औषधी वनस्पती

Submitted by जिप्सी on 20 February, 2011 - 22:49

=================================================
=================================================
पूर्वी कुणाला खोकला, सर्दी पडसं झाले कि डॉक्टरकडे न जाता अडुळशाचा काढा, गवती चहाचा काढा असे द्यायचे. पोटात दुखायला लागले कि ओव्याचा अर्क किंवा पाण्यात हिंग टाकुन द्यायचे. मुका मार लागला असता निर्गुडीच्या पालांचा लेप गरम करून त्या भागावर लावला जायचा. लहानपणी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आई आम्हाला कडु किराईताचा काढा प्यायला द्यायची. अतिशय कडु असलेला हा काढा जबरदस्तीने प्यायला लागायचा. हा इतका कडु कि याच्या काडीला स्पर्श करून बोट तोंडात टाकले असता जबरदस्त कडवटपणा यायचा. अर्थात हे सारे शरीरासाठी चांगले म्हणुन ते इच्छा नसताना प्यायला लागायचे. अशाच प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती आहेत पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. बर्‍याचवेळा त्या वनस्पती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, "अरे, याला अमुक अमुक म्हणतात का?" हे तर आमच्या इथे भरपूर आहे अस ऐकायला मिळते. तर कधी "आजुबाजुला अडुळशाचा पाला आहे, पण त्याचा काढा कसा करायचा ते माहित नसते" किंवा केला तरी तो कोणत्या मात्रेत द्यायचा हे माहित नसते. आज पेनकिलरने त्वरीत आराम जरी मिळत असला तरी सतत सेवनामुळे त्याचे शरीरावर वाईट परीणाम होतात. म्हणुनच कि काय आजही वनौषधीला पर्याय नाही.

आपणांसही या सार्‍या औषधी वनस्पतींची माहिती आणि ओळख एकत्र मिळावी म्हणुन हा वेगळा धागा काढतोय. यापैकी काहि वनस्पतींची लागवड घरच्या घरी करणे सहज शक्य आहे.

ही माहिती फक्त औषधी वनस्पती ओळखण्यासाठी आहे. स्वप्रयोगांसाठी नाही. यात लिहिलेले उपचार तज्ञांच्या सल्ल्यानेच/मार्गदर्शनाखालीच करावेत.
=================================================
=================================================
पान १
वनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:
अडुळसा, ब्राह्मी, अश्वगंधा, नागकेसर, मरवा, टाकळा, ओवा, वेखंड, रिठा, सब्जा, अक्कलकारा, कापूर तुळस, तमालपत्र, हाडजोडी, गवती चहा, हिरडा, वेलची, सागरगोटा, जायफळ, गुळवेल, सर्पगंधा, दंती, मेंदी, शेर, शतावरी, बेहडा, वनई उर्फ निरगुडी, रुई, रिंगण, पारिंगा, पानफुटी, माका, कोरफड, कडूलिंब, जास्वंद, गुंज, हळदकुंकू.

चर्चा आणि माहिती: विड्याचे पान, गुलबक्षीचे पान, गणेशपुजनात वापरण्यात येणार्‍या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग.
=================================================
पान २
वनस्पतींची प्रकाशचित्रे आणि त्यांचे औषधी उपयोग:

कुर्डु, गेळफळ/मैनफळ, पुनर्नवा (शोथग्नी, श्वेतमूला, दीर्घपत्रिका),खडकी रास्ना, अग्निशिखा (कालिकारि, खड्यानाग, बचनाग, लांगलीकंद, कलिहरी).

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रदर्शनात टिपलेली काहि औषधी वनस्पतींची प्रकाशचित्रे. याचे उपयोग जाणकार सांगतीलच.

