औषधी वनस्पती

Submitted by जिप्सी on 20 February, 2011 - 22:49

=================================================
=================================================
पूर्वी कुणाला खोकला, सर्दी पडसं झाले कि डॉक्टरकडे न जाता अडुळशाचा काढा, गवती चहाचा काढा असे द्यायचे. पोटात दुखायला लागले कि ओव्याचा अर्क किंवा पाण्यात हिंग टाकुन द्यायचे. मुका मार लागला असता निर्गुडीच्या पालांचा लेप गरम करून त्या भागावर लावला जायचा. लहानपणी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आई आम्हाला कडु किराईताचा काढा प्यायला द्यायची. अतिशय कडु असलेला हा काढा जबरदस्तीने प्यायला लागायचा. हा इतका कडु कि याच्या काडीला स्पर्श करून बोट तोंडात टाकले असता जबरदस्त कडवटपणा यायचा. अर्थात हे सारे शरीरासाठी चांगले म्हणुन ते इच्छा नसताना प्यायला लागायचे. अशाच प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती आहेत पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. बर्‍याचवेळा त्या वनस्पती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, "अरे, याला अमुक अमुक म्हणतात का?" हे तर आमच्या इथे भरपूर आहे अस ऐकायला मिळते. तर कधी "आजुबाजुला अडुळशाचा पाला आहे, पण त्याचा काढा कसा करायचा ते माहित नसते" किंवा केला तरी तो कोणत्या मात्रेत द्यायचा हे माहित नसते. आज पेनकिलरने त्वरीत आराम जरी मिळत असला तरी सतत सेवनामुळे त्याचे शरीरावर वाईट परीणाम होतात. म्हणुनच कि काय आजही वनौषधीला पर्याय नाही.

आपणांसही या सार्‍या औषधी वनस्पतींची माहिती आणि ओळख एकत्र मिळावी म्हणुन हा वेगळा धागा काढतोय. यापैकी काहि वनस्पतींची लागवड घरच्या घरी करणे सहज शक्य आहे.

ही माहिती फक्त औषधी वनस्पती ओळखण्यासाठी आहे. स्वप्रयोगांसाठी नाही. यात लिहिलेले उपचार तज्ञांच्या सल्ल्यानेच/मार्गदर्शनाखालीच करावेत.
=================================================
=================================================
पान १
वनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:
अडुळसा, ब्राह्मी, अश्वगंधा, नागकेसर, मरवा, टाकळा, ओवा, वेखंड, रिठा, सब्जा, अक्कलकारा, कापूर तुळस, तमालपत्र, हाडजोडी, गवती चहा, हिरडा, वेलची, सागरगोटा, जायफळ, गुळवेल, सर्पगंधा, दंती, मेंदी, शेर, शतावरी, बेहडा, वनई उर्फ निरगुडी, रुई, रिंगण, पारिंगा, पानफुटी, माका, कोरफड, कडूलिंब, जास्वंद, गुंज, हळदकुंकू.

चर्चा आणि माहिती: विड्याचे पान, गुलबक्षीचे पान, गणेशपुजनात वापरण्यात येणार्‍या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग.
=================================================
पान २
वनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:

कुर्डु, गेळफळ/मैनफळ, पुनर्नवा (शोथग्नी, श्वेतमूला, दीर्घपत्रिका),खडकी रास्ना, अग्निशिखा (कालिकारि, खड्यानाग, बचनाग, लांगलीकंद, कलिहरी).

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा योगेश मस्तच धागा काढलास. फोटो तर नेहमीप्रमाणे छानच.
जागू तुझे काही फोटो दिसत नाहीयत.

आर्या तुम्ही पण फार उपयुक्त्त माहिती देत आहात. छान!! ते गेळ्फळ आणि पुनर्नवाचे.. एकुण सगळेच फोटो कुठे मिळाले? ही झाडे सहजासहजी पहायला मिळत नाहीत. तुमच्या घरी आहेत का?

