Submitted by Girish Kulkarni on 26 February, 2011 - 04:17
***************************
***************************
हसत हसत करेन देहदान एकदा तरी
ठरेन या जगात मी...महान एकदा तरी
तुझी मला हवीतशी छबी कुठे न सापडे
चितार तीच मयसभा निदान एकदा तरी
अता जरी तुला नको हिशेब कालचे पुन्हा
दगा करील चांदणे किमान एकदा तरी...
अभंग गात माणसे कुणांस शोधती इथे
मिळो तयां असेच चांद्रयान एकदा तरी...
असा विठू न सापडे,न सापडेल ख्रिस्तही
अता हवीच वेगळी...अजान एकदा तरी !!
**************************
**************************
गुलमोहर:
शेअर करा
मतला छान आहे. असा विठू न
मतला छान आहे.
असा विठू न सापडे,न सापडेल ख्रिस्तही
अता हवीच वेगळी...अजान एकदा तरी
हा शेर अफाट आहे... मस्त गझल.
तुझी मला हवीतशी छबी कुठे न
तुझी मला हवीतशी छबी कुठे न सापडे
चितार तीच मयसभा निदान एकदा तरी
असा विठू न सापडे,न सापडेल ख्रिस्तही
अता हवीच वेगळी...अजान एकदा तरी
व्वा...
सुंदर.....
मस्त!! विठू-ख्रिस्त आवडला.
मस्त!! विठू-ख्रिस्त आवडला.
शेवटच्या ओळी विशेष छान. मस्त.
शेवटच्या ओळी विशेष छान. मस्त.
छान, सफाईदार वाटल्या सर्वच
छान, सफाईदार वाटल्या सर्वच द्विपदी! गझलही आवडली.
धन्यवाद
डॉक्टर -मुक्ता-प्राजु-सुरेखा
डॉक्टर -मुक्ता-प्राजु-सुरेखा व बेफिकीर : सगळ्या मित्रांचे आभार !!!
!!!
बेफिकीरजी - खुप आभार
सुंदर गझल.
सुंदर गझल.
अता जरी तुला नको हिशेब कालचे
अता जरी तुला नको हिशेब कालचे पुन्हा
दगा करील चांदणे किमान एकदा तरी...
अभंग गात माणसे कुणांस शोधती इथे
मिळो तयां असेच चांद्रयान एकदा तरी...
व्वा!
रामकुमार