द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ६

Submitted by बेफ़िकीर on 15 February, 2011 - 03:26

नवलेच्या क्वार्टरपर्यंत जाणे शक्यच नव्हते आणि तिथ जाऊन मोबाईल शोधणे तर दुरापास्तच! दोनच दिवसात विविध मार्गांनी ती परवानगी मिळवण्याचे निष्फळ प्रयत्न करून वैतागून सगळेच आत्ता दुपारी चार वाजता बरॅकमध्ये बसलेले होते. आज खेळायला परवानगी नव्हते म्हणे काहीतरी कारणाने, त्यामुळे वैतागलेलेही होतेच! आणि त्यातच..........

"राजासाहब आप???"

बरॅकमध्ये नेहमीप्रमाणे वैतागलेल्या मुल्लाच्या चेहर्‍यावरील आनंद लपत नव्हता. राजासाब हा चीफ जेल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर अत्यंत कार्यक्षम असूनही कैद्यांच्या बाबतीत माणूसकी दर्शवणारा अधिकारी होता. इतकच, की तो कधी दिसायचाच नाही. कारण त्याचे ऑफीस होते गेटच्या जवळ! कुणी मोठे पाहुणे आले तर तो त्या समारंभापुरता दिसायचा. पण त्याच्या बातम्या यायच्या कानोकानी! एक जण आजारी पडला तर राजासाबने स्वखर्चाने त्याला उपचारांना मदत केली. म्हणजे शासकीय प्रोव्हिजनच्या बाहेरची मदत! कुणाला जखम झाली तर राजासाबने धावाधाव केली. कैद्यांसाठी वेगळे उपक्रम काढले. शिक्षण सुरू केले. वाचनालय 'लाईव्ह' केले वगैरे! याचबरोबर अशाही बातम्या यायच्या की कुणी मुद्दाम काही चूक केली तर राजासाबने त्याला वाईट मारले. सर्वांदेखत मारले.

राजासाबसमोर शान दाखवण्याची खरे तर नवलेचीही हिम्मत नसायची असे कैदी बोलत! पण राजासाबचे रिपोर्टिंग नवलेलाच असल्यामुळे त्याला नवलेपुढे नाही म्हमले तरी मान तुकवून वागावेच लागे. तसेही, दोघांमध्ये काही विशेष मतभेद वगैरे नव्हतेच! कारण जबाबदार्‍याच वेगवेगळ्या होत्या. राजासाब हा प्रशासनातील अधिकारी होता, तर नवले जेलचा प्रमुख! बाहेरील जगाला जेलचा परिचय करून देणे व जेलमधील सर्व व्यवस्था ठीकठाक आहे हे पाहणे नवलेच काम होते. तर कैद्यांच्या बाबतीतील डे टू डे गोष्टी सांभाळणार्‍या स्टाफवर देखरेख हे राजासाबचे काम होते. त्यामुळे कार्यकक्षाच वेगवेगळ्या होत्या.

राजासाब हा माणूस पठाण या हवालदाराच्याही सव्वापट होता. त्याला पाहूनच नुसते सगळे टरकायचे. त्याचे अस्तित्व हा एक मोठा आधारही होता आणि एक संकटही! राजासाब जर आपल्या विरुद्ध गेला तर आपली खैर नाही हे जसे कैद्यांना वाटायचे तसेच राजासाबने जर आपल्या तक्रारीची दखल घेतली तर आपल्यासारखा सुखी कुणी नाही हेही माहीत असायचे. मात्र! बाबू व तत्सम कैदी इतर कोवळ्या कैद्यांवर करत असलेले अत्याचार ही तक्रार प्रशासकीय अधिकारी असूनही राजासाबपर्यंत नवले पोहोचूच द्यायचा नाही. यात नवलेचा स्वार्थ होता. जो कैदी अशा अत्याचारांमधून पोळला गेला असेल तो नवलेची तरी दया मिळावी म्हणून नवलेसाठी काहीही करायला तयार व्हायचा. तसेच अत्याचार करणारा अत्याचार करता यावेत यासाठी नवलेची खुशामत करायचा ती वेगळीच! कैद्यांमध्ये भावनिक असंतोष व दुही पसरवणे हे नवलेसाठी अत्यंत महत्वाचे घटक होते. त्यामुळे तो अशा तक्रारी स्वतःच बेदखल करायचा. नवलेचा अधिकार जास्त असल्यामुळे राजासाब उगाच त्यात पडून नवलेशी वाकडे घ्यायचा नाही. मुळात नवले राजासाबचा दैनंदिन पातळीवर कैद्यांशी संबंधच येऊ द्यायचा नाही. जेलचा खर्च, बाग, वाटा, ऑफिसेस, बरॅक्ससाठी सुविधा, अन्नाचा दर्जा, गेटवरील तपासणी, एकंदर सुरक्षा व्यवस्था, पाहुण्यांच्या आदर सत्काराची तयारी आणि हिशोब इतक्या जबाबदार्‍या राजासाबवर असल्यामुळे कैद्यांमध्य अंतरगतरीत्या काय चाललेले आहे याकडे पाहण्यास त्याला वेळही मिळायचा नाही. पण राजासाबचा एक पॅरलल चॅनेलही बनलेला होताच. दहा पाच हवालदार नवलेपेक्षा राजासाबला महत्व द्यायचे. त्याला माहिती पुरवायचे. यातूनच नवलेची काळी कृत्ये आणि जेलमध्ये चाललेले भीषण प्रकार राजासाबला अधेमधे समजायचे. त्यातही तो पडायचा नाही कारण उघडपणे विरोध पत्करल्यास बदलीच करायचा नवले! नवलेचा वर असलेला वट हा प्रॉब्लेम फार मोठा होता खरे तर!

