गेल्या हिवाळ्यात मी पुण्यातल्या गिरीदर्शन बरोबर रामसेज-धोडप-कंचना असा नाशिक प्रांतातला ट्रेक केला. या ट्रेकमध्ये सांगण्यासारखे फारसे न घडल्यामुळे फक्त फोटो टाकत आहे
रामसेज हा किल्ला तसा लहान आकारातच मोडण्यासारखा...आणि गावातून तर त्याच्या आकाराची अजिबात कल्पना येत नाही.
जसे जसे किल्ल्याकडे जावे तसे त्याच्या आकाराचा अंदाज येत जातो.
या किल्ल्याला अभिमानास्पद असा इतिहास आहे...मोगलांच्या स्वारीदरम्यान, जेव्हा मोगल सैन्य किल्ल्यापाशी पोचलं तेव्हा किल्ल्याचा लहान आकार पाहून एका मोगल सरदाराने वल्गना केली की एका दिवसात शहनशहांना हा किल्ला जिंकून देतो. आणि त्यांनी पूर्ण शक्तीनिशी किल्ल्यावर चढाई केली...मराठे सैन्य सावध होतेच त्यांनी इतका तिखट प्रतिकार केला की खानाचे डोळेच पांढरे झाले...
एक दिवसाची मुदत हळुहळु एका आठवड्यावर नंतर एका महिन्यावर गेली तर हट्टी मराठे हार मानेनात..त्यांनी एकांगी किल्ला लढवत ठेवला...होता होता वर्ष झाले तर किल्ल्याची तब्येत खणखणीतच...
मोगल सैन्य टेकीला आले पण काहीही उपाय सापडेना...जितके हल्ले करावे तितकेच त्यांची शक्ती कमी होत चालली होत होती. सुरुंग लावता येत नव्हता, वेढा घालून उपयोग नाही...रोज दारूगोळा आणि माणसांचा मात्र नाश होत चालला होता.
अशी तब्बल दोन वर्षे गेली पण तरीही काहीही नाही. एक दिवस एक मौलवी सैन्यात दाखल झाला. त्याने सांगितले मी दैवी शक्ती जाणतो मला मुबलक पैसा आणि साधन सामग्री द्या...मी किल्ला जिंकून दाखवतो...
मग त्याने एका आठवड्याभरात एक सुबक असा सोन्याचा नाग बनवला. त्याला मंतरले आणि मग खानाला म्हणाला, आता आपल्याला भिती नाही. शत्रुची गोळी किंवा बाण आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. तुम्ही माझ्यामागोमाग या..
आणि मग डोक्यावर तो नाग धरून मौलवी चालत किल्ल्याकडे निघाला..त्यापाठोपाठ एका रांगेत सगळे मोगल सैन्य...
किल्ल्यावरच्या मराठ्यांना हे अद्भुत दृश्य दिसल्यावर त्यांनीही नेहमीची गोळामारी थांबवली आणि गंमत बघत बसले...
नेहमीच्या पल्ल्यात गेल्यावरही वरून काहीच मारा होत नाही असे पाहिल्यावर मोगलांचा जोर वाढला...
अल्ला हो अकबर करत सगळे सैन्य गर्जना करू लागले पण तरीही कुणी त्या मौलवीला ओलांडून हल्ला करायला पुढे आले नाही. संरक्षक कवच तुटले तर...
असे करत करत मराठ्यांनी त्यांना बरेच पुढे येऊ दिले...विजयाच्या आनंदात मोगलही बेभानपणे पुढे आले...आणि वरून एक गोळी सणसणत आली आणि नागासकट मौलवी महाशय धाराशायी झाले...
झाले...उरल्या सुरल्या मोगल सैन्याचा धीर सुटला आणि त्यांची कत्तलच उडाली.
विश्वास बसणार नाही पण तब्बल साडेसात वर्षे तो किल्ला मोगलांशी झुंजत राहीला...
प्रचि १
इंडियन व्हाईट बॅक व्हल्चर बहुदा
अरे भारी! पक्षी पण लय भारी
अरे भारी!
