Submitted by जर्दाळू on 14 March, 2011 - 10:40
चुकून दिसलीस पण दिसून चुकलीस
"इयँओव"
भेदरलेले तपकीरी डोळे
लुसलुशीत कान
ओंजळीत मावशील एवढी होतीस
अन शेपटी सोनेरी
घाणेरड्या बशीतून दूध काय
शिळी पोळी काय
गलेलठ्ठ
"अहो प्स प्स करू नका,
तिच नाव ठेवू"
मनी, मावशी सगळे पर्याय एकमताने बाजूला
हं! एकच मत चालायचं त्यावेळी
हिचच मत फक्त
आताही एकच मत चालत
माझच फक्त
ही नाही राहिली आता
तर नाव
म्हणे आदराने बोलवायला हव
आपली पोरे परगावी
ही बिचारी बघेल आपल्याकडे
म्हणून आदर
मांजरीला पगार नसतो ना
टायमिंगपण नसत
गुंडुली
अहो गुंडुली म्हणायच म्हणे
बर बुवा
ही अॅटॅकने गेलेली पाहिल अन स्वतः गेली गाडीखाली
मला वेडा म्हणतात सगळे
रस्त्यावरून फिरतो
कुठल्याही घरात डोकावतो अन विचारतो
"गुंडुली आहेत का इथे?"
पण ठरवलय आता
आता नाही विचारणार
गुलमोहर:
शेअर करा
.....
.....

(No subject)
नि:शब्द !
नि:शब्द !
माहित नव्हतं!
ओह वाईट वाटल
ओह वाईट वाटल
मन गंभीर झाले
मन गंभीर झाले
जर्दाळू आहे ना इथे......
जर्दाळू आहे ना इथे...... !!!!!
मग ठीक आहे.
काये त्यात वाकडी दु:खी तोन्डे
काये त्यात वाकडी दु:खी तोन्डे करण्यासारखे. फडतूस कविता. ओरिजिनल आयडीने लिहायची लाज वाटली का? त्यापेक्षा तुमच्या गझला फार चांगल्या हो तुम्हि तेच लिहा. (फक्त)
सहमत आहे 'ए - मॅन'! अत्यंत
सहमत आहे 'ए - मॅन'!
अत्यंत फडतूस कविता आहे.
हा आयडी माझाच आहे. जर्दाळू!
'गाजलेले मराठी काव्य (?) - १' या धाग्यावर होत असलेली चर्चा पाहून घेतलेला!
जर्दाळू या नावाने विंदांच्या नावाखाली एक कविता (?) वाट्टेल तशी खरडून 'बेफिकीर' यांना अभिप्राय मागीतला त्या कवितेचा! हेतू हा की कुणीतरी 'विंदांची कविता' आहे हे मानून स्वतःहून अर्थ सांगेल. तसे जरी कुणी केलेले नसले तरीही मी स्वतः 'बेफिकीर' या आयडीनेच 'विंदांच्या नावाखाली' एक कविता खरडली व अर्थ विचारला त्या कवितेचा मात्र एका सदस्याने अगदी मनापासून अर्थ सांगितला.
जे सिद्ध करायचे होते ते जर्दाळूला जमले नाही पण मला जमले. सिद्ध झालेच! खालील सर्व सिद्ध झाले.
१. नाव कुणाचे आहे यावर मोठेपण ठरते, स्वतःचे मत कुणीही तपासत नाही, केवळ 'जग एखाद्याला मोठे म्हणते म्हणून आपणही म्हणायचे असते' असाच समज असतो. विंदांची म्हणून कुठलीही टुकार कविता खपवली तरी ती ग्रेट ठरू शकते.
२. वाचन सर्वच धाग्यांचे करतात बहुतेकजण! पण प्रतिसाद मात्र विशिष्ट सदस्यालाच देतात. यात नि:ष्पक्षपातीपणा अजिबात नसतो. लेखनाच्या दर्जाशी प्रतिसादांचा काही संबंधच नसतो. हा आपला, तो परका यावर प्रतिसाद देणे / न देणे हे ठरते. जर्दाळू नावाने लिहीलेल्या अत्यंत सुमार कवितांना अनेक प्रतिसाद उत्स्फुर्तपणे आले. या सदस्यांनी 'मीच माझ्याच आय डी ने लिहीलेल्या जर्दाळू पेक्षा बर्या' कवितांकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. सर्वच्यासर्व 'जर्दाळू कविता' (सदर कविताही धरून) मी केवळ चार, पाच मिनिटात ऑनलाईन लिहूनच प्रकाशित केल्या. (सगळेच लिखाण मी ऑनलाईनच करतो तसे खरे तर!) दर्जाचा प्रतिसादांशी संबंध नसतो हे सिद्ध झाले.
३. मुक्तछंद कुणीही कसाही लिहू शकतो व त्यात कुणीही काहीही आक्षेप घेऊ शकत नाही हेही सिद्ध झाले. तसेच, मनात आणले तर अजिबात विचार न करता खरडलेल्या कोणत्याही ओळी कविता ठरू शकतात ही दुर्दैवी बाबही सिद्ध झाली.
जर्दाळू या आयडीच्या अस्तित्वाचा हेतू विंदांच्या धाग्यावर साध्य झाला नसला तरी आता झालाच. तोही नजरचुकीनेच म्हणा, पण साध्य झाला.
एकंदर, आंतरजालीय आभासी जगत खरे वागत नाही.
असो, जर्दाळू कवितांना आजवर प्रतिसाद देणार्यांचे आभार! जर्दाळू यांचे आज प्रयाण झाले मायबोलीवरून!
-'बेफिकीर'!
-'बेफिकीर'! >>>
-'बेफिकीर'! >>>
'बेफिकीर' अशक्य आहे (तुम्ही
'बेफिकीर' अशक्य आहे (तुम्ही इतके स्पष्टीकरण दिलात तरीही).
"जर्दाळु" हा आयडी अजुनही अस्तित्वात आहे आणि तो तुमचा नाही.
(माझा ही नाहीच)
"अमन" मला यावर संशय......
"अमन"
मला यावर संशय......
त्यापेक्षा तुमच्या गझला फार
त्यापेक्षा तुमच्या गझला फार चांगल्या हो तुम्हि तेच लिहा. (फक्त)>
मला यावर संशय......
"अमन"
(No subject)