Submitted by प्राजु on 17 February, 2011 - 10:59
आयुष्य फ़क्त माझे, तू लुडबुडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये!!
दीपा परी जळावे, आयुष्य आपुले
पण कापरा परी ते, नुसते उडू नये
दाखव करून काही, हाती तुझ्याच जे
नुसते उथळपणाने, तू बडबडू नये
नुकती वयात आली, नाजूक ती कळी
"देवा, तिला कुणीही, तोडू -खुडू नये!!!"
काट्यापरी रूतावे, ऐसेच भाव तर
डोळ्यांत त्या जराही आपण बुडू नये..
थोडी फ़ुलून ये ना, राणी अता जरा
मौनात या तुझ्या गं, प्रीती दडू नये..
मजला खुणावती त्या, क्षितिजा वरी दिशा
माझेच पंख कोणी, कृपया खुडू नये..
- प्राजु
गुलमोहर:
शेअर करा
दीपा परी जळावे, आयुष्य
दीपा परी जळावे, आयुष्य आपुले
पण कापरा परी ते, नुसते उडू नये!
छान.
छान मतला... पुलेशु...
छान मतला...
पुलेशु...
प्राजू, टॉप क्लास.
प्राजू,
टॉप क्लास. अप्रतिम.अजून काय म्हणू ? अभिनंदन.
दीपा परी जळावे, आयुष्य आपुले
पण कापरा परी ते, नुसते उडू नये...हा शेर मनाला भिडला.
एक लहान शंका. शेवटच्या शेराच्या दुस-या ओळीत वृत्त भंग झाल्या सारखे वाटते. "कृपया" शब्दाची फोड
ल गा गा अशी होते पण येथे गा गा अस शब्द हवाय. ही माझी फक्त शंका ! तपासून घेणे. अर्थात जाणकार मंडळी पण भाष्य करतीलच.
शिवाय कफिया काय आहे? पडू, घडू हा कफिया मतल्यात स्थीर झाला आहे. मग बुडू,खुडू आणी बुडू हे काफिया होऊ शकत नाही
कापूर सही!
कापूर सही!
मस्त....
मस्त....
प्राजु, परत एकदा सुंदर गजल
प्राजु,
परत एकदा सुंदर गजल घेऊन आलीस! छान! आनंद झाला. पूर्ण गजल आवडली!
:<<"कृपया" शब्दाची फोड
ल गा गा>>
निशिकांत, शेवटी मात्रा म्हणजे काय? अक्षराच्या उच्चारासाठी लागणारा वेळ. र्ह्स्व अक्षरासाठी कमी वेळ लागतो आणि दीर्घ अक्षरासाठी जास्त वेळ लागतो.
वरील शब्दात "कृ" आणि "प" च्या उच्चारासाठी साठी सारखाच वेळ लागतो. त्यामुळे 'ल ल गा' अशीच लगावली होते. म्हणून प्राजुचे बरोबर आहे.
बुडू, खुडू विषयी भट साहेबांनी त्यांच्या एका पुस्तकात (बहुतेक झंझावात मध्ये) म्हटले आहे की मथळ्यातच जर अशी सूट घेतली असेल तर मग ती पुढे चालू शकेल. प्राजुने मथळ्यात ती सूट घ्यायला हवी होती.
मी प्रयत्न करतेय.. अलामतीत
मी प्रयत्न करतेय.. अलामतीत सूट घेण्यासाठी.. बघूया कसे जमतेय.
लिहिते लवकरच.
प्राजुतै लै भारी... सगळेच शेर
प्राजुतै लै भारी...
सगळेच शेर मस्त, कापूर खास
शरदजी धन्यवाद. मलाही शंका
शरदजी धन्यवाद. मलाही शंका होती त्या कृपया बद्दल. खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद विशाल.
छान आहे.
छान आहे.
छान लिहिलीय!विशेषतः
छान लिहिलीय!विशेषतः 'कळी'.
थोडी फ़ुलून ये ना, राणी अता जरा
मौनात या तुझ्या गं, प्रीती दडू नये..
सुद्धा आवडले.
कृपया= ल ल गा योग्य आहे
'काट्यापरी रूतावे, ऐसेच भाव तर'मध्ये
शेवटी आलेल्या ल ल ऐवजी गा -कानांना बरा वाटला असता.
रामकुमार.
सुंदर गझल. मतल्यात कोणत्याही
सुंदर गझल.
मतल्यात कोणत्याही ओळीत बुडू,खुडू हे काफिये आले असते तर ते कफिये इतर शेरांत वापरणे योग्य ठरते.
निशिकांत व शरद यांचेशी सहमत.
प्राजू,मस्त. कापूर आणि पंख
प्राजू,मस्त.
कापूर आणि पंख आवडले.
अहाहा!, मस्त, आशयपूर्ण तरीही
अहाहा!, मस्त, आशयपूर्ण तरीही सहज!
निशिकांत,शरद, कैलास यांच्याशी
निशिकांत,शरद, कैलास यांच्याशी सहमत आहे.
पण गझल सुंदरच झाली आहे..!
दीपा परी जळावे, आयुष्य आपुले
पण कापरा परी ते, नुसते उडू नये
आवडला..!
निशिकांत जी, शरददादा आणि
निशिकांत जी, शरददादा आणि कैलास दादा..
मी मतल्यातली पहिली ओळ बदलली आहे.. आता बहुतेक अलामतीत सूट घेतल्यामुळे गजल बरी वाटेल.
कापूर एकदम सही !!
कापूर एकदम सही !!
धन्यवद जयुताई.
धन्यवद जयुताई.