मला आवडलेले चित्रपट : Casablanca

Submitted by नेतिरी on 25 January, 2011 - 21:18

दुसर्‍या महायुद्धावर अनेक संस्मरणीय चित्रपट हॉलिवुड मधे निर्माण झाले,१९४२ चा Casablanca हा त्यातीलच एक.जवळपास ७० वर्षांपूर्वीचा हा चित्रपट अजुनही fresh वाटतो.तस पाहता कथेत नाविन्य काही नाहि, तांत्रिक द्रुष्ट्याही average च.याच्या अगदी विरुद्ध असणारा citizen Kane तांत्रिक आश्चर्य समजला जातो.तो आजपर्यंत बनलेला सर्वात great movie आहे म्हणतात, तरीही प्रेक्षकांच्या मनावर थोड्या थंडच प्रतिक्रिया उमटतात.(though i agree citizen Kane is one of the best movie ever made , i haven't succeeded yet to make me like it).शेवटी चित्रपट हे मनोरंजनाच एक माध्यम आहे कितिही सोपा कींवा क्लिष्ट विषय तुम्ही कसे मांडता आणी प्रेक्षकांच्या किती जवळ पोचता यावर त्याच खर यश अवलंबून असत. Casablanca ला बरोब्बर हेच जमलय.आता legend बनलेले डायलॉग, अप्रतिम अभिनय,खुमासदार supporting cast, "as time goes by" हे गाण आणी हाय "तो शेवट" (कितीहि predictable असला तरिही) जादू निर्माण करतात.

चित्रपटाची साधरण कथा अशी
फ्रेंच अंमलाखालील Casablanca त रिचर्ड (हंफ्रे बोगार्ट) हा सिनिकल आणी कडवट बनलेला माणुस rick's cafe चालवतो.आपल्या फायद्यापुरते पोलिस अधिकार्‍याना धरुन राहणारा रिक anti-fascist आहे.एक्झिट व्हिसा मिळवुन युरोपातुन बाहेर पडण्यासाठी कॅसाब्लँकात बरेच लोक ताटकळतायत.कुठेही प्रवास करण्याची परवाना असलेली Nazi transit letters योगायोगाने रिकच्या हवाली करुन एक चोर पकडला जातो.रेनॉल्ट ( क्लॉड रेन्स) ह्या फ्रेंच भ्रष्ट अधीकार्‍याला ती पत्रे रिक कडे असल्याचा संशय आहे.व्हिक्टर लाझलो ( पॉल हेन्रिड) हा concentration camp मधुन निसटलेला resistance नेता कॅसाब्लँकात येणार असल्याची वंदता आहे.तो सुटुन अमेरिकेला जाउ नये यासाठी फ्रेंच आणी जर्मन दोन्ही अधीकारी टपून बसलेत.एका संध्याकाळी व्हिक्टर rick's cafe त एल्सा (ईंग्रिड बर्गमन) बरोबर प्रवेशतो.रिकच्या सगळ्या कडवटपणाच कारण आहे एल्सा.कांही वर्षांपूर्वी दोघेही पॅरिस मधे एकमेकांच्या प्रेमात असतात पण कोणतेही करण न देता शेवटी एल्सा रिकच्या आयुष्यातुन निघुन गेलेली असते.रात्री पॅरिस मधे काय झाल होत हे रिकला सांगायला आलेल्या एल्साचा दारुच्या नशेत रिक अपमान करतो.कॅसाब्लँकातुन सुटण्यासाठी व्हिक्टर आणी एल्साला ती transit letters हवी आहेत.नंतर थोडासा निवळलेला रिक एल्साला माझ्याशी लग्न कर म्हणतो पण जेंव्हा ती पॅरिस मधे आपल्याला भेटली होती त्याच्याही आधी तिच व्हि़क्टरशी लग्न झालेल होत हे त्याला कळत.concentration camp मधे व्हिक्टर मरण पावला ही चुकिची बातमी एल्साला कळलेली असते. ती जेंव्हा रिक बरोबर पॅरिस सोडुन निघणार त्या क्षणी तो जीवंत असल्याच तिला कळत आणी ती व्हिक्टर कडे परतते पण अजुनही ती रिकला विसरली नाहिये.शेवटी रिक या दोघांना कॅसाब्लँका सोडुन जाण्यास ती transit letters देतो, वाटेत अडव्या आलेल्या जर्मन अधिकार्‍याचा रिकच्या हातुन खून होतो.रेनॉल्ट Round up the usual suspects म्हणून प्रकरणावर पडदा टाकतो.

