थांबणे सोसेल तोवर लागते चालायला... (यावेळची तरही)

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 February, 2011 - 23:00

चालण्याचे दु:ख जोवर लागते विसरायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला...

लाघवी भासांसवे संवेदना सुखवायला
वास्तवाचे पाश ते मग लागती जाचायला...

लाजणार्‍या मोगर्‍याचे हासणे फसवे किती..,
लागलेला वेळ थोडा वागणे समजायला...

मी फुलांना सांगतो हे भुलवणे आता नको
त्या कळ्यांचा धीर आता लागला संपायला...

या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला...

विशाल

गुलमोहर: 

या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला>>> अगदी खरे आहे विशालराव!

छान गझल!

धन्यवाद!

लाजणार्‍या मोगर्‍याचे हासणे फसवे किती..,
लागलेला वेळ थोडा वागणे समजायला...

मी फुलांना सांगतो हे भुलवणे आता नको
त्या कळ्यांचा धीर आता लागला संपायला...

वाह...

मी ऋतूंना सांगतो हे भुलवणे आता नको असे वाचले.. तेही आवडले..
हेही मस्तच! Happy

मी फुलांना सांगतो हे भुलवणे आता नको
त्या कळ्यांचा धीर आता लागला संपायला............व्वा !!

छान आहे गझल. अभिनंदन. Happy

धन्यवाद बेफ़िकीरजी, आनंदयात्रीजी, कैलासदादा ... मन:पूर्वक आभार Happy

या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला...

मस्तच.. Happy

आनंदयात्रींना अनुमोदन....

छान ! आवडली
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला... >>> वेड्या हा तखल्लुस घेतला की काय Happy

या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला... >> अप्रतिम विशल्या.. Happy

पुलेशु!!!

या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला...

सही! मस्त गझल.

तखल्लुसबद्दल पंतांच्या म्हणण्यावर विचार करायला हरकत नाही! Wink