आणि आज हा अतीप्रचंड शरीराचा राजासाब सरळ चालत आतमध्ये येऊन आपल्या बरॅकपाशी???

मुल्ला आणि सगळ्यांनाच आनंद झाला. काही असले तरी राजासाबबाबत त्यांना प्रेमयुक्त आदर होता. नसीम तर उठून उभाच राहिला. आकाशला मात्र तिसरीच शंका आली. इतका धिप्पाड माणूस आहे म्हणजे आजही कुणीतरी चेंबरमध्ये जाणार बहुधा!

राजासाब - क्या बे?? ... ढिल्ला पडगया बहुत??

मुल्लाने लाचारपणे कानाखाली खाजवत सांगीतले..

मुल्ला - क्या करेंगे साहब.. खानेको ऐसी चीजे मिलती है...

राजा - क्युं?? अच्छी रोटी और चावल दे रहे है हम लोग??

मुल्ला - टेस नही होती..

राजा - तो जेलमे तेरेको शीरखुर्मा होना??

पुन्हा लाचारपणे हासत मुल्लाने नकारार्थी मान हालवली.

राजा - अच्छा सुन.. नमाझ पढता है??

मुल्ला आणी नसीमने जोरजोरात मान हालवली. नसीम नमाझ पढायचा नाही. पण मुल्ला रोज दोन वेळा पढायचा.

राजा - तो आजसे शाममे नमाजके लिये एक जगहा बनायी है हम लोगोने.. वहा नमाज पढी जायेगी..

मुल्ला आणि नसीमला आणखीन काही घटकांचे स्वातंत्र्य मिळणार याचा असीम आनंद लपवता आला नाही. तर आपण मुसलमान नसल्याचे दु:ख बाबू आणि वाघला लपवता आले नाही.

मुल्ला - सात बजे साहब??

राजा - सव्वा सात.. नहानेके बाद उधर.. जेलमे इस्लाम माननेवाले चालीस प्रिझनर्स है.. आज लंचके बाद ऑफीसमे बुलाया है सबको... आकर अपना अपना नाम लिखवाकर जाओ.. समझे???

हातानेच सलाम करत व आकाशाकडे बघून दुवेप्रमाणे हात उचलत मुल्ला आणि नसीमने राजासाबला धन्यवाद दिले. किती छोटे छोटे आनंद होते. नमाज पढण्यासाठी मिळणार्‍या पंधरा मिनिटांची हळूहळू पंचवीस मिनिटे करायची. तेवढ्याच गप्पा, बाहेरची फ्रेश हवा आणि धार्मिक कृत्य केल्याबद्दल कदाचित मिळू शकणारा एखादा चहा!

आकाश - ये कौन साहब है??

मुल्ला - राजासाब है राजासाब... नवलेके बाद इन्हीका नंबर है..

आकाश - तो अब नमाज पढनेके लिये छुट्टी मिलेगी तुम लोगोंको..

मुल्ला - जरूरी है बेटा.. नमाज जरूरी है..

आकाश - वैसे... नाम क्या है इनका??

मुल्लाने इकडे तिकडे बघत सहजपणे उत्तर दिले आणि आकाशने ते ऐकले. आणि दोनच क्षणांनी आकाश ताडकन उभाच राहिला. तो उभा राहिला आहे हे मुल्लाला त्याच्याकडे पाठ असल्याने समजलेही नव्हते.. पण तरीही स्वतःच उत्तर देऊन मुल्लानेही ताडकन मागे वळून पाहिले.. आणि मग बाबू, वाघ आणि नसीम हेही हादरून मुल्ला आणि आकाशकडे पाहू लागले..

कारण राजासाबचे जे नाव मुल्लाने आकाशला सांगीतलेले होते... ते नाव होते...

... मुहम्मद कादिर...

...... एम .... क्यू...

===============================================

राजासाब बरॅकमध्ये येऊन गेल्याला आता दोन दिवस झालेले होते. दोन्ही दिवस मुल्ला आणि नसीमने जाऊन नमाज पढलेली होती. मात्र प्रत्यक्षात पाचही जण आनंदाने हुरळलेले होते. नक्कीच राजासाबशी मिनीने काहीतरी संधान बांधलेले असणार होते.