बोगिने कडवट पण अजुनही एल्सा साठी झुरणारा रिक मस्त रंगवलाय्.तोपर्यंत gangster च्या भुमीका करणार्‍या बोगिचा हा पहिलाच romantic role.देखणेपणाच्या चौकटीत आजिबात न बसणारा त्याचा चेहरा प्रचंड बोलतो.कपाळावर एक अठी, ओठात सिगरेट्,डोळ्यात तिची आठवण आणी हे सगळ चेहर्‍यावर दिसु नये म्हणुन घेतलेला सणकू अवतार.पहिलेंदा जेंव्हा तो तिला कॅफेत बघतो तेंव्हा त्याचा चेहर्‍यावर धक्का, दु:ख याच तिव्र मिश्रण दिसत. हा एक चित्रपट आहे आणी तो अभिनय करतोय हे तुम्ही बोगिला बघताना पुर्ण विसरता.संवाद सुद्धा अगदी खुसखुशीत.
Major Strasser: What is your nationality?
Rick: I'm a drunkard.
Captain Renault: That makes Rick a citizen of the world.

एल्साशी होणारा पहिला संवाद ही असाच
Ilsa: I wasn't sure you were the same. Let's see, the last time we met...
Rick: Was La Belle Aurore.
Ilsa: How nice, you remembered. But of course, that was the day the Germans marched into Paris.
Rick: Not an easy day to forget.
Ilsa: No.
Rick: I remember every detail. The Germans wore gray, you wore blue.
भुतकाळातला हसरा, एल्साकडे मायेने बघणारा रिक आणी नंतरचा सणकलेला तरीहि चांगल्या वाइटाची चाड असणारा रिक बोगिने ताकदिने रंगवलाय इतका की याचा खराच प्रेमभंग झालाय त्यामुळे तो सटकलाय आणी आतुन तो अजुनही चांगला मणुस आहे यावर आपला विश्वास बसतो.(यासाठी ढसाढसा दारु पिउन, डोळ्याभोवति काळ करुन घेउन मेलोड्रॅमॅटिक बोलण्याची काहीही गरज नसते, नेमक बोलण्यातुन आणी अभिनयातुन हे दाखवू शकता याची इथे प्रचिती येते).ज्यासाठी हा चित्रपट ओळखला जातो असे काही संवाद
Rick: Of all the gin joints, in all the towns, in all the world, she walks into mine

Rick: here looking at you kid

Rick: Why did you come back? To tell me why you ran out on me at the railway station?
Ilsa: ...Yes.
Rick: Well, you can tell me now. I'm reasonably sober

Major Strasser: Are you one of those people who cannot imagine the Germans in their beloved Paris?
Rick: It's not particularly my beloved Paris.
Heinz: Can you imagine us in London?
Rick: When you get there, ask me!
Captain Renault: Hmmh! Diplomatist!
Major Strasser: How about New York?
Rick: Well there are certain sections of New York, Major, that I wouldn't advise you to try to invade

Captain Renault: What in heaven's name brought you to Casablanca?
Rick: My health. I came to Casablanca for the waters.
Captain Renault: The waters? What waters? We're in the desert.
Rick: I was misinformed.

