अतुल्य! भारत - भाग १२ - खजुराहो, मध्य प्रदेश

Submitted by मार्को पोलो on 31 January, 2011 - 05:18

खजुराहो म्हटले कि आठवतात भव्य मंदिरे, अत्युच्च शिल्पकला, ह्या देशाच्या भरभराटिची, संस्कृतीची आणि संपन्नतेची साक्ष देणारी कलाकुसर...
आम्ही ह्या अद्भुत भूमिची सफर डिसेंबर, २००९ च्या शेवटच्या आठवड्यात केली. खजुराहो, दिल्ली पासुन रेल्वेने १० ते १२ तासांवर आहे. स्टेशन अगदी छोटेसे आणि स्वच्छ आहे. हे गाव हवाई मार्गाने मुंबई, दिल्लीला आणि कोलकत्याला जोडलेले आहे. खजुराहो गाव तसे फारच लहान आहे पण येथे अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि पंचतारांकित हॉटेल्स आहेत.
खजुराहो हे गाव प्राचिन काळी खजुरांच्या झाडांनी वेढलेले असल्याने हे नाव पडले.
ह्या गावाची लोकसंख्या जेमतेम १५००० असेल. ईथल्या लोकांची उत्पन्नाची साधने म्हणजे पर्यटन आणि शेती.
हॉटेल्स ५०० रुपयांपासुन १५००० पर्यंत मिळतात. जेवणात पराठ्या पासुन पिझ्झ्यापर्यंत आणि सांबर पासुन सिझलर्स पर्यंत सर्व काही मिळते.
ईथे गेल्यावर फिरण्याचे सोपे आणि स्वस्त साधन म्हणजे रिक्षा. ईथे मंदिरे पाहताना गाईड नक्की करा.
ईथे एव्हडे परदेशी पर्यटक येतात कि तुमच्या शेजारी उभा राहुन एखादा अगदी साधा वाटणारा गाईड अस्खलिखित फ्रेंच किंवा जपानी बोलायला लागला कि चाट पडायला होते.

खजुराहो नीट पहायचे म्हणजे कमीतकमी ३ दिवस तरी पाहिजेत.

आम्ही ह्या भूमिची सफर ईथे जवळच असलेल्या पांडव गुहांपासुन सुरु केली.
पांडव गुहांचा रस्ता पन्ना च्या जंगलामधुन जातो.

प्रचि १
पन्नाचे जंगल

असे म्हणतात की ह्या गुहांमध्ये पांडवांनी वनवासात असताना वास्तव्य केले.
असे म्हणतात की ईथे जे तळे आहे ते भिमाने गदा मारुन तयार केले. ह्या तळ्यावरील Rock Formation पहाण्यासारखे आहे.

प्रचि २
भिमाने गदा मारुन तयार केलेले तळे

परत येताना राणेह ह्या धबधब्याला भेट दिली. हा धबधबा केन नदीवर आहे. त्या वर्षी पाऊस कमी झाल्याने धबधब्याला पाणी कमीच होते. पण पहाण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथले Rock Formation. ह्याला भारताचे Grand Canyon म्हणतात. ईथले Rock Formation ५ किमी लांब व १०० फूट खोल आहेत. हे सर्व खडक crystalline granite असुन गुलाबी, लाल, पिवळा, नारंगी, राखाडी अशा विविश रंगात सापडतात. एकाच ठिकाणाहून एव्हडे विविध दगड मिळण्याची ही भारतातली बहुदा एकमेव जागा असावी.

