Submitted by क्रांति on 17 February, 2011 - 05:45
येते मनात ते का सारे घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
वाटा नव्या जगाच्या हाकारती मला,
पाऊल टाकले ते जागी अडू नये!
आनंदसोहळ्याला हे दार वर्ज्य का?
का नौबती सुखाच्या येथे झडू नये?
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये
काट्यांत गुंतला ना, निष्पाप, भाबडा?
जीवास काय ठावे, कोठे जडू नये?
आजन्म जीवनाचा मी शोध घेतला,
हे दैवजात होते, ते सापडू नये!
गुलमोहर:
शेअर करा
त्याच्याविना जरी मी आहे
त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये>>> व्वा व्वा!
वाहून जन्म जावा इतके रडू नये - ही ओळही मस्तच!
धन्यवाद!
क्रांती, गझल आवडली.
क्रांती, गझल आवडली.
वा.. वाह... ग्रेट.. भारी
वा.. वाह... ग्रेट.. भारी जमलिये...
सुंदर सुरुवात..
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये
काट्यांत गुंतला ना, निष्पाप, भाबडा?
जीवास काय ठावे, कोठे जडू नये?
हे विशेष आवडले..
खूप आवडली
खूप आवडली
गालास तीट काळी, आसू तसे
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
सुंदर शेर!!!
नौबती मस्तच.
नौबती मस्तच.
व्वा! क्रांती, मस्तच जमलेय
व्वा! क्रांती, मस्तच जमलेय गझल.
काट्यांत गुंतला ना, निष्पाप,
काट्यांत गुंतला ना, निष्पाप, भाबडा?
जीवास काय ठावे, कोठे जडू नये?
आहा!!!
येते मनात ते का सारे घडू नये?
पाऊल टाकले ते जागी अडू नये!
हे सुटे मिसरे आवडले..
क्या बात्..खुप मस्त मस्त
क्या बात्..खुप मस्त मस्त झालिये.....
त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये
...........वाहवा
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
हे तर अप्रतीम......
गालास तीट काळी, आसू तसे
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये
......क्रांतीजी अप्रतिमच.....
नितांत सुंदर!!! हॅट्स ऑफ!!
नितांत सुंदर!!! हॅट्स ऑफ!!
खुप सुंदर
खुप सुंदर
गालास तीट काळी, आसू तसे
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!>>>> जियो
अतीसुंदर! रामकुमार.
अतीसुंदर!
रामकुमार.
खूप छान. गालास तीट काळी, आसू
खूप छान.
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये. हे जास्त आवडले.
वाटा नव्या जगाच्या हाकारती
वाटा नव्या जगाच्या हाकारती मला,
पाऊल टाकले ते जागी अडू नये!
आनंदसोहळ्याला हे दार वर्ज्य का?
का नौबती सुखाच्या येथे झडू नये?
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
काट्यांत गुंतला ना, निष्पाप, भाबडा?
जीवास काय ठावे, कोठे जडू नये?
- अतिसुंदर. खूप आवडले.
क्या बात! अतिशय सुंदर!!
क्या बात! अतिशय सुंदर!!
अप्रतीम
अप्रतीम
व्वा,!! अक्खी गझल सुंदर. वाटा
व्वा,!! अक्खी गझल सुंदर.
वाटा नव्या जगाच्या हाकारती मला,
पाऊल टाकले ते जागी अडू नये!
ह्या शेरात जागी ऐवजी दुसरा शब्द योजला तर अजून चांगला परिणाम येईल असे वाटते. अकारण्,वृथा या अर्थाचा. असो.
आवडली गझल.
आवडली गझल.
धन्यवाद!
धन्यवाद!
झकास!
झकास!
त्याच्याविना जरी मी आहे
त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये>>>>
हा शेर आवडला
क्रांति....जियो
क्रांति....जियो यार........!!
प्रत्येक शेर एकदम जबरी ...मजा आ गया !!