आणि आज आणखीनच आनंदाचा दिवस होता. कारण नमाज पढून परत येताना राजासाबने मुल्लाला उद्देशून वाक्य टाकले होते.

"ए मुल्ला... आज साहब नही है... हमेशा की तरहा मारामारी मत करना बरॅकमे.. नही तो स्साले ऐसी ** मारुंगा के चल नही सकेगा तू... समझा क्या???"

हे वाक्य इतर कुणी फारसे ऐकले नाही कारण राजासाबने परिस्थिती न्याहाळूनच ते विधान केलेले होते. आणि मुल्लाचे डोले लख्खकन चमकले ते वाक्य ऐकून!

थोडक्यात... आज मारामारी करायची होती..

मुल्लाने बरॅकमध्ये येऊन बाबू आणि वाघच्या डोळ्यात बघत सहेतूकपणे सांगीतले..

"राजासाहबने बोला है... आज मारामारी??? 'नही' करनेका... "

आकाशला हे वाक्य समजलेच नाही. त्याला विचारायचे होते की रोज कुठे मारामारी करतो आपण??

हा प्रश्न विचारण्यासाठी त्याने उघडलेले तोंड तो प्रश्न विचारायच्या ऐवजी एक किंकाळीच फोडून गेले होते. कारण नसीमची एक भरभक्कम लाथ आकाशच्या पोटात बसली होती.

बहुधा आपल्याला आता सगळेच बडवून काढणार ही जाणीव आकाशला झाली.... आणि लगेचच ती नष्टही झाली... कारण तिकडे वाघने मुल्लाच्या खाडकन कानाखाली वाजवली होती... आणि...

.. चिडायच्या किंवा ओरडायच्या ऐवजी...

... मुल्ला खदाखदा हासत होता... आता बाबूनेही हासत खण्णकन एक वाघच्या तोंडात दिली.. तोवर वाघने उचलून नसीमला खाली आपटले...

हे नक्की काय चाललेले आहे हेच आकाशला समजेना! आता त्याच्याकडे कुणी बघतही नव्हते. हे चौघे जमेल त्याला फटके देत होते, कधी स्वतः फटके खात होते..

आणि हे सगळे होत असताना हसू दाबत होते...

मधेच मुल्ला आकाशकडे वळला. आत्ताच आतडी पिळवटून निघालेली असताना हा आता आणखीन काय करतो या भीतीने आकाश घाबरून बघू लागला. तर मुल्ला म्हणाला..

"मार मेरेको... अबे मार??? "

"क्युं??"

"मार नही तो मै मारेगा.."

"क्युं लेकिन??"

"...**... मारता है या मारूं??"

आकाशने खरे तर घाबरून एखादी चापट लावावी तशी एक हलकी थप्पड मुल्लाच्या डोक्यात लावली. खदाखदा हासत मुल्ला जमीनीवर लोळला.

"बाबू... ये देख कैसे औरतकी तरहा मारता है स्साला... ऐसे ... ऐसे मारता है.."

आता आकाश हे एक चांगले खेळणेच मिळाले चौघांना! प्रथम वाघने त्याला उचलून आपटला. आपल्यासारख्या माणसाला हा उचलू शकतो म्हणजे काय ताकद असेल हे आकाशला समजले. तोवर बाबूने पाठीत अशी काही लाथ घातली की आकाशचा आवाजच फुटेना! सगळे खो खो हासत होते. तेवढ्यात नसीमने पुन्हा पोटात लाथ घातली. आपले पोट फुटून त्यातील सर्व आतडी वगैरे नष्ट झालेली असावीत असा आकाशला अंदाज आला. वेदनांनी अक्षर फुटत नव्हते तोंडातून! पण काही कळायच्या आत दोन हातांमध्ये त्याचे डोके धरले गेले व खण्णकन जमीनीवर आपटले गेले.

आकाशला वाटले आपली शुद्ध जातीय! पण एक गॅप मिळाली. आकाशला मनासारखे मारायची एक ऑफिशियल संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी चौघे खदाखदा हासत असलेले आकाशने पाहिले. आकाशने कसेबसे तोंड उघडून जेलमधील वास्तव्यातील पहिली खरीखुरी अस्सल शिवी दिली..

"मादर**... तुमच्याईच्ची **"

त्याची ती बाळबोध उच्चारांमधील शिवी ऐकून तर पोट धरून हासू लागले सगळे! आता त्याला मारायचीही इच्छा होईना कुणाला!

तेवढ्यात वाघ म्हणाला...

"अबे मुल्ला... कालापीला तो होना मंगता है ना थोबडा... थोबडे पे मार मेरे... चल्ल.."

खालीच लोळत असलेल्या आकाशने हादरून ते वाक्य ऐकले तोवर मुल्लाने सण्णकन एक मुठ वाघच्या उजव्या डोळ्याखाली मारली..

