बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवून गेला ....॥१॥
त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला ....॥२॥
जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला ....॥३॥
लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेवून, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहूनच गेला ....॥४॥
.
........ गंगाधर मुटे
ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.
.....................................................................
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली.
बंदी = पुर्ण,संपुर्ण.
आवमाय = अग्गबाई
मांगं = मागे
नावकूल = पुर्णपणे.
....................................................................
१) नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल
२) छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका
...................................................................
मुटे साहेब.. लै भारी होतं
मुटे साहेब.. लै भारी होतं बिपाशाचे लुगडे..
लय भारी .... त्याचा काय
लय भारी .... त्याचा काय हाय, तो जगाचा न्याय हाय , दात हाय पण चणे नाय, चणे हाय तर दात नाय
उघड्या बिपाशाले, श्याम्या घाले लुगड
घरात त्याच पोर असेल उघड
ह्ये मंजी येकदम फसट्कलास
ह्ये मंजी येकदम फसट्कलास जंक्षन जालं की हो राव!
एकदम लंबर वन!
बाप्रे मुटेजी.
बाप्रे मुटेजी.
सहीच!
स्मितु, एक वर्षापूर्वीची ही
मुटेजी, तुमची कविता तर मस्तच जमलीये, पण ऑडिओ ऐकून खुपच मज्जा वाटली... खास नागपुरी तडक्यातलं तुमचं काव्यवाचन ऐकणे ही एक पर्वणीच होती.
सर्व प्रतिसादकांचे बिपाशाच्या
सर्व प्रतिसादकांचे बिपाशाच्या वतीने आभार मानतो.
लयच भारी हाय राव
लयच भारी हाय राव
येकदम बेस .. लय हासली...
येकदम बेस .. लय हासली...
लै भारी तुमची बिपशा!
लै भारी तुमची बिपशा!
अनिल तापकीर, टीना,
अनिल तापकीर, टीना, अग्निपंख
खूप खूप आभार प्रतिसादांचे शतक पूर्ण करून दिल्याबद्दल.
मस्तंच
मस्तंच
आज सर्व प्रतिसादकांची नावे
आज सर्व प्रतिसादकांची नावे वाचली. किती लोकांच्या आय ड्या बदलल्या. बापरे. आता अनेक लोक बदललेल्या आय डी मुळे ओळखताच येत नाही.
Pages