कुठे गेली सगळी माणसे

Submitted by निनाव on 15 March, 2011 - 16:34

कुठे गेली सगळी माणसे
नाहिच कसे कुणी मज दिसेना?

तो पान वाला पण दिसत नाहिये आज
ज्याच्या दुकाना च्या बाहेर उभे राहुन
विविध आकॄत्यांमधे ...धुर उडायचे
ओठांचे चंबु मग शुन्यात बसायचे

बाजार ही रिकामेच दिसते आहे आज
कुणास ठाउक का?
न ते आवाज न ते गोंगाट
सगळे संपले कि..विकले गेले आज?

तिथं त्या कडु-लिंबाच्या बाजुला
असायचा एक -बस-थांबा
तो ही दिसत नाहिये मला
प्रवासी गेले आहेत निघुन
कि संपले आहे प्रवास?

डोंबारीच दिसत आहेत फक्त आज
ओसाड रस्त्यांवर मला
तोल सांभाळतांना हसत आहेत
का त्या दोरी चीच आहे कास?

मारुन पाहिल्या हाका त्यांना
पण कुणी काही बाहेर येईना
जात नसेल का माझा आवाज
कि यायचेच नसेल त्यांना?

कुठे गेली सगळी माणसे
नाहिच कसे कुणी मज दिसेना?

गुलमोहर: 

निनाव -
तिथं त्या कडु-लिंबाच्या बाजुला
असायचा एक -बस-थांबा
तो ही दिसत नाहिये मला
प्रवासी गेले आहेत निघुन
कि संपले आहे प्रवास?
छान चित्र उभे किलेस