अडुळसा
उपयोग: खोकला, कफवर उपयुक्त
ब्राह्मी
अश्वगंधा
उपयोग: शक्तीवर्धक, कामवर्धक तसेच मूत्रविकारावर
नागकेसर

"असा नेसुन शालु हिरवा, अन् केसात खुंटुन मरवा"
"शालू हिरवा पाचू नि मरवा, वेणीत पेडी घाला, साजनी बाई येणार साजण माझा"
"अंग अंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा, पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा"
अशा विविध गाण्यांमधून भेटलेला हा "मरवा"

मरवा
उपयोग: चर्मरोग व पोटदुखीवर उपयुक्त. (सुगंधी द्रव्यात याचा उपयोग)

टाकळा
अर्धशीशी, कंठमाला, गंडमाला यावर उपयुक्त
ओवा
पोटदुखीवर उपयुक्त
वेखंड
दमा, खोकला, गालगुंड, अपस्मार यावर उपयुक्त
रिठा
सब्जा

योगेश खरोखर उपयुक्त असा धागा. नेहमीसारखं वेगळेपण जपलस. Happy
औषधी वनस्पतींबद्दल अन त्यांच्या संवर्धनाविषयी तुला इथे आणखी माहीती मिळेल. ५०० हून आधिक आर्युवेदिक औषधी वनस्पतींची माहीती इथे आहे.

१.माहीम निसर्ग उद्यान,
२. कुलाब्याचे बोटॅनिकल गार्डन

यापैकी तु कोणत्या उद्यानाला भेट दिली आहेस ?

धन्स नादखुळा Happy

औषधी वनस्पतींबद्दल अन त्यांच्या संवर्धनाविषयी तुला इथे आणखी माहीती मिळेल. ५०० हून आधिक आर्युवेदिक औषधी वनस्पतींची माहीती इथे आहे.

१.माहीम निसर्ग उद्यान,
२. कुलाब्याचे बोटॅनिकल गार्डन

यापैकी तु कोणत्या उद्यानाला भेट दिली आहेस ?>>>>>>>यातील सर्व वनस्पती या राणीबागीतील प्रदर्शनात मांडुन ठेवल्या होत्या आणि त्या माहिम निसर्ग उद्यानातीलच आहे. Happy
कुलाबा बोटॅनिकल उद्यान म्हणजेच "सागर उपवन" का?

व्वा!! मस्त प्रचि कलेक्ट केलेयस! मी आजच (माझ्याकडे असलेल्या कात्रणांच्या आधारे) हा औषधी वनस्पतींचा धागा सुरु करणार होते. Happy
बादवे.... गुळवेलीचं चित्र असं का टाकलेस? माझ्याकडे आहे गुळवेल... Happy

मी आजच (माझ्याकडे असलेल्या कात्रणांच्या आधारे) हा औषधी वनस्पतींचा धागा सुरु करणार होते.>>>>आर्या, यातच कर ना अ‍ॅड तुझ्याकडे असलेली माहिती. Happy

गुळवेल तशीच मांडली होती प्रदर्शनात. तुझ्याकडचा फोटो डकव ना इथे. Happy

छान धागा. धारावीला पण अशी झाडे आहेत. ही झाडे ओळखता आली तरच त्याचे औषधी उपयोग करुन घेता येतील !

ही झाडे ओळखता आली तरच त्याचे औषधी उपयोग करुन घेता येतील!>>>>त्यांच्या कोणता भाग औषधी आहे हे पण ओळखता आले पाहिजे. (उदा. मूळ, खोड, पानं, फुलं इ,)

गुळवेलचा फोटो काढुन टाकेन! आणि माझ्याकडे २००२-३ मधे सकाळमधे येत असलेल्या 'ओळख वनौषधींची" या सदराची कात्रणे आहेत. ती पण अ‍ॅड करेन! एक मालिकाच सुरु करुया आता . Happy

धन्स आर्या Happy

एक मालिकाच सुरु करुया आता >>>>येस्स्स्स. म्हणुनच मी हा "लेखनाचा धागा" म्हणुन प्रसिद्ध केला आहे. Happy

कोल्हापूरहून, "वनौषधी" नावाचे मासिक प्रसिद्ध होते. त्यात छान माहिती असते. या वनस्पतींच्या लागवडीसंदर्भात पण चांगली माहिती असते. मुबईला ते का मिळत नाही कुणास ठाऊक ?

योगेश खुप चांगला धागा काढलास. माझे काही झब्बु देते.

