तुझ्या रंगांच्या कविता...

Submitted by Girish Kulkarni on 18 March, 2011 - 10:44

*******************************
*******************************

कुठलाही ठाव नसलेला रंग
तुझ्या गालांवर चढताच
केव्हढा आव आणत असतो...
कशाचा भाव कुठे वधारेल
याचा काही नेम नसतो !!!

***************************

जेंव्हा रंग बोलायचे , हसायचे अन सगळं ऐकायचे
ते दिवस आज उगाच उगाळावेसे वाटतायत...
तेंव्हा तुझ्या डोळ्यातले समुद्र बाहेर येऊ नयेत म्हणून
तुझ्या पापण्यात जमलेले रंगही गुमान बाहेर यायचे
आता मात्र मस्त चाललय......समुद्राच !!!!

***************************

रंग चढत-उतरत असतात
मनातल्या ऋतूंप्रमाणे....
एव्हढ तरी तुला कळलं असेलच आतातरी....
की तू अजुनही
त्वचेला पोषक रंगांची दुकानच शोधतेयस...!!!!

*******************************
*******************************

गुलमोहर: 

खास!

रंग चढत-उतरत असतात
मनातल्या ऋतूंप्रमाणे........... >>>>>>> सही

सर्व मायबोलीकरानां होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Donald13.gif

खल्लास!!!!!! खुप दिवसांनी देवा.....?

तिनोळ्या झाल्या, पाचोळ्या झाल्या.... आता पुढचा प्रयोग कुठला?

व्वा! काय मस्त लिहिलय!!

"कुठलाही ठाव नसलेला रंग
तुझ्या गालांवर चढताच
केव्हढा आव आणत असतो...
कशाचा भाव कुठे वधारेल
याचा काही नेम नसतो !!!"

मला ह्या ओळी फार म्हणजे फारंच भावल्या.... Happy

सखी - रुणुझुणु - अस्मिता -मुटेसाहेब - विशाल -अमित - बागेश्री - रोहण अन जयु :

सगळ्या मित्रांचे मनःपुर्वक आभार !!!

विशाल :
उम्रभर बहारोंमे की है शायरी..
उम्रभर हमसे ये पागलपन हुवा !!! Happy

उम्रभर कहेंगे हम...
जय देवा... जय देवा...
सॉरी... रहावलं नाही...
एकाहून एक... पहिली जास्तंच आवडली Happy