पक्षी पण लय भारी
नावावरून मला वाटलं, की "रामसे बंधुंचा किल्ला".
ह्याला कारण "अमानविय".
चंपु..."मचुपिचु" "रामसेज">>
चंपु..."मचुपिचु"
"रामसेज">> तुझी (इथे 'मानसिक' असे वाचावे) तब्बेत दिवसेंदिवस ढळत चाललीय रे.
थोडं .... उसंत घे. काळजी वाट्ते.
फोटो छान आहेत "रामसेज" चे.
हो मला पण असेच काहितरी वाटले
हो मला पण असेच काहितरी वाटले रामसेजवरून
मस्त माहिती
मस्तच प्रचि आशू.
मस्तच प्रचि आशू.
मस्त प्रचि चँप...
मस्त प्रचि चँप...
फोटो छान..पण माहिती जास्त
फोटो छान..पण माहिती जास्त आवडली रे... सही ! धन्यवाद
धन्यवाद सर्वांना... नावावरून
धन्यवाद सर्वांना...
नावावरून मला वाटलं, की "रामसे बंधुंचा किल्ला".
ह्याला कारण "अमानविय". फिदीफिदी
हो मला पण असेच काहितरी वाटले रामसेजवरून
च्यामारी मी या अमानविय मुळे प्रसिद्ध होतोय का कुप्रसिद्ध काय कळत नाहीये...:G
चातका - तुझी पोस्ट काय कळली नाही...इतका का गूढ बोलून राहीलास बे...:)
डॉ. रोहीत धन्स
यो - मलापण फोटोंपेक्षा माहीतीच जास्त द्यावीशी वाटली.
..फोटो काय खास नाय मिळाले
चातका - तुझी पोस्ट काय कळली
चातका - तुझी पोस्ट काय कळली नाही...इतका का गूढ बोलून राहीलास बे...>>>
घे.. मी "अमानविय" नाही रे
घे या वेळी
घे.
झालास तर प्रसिध्दचं होशिल रे
कारण "कुप्रची" कामं आपण करत नाही.
मस्तच रे!!!! प्रचि ९ विशेष
मस्तच रे!!!!
प्रचि ९ विशेष आवडला.
अफाट फोटोज् रे... सर्वात
अफाट फोटोज् रे...
सर्वात पहिला, प्रचि १ आणि ७ फार आवडले...
"रामसेज"... नावावरुन मला तो ईजिप्शियन वाटला..
रामिसेज ईजिप्त चा एक फॅरो(सम्राट) होता..
आशु, फोटो छानच. गडाचा इतिहास
आशु, फोटो छानच. गडाचा इतिहास मस्त वर्णन केलास. धन्यवाद.
घ्या!!! अजून एक करायचा
घ्या!!! अजून एक करायचा राहिलाय...
मस्तच माहिती गडाचा इतिहास पण
मस्तच माहिती गडाचा इतिहास पण छान प्रची आवडले

या ट्रेकमध्ये सांगण्यासारखे फारसे न घडल्यामुळे फक्त फोटो टाकत आहे>>>>
गिरी दर्शन मुळे कदाचीत ?
मस्त आहे सर्वच प्रचि
मस्त आहे सर्वच प्रचि
सही फोटो
सही फोटो
छान लिहिलय. फोटोहि सुंदर.
छान लिहिलय. फोटोहि सुंदर. किल्याचे म्हणून काही अवशेष दिसत नाहीत.
फोटो मस्त आहेत..
फोटो मस्त आहेत..
छान
छान
सर्वांना
सर्वांना धन्यवाद...
मार्कोपोलो - तुम्हाला माझे फोटो आवडले यामुळे खरेच खूप बरे वाटत आहे...
"रामसेज"... नावावरुन मला तो ईजिप्शियन वाटला..
रामिसेज ईजिप्त चा एक फॅरो(सम्राट) होता.