ही वनई उर्फ निरगुडी वातावर उपयोगी असते. पाय वगैरे मुरगळला तरी ह्याचा पाला भाजुन बांधुन ठेवतात मुरगळल्या जागी.
vanai2.JPG

ही आहे रुई
लहान बालकाच्या पोटात दुखत असेल तेंव्हा ह्याच्या पानाचा हलका शेक देतात.
Rui.JPG

हे रिंगण. ह्याच्या फळांचा नागीण ह्या रोगावर उपचारासाठी वापर करतात.
Ringan.jpg

हा आहे पारिंगा. ह्याची पाने चोळून रस काढून वाहत्या जखमेवर लावल्यावर रक्त वाहणे लगेच थांबते. तसेच जखम लवकर भरुन येते.
paringa2.JPG

पानफुटी - डायबेटिजच्या उपचारासाठी वापर करतात.
Panphuti.JPG

हा आहे माका. केशवर्धनाच्या तेलात ह्याचा उपयोग होतो.
Maka.JPG

कोरफड - खोकल्यासाठी गुणकारी तसेच त्वचा व केसांसाठीही गुणकारी आहे.
korphad.JPG

कडूलिंब - बहुगुणी आहे हा. मधुमेह, त्वचारोगावर, हवा शुध्द करण्यासाठी उपयोगी. अगदी ह्याचे दातवणही करतात.
Kadu limb.JPG

जास्वंद - केशवर्धनासाठी उपयोगी.
Jasvand.JPG

गुंज - ह्याची पाने खोकल्याच्या उपचाराला उपयोगी पडतात.
Gunj3.JPG

अजुन मिळाल्यावर टाकतेच.

धन्स जागू, मस्तच माहिती!! Happy
मी निर्गुडी आणि रूईचे फोटो आणि माहिती टाकणारच होतो. Happy
पंगार्‍याच्या पानाचा उपयोग पहिल्यांदा समजला. Happy

लहान बाळाना पोटात थंडी झाल्यास, विड्याचे पान गरम करुन हातावर चोळून त्याच्या रस काढायचा आणि आईच्या दुधातुन बाळाला द्यायचा. लगेच आराम पडतो.

गुलबक्षीचे पान तेल किंवा तुप लावून गरम करुन गळवावर बांधल्यास, गळू फुटुन पस निघून जातो आणि जखम सुकते.

गुलबक्षीचे पान तेल किंवा तुप लावून गरम करुन गळवावर बांधल्यास, गळू फुटुन पस निघून जातो आणि जखम सुकते. >>>

हाच आणि असाच उपयोग पानफुटीच्या पानाचाहि होतो.. फक्त पान उलट करुन बांधायचे..

बाळाला कफामुळे धाप लागत असल्यास, कडुबोळ पातळ करुन कोमट झाल्यावर बाळाच्या छातीवर / पोटावर लावायचा आणि वरुन विड्याची २ - ३ पाने लावून मऊ कपड्याने बाळाला गुंडाळायचं, कफ पातळ होतो.

माझ्या मावसभावाला लहानपणी बरेचदा करावा लागायच.

छान धागा आणि माहिती. घाणेरीच्या पानांचा देखील नागीण या आजारावर उपयोग होतो.

साधारण २००२-२००३ मधे डॉ. नटराज द्रविड, आणि प्रा. डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी 'सकाळ' वर्तमानपत्रात 'औषधी वनस्पती' या विषयावर मालिका सुरु केली होती. त्याची काही कात्रणं माझ्याकडे आहेत. ती कात्रणं आता जपुन ठेवण्यापेक्षा इथे टाकणे मला सोयिस्कर वाटले. त्यावर आधारीत इथे ही माहिती टाकत आहे. ज्यायोगे सर्वांना आपल्या आजुबाजुला असलेल्या औषधी वनस्पती ओळखणे सोपे जाईल.
kurki.jpg

नावः हळदकुंकू
कुळः Ascleladaceae (रुई कुळ)
संस्कृत नावः काकतुंडी, वनपिचुल, दुग्धक्षुप, रक्तपुष्पा
लॅटिन नावः Ascelplas curassavica L.
उपयोगी भागः चीक

उपयोगः रुई कुळातील सुंदर दिसणारे तण. या कुळातील वनस्पतीचा चीक वाळवुन वापरतात कारण पाण्यात याच्या औषधी गुणधर्माचा नाश होतो. पावसाळ्यात येणारा दमा व खोकला यासाठी कुर्की वापरतात. तरुण वयातील बडकेयुक्त दम्यासाठी काळी मिरी व सुंठ यांच्या चूर्णाबरोबर याचा चीक घेउन त्याच्या गोळ्या देतात. नविन -हुमॅटाईड आर्थ्राइटिस मधे पण याचा वापर होतो.