वाघ किंचाळून म्हणाला...

"*****... आंख फुट जाती मेरी अभी...."

बाबूने तोवर मुल्लाचे नाक चेपवून सुजवून टाकले. मुल्ला कोपर्‍यात नाक धरून आडवा झाला तसे बाबूने नसीमच्या चेहर्‍यावर नखांनि ओरखाडले..

नसीमचा डावा गाल रक्ताळलेला पाहून आकाशला जाणवले.. हा काहीतरी प्लॅन आहे साला.. काहीतरी प्लॅन आहे.. पण त्यात आपल्याला सहभागी होताच येत नाही कारण आपल्याला या वेदनाच सहन होत नाहीयेत..

वाघने मुल्लाच्या नाकावर सटासट आणखीन चार बुक्या मारल्या... आता मात्र मुल्लाचा आक्रोश सहन होईना कानांनाही...

इकडे बाबूने नसीमचे नाक सुजवले... वाघने तोवर मुल्लाच्या डाव्या फोरआर्मवर दातांनी चावा घेऊन रक्त काढले.. मुल्लाचा गगनभेदी आक्रोश ऐकून बाकीच्या बरॅकींमधून आता आवाज येऊ लागले.. आता काही हवालदार नक्कीच धावत येणार हे समजले तसा बाबू शिव्या देत ओरडू लागला..

"*****... तुम्ही लोगोंने... तुम्ही लोगोंने जिहाद छेडा है बारबार... हर्राम्मी स्साले.. पार्टिशनके बाद हमारी ट्रेने यहां आयी... तो उसमे साली सब डेड बॉडियां... कायको??? तुम कायको इधर रहरहे है फिर?? आ?? हिंदू बनके रहो ना??? आ???"

या ओरडण्याचा आणखीन एक तिसराच परिणाम झाला. इतर बरॅकींमध्ये जेथे मुस्लिम कैदी होते तिथेही गोंधळ सुरू झाला.

इकडे नसीम आणि मुल्ला जीव खाऊन ओरडत होते. जितके लागले होते त्यापेक्षा कितीतरी अधिकच कर्कश्श ओरडत होते. आता आकाशला समजले. आपण पडून राहिलेले असणे हे हिंदू मुस्लीम दंगा भासवण्यासाठी निगेटिव्ह ठरू शकते. तो कसाबसा उठला आणि जमेल तशी एक लाथ घातली नसीमला! पण त्या लाथ घालण्यातल्या नाजूकपणाचे त्याही परिस्थितीत चौघांना हसू आले. तेवढ्यात लांबून हवालदारांच्या शिव्या ऐकू येऊ लागल्या तसे अधिकच येणारे हसू अधिकच दाबत सगळे आरडाओरडा करू लागले. आकाश सर्वांच्या वरताण ओरडू लागला. काही का असेना, काहीतरी प्लॅन असला तर आपण मागे नको राहायला, या विचाराने!

"क्या बे कुत्तो.. आ... क्या लफडा... चल्ल.. चल्ल स्साले.. एकेकको चेंबरमे ले जाते है... चल्ल ...ऊठ.."

आलेल्या तीन हवालदारांनी पाचही जणांना बाहेर काढले आणि शिवीगाळ करत हातातल्या केन्स पोटर्‍यांवर ओढायला सुरुवात केली कैद्यांच्या!

त्या माराने मात्र खरोखरचे ओरडू लागले सगळे! मार खाणे रोजचेच होते, पण तरीही वेदना झाली की काही तोंड सरळ ठेवता येत नाही, ते वाकडे होतेच!

आकाशला मात्र त्या केन्सचा मार सहन होईना! त्याचे भीषण ओरडणे पाहून त्याही अवस्थेत यांना हसू येऊ लागले होते. पण त्या हासण्याचे क्षणातच वेदनेने ओरडण्यात रुपांतर होत होते.

आज नवले जेलमध्ये नसल्यामुळे सगळ्यांना राजासाबसमोर उभे केले आणि सांगण्यात आले की हे धर्मावरून मारामारी करतायत!

झालं! आधीच पावणे सात फुटी अवाढव्य माणूस, त्यात मुसलमान! त्याच्या तर एकेका फटक्यानेच शुद्ध जायची वेळ येऊ लागली.

आणि पंधराव्या मिनिटाला लोळागोळा अवस्थेतील पाचजणांना एका खोलीतील एका आडव्या खांबाला लटकणार्‍या दोर्‍यांना हात बांधून लटकवण्यात आले होते.

इतकीच शिक्षा! कारण राजासाब म्हणत होता...

"स्साले... मैने बोला था की आज लफडा मत करो... आज साहब नही है... आज लफडा नही करनेका है.. लेकिन सुनते नही... ये मजहबके नामपे लढरहे है.. ऐसा कभी हुवा नही आजतक... इसका फैसला साहबको ही करनेदो.. इनको लटकाओ आधा घंटा और दस दस फटके लगाओ... बस्स.. कल साहब आयेंगे तब देखेंगे..."