प्रचि ३
राणेह धबधबा

-
-
-
प्रचि ४
रॉक फॉरमेशन

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६
एकाच ठिकाणाहून निघालेले विविध प्रकरचे दगड

-
-
-

पांडव गुहा व राणेह धबधबा पाहुन सायंकाळी बुंदेली नृत्य-प्रकार तसेच मंदिरांची माहिती देणारा खास रात्रीचा दृक्-श्राव्य (light and sound show) खेळ ही पाहिला.
प्रचि ७
बुंदेली नृत्ये

-
-
-
प्रचि ८

दुसर्‍या दिवशी आम्ही खजुराहोच्या जगप्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला निघालो. ईथली सर्व मंदिरे चंदेला राजांच्या राजवटीत, दहाव्या ते बाराव्या शतकात बांधली गेली. एके काळी ईथे ८५ मंदिरे होती. काळाच्या ओघात, दुर्लक्षिले गेल्यामुळे व आक्रमणांमध्ये बरीच मंदिरे नष्ट झाली. आता फक्त २२ मंदिरे अस्तित्वात आहेत. ही सर्व मंदिरे खजुराहोच्या दक्षिण, पुर्व व पच्शिम ह्या दिशांना पसरलेली आहेत.

आम्ही आमचा प्रवास दक्षिण-पुर्व मंदिरांच्या समुदायाकडुन सुरु केला. ह्या समुदायात चतुर्भुज, दुल्हा देव, पार्श्वनाथ आणी आदीनाथ अशी मंदिरे येतात. ईथे गाईड नक्की करावा. ते मंदिरांची फार छान माहिती देतात.
जरी सर्व मंदिरांचे स्थापत्यशास्त्र एकच असले तरी त्यांवरची शिल्पकला थक्क करणारी आहे. प्रत्येक मंदिर पायापासुन ते कळसापर्यंत शिल्पकलेने मढविलेले आहे. प्रत्येक मंदिरावर पुराणकाळातल्या कथा, त्याकाळचे लोकजीवन, नृत्ये, खेळ, शिकार, प्रणयदृष्ये असे कोरलेले आहे. ह्या सर्व शिल्पांमध्ये देव, देवता, राजा, दास, दासी, शिकार, शिकारी, दांपत्य, कुटुंब, नृत्यांगना, गायक, वादक, प्रेमी युगुल, श्रृंगार करणारी तरुणी, तरुण, अप्सरा, ललना असे सर्व काही आहे.
सर्व मंदिरे व मुर्त्या ईतक्या जिवंत, सुंदर आणी प्रमाणबद्ध आहेत की आपण त्याच काळात वावरतो आहोत असा भास व्हावा.

प्रचि ८

-
-
-

प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
तिसर्‍या दिवशी आम्ही पच्शिम मंदिरांच्या समुहाला भेट द्यायला निघालो.
पच्शिम मंदिरांच्या समुहातली सर्व मंदिरे एकाच परिसरात येतात व ही सर्व मंदिरे बाजारपेठेच्या जवळच आहेत. ह्या समुहात कंदरीया महादेव मंदिर, चौसष्ठ योगिनी मंदिर, चित्रगुप्त मंदिर, लक्ष्मण मंदिर, मातंगेश्वर मंदिर व वराह मंदिर अशी मंदिरे येतात. ही सर्व मंदिरे नीट पहायची असतील तर तुमच्याकडे किमान ५-६ तास तरी हवेत.
ही सर्व मंदिरे बघताना भान हरपुन जाते. ह्या मंदिरांतला प्रत्येक दगड ईतका सुंदर घडविला आहे की थक्क व्हायला होते. हजारो हातांनी शतके राबुन घडविलेले ते काम पाहुन ऊर अभिमानाने भरुन येतो.
ईथल्या मंदिरांभोवतीच्या बर्‍याचशा शिल्पात आपल्या संस्कृतीत जे चार आश्रम (ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम) सांगितले आहेत त्यांचा ऊल्लेख केला आहे. एक परीपुर्ण व सफल जीवन जगण्यासाठी व मोक्षप्राप्तिसाठी हे चारही आश्रम पुर्ण करणे अतिशय गरजेचे आहे हे वारंवार सांगितले आहे. ह्या चारही आश्रमांमध्ये करण्याची सर्व कामे प्रत्येक मंदिराच्या भोवताली कोरलेली. ईथे हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या सर्व भौतिक व शारीरीक गरजा पुर्ण करा व ते सर्व झाल्यावर त्या सर्वशक्तिमान विधात्यामध्ये विलीन व्हा. जुन्या काळी जे पुजारी सांगायचे की आधी मंदिर प्रदक्षिणा पुर्ण करा व मग नंतर गाभार्‍यात या हेच त्यासाठी.