<<प्लीज, एक डिस्क्लेमर टाकणे गरजेचे आहे. हि माहिती केवळ माहितीसाठीच आहे असा.<<
अगदी अगदी दिनेशदा! अनुमोदन!!
ह्यासाठीच मी त्या कात्रणात असलेल्या मात्रा किंवा किती भाग कुठले चूर्ण घ्यावे इ. माहिती टाकली नाही..!
जिप्सी: इथे वरतीच ठळक अक्षरात टाक की : ही माहिती फक्त औषधी वनस्पती ओळखण्यासाठी आहे. स्वप्रयोगांसाठी नाही. यात लिहिलेले उपचार तज्ञांच्या सल्ल्यानेच/मार्गदर्शनाखालीच करावेत.

<<आर्या तुम्ही पण फार उपयुक्त्त माहिती देत आहात. छान!! ते गेळ्फळ आणि पुनर्नवाचे.. एकुण सगळेच फोटो कुठे मिळाले? ही झाडे सहजासहजी पहायला मिळत नाहीत. तुमच्या घरी आहेत का?<<

निलू, यातले फोटो मी जी पेपरची कात्रणं काढली होती त्यात होते...मी त्यांची बोटॅनिकल नावे टाकुन इंटरनेटवर सर्च करुन टाकलेत.
यातले माझ्याघरी सध्यातरी ब्राम्ही, पांढरी कण्हेर, निर्गुडी, गुळवेल, हळदकुंकू, घाणेरी, पानफुटी, नागवेल ह्या वनस्पती आहेत. माका आणि वेखंड जळून गेलेत. Sad

योगेश चागंला धागा सुरु केला आहेस.

ही माहिती फक्त औषधी वनस्पती ओळखण्यासाठी आहे. स्वप्रयोगांसाठी नाही. << हे एकदम योग्य आहे.
यातले बरेच उपाय मी पाहिलेत, माझे पणजोबा सोलापुर मधे वैद्य होते. त्यामुळे लहानपणापासुनच घरात काही झाले तरी डॉक्टर कडे न जाता झाडपाल्याचा उपाय केला जायचा. डोके दुखत असले की सारवलेल्या जमीनीवर मिठ ओले करून चोळायचे आणि तोच हात कपाळावरून फिरवायचा. जुलाब लागले की बेलफळाचा पाक खायला द्यायचे, ताप आल्यास नारळाची शेंडी ची राख मधातून चाटण म्हणून दिली जायची किंवा तुळस, आले, लवंग, दालचिनी, बेलपान याचा काडा आजुनही असतो , खोकल्यावर अडूळसा, किंवा हळद + गूळ याचे मिश्रणाच्या गोळ्या चघळत रहायचे आणि त्याचा गुण पण येयचा, पण प्रत्तेकाला हे उपाय लागू पडतातच असे सांगता येत नाही.

माका आणि वेखंड जळून गेलेत. << आर्या माक्याची झाडे पावसाळ्यात परत उगवतील. वेखंड कशात लावले आहे कुंडीत का जमीनीवर ??

<<आर्या माक्याची झाडे पावसाळ्यात परत उगवतील. वेखंड कशात लावले आहे कुंडीत का जमीनीवर ??<<
जमिनीतच होते...पण कंदही जळुन गेलेत. Sad

<<<त्यामुळे लहानपणापासुनच घरात काही झाले तरी डॉक्टर कडे न जाता झाडपाल्याचा उपाय केला जायचा. डोके दुखत असले की सारवलेल्या जमीनीवर मिठ ओले करून चोळायचे आणि तोच हात कपाळावरून फिरवायचा. जुलाब लागले की बेलफळाचा पाक खायला द्यायचे, ताप आल्यास नारळाची शेंडी ची राख मधातून चाटण म्हणून दिली जायची किंवा तुळस, आले, लवंग, दालचिनी, बेलपान याचा काडा आजुनही असतो , खोकल्यावर अडूळसा, किंवा हळद + गूळ याचे मिश्रणाच्या गोळ्या चघळत रहायचे आणि त्याचा गुण पण येयचा, पण प्रत्तेकाला हे उपाय लागू पडतातच असे सांगता येत नाही. <<

