अडालज

Submitted by वर्षू. on 11 January, 2011 - 04:10

अहमदाबादपासून जवळ असलेल्या गांधीनगर डिस्ट्रिक्ट मधे स्थित असलेली ही अडालज वाव (step well)
१४९९ मधे मुहम्मद बेगडा या मुसलमान राजाद्वारे, वाघेला वंशाचा राजा वीर सिंग याची राणी रूपबा,हिच्यासाठी बांधण्यात आली. पाच मजले खोल असलेल्या या विहिरीच्या भिंतींवर अप्रतिम बारीक नक्षी कोरलेली आहे. जुन्याकाळी या विहीरी चे पाणी पिण्याकरता,आंघोळीकरता,कपडे धुण्याकरता वापरले जाई.संपूर्ण गुजरात राज्यात पाचव्या शतकापासून १९साव्या शतकापर्यन्त बांन्धण्यात आलेल्या १२० अश्याप्रकारच्या विहीरी आढळून आल्या आहेत्.त्यापैकी अडालज ही सर्वात आधिक महत्वपूर्ण स्टेप वेल ठरली आहे.
या विहिरीमागचा संक्षिप्त इतिहास
१५व्या शतकातील 'दंडाईदेशावर (आत्ताचे गांधीनगर) वाघेला वंशाचा 'राणा वीर सिंग' राज्य करत होता. मुहम्मद बेगडा या मुसलमान राजाने दंडाईदेशावर आक्रमण केले. या युद्धात 'राणा वीर सिंगाचा मृत्यू झाला. त्याची अनुपम सुंदरी राणी रूपबा हिच्यासमोर मुहम्मद बेगडाने विवाहाचा प्रस्ताव मांडला. यावर शोकाकुल राणीने त्याचा प्रस्ताव मानला परंतु, बेगडा राजाला तिच्या नवर्‍याने सुरु केलेल्या या विहिरीचे काम आधी पूर्ण करायची अट घातली. त्याप्रमाणे विहीर बांधण्याचे काम संपूर्ण झाल्यावर मुहम्मद बेगडाने राणीला तिच्या वचनाची आठवण करून दिली.
पण स्वाभिमानी राणीने त्याच विहीरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.
ही विहीर बांधण्यामागच्या घटना येथील भिंतींवर चित्रीत करण्यात आल्या आहेत. राणीच्या विश्वासघाताचा बेगडा वर काहीच विपरीत परिणाम झाला नाही.पुढे त्याने ही विहीर नष्ट न करता वाटसरू,गरजू लोकांसाठी खुली केली.

adl1.jpg450px-Adalaj_Wav.jpgadl2.jpgadl3.jpgadl4.jpgadl5.jpg

गुलमोहर: 

वर्षू ...मस्तच गं!
आमच्याही गावात एक हत्ती बारव म्हणून पुरातन काळातली विहीर्/हौद आहे. पण संपूर्णपणे दुर्लक्षित! फार सुंदर काम आहे. तिथेही कोणी राण्या अंघोळ करायच्या असा काहीतरी रेफरन्स आहे.

मी हे फोटो एअरपोर्टवरुन बघितले होते पण मराठीत प्रतिसाद टाईप करायला जमत नव्हते. मस्त आहेत फोटो. मी अजूनही अशी विहिर बघितली नाही. एका खेडेगावात बघितली होती, तिला फक्त एका बाजूने उतरायला जिना होता.
अशा विहिरित खूप थंड वाटते असे पण ऐकले होते.
शाहरुख खान आणि राणी मुखर्जी च्या, पहेली सिनेमात पण अशा काहि विहिरि दाखवल्या होत्या.

अडालजनी वाव बद्दल कितीही वेळा वाचलं पाहिलं तरी मन भरत नाही. प्रत्यक्ष बघायलाच पाहिजे.
रच्याकने सुरभि ही दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणातली सांस्कृतिक पत्रिका. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे सादर करायचे. भारतीय बैठक - मांडी घालून बसलेले, हात जोडून सुंदर नमस्कार करायचे. रेणुकाचे स्माइल तिथे लोकांच्या लक्षात आले.

मानुषी.. विहिरीचा फोटो काढून टाक हिक्डं Happy
दिनेश दा.. गुजरात,राजस्थान इथे अश्या विहिरी खूप आढळून येतात.. या प्रदेशांतून नेहमी असलेली पाण्याची वनवा हेच कारण असावे या विहीरी बांधण्यामागे.. सध्या कुठेशी आहात???????
रुणुझुणु ,स्वाती धन्स!!

अरे भुलभुल्लैय्या मधे आहेतच कि अश्या विहिरी. मंजूडीला अनुमोदन. खरोखर स्थापत्य कलेचा एक उत्तमोत्तम नमुना. भव्यता तर आहेच पण कोरीव कलाकुसर वाखाण्याजोगी. इतिहासानं खूप काही मागे ठेवलयं. आपल्याला फक्त ते शोधून त्याचा आनंद घ्यायचा अन शिकता आलं तर शिकत अन शिकवत रहायचं. जेणेकरून इतिहास जिवंत ठेवता येईल.

वर्षूजी,
संदर.
२ र्‍या आनि ३र्‍या प्र चि मध्ये एक कंपार्टमेंट (शब्द सुचत नाहिये) मधुन बाजुच्या दुसरं कंपार्टमेंट दिसत आहे, केवळ अप्रतिम. प्र चि काढणार्‍याचे प्रेझन्स ऑफ माईंड चे खरंच कौतुक.

धन्स सुनिल्,म्हमईकर.. अरे फोटो म्याच काढलेत्..आणी मी अजिबात एक्सपर्ट नाहीये.्ई वास्तूच इतकी अदभुत आहे कि आपोआप फोटू मस्त निघालेत

वर्षु,
खास माहिती आणि मस्त फोटो !
विहिरीच्या भिंतीवर देखील इतकं नक्षीकाम म्हणजे सध्याच्या काळातला चमत्कारच म्हणायला हवा !
:स्मितः

Pages