प्रचि ३१
कंदरीया महादेव. (कंदरा = गुहा)
खजुराहोतील सर्वात मोठे व सर्वात भव्य मंदीर.

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३५
कंदरीया महादेव

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०

-
-
-
प्रचि ४१

-
-
-
प्रचि ४२

-
-
-
प्रचि ४३

-
-
-
प्रचि ४४

-
-
-
प्रचि ४५

-
-
-
प्रचि ४६

-
-
-
प्रचि ४७

-
-
-
प्रचि ४८

-
-
-
प्रचि ४९

-
-
-
प्रचि ५०

-
-
-
प्रचि ५१

-
-
-
प्रचि ५२

-
-
-
प्रचि ५३

-
-
-

बर्‍याचशा गोष्टी शिकुन भारावलेल्या मनाने आम्ही ह्या जादुई देवनगरी चा निरोप घेतला ते परत येण्याच्या ईर्‍याद्यानेच.
-------------------------------------------------------------------

अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - आंध्र प्रदेश.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

खूप मोठा पॉझ घेऊन नाव बदलून आलायस त्यामुळे पटकन लक्षात नाही आलं. असो..

उच्च फोटोज सगळेच. सुरुवातीच्या रॉक फॉर्मेशनचे फोटोज अफाट आहेत.

मस्त

अरे पोल्या....काय फोटो घेतले आहेस यार अप्रतिम.......... सगळेच...! अगदी त्या त्या पोझ मध्ये.!
जर यावर तुझे वॉटर मार्क नसते तर चोरलेच असते Happy

अप्रतीम नजारा! मंदिर आणि शिल्प कला भाराउन टाकणारी आहे.फोटो उत्तमचं नेहमिप्रमाणे, धन्यवाद चंदन !:-)

अप्रतिम प्रचि! थँक्यु थँक्यु.... प्राच्यविद्या अभ्यासक्रमाच्या वेळी केलेला खजुराहो शिल्पांचा अभ्यास आठवला. रॉक फॉर्मेशन खासच. ते वेगवेगळ्या रंगांचे दगड अतिशय सुरेख पोत, आकारांचे आहेत. किती हजार वर्षे लागली असतील त्यांना ह्या रूपात यायला....

माझ्या आवडत्या यक्षींना फोटोतून पुन्हा भेटून खूप छान वाटले. Happy

वॉव ! वॉव ! वॉव ! खूपच सुंदर ! ख़जुराहोबद्दल ऐकून होतो.. पण इतके फोटो एकाच ठिकाणी पहिल्यांदाच बघितले त्यामुळे ऑनलाईन सैर घडवून आणलीस.. Happy

निव्वळ अप्रतिम.
रॉक फॉर्मेशन, राणेह तर खासच आहे पण खजुराहो ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते महादेवाचे मंदीर-त्याचे फोटोज जास्त आवडले.
खजुराहोच्या शिल्प- मंदीराच्या उभारणीमागची कथा ठाऊक असेलच, नसेल तर सांगते-