सचिन्_साचि! असे काही अनुभवसिद्ध उपचार तुम्हाला वारसाहक्काने माहित असतील तर इथे टाका.
http://www.maayboli.com/node/23611 Happy

bramhi.jpg

संस्कृत नावः मण्डुकपर्णी, माण्डुकी
लॅटिन नावः Centella asiatica, Hydrocotyle asiatica
कूळः Apiaceae, Umbelliferae
इतर भाषिक नावे: मराठी- ब्राम्ही, कारिवणा, हिंदी- ब्रम्हमाण्डुकी, ब्राम्हीभेद, ब्रम्हो, ब्रम्ही, गुजराती- ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही, इंग्रजी- इंडियन पेनीवर्ट
उपयोगी अंगः पंचांग (विशेषकरुन पाने)

या वनौषधीची पाने बेडकाच्या पंजासारखी दिसतात म्हणुन याला मण्डुकपर्णी म्हणतात.
त्वचेच्या रोगात ब्राम्ही उत्तम गुणकारी आहे. कुष्ठामध्ये त्वचेवर लेप करतात. ब्राम्ही रस व त्याच्य दहा पट तेल एकत्र करुन सिद्ध केलेले तेल डोक्याला लावण्यासाठी श्रेष्ठ आहे. याने मेंदू थंड रहातो, केसांची वाढ होते, स्मृती वाढते. मनःशांतीसाठी तसेच शांत झोप लागण्यासाठी ब्राम्ही अत्यंत उपयोगी आहे. रक्तशुद्धीवर, मेंदुच्या विकारांवर, जुनाट इसबावर ब्राम्हीच्या व गुंजेच्या पानांचा रस देतात. भूक वाढविण्यास ब्राम्ही अत्यंत उपयोगी आहे. कास, श्वास, स्वरभेदात, हृदय दौर्बल्यात ब्राम्ही उपयुक्त आहे. ब्राम्हीमुळे बुद्धीची धारणाशक्ती वाढते. पाने उकळुन तयार केलेला काढा महारोगावर वापरतात. क्षयरोगात, मूत्रकृच्छावर, अपस्मार/उन्मादावर याचा रस वापरतात. बोबडे बोलणा-या मुलांना ब्राम्हीची पाने खाण्यासाठी देतात.

डॉ. मधुकर बाचूलकर यांच्या दै. सकाळमधील 'ओळख वनौषधींची' या सदरातील लेखावरुन साभार.

