रत्नागिरी — कोल्हापूर (व्हाया अंबा घाट)

Submitted by जिप्सी on 9 February, 2011 - 00:30

डिसेंबर मध्ये रत्नागिरी भटकंती केली. त्याचे फोटो आपण पाहिले असेलच. या भटकंतीत शेवटच्या दिवशी रत्नागिरीहुन कोल्हापूरला अंबा घाट मार्गे गेलो. एकच दिवस हाताशी असल्याने श्री ज्योतिबा, महालक्ष्मी
मंदिरलाच भेट देता आली आणि थोडा वेळ खरेदीसाठी दिला :-). याच धावत्या कोल्हापूर भेटीची हि काहि क्षणचित्रे.
=================================================
=================================================

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४
मलकापूरच्या पुढे एका गावात चहासाठी थांबलो असता एक मस्त नदी दिसली. Happy

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७
श्री ज्योतिबा मंदिर परिसर

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
श्री महालक्ष्मी मंदिर आणि परिसर

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
छत्रपती शाहू महाराज

प्रचि २५
भवानी मंडप

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

=================================================
=================================================

गुलमोहर: 

गुजरीत बसून, सोन्याचा साज तूम्ही घडवा... पण साज नाही टिपलास.

महाद्वारातून पूर्वी छान फोटो काढता यायचा, आता गिचमिड झालीत तिथे. तूम्ही मला वाटतं खालची गर्दी टाळण्याच्या प्रयत्न केलेला दिसतो आहेस.

कंदी पेढे, गूळ, आईस्क्रीम राहिलं. रंकाळा परिसर राहिला.

मलकापूर कोल्हापूर मार्गावर ते कासवाचे देऊळ दिसते, काही कोल्हापूर पद्धतीचे बांधारे दिसतात, ज्योतिबाच्या डोंगरावरुन पण सभोवतालचा परिसर छान दिसतो.

आणि ती नदी शाळी. तिच्यावरुनच माझ्या आईचे नाव, शालिनी ठेवले आहे.

घाटातले फोटो म्हणजे आमचाच रस्ता बरं का! साखरपा लागलं असेल ना वाटेत? मी तिथलीच!

कोल्हापूरचे फोटो बघून मस्त वाटलं!

जिप्सी,
वाह ! फोटो आवडले !
माझ्या मलकापुरभेटीच्या आठवणी जाग्या झाल्या !
दिनेशदांना कोल्हापुर्-मलकापुर सगळं कसं अगदी पाठ आहे ....!
Happy

जिप्स्या,
आनंदाने नाचावसं वाटतंय.. Happy
एक तर चक्क तु इथे टाकलेले फोटो मला दिसतायंत..
का म्हणे माझ्यावर इतकी कृपा केलिस यावेळी?
दुसरं म्हणजे माझं जन्मगाव सुंदर टिपलंयस... Happy

यूवर फॅन इज बॅक... Happy सुरेख फोटो काढलेयंस Happy माझ्या निवडक १०त.
हो पण असे दिसतील असे फोटो टाकलेस तरंच
नाही तर मी पुन्हा जाईन Sad

गजराज खूपच छान
त्याला पाहून "एका रानवेड्याची शोध यात्रा या पुस्तकाची आठवण झाली "
बाकी इतर फोटोही खूपच छान........

योगेश मस्त रे .....कोल्हापुर मिसळ आणि कटिंग चहा मस्त ............कोल्हापुर मटन आणि वडे कुठे आहे मित्रा !!!!!!!!!!!!!

मस्त
स्वरुपानंदांच्या पालखीबरोबर अंबा- ते साखरपा चालत गेलेला प्रवास आठवला
सुंदर फोटो

अमोल केळकर
------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

नादखुळा गणपतपुळा खुळखुळा!!!

रच्याकने, तो जोतिबाचा पोशाख केलेला फोटो, मेन गाभार्‍यातल्या मुर्तीचा आहे का दुसर्‍या?

सुंदर फोटो!
नदीचं इतकं निवळशंख पाणी...आता दुर्मिळ झालं फार!

नेक्ष्ट टायमाला घरला जायच्या येळंला, मलकापुराच्याहितं बांबवड्यातनं खवा घेऊन जावा. लई झ्याक भ्येटतो! गुलब्जामुन झ्याक व्हतात! Happy

प्रतिसादाबद्दल धन्स Happy

हो पण असे दिसतील असे फोटो टाकलेस तरंच
नाही तर मी पुन्हा जाईन>>>>दक्षे Proud

मेन गाभार्‍यातल्या मुर्तीचा आहे का दुसर्‍या?>>>>नाही तो गाभार्‍यातल्या मूर्तीचा फोटो नाही. मंदिर परिसरातील एका मूर्तीचा आहे तो फोटो. Happy

कोलापुरात जाउन आल्यागत वाटल.... लय भारी गड्या!

आंबाघाट एकदम मस्त आहे..... एकदम रुंद आणि प्रशस्त.... ड्रायव्हिंगला मजा येते!

मेन गाभार्‍यातल्या मुर्तीचा आहे का दुसर्‍या?>>>>नाही तो गाभार्‍यातल्या मूर्तीचा फोटो नाही. मंदिर परिसरातील एका मूर्तीचा आहे तो फोटो. >> व्वा, जोतिबाच्या नावानं चांगभलं...

रच्याकने, आम्ही कॉलेजला (वारणेत असताना) जोतिबाला सायकलीवर जायचो, मजा यायची!

मित्रा, अजुन फोटो असले तर टाक, जुन्या आठवणी ताज्या झाल्या

@ योगेश साहेब :प्रची २६ मधील मिसळ मला आवडली पण पुन्हा कधी गेलात तर फडतरे ची मिसळ चाखून बघा..
प्रची २७ आणि २८ मधील ठुशी खूपच सुरेख माझ्या घरी सुधा आहे.
शाहू महाराज राजवाडा भेट दिलात कि नाही................

तो नदीचा जो फोटो आहे मला वाटते ती कडवी नदी आहे.
तसेच नेक्ष्ट टायमाला घरला जायच्या येळंला, मलकापुराच्याहितं बांबवड्यातनं खवा घेऊन जावा. लई झ्याक भ्येटतो! गुलब्जामुन झ्याक व्हतात >>> तो खवा कणदुर गावाहुन येतो. कणदुरचा खवा गणपती पुळ्याला पण मिळतो.

Pages