प्रत्येकाला दहा दहा केनचे फटके दिल्यावर दोन हवालदार तिथेच बसून राहिले. लांबर राजासाब बसलेला होता. तेवढ्यात त्याला कुणाचातरी फोन आला. त्याने मोबाईल हातात घेऊन तिथूनच मुल्लाकडे बघत बोलायला सुरुवात केली. हवालदारांची पाठ होती राजासाबकडे!

"क्या?? पंधरा तारीख को?? नय नय.. पंधरा नही.. अबे नवलेसाहब नही है पंधरा से अठरा तक.. नय नय.. मै अकेला क्या क्या देखुंगा.. होम सेक्रेटरी साहब आ रहे है तो मै क्या करू?? आप नवलेसाहबको रुकनेको बोलो ना यार यहांपर... वोही सबकुछ संभाल सकते है ऐसे बडे बडे लोगोंका.. मै छोटा आदमी हुं.. मै क्या करुंगा... और उस दिन हमारे पाच लोगोंने पहिलेसेही छुट्टी ले रख्खी है.. मुझे तो दोही लोगोंके साथ खुद गेटपे खडा रहना पडेगा.. मै अंदर आ ही नही सकता हूं.. हां इसीलिये कह रहा हूं के पंधराको कुछ मत करना... अठराके बाद कभीभी आनेदो साहबको... अबे तुमको मजाक लगता है क्या?? इधर गेटपर पचास पब्लिक आता है बाहरसे... उसपर वो मिट्टीके ट्रक्स.. उसपर मै अकेला.. नवलेसाहब होते तो आरामसे देख लेते.. वो पहचानतेभी है सेक्रेटरी साहबको.. मै छोटा आदमी हूं.. मै गेटपर चेकिंग करू के सेक्रेटरी साहबके पीछे रहूं..?? आं?? क्या क्या करू मै"

कळायचे ते केव्हाच कळले होते चौघांना! हं! चौघांनाच! कारण आकाशची शुद्ध जाणे आणि असणे याच्या सीमारेषेवर होती.

दुसर्‍या दिवशी मात्र नवलेने चांगलीच हजेरी घेतली. बाबू सोडला तर बाकीच्यांना त्याने लाथाच घातल्या. हे प्रकरण दाबणे अत्यावश्यक झालेले होते. आता काय मुस्लिम कैदी वेगळे ठेवायचे का काय यावर नवले विचार करू लागला होता. त्यावेळेस मात्र अचानक आकाशने नाटक सुरू केले. कारण त्याला आत्तापर्यंत प्लॅन लक्षात आलेला होता. त्याने एकदम स्फुर्तीदायक भाषण ठोकतात त्या आवेशातच विधाने केली. ये हमारे भाई है, ये हमसे अलग कैसे होंगे, आजके बाद इन्हे कोईभी छुएगा भी नही! मग लगेच बाबू आणि वाघने माफी वगैरे मागीतली.

प्रकरण शमले.

तिकडे नवलेने राजासाबचीही हजेरी घेतली 'होम सेक्रेटरी' येणारच नसताना उगाचच काहीतरी बडबड केल्याबद्दल! ही बडबड केल्याचे त्याला दोन हवालदारांकडून समजले होते. नवलेला प्रथम संशय आलाच! की त्या पाचजणांना मारहाण होत असताना हा असा का बडबडला असेल! त्यामुळे त्याने गृहमंत्रालयातील त्याच्या एका जवळच्या मित्राला फोन करून सचिवांचा कार्यक्रम काय आहे हेही विचारले. पण तोवर राजासाबने होम सेक्रेटरी म्हणजे 'माझीच पत्नी' येणार असल्याचे सांगीतले. पहिल्यांदा भडकलेला नवले नंतर हसू लागला. राजासाबने हे वाक्यही ऐकवले.

"साब.. सेक्रेटरी साहब आयेंगे तो कोई मुझे क्युं बतायेगा.. आपहीको पहले बतायेगा ना?"

नवलेला पटले.

जेलमध्ये खरे तर तारखेला तितकेसे महत्व नसते. वारालाही नाही. जेलच्या बाहेर रविवारी सुट्टी असते. शनिवारीही असू शकते. शुक्रवारी लोक आपल्या कुटुंबाला घेऊन सहलीला किंवा जेवायला जाऊ शकतात. जेलमध्ये काय? रोजची तीच कार्यक्रमपत्रिका!

पण आज वाघला कुणाकडून तरी समजले..

..... 'आज... दहा तारीख आहे....'

पाच दिवस!

फक्त पाच दिवस!

राजासाब उर्फ मुहम्मद कादिर आपल्या बाजूने का आहे हेच समजत नव्हते. कर्तव्यदक्ष माणूस होता तो! त्याने तर मिनीच्या सांगण्यावरून बाबूसाठी प्रयत्न करणे हेही शक्य नव्हते. मग सगळ्यांवर इतका उदार का?