nirbramhi.jpg
संस्कृत नावः ब्राम्ही, तोयवल्ली, तिक्तलोणिका, जलशाया, कपोतबंका
लॅटिन नावः Bacopa monnieri, Herpestis monniera, Moiera cunefolia
कूळ : Scrophulariaceae
इतर भाषिक नावे: मराठी- ब्राम्ही, नीर ब्राम्ही, जलब्राम्ही,हिंदी- जलनीम, ब्रम्ही, ब्राम्ही, गुजराती- बाम, नेवरी, कडवी लुणी, जलनेवरी, इंग्रजी- थाईम लिव्हड ग्रेशिओला.
उपयोगी भागः पंचांग
ब्राम्ही (मंडुकपर्णी) व नीरब्राम्ही या दोन्ही वनस्पती सर्वसाधारणपणे सारख्या गुणधर्माच्या आहेत. परंतु, मुख्यतः मंडुकपर्णी या वनस्पतीचे कार्य त्वचेवर दिसते तर नीर ब्राम्हीचे कार्य मज्जातंतूवर दिसते. अर्थात दोन्ही वनस्पती उन्माद, अपस्मारावर उपयुक्त व मनःशांती करणा-या आहेत.
नीर ब्राम्हीची मुख्यतः क्रिया मगज व मज्जातंतूच्या रोगावर होत असते. त्यामुळे मेंदूस पुष्टी मिलते. नीर ब्राम्ही मज्जातंतुंचे पोषण करणारी, मज्जासाठी मूल्यवान व शक्तिवर्धक आहे. आचके येणे, बेशुद्ध अवस्था इ. मज्जासंस्थेच्या रोगांसाठी मानसिक रोगात हिचा वापर करतात. बुद्धी स्मरणशक्ती,व आयुष्य वाढण्यासाठी ब्राम्ही चूर्ण मधातुन देतात. ज्वरात भ्रम, प्रलाप, उन्माद इ. लक्षणे असल्यास ब्राम्हीचा लेह देतात. उदासिनपणा, मनोदौर्बल्य दूर करण्यासाठी, बुद्धीवर्धनासाठी नीर ब्राम्हीचा उपयोग होतो.
लहान मुलांच्या सर्दीत, खोकल्यात पानांचा रस देतात. यात वमनकारक व रेचक गुण असल्याने कफ उलटुन पडतो व रोग्यास आराम मिळतो. डांग्या खोकल्यात ब्राम्हीचा लेह देतात.
नीर ब्राम्हीत 'ब्राम्हीन' नावाचे अल्कलॉईड हृदयासाठी शक्तिवर्धक आहे. ते हृदयास शक्ति आणि नियमितपणा प्रदान करते.
पित्तशमनसाठी ब्राम्हीचा स्वरस देतात. नीर ब्राम्हीमुळे लघवीचे प्रमाण वाढते. मूत्रदाह, शूल, लघवीतुन रक्त पडणे, मूतखडा यांमधे नीरब्राम्हीचा उपयोग होतो. ब्राम्ही स्वरसात, त्रिफळा, कचोरा, वाळा इ. द्रव्ये टाकुन सिद्ध केलेले तेल केसांच्या वाढीसाठी व मनःशांतिसाठी उपयुक्त आहे.

kapalfodi.jpg
नावः कपाळफोडी
संस्कृत नावः काकमर्दनिका, कर्णस्फोटा
लॅटिन नावः Cardiospermum helicacabum L.
कूळः Sapindaceae (रिठा कूळ)
इतर नावे: कानफुटी, लटाफटकी, नयफटकी, कनफूटी, करोटीओ
उपयोगी भागः पाने
उपयोगः याच्या पानांचा रस कान फुटल्यास वापरतात. नविन संधीवातात ही वनस्पती उपयुक्त आहे. पण एकेरी वापरु नये, उलट्या जुलाब होऊन उपयोगी पडत नाही, त्याबरोबर सुगंधी वनस्पती घ्याव्या लागतात. कपाळफोडीच्या पानांचा रस, कंकोळ, दालचिनी, लेंडीपिंपळी, एरंडेल किंवा एरंडीच्या पानांचा रसातुन घेतल्यास संधीवात सुरवातीसच कमी होतो.

ते गेळफुल अनंताच्या फुलासारखे दिसत आहे.

पुनर्नवा मुळी ही रांजणवाडीकरता अतिशय उपयुक्त आहे. कधीही रांजणवाडी झाली तर मी ही दुधात उगाळुन लावतो दुसर्‍या दिवशी निचरा होतो रांजणवाडीचा.

kuda.JPG
नावः पांढरा कुडा, इंद्रजव, कोरया, कडो
संस्कृत नावः कुटज, गिरीमल्लिका, वत्सक, इंद्रजव, कलिंग, भद्रयव
लॅटिन नावः Holarrhena pubescens (Butch. Ham.) Wall.ex G. Don
कूळः Apocynaceae (करवंद कूळ)
उपयोगी भागः सर्व भाग

