मालवणी कविता - गंगाधर महांबरे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नुकतीच वाचनात आलेली गंगाधर महांबरे यांची एक मालवणी कविता

ऐनाच्या बैना शबय शबय शबय शबय | मालवणाच्या बंदरात म्हावरा लय |
घेऊ किती नावा सुळे, मुडदुशी | कोळंबी, शेवटे, पालु, तांबुशी |
पेडवे, सौंदाळे, पापलेटा, गुंजली | रावस, बांगडे, मोरी नि कर्ली |
मांदेली, सरंगे, कुलमौ एकठथ.. |
पाण्यातलो रूचकर माशांचो खजिनो |
भरुन घे डोलकरा तुझो छबिनो |
खोल पाण्याचा मेल्या खय तुका भय?..|
हलवाच्या ऐवजी हलवो | नाव घेवन येक येक |
मेल्यान आवंढो गिळलो | सुक्या हुमण तिखला अख्खो |
बाजार तळलो | चाटून पुसून खावची सवय |

विषय: 
प्रकार: 

खूप काही कळली नाही पण छान वाटतात मराठी लहेजा असलेल्या कविता.

ती कॉमा देऊन आलीली नामे, माशांची नावे आहेत का?

|नीलुताइ,
मी सध्या हिमाचल मधे आहे. वरील नाव वाचुन माशांची फारच आठ्वण येते आहे.

नीलू, अगं त्या कवितेचा अर्थही लिही ना, किंवा वाचणार्‍याच्या डोक्याला खुराक देण्यासाठी, मोजक्या शब्दांचे अर्थ तरी दे....
मला तर शून्य कळलंय वरच्या कवितेतलं... Sad