आणि आत्ता रात्री दबक्या आवाजात बरॅकमध्ये मीटिंग चाललेली होती.

वाघ - लेकिन वो सबको कायको छोड रहा होगा?

बाबू - पता नही.. लेकिन एक बात बताओ... पाच दिन रहे है.. ये पाच दिनमे क्या क्या करनेका है??

आकाश - सबसे पहले तो ये करना है के पुरी तरहा काममे लगे रहना है.. किसीको शक नही चाहिये..

बाबू - वो तो ठीक है.. लेकिन.. ये कही एन्काउंटरका लफडा तो नही होगा ना??

मुल्ला - मुझे नही लगता....

वाघ - लेकिन... मुझे लग रहा है...

मुल्ला - तुम हमेशा ऐसेही सोचते हो..

वाघ - वैसा नही है.. ठीकसे सोच.. हमही पाचोंको क्युं छोडा जा रहा है?? बाबूने सात मर्डर किये.. मैने एक... तुने छब्बीसबार पब्लिकको लुटा है... ये बच्चेनेभी हाफ मर्डर कियेला है.. नसीम तो वैसेही मरनेवाला है.. तो हम सब.. मरही जाना अच्छा है ना इन लोगोंके लिये...

मुल्ला - क्युं लेकिन??

वाघ - जीके बाहर निकले तो वहीच करेंगे ना फिरसे??

मुल्ला - ऐसा कहां जरूरी है??

बाबू - और फिर हमहीच क्युं?? वैसे तो बहुत कैदी है यहांपर..

वाघ - अगर तेरी बिवी नवलेको हमेशा के लिये चाहिये होगी तो??

बाबूचा चेहरा क्षणभर हिंस्त्र झाला, पण वाघ म्हणतो ते अगदीच अशक्यही नव्हते.

बाबू - लेकिन.. नवलेके लिये राजासाब क्युं काम करेगा??

नवले - नवलेने ऑर्डर छोडा तो करनाही पडेगा ना??

बाबू - लेकिन मेरे एन्काउन्टरको पर्मिशनही नही मिलरही है...

वाघ - बाबू... तेरे एन्काउंटरको पर्मिशन नही मिल रही है..

बाबू - मतलब???

वाघ - तू अगर भागनेकी कोशिश करेगा तो मारही डालेंगे ना??

बिनतोड मुद्दा होता तो! कदाचित सर्वांना पळून जाण्याची कल्पना पटवूनच यासाठी देण्यात येत होती की पळणार्‍यांपैकी कुणालातरी मारून टाकता यावे. कदाचित, फक्त एकालाच किंवा कदाचित दोघांना किंवा इतरांनाही! कुणाला हे निश्चीत समजू शकत नसले तरी संजयबबूचे नाव सर्वच प्रयोजनांती सर्वात वरचे असणार होते.

बाबू - मतलब... तू कहना चाह रहा है की.. ये सब... आपुनको मारनेके लिये हो रहा है??

वाघ - क्या कह सकते है??

बाबू - लेकिन फिर... फिर... मेरेको एक चीज बता...

सगळेच चेहरे बाबूकडे वळले...

वाघ - .. बोल.. बोल ना??.. क्या???

बाबू - फिर... मिनी एम और क्यू पे ... निशाना क्युं लगायेगी???

वाघ - शायद....

बाबू - ... ??????

वाघ - शायद... वो भी वही चाहरही होगी तो???

बाबूला भयानक संताप आला वाघचा! पण... इतके होऊनही वाघचे म्हणणे फेटाळून टाकण्यासारखे नव्हतेच!

नसीम - लेकिन... वो ऐसा कुछ क्युं चाहेगी???

वाघ - ये बाबू इधर रहता है... उधर बाहर क्या चल रहा है अपनेको क्या पता??

नसीम - मतलब??

वाघ - हो सकता है के उसे अब बाबूके साथ रहनाही नही है... या फिर किसी औरके साथ रहना है इसलिये बाबूको फसा रही है..

मुल्ला - कुछ भी बोलता है ये...

वाघ - क्युं??

मुल्ला - वो बाबूके कहनेपर नवलेके पास क्युं आती थी फिर??

वाघ - हो सकता है के..

बाबू - यार तू ये 'हो सकता है' मत बोला कर...

वाघ - हो भी सकता है के... वो... नवलेकोही ज्यादा चाहरही हो...

बाबू - हॅ.. कुछ भी बकवास... स्साला नवलेको कोई औरत कभी चाहेगी क्या??

वाघ - क्युं नही?? **वाना तो हर मर्दसे हैही.. तेरेसे अच्छा तो जेलर नवले हुवा जिसके हाथमे आज पावर है और पैसा भी है..

बाबू - बंडल मत फेका कर.. मिनी ऐसे हैही नही..

