एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल?

Submitted by मदत_समिती on 27 March, 2008 - 02:10

तुम्हाला मायबोलीवरच्या ज्या सदस्याचे लिखाण वाचायचे आहे त्या सदस्याच्या नावावर* टिचकी मारा मग जे पान उघडेल तिथे "लेखन" या टॅबवरती त्या सदस्याने केलेले सगळे लिखाण एकत्र दिसेल.

या नियमाला अपवादः लेखकाने एखाद्या ग्रुपमध्ये केलेले लिखाण हे , तुम्ही त्या ग्रुपचे सदस्य असाल तरच दिसेल. अन्यथा दिसणार नाही.

स्वतःचे लेखन बघण्यासाठी "माझे सदस्यत्व" ==> "लेखन" क्रमाने क्लिक करत जावे.

पुर्वी बाफवरती दिलेल्या प्रतिक्रिया पाउलखुणांमध्ये दिसत असत. त्यात बदल केला आहे. याबद्दल माहिती येथे मिळेल.
लेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु

*सदस्य कसा शोधावा यासाठी मदतपुस्तिकेमधील "मायबोलीचा सदस्य शोधायचा असेल तर कसे शोधावे? सदस्यांची लिस्ट आहे का?" हे पान बघावे.

शोनू, ते आयडी, रोमन लिपीत का करायचे आहेत ? 'शोध' करताना मिळत नाहीत म्हणून का ?

मला असं वाटतं की अजून देवनागरी आयडी घेण्याची तांत्रिक सुविधा पूर्ण उपलब्ध नाही, त्यामुळे शोध व्यवस्था पण त्यावर चालत नाही. यावर सध्या तरी पर्याय म्हणजे देवनागरी आयडी न घेणे.

मिलींदा माझ्यामते तिला म्हणायच होते की भाषा कशी टॉगल करायची सूचीत एखादा आयडी शोधायच्या चौकटीत लिहीतांना. आता मराठी उमटतय तिथे. शोनू Ctrl + \ ने भाषा बदलून रोमन मध्ये तुला एखादा आयडी लिहीता येईल आणि शोधता येईल.

I need help...few days back I read oen article (dont remember the author) its title was "सुटलेल्या पोटाची राजगडावर ...." Cn anybody PLEASE send me link fo this article? I want to read it again......

hey thanks alooooooooooooooooooooooot !!!! Happy

"पाऊलखुणा" विभागात त्या सदस्याने दिवाळी अंकात केलेले लेखन दिसत नाही. ते उपलब्ध करुन देता येइल का ?

मला सध्या पाऊलखुणा ही टिचकीयोग्य जागाच दिसत नाही जेव्हा मी माझ्या सद्स्यत्वामधे येतो तेव्हा ... का बरं असं?

एखाद्या जुन्या सदस्याचे लिखाण वाचायचे असेल तर त्याला शोधायचे कसे? आणि त्याचा id जिवंत असेल, पण latest लिखाण नसेल तर त्याला प्रतिसाद कसा द्यायचा?

एखादी जुनी id शोधुन तिला संपर्क कसा करायचा?

मनिमाउ: मायबोलीसंबंधी प्रश्नोत्तरे विभागात तुमच्या प्रश्नाची उत्तरे आहेत, "मायबोलीवर एखाद्या सदस्याला कसे शोधावे" या उपविभागात. तेथे सदस्याला शोधून, त्याच्या/तिच्या विपूमध्ये तुम्ही लिहू शकता.

अ‍ॅडमिन, एखाद्या सदस्याच्या पाऊलखुणांच्या दुव्यावर टिचकी मारल्यावर त्याच्या पाऊलखूणांची यादी येते. या यादीतल्या एखाद्या दुव्यावर टिचकी मारली तर त्या बाफाचे पहिले पान उघडते. पहिल्या पानाऐवजी त्या सदस्याचा (पहिला) प्रतिसाद ज्या पानावर आहे, ते पान उघडता येईल का? ते सोयीचे होईल का? सध्या पहिले पान उघडत असल्यामुळे ज्या बाफांवर प्रतिसादांची भरपूर पाने आहेत, तिथे त्या सदस्याची "पाऊलखूण" शोधण्यासाठी सगळी पाने चाळावी लागतात.

i have just joined first time MMAYBOLI ... i got an password 2 my account but as they said i am unable to change it .. it was just system genrated password.. can anyone plzzzzzz help me or tell me how can i change it online ... when i am trying to change password .. it again going to first page and again it is asking to change .. at what time it would be reset then ...

can anyone plzzzzzzzz help me out .....

एखाद्या लेखनाची किती वाचने झाली हे इथे समजत नाही. त्यामुळे एखादा लेख किती लोकांपर्यंत पोचला याचा काही अंदाज बांधता येतो.त्यांनी तो चाळला कि वाचला हा नंतरचा भाग आहे.

एखादा आयडी डिसेबल झाल्यावर त्याचे / तिचे लिखाण कसे शोधायचे? माझी आवडत्या १०ची लिस्ट वाढत गेल्यावर Kiran... च्या काही कविता आणि स्फुट १० मधुन निघुन गेले आहे.

मला ' चैत्रातला पाउस /कि ऊन' असं काही तरी लिखाण होतं ते परत वाचायचं आहे.

दैवी कृपा

क्षण होते कितीतरी सुखाचें
अजुनी आठवणीत ताजे तवाने
बिलोरी आरशासमोर असूनही
मी आरशात तुलाच पाहते

रुबाबदार डोळ्यांतील तुझे हसणे
मनामनात सतत तरळत राहते
ऐटीत फिरणे आणि ना कुणासमोर वाकणे
वैशिष्ट तुझ्या जीवनाचे मज भावले

तुझीच होऊन राहणे खूप खूप आवडले
शक्य नव्हते तरीही दैवीकृपेने साध्य झाले
एक एकदा मन विचारते स्वतःलाच
दुसऱ्या कुणी सुख दिले असता का ग एवढे?

नको तो विचार सुद्धा माझ्या मना
तू आणि तूच जीवांसाठी व्हावास पुन्हा पुन्हा
ईश्वर चरणी हीच एक प्रार्थना
देवो आरग्य आणि भरपूर आयुष्य तुला

२२/०५/२०१८
मी संतोषी

दैवी कृपा

क्षण होते कितीतरी सुखाचें
अजुनी आठवणीत ताजे तवाने
बिलोरी आरशासमोर असूनही
मी आरशात तुलाच पाहते

रुबाबदार डोळ्यांतील तुझे हसणे
मनामनात सतत तरळत राहते
ऐटीत फिरणे आणि ना कुणासमोर वाकणे
वैशिष्ट तुझ्या जीवनाचे मज भावले

तुझीच होऊन राहणे खूप खूप आवडले
शक्य नव्हते तरीही दैवीकृपेने साध्य झाले
एक एकदा मन विचारते स्वतःलाच
दुसऱ्या कुणी सुख दिले असता का ग एवढे?

नको तो विचार सुद्धा माझ्या मना
तू आणि तूच जीवांसाठी व्हावास पुन्हा पुन्हा
ईश्वर चरणी हीच एक प्रार्थना
देवो आरग्य आणि भरपूर आयुष्य तुला

२२/०५/२०१८
मी संतोषी