कोथिंबीर टिक्की, पालक रोल - शेफ विष्णू मनोहर यांच्या पाककृती

Submitted by चिनूक्स on 12 September, 2008 - 14:20

मायबोली गणेशोत्सवाकरता सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिलेल्या खास पाककृती
---------------------------------------------------------------

. कोथिंबीर टिक्की :

लागणारा वेळ :
१५ मिनिटे

साहित्य :
बारीक चिरलेली कोथिंबीर - २ वाट्या
कणीक - अर्धा वाटी
चण्याच्या डाळीचे पीठ - अर्धा वाटी
आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
आमचूर पावडर - अर्धा चमचा
हळद, तिखट - प्रत्येकी अर्धा चमचा
मीठ
तेल - १ चमचा

कृती :
कढईत तेल घेऊन आलं-लसूण पेस्ट साधारण मिनिटभर परतून घ्यावी.
मग त्याच कढईत कणीक व चण्याच्या डाळीचे पीठ तांबूस भाजावे.
मग त्यात कोथिंबीरीसकट सगळे जिन्नस घालावे.
कोथिंबीरीला जे पाणी सुटेल त्यातच हे मिश्रण शिजवावे.
नंतर एका ताटलीला तेल लावून, हे मिश्रण त्यावर थापून वाफवून घ्यावे.
या वड्या किंचित तेलात खरपूस परतून घ्याव्यात आणि टोमॅटो केचपबरोबर खायला द्याव्यात.

वाढणी :
२ माणसांसाठी

---------------------------------------------------------------

. पालक रोल :

लागणारा वेळ :
१० मिनिटे

साहित्य :
पालकाची मोठी पाने - १०
बारीक चिरून वाफवलेल्या मिश्र भाज्या - १ वाटी
कॉर्नस्टार्च किंवा आरारोट - ३ चमचे
भाजलेले जीरे - अर्धा चमचा
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ, साखर
तेल

कृती :
वाफवलेल्या भाज्यांमध्ये मीठ, लिंबाचा रस, साखर (चवीपुरती), जीरे घालून नीट एकजीव करावे.
हे सारण पालकाच्या पानात गुंडाळून त्याला टुथपीकने बंद करावे.
हे रोल कॉर्नस्टार्च किंवा आरारोटच्या पीठात बुडवून तळावे, आणि हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावेत.

वाढणी :
२ माणसांसाठी

---------------------------------------------------------------त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चकली हयांच्या ब्लॉगवर आहे रेसेपी...
http://chakali.blogspot.com/2008/04/spring-roll.html

ह्यावर क्लिक केल्यास मिळेल रेसेपी...मी ट्राय केली होती, चांगले झालं होते....

================================================
Write your Sad times in Sand, Write your Good times in Stone.
--GEORGE BERNARD SHAW