" ताठ बसा " चळवळ

Submitted by सज्जनगड on 18 February, 2011 - 03:37

लेख खुप छानच आहे. याच्या शिवाय पाठीच्या मणक्याचे अरोग्य हा ही मुद्दा आहे. पाठीचा कणा चुकिच्या बसण्याच्या /उभे रहाण्याच्या/ भार टाकण्याच्या सवयीमुळे दुखावला जातो. परिणामी मानेचे दुखणे/कंबरेचे दुखणे ( स्पॉन्डीलिसिस ) सायटीका अर्थात गृधसी या सारखे विकार उदभवतात.
या शिवाय मणक्यातुन बाहेर पडणारे मज्जातंतु हे विवीध अवयवांच नियंत्रण करतात त्या अवयवांच्या कार्यात दोष निर्माण होतात.

शाळेत ताठ बसा हे वाक्य शिक्षक म्हणायचे त्यात किती गहन अर्थ आहे हे या विषयावरच वाचन केल्यावरच समजला.

नक्कीच नितीनचंद्रजी...

मी मुद्दाम हा लेख आटोपशीर ठेवला कारण त्या निमित्ताने तो वाचला तरी जाईल....

अजुन ४-२ ओळी जस्ती असत्या तर लोक लेख टाळून पुढे जातात असा अनुभव आहे...

आणि आपला हेतु तर व्यापक जनकल्याणाचा आहे! त्यामुळे फक्त आवश्यक तितकेच लिहीले आहे...बाकीचे फायदे न लिहीताही ताठ बसणारास मिळणारच!!!!!

इथे मी २ प्रतिमा टाकलेल्या आहेत...परंतु आपल्याला मेल वर टाकण्यासाठी प्रतिमा हवी असेल तर ती माझ्या उपरोक्त ब्लॉग वरून उचलावी ही विनंती.... ती अधिक स्पष्ट आहे...

आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

हा लेख वाचून आपण मला जे इ-मेल्स पाठवीत आहात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे...

दुर्दैवाने इ-मेल्सची संख्या फार असल्याने प्रत्येकाला मी लगेच उत्तर देईनच असे नाही पण उत्तर नक्कीच देईन!

आपण ताठ बसू लागलात तर त्यातच सर्व आले!

मस्त...
इतका साधा उपाय बरेच बदल घडवून आणत असेल,
तर नक्कीच केला पाहिजे.

आज घरि जाऊन माझ्या फेसबुकावर लिंक देतो तुमच्या ब्लॉगची.
(हे सगळं मी ताठ बसून टाईप केलं. सुरुवात केली Happy )

धन्यवाद! रणजीतजी! ब्लॉगचा इश्यु बघतो लगेच...
धन्यवाद चैतन्य! आपण ताठ बसण्यास सुरुवात केलीत हे पाहून फार बरे वाटले!

किती साधी गोष्ट आहे पण आपण करीत नाही खरेच मला हा उपक्रम आवडला आणि वाटते कि हि एक चळवळ व्हावी धन्यवाद..

तुम्ही छान चळवळ सुरु केली आहे फक्त एक करा जनहिताच्या दृष्टीने सगळ्यांना परवानगी द्या कॉपी करून पुढे पाठवैला म्हणजे खरोखर हि चळवळ प्रत्यक्षात येईल नाही तर काही जनापर्यंत सीमित राहील..काय वाटते?