्या चुकांवर मात्र
भलत्याचेच बोट...

------------------------------------------०

विचाराने मेलेल्या मनाला
कशाचीच भीती नसते,
आज नाहितर उद्या त्याला
चिते मध्येच जळायचे असते.

------------------------------------------०

तुला अलविदा केले तेव्हा
मन अगदि हताश होऊन बसले होते,
पापण्यां मागे अश्रुंचे दोन थेंब कदाचित
या दिवसा साठीच जपुन ठेवले होते.

------------------------------------------०

राप तापलेल्या ऊन्हा मध्ये
एक मजुर दगड फोडत होता,
मारलेल्या प्रत्येक घावाच्या ध्वनित
तो नविन स्वप्न जोडत होता.

------------------------------------------० धनेष ०

गुलमोहर: 

धनेश -निव्वळ अप्रतिम ..!!
आपल्या दाताखाली
आपलेच होट,
अन् आपल्या चुकांवर मात्र
भलत्याचेच बोट...
मानले मित्रा ..!!

उत्तम.....!
तुला अलविदा.....
....................!
मस्त...:-)

राप तापलेल्या ऊन्हा मध्ये
एक मजुर दगड फोडत होता,
मारलेल्या प्रत्येक घावाच्या ध्वनित
तो नविन स्वप्न जोडत होता.

सही!

होट कि ओठ?
राप तापलेल्या ऊन्हा मध्ये
एक मजुर दगड फोडत होता,
मारलेल्या प्रत्येक घावाच्या ध्वनित
तो नविन स्वप्न जोडत होता.>>
छान धनेश अनिया Happy

अनिलजी, नेत्राजी, क्रांतिजी, उमेशजी... धन्यवाद......!

उमेशजी तुमच्यासह इतर मा.बो करांच्या प्रतिसाद आणि मार्गदर्शनाचाच परिणाम.....

पल्ली चेची, चुक सुधारली आहे..... अशाच अभिप्रायाची अपेक्षा...... धन्यवाद!