ईंग्रिड बर्गमनने व्हिक्टर आणी रिक या दोघांमधे गुंतलेली एल्सा छान व्यक्त केलिये. हे काही तिच्या कार्किदीतल सर्वोत्तम काम आजिबात न्हवे.(Casablanca च्या अफाट यशामुळे लोक आपल्या इतर चांगल्या भूमिकांकडे दुर्लक्ष करतात अस ईंग्रिडला नेहमी वाटायच).तीचा चेहरा थोडासा हरवल्या सारखा आणी sad वाटण्यासाठी कॅमॅर्‍याला सॉफ्ट गॉज फिल्टर बसवल होत.एका मुलाखातित या दोघांच्या chemistry बद्दल विचारल असता बोगी म्हणाला होता when Ingrid Bergman looks into ur eyes and says "i love you" then there is no need to act.

क्लॉड रेन्स या इंग्लिश अभिनेत्याने रंगवलेला रेनॉल्ट लाजवाब. हा रेनॉल्ट अगदीच भ्रष्ट आहे, एक्झिट व्हिसासाठी लोकांकडुन बराच पैसे उकळतो.मनातुन त्यालाही फॅसिझम चा तिटकारा आहे.मिश्किल डोळे, भिरभीरणारी नजर आणी खुसखुशीत संवाद यामुळे रेनॉल्ट चांगलाच लक्षात राहतो.

Captain Renault: Rick, there are many exit visas sold in this café, but we know that *you've* never sold one. That is the reason we permit you to remain open.
Rick: Oh? I thought it was because I let you win at roulette.
Captain Renault: That is *another* reason.

Renault: [to Ilsa] I was informed that you were the most beautiful woman ever to visit Casablanca. That was a *gross* understatement.

[about Rick]
Major Strasser: You give him credit for too much cleverness. My impression was that he's just another blundering American.
Captain Renault: We mustn't underestimate "American blundering". I was with them when they "blundered" into Berlin in 1918.

व्हिक्टर लॅझलो चा चेहरा संपूर्ण चित्रपटात अतिशय stiff दाखवलाय.नाझी छावणीत बराच छळ झाल्यामुळे तो असा बनलाय.या कारणामुळे पॉल हेन्रिड सुरुवातीला बराच साशंक होता.वॉर्नर ब्रदर्स नी शेवटी त्याला मुख्य कलाकांरांएवढे मानधन देउ केले.
चित्रपटातिल इतर कलाकारांनी आपापली कामे चोख बजावली आहेत.पियानो वाजवणारा सॅम, कार्ल हा वेटर पण मस्तच.जवळपास पुर्ण चित्रपट कॅफेतच घडतो."as time goes by" हे गाण चित्रपटातील एकंदर माहौलमधे अगदी चपलख बसत.

चित्रपटाच्या शेवटी रिक आणी रेनॉल्ट बरोबर चाललेत, आजूबाजुला थोडस धुक पसरलय आणी
रिक म्हणतो
"Louis, I think this is the beginning of a beautiful friendship"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद नेतिरी. हा सिनेमा मी नेटफ्लिक्स वर क्लासिक्स चाळताना नेहमी दिसतो. का कोणास ठाऊक पण बघणं झालं नाही कधी. आता आवर्जून बघेन. सिटीजन केन बद्दल अनुमोदन. मी पाहिला पण इतका प्रभावी वगैरे आजिबात वाटला नाही. त्यात दाखवलेला काळ कदाचित मला अजिबातच ओळखीचा नाही त्यामुळेही असं झालं असावं. Happy

Thats a great movie of all the time... My personal favorite quote is "we'll always have paris.." Happy

अरे हे पाहिलेच नव्हते. माझा अत्यन्त आवडता सिनेमा आहे. आतापर्यन्तच्या चित्रपटातल्या टॉप ३ क्लायमॅक्सपैकी एक असे याचे वर्णन केले जाते. अगदी शेवटच्या फ्रेमला चित्रपटाचा निर्णय होतो.... यात ६५ की काय राष्ट्रीयत्वा ची पात्रे दाखवलेली आहेत..
मुख्यतः प्ले इट अगेन सॅम हा इन्ग्रिड बर्गमनचा डायलॉग.