गणेशपुजनात वापरण्यात येणार्‍या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग (आंतरजालावरून साभार)

१. मधुमालती (Hiptage benghalensis)
औषधी उपयोग: पानांचा वापर जखम, सूज, कुष्ठरोग, कफ, संधिवात यावर करतात.

२. माका (Eclipta Alba)
औषधी उपयोग: यकृताची सूज, कावीळ, मूळव्याध, सांधेदुखी व त्वचेचे जुनाट आजार यावर माका उपयुक्त. केसांच्या आरोग्यासाठी याचे तेल उपयुक्त.

३. बेल Aegle Marmelos
औषधी उपयोग: बेलफळ अतिसार, आतड्यांचे विवकार यावर गुणकारी. पानांचा रस मधुमेहावर उपयुक्त.

४. दुर्वा (Cynodon Dactylon)
बुद्धीवर्धक , शक्तीवर्धन , थडं गुणाच्या आहेत. दुर्वाच्या रसाने, लेपनाने त्वचेचा दाह कमी होतो. आम्लपित्तावरही दुर्वाचा रस उपयुक्त. डोळ्यांचे विकार, सर्दी-खोकला यावर गुणकारी.

५. बोर (Zizyphus Mauritiana)
फळे, बिया, पाने, खोड हे सर्व भाग औषधी. कफ, पित्त, ताप, त्वचारोग, अतिसार यावर उपयुक्त.

६. धोतरा (Datura metel)
त्वचारोग, डोळ्यांचे विकार, मूळव्याध, मूतखडा यावर गुणकारी

७. तुळस (Ocimum sanctum)
सर्दी-खोकल्यासाठी पानांचा काढा गुणकारी. अपचन, ढेकर, पोटदुखी, कानदुखी यावरही पानांचा रस उपयुक्त.

८. आघाडा (Achyranthes aspera)
मूळव्याध, पोटाचे विकार, अतिसार, बद्धकोष्ठ यावर उपयुक्त

९. शमी (Prosopis cineraria)
दाहशामक. दमा, ब्रॉन्कायिटस, कुष्ठरोग, अतिसार, जुलाब यावर गुणकारी.

१०. केवडा किंवा डोरली/रानवांगे

केवडा (Pandanus odoratissimus)
पाने व फुले औषधी. डोकेदुखी, पोटदुखी, जखमा यावर उपयुक्त

डोरली/रानवांगे (Solanum indicum)
कफ, सर्दी, दम्यावर गुणकारी, पानाचा रस पोटदुखीवर उपयुक्त. याच्या मुळांचा वापर दशमुळारीष्टात केला जातो.

११. कण्हेर (Nerium indicum)
तेल विंचवाच्या चावण्यावर उपयुक्त. मूळव्याध, सूज यावर उपयुक्त

१२. आपटा (Bauhinia racemosa)
साल, पाने, शेंगा आणि बिया औषधी. पित्त आणि कफदोषांवर गुणकारी व दाहशामक. खोडाच्या सालीचा लेप जखमा व सूज यावर लावतात.

१३. रूई, मंदार (Calotropis gigantea)
कुष्ठरोग, कफ, पोटाचे विकार यावर गुणकारी. न्युमोनिआ, सायनसला, सूज येणे, दमा या विकारांमध्ये उपयुक्त.

१४. अजुर्न सादडा (Terminalia arjuna)
जखम भरून येण्यास सालीचा काढा उपयुक्त, ह्रदयाच्या शिथिलतेवर खोडाची साल अत्यंत गुणकारी, मोडलेले हाड सांधण्यास सालीचा वापर करतात. कानदुखीवर पानांचा ताजा रस कानात घालतात.

