त्सुनामी

Submitted by वर्षा.नायर on 14 March, 2011 - 14:13

पुन्हा पुन्हा तू येतोस
तुझा मीट्ट अंधार,
गडद काळोख घेउन
पुन्हा पुन्हा ते पाशवी,
ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन
पुन्हा मी लढते, जीव तोडुन
सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन,
स्वत:तील सत्व जपत
तू घोंघावत येतोस त्सुनामी सारखा
आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत
मला संपवून टाकायला
पण मी जिवाच्या आकांताने लढते
स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने
लढते लढते लढते
त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला
पुन्हा एकदा परतवून लावते
माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो
पण मी जिवंत रहाते
आणि पुन्हा मी त्या जिवनरुपी वेताळाला
खांद्यावर घेवुन पुढील प्रवासाला निघते

गुलमोहर: 

छान!!
एक सुधारणा
त्सुनामी
सुनामी नाही

धन्यवाद रेव्यु, श्यामली.
रेव्यु मला 't' silent वाटला, tsunami मधे, म्हणुन मी सुनामी लिहीले.

प्रयत्न सुरेखच. काही तरी अपुर्ण राहिल्याची जाणीव होते आहे. बाकि 'अनालिस्ट' मंडळीच जास्त चांगले सांगु शकतील. - शुभेछा.

छान....

शेवटच्या दोन ओळी (जिवनरुपी वेताळाला... ) मी इथे पोस्ट करतांना गाळल्या होत्या, पण आता त्या पुन्हा अ‍ॅड केल्या आहेत.

तू घोंघावत येतोस सुनामी सारखा
व्वा !
मला वाटलं नैसर्गिक सुनामीवर आहे.
अपेक्षाभंग आवडला
खरी सुनामी मात्र सुन्न करतिये
वर किरणोत्सर्ग!
रामकुमार

दक्षिणा
म्हणतानाही अंधुक त उच्चारला जातो.
म्हणून त्सुनामी.
पण कसाही उच्चारला तरिही तांडव अन दु:ख कमी होत नाही
Sad

धनेश, क्रांति धन्यवाद.
दक्षिणा, रेव्यु बदल केला आहे.