मी एक स्वतंत्र वर्तुळ

Submitted by अवल on 23 January, 2011 - 23:32

ऊल्हास भिडे यांच्या "π (२२/७)"" http://www.maayboli.com/node/22901
या कवितेकडून प्रेरित होऊन Happy

माझ्या भावनांचे
अर्थ उलगडत, संदर्भ देत
भावभावनांच्या गुंत्यात
राहिले मी गुंतत
मी आखलेल्या पण
तू दुर्लक्षिलेल्या
व्यापलेल्या परिघाच्या
वर्तुळाच्या केंद्री....
मी .....
……………………
हळूहळू हळूहळू
माझा परिघ
आकसत गेला
मग एक नवेच
फक्त माझे असे
स्वतःचे व्यक्तित्व असलेले
"माझे" वर्तुळ
सापडले मला
तू मात्र पूर्वीच्यात
पारंपारिकतेत मश्गुल
माझ्या वर्तुळाच्याही परीघा बाहेर
माझ्यापासून कितीतरी दूर.....

गुलमोहर: 

अवल,

ही भयंकर आवडली. प्रेरणा घेतलेल्या कवितेला उत्तर म्हणून अगदी चपखल आहे. Happy
इन फॅक्ट मूळ कविता वाचताना "ती" च्या साईडचेच विचार मनात प्रभावीपणे रेंगाळले आणि काहीसे तू वर मांडलेल्या विचारांशी जुळले. Happy त्यामुळेच तुझी ही कविता जास्त रीलेट झाली. Happy

<<तू मात्र पूर्वीच्यात
पारंपारिकतेत मश्गुल
माझ्या वर्तुळाच्याही परीघा बाहेर
माझ्यापासून कितीतरी दूर.....<<

ए, छानच गं! आवडली!!! Happy

पुन्हा वाचल्यावर समजली Happy आणि आवडली.
भूमितीतले मराठी शब्द पटकन समजत नाहीत ते विदिपांनी सांगितले.

शेवटी केंद्रबिंदूवरच परीघाचं आकसनं अवलंबून असतं ना? जेवढी त्रिज्येची सैलता अन सुट तेवढंच वर्तुळ मोठं होतं राहणार.
आवडली कविता. Happy

>>तू मात्र पूर्वीच्यात
पारंपारिकतेत मश्गुल

व्वा! इथे मश्गुल ऐवजी अडकलेला इ. कुठलाही तत्सम शब्द न घेता 'मश्गुल' हाच शब्द निवडलात हे खासच!

कविता छानच! Happy