लफ्फा

Submitted by नीधप on 8 January, 2011 - 01:27

पूर्वी पण टाकला होता तो परत टाकतेय.

laphphs.jpg

हे चित्र तयार करण्याचं मूळ कारण माझ्याकडे संदर्भ-बँक तयार करणं हे आहे. मला कल्पना आहे की डिजिटल पेंटींग म्हणून ह्या चित्राला काही महत्व नाही.
फोटोशॉपमधे आयबॉलच्या पेन टॅब्लेटच्या ( http://iball.co.in/Product.aspx?c=16 ) सहाय्याने हे चित्र तयार केलेय.
लफ्फ्याच्या फुलामधली एक पाकळी आधी पेनने फोटोशॉपमधे काढली. मग ती ३ वेळा रोटेट करून एक चार पाकळ्यांचे फुल बनवले आणि मग तेच फुल रोटेट आर्बिटरी (०.०५ - ०.१ या दरम्यान) क्लॉकवाइज आणि अँटीक्लॉकवाइज दोन्ही करून सगळी फुलं तयार केली. ती योग्य पद्धतीने अ‍ॅरेंज करून पहिले त्याची माळ बनवली.
एवढी सिमिट्री मिळाल्यावर मग नवीन लेयर मधे मोती फ्रीहँड काढले. शेड बिड दिली. तीच गोष्ट प्रत्येक फुलाला असलेल्या ३ मण्यांच्या लटकनची. मधल्या फुलावर लाल माणिक रंगवले.
टेक्स्ट टूलमधून श्री लिपीच्या सहाय्याने लप्फा हे शीर्षक दीले.
नवीन लेयर वर पेन माउसने माझी सही ठोकली.
फ्लॅटन इमेज करून लेयर्स दाबले.

गुलमोहर: 

मस्तच.....
फ्लॅटन इमेज करून लेयर्स दाबले.>>>> पण मुळ फाईलमधे लेयर्स ओपन आहेत ना??? नाहीतर एडीटिंग करतांन पंचाईत व्हायची.....

सुंदर, बॅकग्राऊंड कलर काळा असता तर आणखी छान दिसलं असतं. असं माझं मत !

फूलांची डिझाईन खूप अप्रतिम जमली आहे.

"फोटोशॉप"बद्दल मी अजून अनभिज्ञ आहे पण त्यानं इथं साधलेला परिणाम छानच आहे, हे नक्कीच.<<बॅकग्राऊंड कलर काळा असता तर आणखी छान दिसलं असतं >> मलाही असं जाणवतं पण वेगवेगळी बॅकग्राऊंड देऊन पाहिली असतीलच ना ?

मी बर्‍याचश्या वेळेला ५०% ग्रे पार्श्वभूमीवर चित्र काढते. सगळे रंग त्यांच्या त्यांच्या योग्य व्हॅल्यू आणि इन्टेसिटीत दिसतात.
अती शार्प कॉन्ट्रास्टची आपल्या डोळ्याला अती सवय झालीये कारण आपल्यासमोर तेवढंच जास्त वेळा येत असतं. उदा. फोटोमधलं सोनं ज्या पद्धतीने पिवळं झळाळतं. तसं खरं सोनं कधीच झळाळत नाही.
असो पण हे अती शार्प कॉन्ट्रास्ट मला फार भडक वाटतात. चित्राचा फोकस क्लीअर न करणारे वाटतात. त्यामुळे निगेटिव्ह स्पेस म्हणून ५०% ग्रे पार्श्वभूमी योग्य ठरते.
हे चित्र काढताना प्रिन्ट क्वालिटी मिळावी या हेतूने हायर रिझोल्युशनला काढलेले आहे. माबोवर टाकताना चित्राच्या वजनाला मर्यादा असल्याने ते कॉम्प्रेस करावे लागते. ते करताना अनेक तपशील निघून जातायत त्यामुळे माझ्या ५०% ग्रे वर कडा मर्ज झाल्यासारख्या दिसतायत.
त्यासाठी उपाय म्हणून या ठिकाणी ५०% ग्रेच्या ऐवजी व्हॅल्यू थोडी वाढवली. याहून व्हॅल्यू वाढवल्यास लफ्फा हा सोन्याचा न दिसता रस्त्यावर मिळणार्‍या चमचम पिवळ्या मटेरियलचा दिसेल. पण लोअर रिझॉल्यूशनला ते जास्त बरं दिसत असावं.

काळी किंवा निळी किंवा कुठलीही सॅच्युरेटेड रंगांची पार्श्वभूमी घेतल्यास लफ्फ्याचा पिवळेपणा अती झळाळ कडे पोचेल. लफ्फ्यातला खानदानीपणा निघून जाईल.

<<लफ्फ्यातला खानदानीपणा निघून जाईल.>> नीधप, एव्हढा कांटेकोर विचार यामागे असावा हा चित्राचाही खानदानीपणाच झाला !

छान

<< काळी किंवा निळी किंवा कुठलीही सॅच्युरेटेड रंगांची पार्श्वभूमी घेतल्यास लफ्फ्याचा पिवळेपणा अती झळाळ कडे पोचेल. लफ्फ्यातला खानदानीपणा निघून जाईल. >>

धन्स, अपेक्षित असं स्पष्टीकरण दिलंत. बाकी 'लफ्फा' सारखे दागिने मूळातलेच खानदानी आहेत. Wink

चित्रातल्या लफ्फ्यातला खानदानीपणा निघून जाईल असं म्हणायचं आहे काय? नीरजाताई.

कंठभूषणे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=605...

सुरेख Happy