उपयोगः कुड्याचा अतिसारावरील उपयोग सर्वश्रुत आहे. कुडा असलेले लघुगंगाधर चूर्ण अल्सरेटिव कोलायटिस विकारावर कोणत्याही अ‍ॅलोपॅथिक औषधापेक्षा श्रेष्ठ आहे. लहान मुलांना नेहमी होणारी सर्दी, बालदमा यावर कुड्याच्या पानांचा रस, काळी मिरीच्या दोन दाण्यांबरोबर दिला असता बालदमा होण्याची प्रवृत्ती कमी होते.
सामान्य अतिसारावरही हे चूर्ण उपयुक्त आहे. कुडासाल, खैरसाल, करंजसाल, नागरमोथा, पळससाल एकत्र घेतल्यास जास्त वजन असलेल्या व्यक्तींच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे. वरचेवर होणारी टॉन्सीलची सूज, चिकट शेंबुड व तोंडाला येणारा वास कुडापाळ (मुळाची / खोडाची साल) व दारुहळद यांच्या काढ्याने बरे होतात.

041Asparagus_racemosus.JPG4870-asparagus-racemosus-herbal-supplement-women-ton.jpg

शतावरी

संस्कृत नावः शतावरी, नारायणी, अतिरसा, वरी
मराठी- शतावरी, शतावर
हिंदी- सतावर, सतावरी, सतमुली, सरनोई
गुजराती- शतावरी
इंग्रजी- wild asparagus
लॅटिन नावः Asparagus racemosus
कुळः Liliaceae

उपयोगी अंगः मुळ्या, अंकुर
शतावरी त्रिदोषनाशक एक उत्तम रसायन आहे. शतावरी वात व पित्तशामक तर कफास वाढवणारी आहे. रसापासुन शुक्रापर्यंत सर्व शरीरधातुंना बल देणारी, बुद्धीचा तल्लखपणा वाढवणारी, डोळ्यांना हितकारक आहे. शतावरीच्या तेलास 'नारायण तेल' म्हणतात. हे तेल सर्व प्रकारच्या वातावर गुणकारी आहे. नारायण तेल (तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली) पोटात घेतल्याने अर्धांगवायु, संधिवात व महिलांना फेफरे येणारा रोग बरा होतो.नारायण तेलाच्या बस्तीने सर्व प्रकारचा वायु नाहीसा होतो. स्त्रियांच्या आर्तव रोगावर या तेलाची बस्ती देतात.
पित्तप्रकोप, कुपचन व जुलाब यात शतावरी मधातुन देतात. वातरोगात शतावरी मध, दुध व पिंपळीबरोबर तर कफरोगात शतावरीचा खंडपाक देतात. शक्ती वाढवण्यासाठी शतावरीची दुधात पेज करुन खडीसाखर व जि-याबरोबर देतात. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे छाती, घशाशी जळजळ, तोंडास कोरड पडणे, डोके दुखणे, आंबट-कडु ढेकर किंवा उलटी होणे, नाभीभोवती पोट दुखणे या अवस्थांमधे शतावरी अमृताप्रमाणे काम करते. कुपचनात शतावरीच्या अंकुराची भाजी देतात. यामुळे वायु सरतो, पोट साफ होते व अन्न पचते. लघवी अडत असेल, दाह होत असेल तर शतावरीचा रस दुध व साखर घालुन देतात. मूतखड्यावर शतावरीचा रस उपयुक्त आहे. स्त्रीयांच्या प्रदर रोगावर शतावरीचे चूर्ण दुधात उकळुन देतात. शतावरीच्या मुळ्या वाटुन पिंपळी, मध व दुधाबरोबर दिल्यास गर्भाशयाची पिडा कमी होते.

