Submitted by अ. अ. जोशी on 13 February, 2011 - 08:15
कापल्या गेल्यांवरी तर मदार होती
तोतयांची, फक्त शस्त्रे दुधार होती
समजले नाही मने करपली कशाने ?
सूर्य होता माजला की दुपार होती....
नाचली होतीस तू थयथया कशाला ?
हाक प्रेमाची जराशी... चिकार होती
उतरली ज्यांच्या मनातुन कधीच नाती
माणसांची त्या वयेही उतार होती
'जीवही देईन प्रेमात आज माझा'
मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती
तापल्यावरी उरे आर्द्रता कशाने ?
साधनेला वेदनेची किनार होती
गुलमोहर:
शेअर करा
समजले नाही मने करपली कशाने
समजले नाही मने करपली कशाने ?
सूर्य होता माजला की दुपार होती....
नाचली होतीस तू थयथया कशाला ?
हाक प्रेमाची जराशी... चिकार होती
व्वा... आवडले हे दोन्ही शेर.
एकंदर चांगली गझल.
<<उतरली ज्यांच्या मनातुन कधीच
<<उतरली ज्यांच्या मनातुन कधीच नाती
माणसांची त्या वयेही उतार होती>>
खुपच छान...........................
'जीवही देईन प्रेमात आज
'जीवही देईन प्रेमात आज माझा'
मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती
मस्ताड!!!
'जीवही देईन प्रेमात आज
'जीवही देईन प्रेमात आज माझा'
मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती
>>>
क्या बात है ...!!!
शेवटचा शेर खुप खुप
शेवटचा शेर खुप खुप आवडला.
मस्त
रामकुमार
'जीवही देईन प्रेमात आज
'जीवही देईन प्रेमात आज माझा'
मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती
हा शेर आवडला!!
'जीवही देईन प्रेमात आज
'जीवही देईन प्रेमात आज माझा'
मी म्हणालो फक्त, ...पण ती तयार होती>>>>.
खासच, आवडली
धन्यवाद मित्रांनो!
धन्यवाद मित्रांनो!
नाचली होतीस तू थयथया कशाला
नाचली होतीस तू थयथया कशाला ?
हाक प्रेमाची जराशी... चिकार होती
मस्तच!
दुपार खासच! बाकीच्या
दुपार खासच! बाकीच्या द्विपदीही आवडल्या.