वाघ - मै बंडल नही मार रहा हूं बाबू... जरा ठीकसे सोच.. इस राजासाबको अपनी रिहाईकी अभी क्या पडी है?? आजतक ये बात उसके जहनमे क्युं नही आयी?? अभ्भी ऐसा क्या होगया के उसने हमको छुडानेकी कोशिश करनी चाहिये?? और मै ये पुछता हूं.. हमारेमेसे हर इकको छुडानेकी जरूरतही क्या है?? हम उसके कोई सगे तो है नही.. फिर सबको क्युं छुडवायेगा वो?? और दुसरी बात ऐसी है के ये आकाशको आये चार पाच दिन हुवे है... इसको वो क्युं छुडायेगा?? और वो भी सिर्फ मिनीके कहनेपर?? क्युं?? क्युं करेगा वो ये सब?? मिनीके साथ तो वो सोताभी नही रहेंगा.. और अगर नवलेके साथ वो सोती है तो राजासाब अपनेको क्युं छुडायेंगा.. नवलेका ये कहना वो क्युं मानेगा... कल अगर सचमुच सब छुटगये और उस दिन नवले जेलमे नही रहा तो राजासाबकी नौकरी नही जायेगी क्या?? वो ये बात नवलेके होते हुवे करेगा या ना होते हुवे??? मै तो कहता हुं के जब नवले जेलमे होगा तभी किसीको छुडवाना राजासाबकी नौकरी बचासकता है... ये नवलेके ना होते हुवे क्युं छुडवाया जा रहा है हमको भाई?? जरा सोचो.. मिनी कोई बच्ची तो है नही... ये तो वो भी जानती है के अगर बाबू भागगया तो कुछही दिनोमे हो सकता है फिरसे पकडा जाये.. फिर क्या?? फिर तो एन्काउन्टर फिक्स है.. वो अगर बाबूसे प्यार करती है तो उल्टा वो ये कहेगी के जितनी सजा है उतनी पूरी काटकेच आ बाबू.. है के नही?? आ?? अच्छा चलो वो छुडवाना चाहती है?? तो सिर्फ बाबूकोही ये क्युं नही बताया गया?? हम सबको किसलिये?? इसका मतलब सीधा है के बहगजानेवाले जितने कैदी थे उनमेसे चार पकडे गये और एक गोलाबारीमे मरगया.. और मरजानेवालेका नाम है संजयबाबू... .. समझमे आरही है बात??

एक दुखरा, बोचरा सन्नाटा पसरलेला होता बरॅकमध्ये! आपण आत्तापर्यंत वेडेपणा करत होतो हे पटू लागलेले होते. वाघचे बोलणे तर्कसुसंगत होते. असे एकदम पाचजणांना सोडायला अधिकारी काही मूर्ख असणार नव्हते. हळूहळू डोक्यात प्रकाश पडू लागला.

मुल्ला - मतलब... तू कह रहा है के... कोई रिहा नही होनेवाला है... अं??

वाघ - क्युं होगा कोई रिहा भाई?? हमने पुण्य किया है क्या बाहर?? के हमको रिहा करेंगे??

नसीम - तो अब.. तो अब करना क्या है??

वाघ - चूपचाप बैठनेका.. पंधरा तारीखकोभी आम दिनोजैसाही रहनेका.. कुछ करनेकाच नही..

बाबू - लेकिन... लेकिन अपना पहलेका प्लॅन तो करही सकते है ना??

वाघ - च्युतिया.. जब मिनीही तुझे फसारही है तो वाघोलीमे गाडी किससे मंगवायेगा तू???

संजयबाबूची मान पुन्हा निराशेने खाली गेली. वाघचा प्रत्येक मुद्दा बिनतोड होता. हेही शक्य होते की नवले मुद्दाम रजा टाकून चाललेला असावा. त्या दिवशी गेटवर राजासाबने डंपर्सचे चेकिंग करायचे नाही. इकडे डंपर्स बाहेर पडणार आणि तिकडे एक हवालदार धावत येऊन राजासाबला सांगणार.. त्या बरॅकमधले पाच जण कुठेही दिसत नाहीत... लगेच येरवड्याकडून येणार्‍या दोन पोलीस व्हॅन्सना राजासाब मोबाईलवर डंपर्स डिटेन करायला सांगणार.. त्यातून सगळे उड्या मारणार.. आणि बाबू मरणार गोळीबारात... बाकीचे इतमामाने पुन्हा जेलमध्ये... विदिन फिव मिनिट्स..

वाघने ऐन मोक्याच्या वेळेस हा मुद्दा काढल्याने सर्वांनाच फार बरे वाटू लागले होते आता! कारण फार तर काय होईल?? की आपण जेलमध्येच सडू! पण पळून पुन्हा पकडले गेलो तर हालत खराब होईल! आणि बाबू तर गेलाच! एन्काउन्टरचीही गरज नाही. सरळ गुन्हा करताना, म्हणजे पळून जाताना रेड हॅन्ड पकडला आणि तरीही पळून जायचा प्रयत्न केला म्हणून ठार केला.

