रोज कौतुकात दंग बायको जरी ,

Submitted by विदेश on 19 March, 2011 - 01:23

( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - )

रोज कौतुकात दंग बायको जरी ,
लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ |

तोच मित्र रोज सिगारेट ओढतो
थेट खिशातून तुझ्या नोट काढतो ,
गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो -
सावध केले मी तुला कितीदा तरी |१|

सांग मित्रमंडळास काय जाहले ?
कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले !
ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले -
एकटाच वाचशील काय तू तरी |२|

तू कधीच रंगढंग नाही उधळला !
मित्रमंडळात तरी कसा गुंगला ?
तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ...
हाय, धावली धरून लाटणे करी |३|

गुलमोहर: 

तू कधीच रंगढंग नाही उधळला !
मित्रमंडळात तरी कसा गुंगला ?
तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ...
हाय, धावली धरून लाटणे करी >>> Lol Lol

आवडली
.
पण, चुकिचा दिवस निवडालात कविता लिहायला.
लाटण्याला राग आला तर पुरणपोळि मिळणार नाहि.

तू कधीच रंगढंग नाही उधळला !
मित्रमंडळात तरी कसा गुंगला ?
तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ...
हाय, धावली धरून लाटणे करी |३|>>> भारीच. Lol
सर्व विंडंबन छान आहे.
पण, चुकिचा दिवस निवडालात कविता लिहायला.
लाटण्याला राग आला तर पुरणपोळि मिळणार नाहि.>>>१०० मोदक.