हो मीपण वाचलेय त्याबद्दल
दादाश्री - अगदी बरोबर...ट्रेकिंग ग्रुपबरोबर जाण्यात हाच एक मोठा तोटा असतो की तुमचे थ्रील जवळपास शून्याच्या बरोबर होते. कारण सगळा प्रोग्राम आखीव-रेखीव असतो. त्यात तुम्हाला साहस अनुभवण्याची काहीच संधी मिळत नाही...
लीडर सांगेल त्यामागे चालत रहायचे एवढेच काम...पण दोन दिवसात तीन किल्ले करता आले हे त्यातल्या त्यात समाधान
आनंदयात्री - होतील रे...सगळे होतील तुझे..
मुकु, मंदार, दिनेशदा, हिरकू, प्रगो, जिप्सी...सर्वांना धन्यवाद
मस्तच. शक्यतो किल्ल्यांच्या
मस्तच. शक्यतो किल्ल्यांच्या बद्दल माहीती लिहीताना कसे जावे हे पण लिहीले तर बरे होईल. विशेषतः असे जवळचे व चढायला सोप्पे किल्ले असले तर फॅमीली ट्रेक पण करता येईल की नाही हे कळु शकेल.
मस्तच रे आशु... मीही हा
मस्तच रे आशु... मीही हा किल्ला डिसेंबर २००८ ला केला होता... त्याचे प्रची झब्बु म्हणुन देतो...
आशु, फोटो छान आहेत पण इस्टोरी
आशु,

फोटो छान आहेत
पण इस्टोरी लईच भारी, आवडली !
शेवटी मोगलांनी किल्ला मिळाला नाही हे वाचुन बरं वाटल...!
हे सुद्ध्हा मस्तच फोटो...
हे सुद्ध्हा मस्तच फोटो...
कांदेपोहे - नक्कीच, पुढील
कांदेपोहे - नक्कीच, पुढील लेखापासून ही सूचना नक्कीच अंमलात आणीन..
पण असे वाटते की किल्ल्याबद्दल माहीती सांगीतली तर वाचनाचा फ्लो थोडा विस्कळीत होतो...
मला याआधीही काही जणांनी सांगितली आहे ही बाबा, पण अजुन ती अंगवळणी पडत नाहीये...
मनोज - जरूर टाक मित्रा,
अनिल, स्मिहा - धन्स
माहिती व फोटो छानच!
माहिती व फोटो छानच!
आशु, गिधाडाचा फोटो प्रचंड
आशु, गिधाडाचा फोटो प्रचंड आवडला. बोले तो शोलेड....
धन्स प्रज्ञा... भुंग्या -
धन्स प्रज्ञा...
भुंग्या - पाखरं सोडून इतरही काही बघत जा...
(त्या गिधाडाला पाखरू म्हणायला कससंच होतयं):)
जबरदस्त असेल रे त्याकाळी हा
जबरदस्त असेल रे त्याकाळी हा किल्ला...


साडे सात वर्षे बलाढ्य मुघलांना तोंड देणे आणि आपले अस्तित्व टिकवुन ठेवणे म्हणजे खायची गोष्ट नाही राव. महत्वाचे म्हणजे एवढासा किल्ला देखील लढवणे म्हणजे त्यांच्या स्वराज्यावरच्या, शिवरायांवरच्या निष्ठा किती प्रखर आणि पवित्र असतील याची मुर्तीमंत साक्षच आहे !!
शिवप्रभूंच्या त्या महापराक्रमी मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा......!
पराक्रमाची शर्थ की काय म्हणतात ती हीच असावी !!
फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम !!
प्रती ११ या मध्ये दिसतंय ते
प्रती ११ या मध्ये दिसतंय ते काय आहे ते सांगितलं असता तर बर झाल असत कारण खूप सुरेख दिसत आहे ते जे काही आहे...............
रामसेज???? आम्ही त्याला
रामसेज???? आम्ही त्याला रामशेज म्हणतो
ह्या किल्ल्या बद्द्ल मला माहीत असलेली गोष्ट म्हणजे.. राम वनवासात असतांना पंचवटीत पोहोचण्याच्या आधी रात्री इथे झोपले होते म्हणुन याचे नाव 'रामशेज'.
Pages