''वादात या कुणीही सहसा पडू नये ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 February, 2011 - 01:02

हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये

शेंदूर फासती का,आम्हास लोक हे?
हा प्रश्न दगड-धोंड्यांना का पडू नये?

उठसूठ मुख्यमंत्री दिसतात मंदिरी
का देव अंतरी,त्यांना सापडू नये?

पाषाण तो जरी ही,पाहूनि अप्सरा
छातीत निष्ठुराच्या का धडधडू नये?

हसतात सातमजली, लाखोलि वाहुनी
कैलासने शिवी ही,का हासडू नये?

गुलमोहर: 

हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये - वा वा! चांगला मतला कैलासराव!

पाषाण तो जरी ही,पाहूनी अप्सरा
छातीत निष्ठुराच्या का धडधडू नये? - पाहू'न'??

हसतात सातमजली, लाखोलि वाहुनी
कैलासने शिवी ही,का हासडू नये - शिवीही (एकच शब्द अभिप्रेत आहे का?) मक्ताहि आवडला.

मला वाटते दुसर्‍या व तिसर्‍या शेरात (आनंदकंदस्वरुपी वृत्तांमध्ये) यती सांभाळला जायला लागत असावा.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आवडली.
मतला जास्त आवडला.
मुख्यमंत्र्यांच्या द्विपदीत वृत्त बरोबर असले तरी बहुदा त्यां आणि ना च्या मध्ये यति येत असल्याने नीट म्हणता येत
नाहीये.

(ता.क. हे आपले माझे मत. )

हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये ...............kya matala hai kailashji, waah

शेंदूर फासती का,आम्हास लोक हे?
हा प्रश्न दगड-धोंड्यांना का पडू नये? ..........mast hai dwipadi

पाहूनि हा बदल केलाय भूषणजी. धन्यवाद.:)
शिवीही हा एकच शब्द आहे... शिवी पण या अर्थाचा. Happy

यतिभंग होतोय २ शेरांत.... मान्य Happy

आनंदकंद्,विद्युल्लता यात यतिभंग झाल्यास खटकतोच... असो.

साती,तुझ्या यतीच्या प्रतिसादाशी सहमत. Happy

क्रांती,भुंगा,म्हमईकर्,विद्यानंदजी,संदिप..... मनःपूर्वक आभार. Happy

हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये

शेंदूर फासती का,आम्हास लोक हे?
हा प्रश्न दगड-धोंड्यांना का पडू नये?

आवडले..!