मात्र आकाशने या शांततेचा भंग केला.

आकाश - वाघ.. तुम्ही मला एक गोष्ट सांगाल का??

सगळ्यांनीच आकाशकडे पाहिले..

आकाश - मिनीला जर आपल्याला राजासाबपर्यंत पोचवायचं असलं... तर ती डब्यावरच्या एम आणि क्यु अक्षरांखाली ठिपके वगैरे कशाला काढत बसेल???

आकाशने मिनीचा उल्लेख मिनी असा करावा याचा या क्षणी संजयबाबूला रागही आला नाही. नुसती विचारांची वादळे होती ती!

वाघ - .... म्हणजे काय??????

आकाश - तिचे अन राजासाबचे काही ठरलेले असले तर... राजासाब स्वतःच आपल्याला अ‍ॅप्रोच नाही का करणार??

वाघ - मग.. केलंच की त्याने...

आकाश - अंहं.. सरळ सरळ येऊन योजना नाही का सांगणार... ???

वाघ - सांगीतलीच की मग??

आकाश - प्लच! तसं नाही.. म्हणजे बरॅकपाशी येऊन आपल्याशीपाच मिनिटे सरळ बोलला तर काय प्रॉब्लेम आहे त्याला?? कोण अडवणार??

वाघ - मग??? का नसेल बोलला??

आकाश - कारण उघड आहे...

वाघ - काय??

आकाश - आपले अ‍ॅझम्प्शनच चुकीचे आहे..

नसीम - क्या गलत है??

आकाश - अ‍ॅझम्प्शन.. मतलब.. जो हम सच समझरहे है वो सच हैही नही...

वाघ - कुठलं अ‍ॅझम्प्शन??

आकाश - एम क्यु म्हणजे... मुहम्मद कादिर नसणारच...

चक्रावलेल्या चेहर्‍याने सगळे आकाशकडे पाहू लागले..

हे आता काय नवीन???

बाबू - .... मग???? ... मग काय असणार???

आकाश - बाबू... आज तू नाश्त्याच्या वेळेस नोटीस नाही वाचलीस...

बाबू - वाचली की?? का??... काय आहे त्या नोटि....... आकाSSSSSSश...

बाबूला एकदम काय जाणवल्यामुळे त्याचे डोळे एवढे विस्फारले असावेत हे बाकीच्या तिघांना समजले नाही. समजले फक्त संजयबाबूला आणि आकाशला..

बाबू - म्हणजे... तेरा तारखेला???

आकाश - येस्स... तेरा तारखेला...

मुल्ला - क्या होगा?? क्या होगा तेरा तरीखको???

आकाश - पाच कैदी जेलसे छुटजायेंगे...

वाघ - ए... आधी मला सांगा काय बोलताय ते...

आकाश - वाघ.. त्या दिवशी चर्चमधला स्टाफ कैद्यांना अणि अधिकार्‍यांना जेवण घेऊन येणारे ना??

वाघ - हो.. मग??

आकाश - त्या.. त्या चर्चचं नांव काय आहे??

वाघ - क्वीन.... ओह.... आईच्ची **.... क्वीन मेरी चर्च...

एम आणि क्यू चा खरा शोध लागल्यामुळे जबडा कधी नव्हे इतका ताणून आकाश हासत होता...

गुलमोहर: 

मी पहिली..... छानच लिहिलय, आकाश खरच चुकिच्या जागी आलाय.....

(सर, कथेत शिव्या लिहिताना फक्त दोन-तीन अक्षर लिहुन स्टार देण्यापेक्षा पुर्णच शिवी स्टार केलीत तर वाचायला सुसह्य होईल अस मला वाटतं)

बाकी कथा नेहमीप्रमाणे खासच.....पु.ले.शु.

बेफिकिर जी,

खुपच छान!

तुमचे टायमीग अचुक आहे.
घर आणि द वर्ल्ड ऑफ डिफरन्स दोनिहि कथा छान सुरु आहेत.
पण बोका कुठाय?????? लवकर पोस्ट करा.

आमित

मस्त !
घर आणि द वर्ल्ड ऑफ डिफरन्स दोनिहि कथा छान सुरु आहेत.
पण बोका कुठाय?????? लवकर पोस्ट करा.>>>अनुमोदन!

चांगला भाग होता.
अधिकारी कितीही दयाळु असला तरी कैद्यांना पळायला मदत करेल असे वाटतच नाही.

मस्त..

सहि....
कुठुन कुठे चालले होते सगळे, पण फायनलि एम क्यु चा शोध लागला, बरे झाले.
आणू वाघ चा प्रत्येक मुद्दा अचुक होता, स्पेशलि जर राजासाहेब ला जर हे काम करायचे असेलच तर तो नवलेच्या ऊपस्थितित करेल........