जिप्स्या मस्त रे "आयुर्वेदिक दवाखानाच"काढ्लास Happy

आर्ये, खुप उपयुक्त माहीती देत आहेस Happy मला माझी 'आज्जी' आठवली.
आणि "संजिवनि" मधला "दादी माँ का खजाना". Happy

घाणेरी:
677px-Lantana_camara_bandera_espa%C3%B1ola.jpg

लॅटीन नावः Lantana camara L. var. aculeata
कुळ : Verbenaceae (निर्गुडी कुळ)
इतर नावे: तांतानी
उपयोगी भागः मूळ

निर्गुडी कुळातली अतिशय उपयुक्त वनस्पती...पण ग्रंथोक्त नसल्याने वापरली जात नाही. ही शिवण, सागवान किंवा जीतसाया यापेक्षा अधिक तीव्र पण निर्गुडीपेक्षा सौम्य आहे. "Fistula in ano" या दुर्धर आजारात घाणेरीच्या मुळांचा काढा दारुहळद, देवदार, मंजिष्ठा यांबरोबर वापरल्यास शस्रक्रियेची गरज रहात नाही किंवा त्याची व्याप्ती तेवढी कमी करता येते. घाणेरी सागवान किंवा शिवणप्रमाणे गर्भ संरक्षक म्हणुन वापरता येत नसली तरी गर्भ रहावा म्हणुन गर्भाशयाच्या शोधनकार्यात या दोन्ही वनस्पतींपेक्षा उजवी ठरते. घाणेरीच्या मुळांच्या चुर्णाने खाज असणारी, ठणकणारी, रक्तस्त्राव होणारी मूळव्याध ताबडतोब कमी होते तसेच याबरोबर हिरडाचूर्ण वापरल्यास मूळव्याध पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी होतो.

घाणेरीचा पण औषधी उपयोग होतो हे माहीत नव्हत. धन्स आर्या.
मी लावलेल्या अश्वगंधाला आता छोटी फुले आली आहेत.
कानफुटी बर्‍याच ठिकाणी पाहीली आहे मी.

आर्या, घाणेरीचे नाव टणटणी असे पण आहे. शिवाय फोटोतली फूले हि विकसित जातीची आहेत. मूळ जातीतली फूले, पिवळट गुलाबी अशी असतात.
ती ग्रंथोक्त नाही, कारण भारतात ती पूर्वी न्व्हतीच.

दिनेशदा मारुती चित्तमपल्ली यांच्या पुस्तकात तिच काहीतरी वेगळ्च नाव आहे राय--- असे काहीतरी उद्या परत बघुन सांगते.

tantani.jpg
दिनेशदा, टणटणी याला म्हणतात ना? Uhoh
लहानपणी ही फुलांची दांडी दोन बोटांच्या चिमटीत पकडुन आम्ही नखाने हे फुल तोडत :" रावणा तु सितेला का पळवुन नेलस, तुझं मुंडकच तोडीन" असं म्हणायचो नि फुलाचं मुंडकं उडवायचो!! Sad

हो हो अगदी बरोबर रायमुनियाच घाणेरीच दुसर नाव त्या पुस्तकात आहे.

आर्या आम्ही पण तेच खेळायचो.

जागुडे....काय योगायोग ना! Happy
हो हो सचिन्... हे ही नाव ऐकलय याचं! त्याच्या पानांचाही रस जखमेवर टाकतात ना?

खूपच छान धागा.......
अजकाल याच महत्व कमी होत चालल आहे........
लेखमाला सुरू करा......
माझ्याकडे पण आहे थोडी फार माहीती.....(परीक्षेला अभ्यास केला होता.)

रामचंद्र ह्याचे औषध करण्याची पद्धत मी औषध करणार्‍यांकडे खोदुन खोदुन विचारली. पण दुसर्‍याला सांगितल्यावर लागु पडत नाही ह्या अंधश्रद्धेवर ते सांगायला तयार नाहीत. थोडस सांगितल की रिंगणाची फळे घेउन ती वाटीने दही घेउन रगडायची. अजुन पुढे आहे. परत कधीतरी खोदुन खोदुन विचारेन.

Pages