"सुंदर मंदिरांचे निर्माणकर्ते- राजपूत राजे चंदेला होते. हे स्वत:ला चंद्रदेवाचे वंशज मानत. इथे राहणाऱ्या एका ब्राह्मणाची अतिसुंदर तरुण कन्या जंगलातील एका सरोवरामध्ये स्नान करीत असताना साक्षात चंद्रदेव तिच्यावर भाळला आणि त्याने तिचा कौमार्य भं ग केला. या मीलनाची परिणती म्हणून जो तेजस्वी बालक जन्माला आला तोच पुढे राजपूत राजा ‘चंद्रवर्मन’ म्हणून नावारूपाला आला आणि त्यानेच 'चंदेला' राजवंशाची स्थापना केली. मात्र कुमारीमातेचे तिरस्कृत, अवहेलनेनं भरलेलं आयुष्य भोगणाऱ्या त्या ब्राह्मण कन्येनं, आपल्या पुत्राचे जंगलात राहूनच पालनपोषण केलं. या मातेनं आपल्या पुत्राकडून एक वचन घेतले होते की, तू मोठा झाल्यानंतर अद्वितीय अशा मंदिरांची निर्मिती कर. या मंदिरांच्या भिंतींवर स्त्री-पुरुष समागमाची अभिव्यक्ती असू देत.. या अभिव्यक्तीद्वारे सर्व जगाला कळले पाहिजे की स्त्री-पुरुष संबंध ही निसर्गातील एक सहजसुंदर क्रिया आहे. स्त्री-पुरुषांचे देहमीलन होणे, हा एक नितांत सुंदर अनुभव आहे. जीवनातील नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे. हा अनुभव हा जीवनातील उत्कटतेचा परम क्षण असून ही गोष्ट त्याज्य नसून जीवनावश्यक बाब आहे..’’
राजा झाल्यानंतर ‘चंद्रवर्मन’ राजाने आपल्या मातेला दिलेले वचन पूर्ण केले, पण असेही म्हटले जाते की, चंदेला राजा हे तांत्रिक संप्रदायाचे अनुयायी होते. त्यामुळेच सांसारिक आणि भौतिक सुखाच्या तृप्तीनेच निर्वाणप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, या उक्तीवर ठाम विश्वास ठेवून त्यांनी या मंदिराचे निर्माण केले आणि या निर्मितीमध्ये सहजसुंदर अशा कामशिल्पांना प्राधान्य देऊन स्त्री-पुरुष संबंधांना एका विशुद्ध सहजभावनेचे स्थान दिले.

आणि कंदरिया महादेवाच्या मंदीराबद्द =लच बोलायचं झालं तर संपूर्ण मंदिर ‘इंटरलॉकिंग’ पद्धतीने उभारले गेले आहे. दोन चिऱ्यांना जोडण्यासाठी कुठलेही माध्यम वापरलेले नाही. ३१ मीटर उंचीचे कंडारिया महादेव मंदिर हे अशा इंटरलॉकिंग पद्धतीनुसार उभारलेले असून आजतागायत दिमाखाने उभे आहे.

मार्को अप्रतिम फोटो. आणि त्यांना कॅमेर्‍यात बंदिस्त करण्याची तुझी कला अफलातून Happy
वेड फोटो आहेत....

मंडळी तुमच्या सुंदर प्रतिसांदाबद्दल खुप खुप धन्यवाद...
एका मूर्तीत तर चक्क दाढीपण कोरलेली आहे..>>>
हो रे डिटेलिंग फार अफाट आहे... मुर्त्यांवर असलेल्या दागिन्यांतला प्रत्येक मणी आणि मणी वेगळा दिसतो...

जर यावर तुझे वॉटर मार्क नसते तर चोरलेच असते >>
तुला आवडलेले फोटोज् सांग. विदाऊट वॉमा पाठ्वुन देईन... Happy

पण इतके फोटो एकाच ठिकाणी पहिल्यांदाच बघितले त्यामुळे ऑनलाईन सैर घडवून आणलीस..>>>
अरे असे ५०० च्या वर फोटोज् आहेत. ईथे निवडकच टाकले आहेत...

मणिकर्णिका,
खुप खुप धन्यवाद... खरोखरच फार मोलाची माहिती सांगितलीस तु...

संपूर्ण मंदिर ‘इंटरलॉकिंग’ पद्धतीने उभारले गेले आहे>>>
हो हे पाहिले आम्ही...

पोल्या मंदिराच्या आतले फोटो कधी टाकशील...?>>>
मंदिरांच्या आतमध्ये काही खास नाहिये रे... बहुतेक ठिकाणी बराच अंधार आहे..

सर्व फोटो आणि माहिती अप्रतिम! खजुराहोची सहलच घडवून आणलीत तुम्ही.तुमचा कॅमेरा आणि फोटोला लागणारी नजर तयारीची आहे.

Pages