१५. विष्णुक्रांत (Evolvulus alsinoides)
अल्सर, कावीळ, मधुमेहावर उपयुक्त

१६. डाळींब (Punica granatum)
खोकल्यावर फळाची साल उपयुक्त, तोंडात धरून चघळल्यास खोकला बरा होतो.

१७. देवदार (Cedrus deodara)
डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, चर्मरोग, पोटदुखी यावर उपयुक्त.

१८. मरवा (Origanum marjorana)
चर्मरोग, पोटदुखी यावर गुणकारी.

१९. निर्गुडी किंवा पिंपळ

निर्गुडी (Vitex negundo )
सजू , संधीवात, डोकेदुखी यावर याची पाने अतिशय गुणकारी.

पिंपळ (Ficus religiosa)
खोडाची साल त्वचाविकार व अल्सरवर उपयुक्त. पाने तोतरेपणा, तोंड येणे यावर उपयुक्त.

२०. जाई (Jasminum grandiflorum)
मूळ व फु ले आयुर्वेद,यूनानी औषधांमध्ये वापरतात. पित्त, तोंड येणे, त्वचारोग यावर गुणकारी

२१. अगस्ती, हादगा (Sesbania grandiflora)
ताप, सर्दी, खोकला, डोके दुखीवर गुणकारी

त्याची काही कात्रणं माझ्याकडे आहेत. ती कात्रणं आता जपुन ठेवण्यापेक्षा इथे टाकणे मला सोयिस्कर वाटले. त्यावर आधारीत इथे ही माहिती टाकत आहे. ज्यायोगे सर्वांना आपल्या आजुबाजुला असलेल्या औषधी वनस्पती ओळखणे सोपे जाईल.>>>>>>धन्स आर्या. याचा निश्चितच उपयोग होईल.

मस्त धागा आहे. बरीच माहिती मिळतेय.
वरती बर्याच वनस्पतींचा उपयोग कशावर होतो ते लिहीलय. तर तो नक्की कसा करायचा ते पण लिहाल का?

रुईच्या देठाचे चिक काटा गेलेल्या भागावर लावल्याने काटा लवकर बाहेर येतो.

काल हा धागा बघितला आणि नेमकीच नर्सरीत मला अश्वगंधाचे झाड सापडले. मी ते घेतले आहे. त्याचा काय काय उपयोग होतो ?

ashwagandha-.jpg

संस्कृत नावः अश्वगंधा, वराहकर्णी
इतर नावे: आस्कंद, असगंध, ढोरगुंज
कुळ- Solanaceae (भुईरिंगणी कूळ)
लॅटिन नावः Withania somnifera
उपयोगी भागः मूळ
उपयोगः अश्वगंध हे सर्वांगाला पुष्टी देणारे आहे आणि सर्व वयोगटांसाठी आहे. अश्वगंधा तुपाबरोबर वापरल्यास अधिक उपयुक्त होते. मधाबरोबर दिल्यास अशक्तपणा येतो. रक्तातील दोषामुळे सांधे लाल होउन होणा-या संधिवातावर अश्वगंधा गुणकारी आहे. पार्किन्सस रोगामधे अश्वगंधा आणि कवचबीज एकत्र करुन दूध किंवा मधाबरोबर घेतात. स्त्रियांची कंबरदुखी यामुळे पूर्ण बंद होते तसेच बीजधारणा होण्यसाठी स्त्रियांना उपयुक्त आहे. नैसर्गीक झोप येण्यास झोपतांआ अश्वगंधा सूंठ तुपाबरोबर घेतात. मात्र सतत वापरु नये कारण त्यामुळे तोंड येणे, निद्रानाश, थरथर होते. तोंड आलेले असेल, मूळव्याध असेल , आजारपणानंतर आलेला अशक्तपणा असून तहानभूक कमी असेल तर अश्वगंधा वापरु नये. संधिवातावर फार गुणकारी. सांध्यांना चोळण्यासाठी अश्वगंधा व मोहरीचे तेल करुन वापरतात.

Pages