कोणी फुलू नये अन कोणी झडू नये! (तरही)

Submitted by ह.बा. on 16 February, 2011 - 23:15

माझाच मी मलाही का उलगडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये!

जो पेरतो बिया तो का सांगतो कधी...
कोणी फुलू नये अन कोणी झडू नये!

बेरंग जीवनाला जर रंग लाभला
हा रंगही उडावा हे का घडू नये!

नसतात खेळणार्‍या सार्‍याच सावल्या
पाहून हात काळे नेहमि रडू नये!

हत्ती असेल तो तर धाडा तया वनी
श्वानास आमुच्या पण त्याने नडू नये!!!

-हबा

गुलमोहर: 

माझाच मी मलाही का सापडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये!..........व्वा.. चांगला मतला.

जो पेरतो बिया तो सांगतो कुठे.................
कोणी फुलू नये अन कोणी झडू नये! ......... छान

बेरंग जीवनाला जर रंग लाभला
हा रंगही उडावा हे का घडू नये!.......... सुंदर.

नसतात खेळणार्‍या सार्‍याच सावल्या
पाहून हात काळे नेहमी रडू नये!................... चांगला शेर.

हत्ती असेल तो तर धाडा तया वनी
श्वानास आमुच्या पण त्याने नडू नये!!........... हा ही सुंदर शेर.

चांगली गझल.

माझाच मी मलाही का सापडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये!

हबाने दोन्ही मिसर्‍यांत सापडू नये कॉमन घेतल्याने सापडू नये रदीफ होत आहे. त्यामुळे हबा,तुला पहिल्या मिसर्‍यात काफिया बदलावा लागेल मित्रा. अन्यथा ती तांत्रिक चूक होईल. Happy

सर्व प्रतिसादकांचा मनापासून आभारी आहे!!!

सापडू नये रदीफ होत आहे >>> च्यायला ल़क्षातच आले नाही. पण बरोबर आहे.

'' उलगडू नये '' ठीक वाटत का ते पहाव >>> मस्त वाटते आहे. धन्यवाद छायाजी.