Mee Amour..
गार काळ्या कातळाखालून
तप्तशुभ्र झरा उसळी मारुन वर येताना
मी लाल बनारसी रेशिम असते
आणि त्यावर जरतारी बुंदके असतात.
माझ्यावरची नक्षी मला आवडते.
मी खेळत रहाते
तुझ्या डोळ्यातल्या मधाच्या ठिपक्याशी
चमकत असतो तो.
माझ्या नाकात चमकी आणि पायात जोडवी सुद्धा असतात
तेव्हा तुझ्यासाठी
भांगात बिंदी आणि केसांत चांदण्यांसारखी फ़ुले खोवलेली
तुला आवडतात म्हणून
मला डोळे भरुन काजळ घातलेलं आवडतं
तेव्हा
आणि हातभरुन रंगीत काचेच्या बांगड्या घालायलाही
मला आवडलेलं असतं.
मला लवलवती रेशिम पात म्हणून हाक मारणारे महानोर तेव्हां आवडतात
आणि बोरकरही
जेव्हा तुझ्या वीजेचं चांदपाखरु माझ्या कवेत असतं.
मला बिडी आवडते तेव्हां आणि जळत राहीलेलं जिगरही.
I play for yu. For the twinkle in your eyes
when I rant in Hindi
क्या हैं..
तेव्हा मला आवडतात
गुलाबी कोडं सोडवणार्या शृंगारिक लावण्या मंचकावर बसून म्हणायला.
ढोलकीचा ताल अंगात भिनत जाताना त्यांचा अर्थ तुला समजावून सांगताना
मला आवडत रहातं.
माझ्या नावातली लाज माझ्या देहावर शिल्लक राहीलेली नसते
आणि तु त्याचा अर्थ त्यावर कोरत रहातोस.
You bring out my name in me.
मी नीलमोहोर आणि मोहाच्या फ़ुलांचा गुलाबी बहर
माझ्यातला लालजर्द पलाश
आणि सोनसळी अमलताश
गॅलरीत तु जमवलेले कॅक्टस आणि क्रोटॉन्स
निलगिरीचा कुंद वास आणि मेंदीचा लाल श्वास
माझ्यात भरुन उरलेला
तेव्हा.
मिनियाबर्गवरच्या त्या जुनाट दगडी बंगल्याच्या कुंपणावर
लावलेल्या पॅन्सीची पानं
मी चावत राहीलेली असते तुझ्याशी
बोलण्याच्या नादात
माझे ओठ जांभळे पडेपर्यन्त.
आणि तुझ्या हातांचे पंजे
रुतत राहीलेले असतात माझ्या
पालथ्या मनगटावर
त्यांना लाल रंग चढेपर्यंत
पण मी तक्रार करत नाही.
जंगली गुलाबांनी भरलेल्या बागा
आणि रिकामी फ़ायरप्लेस
दरीतून लोटालोटानी वर आलेल्या
धुक्याचा वास
माझ्या अंगाला
कालीघाटावरच्या तुझ्या घराच्या अंगणातली
रातराणी मी बनते जेव्हा तु तो हुंगत रहातोस
माझ्या मानेवर तुझे ओठ खुपसून.
ये माझ्या शेजारी बस. जमिनीवर.
मला न जमलेली पोश्तो करी
हिरव्या पानांच्या द्रोणातली नारळाची बर्फ़ी
आणि मला नीट जमलेलं आम्रखंड
तुझ्या बोटांचा चिकटपणा विसरुन
केलेलं प्रेम
माझ्या पाठीवर आणि पोटावर.
मी म्हणायचं असताना तु हम म्हणतोस
आणि त्या प्रत्येक वेळी माझ्या घोळदार स्कर्टच्या घेरात
तुला मी लपवून ठेवते.
तु शोधत रहातोस
तुला आणि मला.
धुपाच्या कांडीच्या चंदनी धुरात
तु गुदमरतोस
तुझ्या ऐंशी वर्षांच्या आजीची आठवण तेव्हां मी काढते
तुझ्यासाठी.
माझ्या डोळ्यात सेपिया धुळीची वादळं
आणि कच्च्या हिरव्या कैरीच्या बागा
कालीघाटावरच्या पुजारणींचा लाल सिंदूर
मी भरुन घेते
तुझ्यासाठी.
मी खेळत रहाते.
तुझे डोळे बंद आणि घट्ट मिटून घेतलेले असताना
तुझ्या अंगावर पसरत रहाते.
फक्त तुलाच अधिकार आहे मला हाक मारायचा
राणी
आणि माझ्या बिछान्यात ब्रेकफ़ास्ट फ़क्त तुच
आणू शकतोस
माझ्यासाठी
आणि कधीकधी व्हिस्कीसुद्धा.
कलोनच्या पाण्याचा गंध
गच्चीत प्यायलेली वाईन
आणि तुझ्या शाळेतल्या शिक्षकांनी दिलेल्या
उसाच्या करव्यांमधे दात रुतवताना ओघळून पडलेले
गोड रसाचे थेंब
तुला माझ्यात आठवत रहातात
तेव्हा.
You bring out everything in me.
निळ्या काचांच्या तुझ्या स्टुडिओत
तुझ्यावर पहिल्यांदा केलेलं प्रेम
तिथल्या त्या जुन्या सागवानी पिवळ्या
लाकडी फ़रशीच्या वासासकट
माझ्यात भिनून राहिलेलं आहे
माझ्यात मुरलेलं आहे
मी त्यात गुरफ़टून राहीलेली आहे
माझ्यात ते धुमसत आहे
मला ते नकोस झालेलं आहे
माझ्यातून ते बाहेर पडत नाहीये.
थंडगार बर्फ़ाळ जमिनिवरची उघडी पावलं
एअरकुलर मधला वाळ्याचा वास
उन्हाळ्यातल्या तुझ्या गच्चीवरच्या बरसातीतला.
टपटपलेल्या प्राजक्तांच्या फ़ुलांखालच्या ओल्या मातीचा वास
आणि उफ़ाळून आलेल्या वाफ़ा
तुझ्या माझ्या कातडीला पोळून टाकणार्या
You remind me of all these.
The forgotten, pushed away,
Hidden parts of me,
You are the one I spin these yarns for,
At 4 am,
Overworked and sleep deprived.
Let me love yu.
(You do.)
Let me show yu.
(kyunki)
You do. Yes. You do.
come call me jaan, like yu do.
कशाची तरी कसली तरी अॅनिवर्सरी साजरी करताना
मधली सारी अंतरं मोजून पहाताना
तुला मी आणि मला तू
शोधत रहातोय
आपापल्या जगात..
You bring out the lost world in me.
Beauty! Welcome back!
Beauty!

Welcome back!
म्हंह्ह्ह्ह...."संवाद"... छान
म्हंह्ह्ह्ह...."संवाद"... छान आहे छान आहे!
थॅन्क्स स्वाती. चातक ही
थॅन्क्स स्वाती.
चातक ही कविता नाही.
वा! सुंदर. 'संवाद' आवडला.
वा! सुंदर. 'संवाद' आवडला.
आवडले ... एकदम आवडतेय वाचताना
आवडले ... एकदम आवडतेय वाचताना ... Me Gusta "Mee Amour ..."
Mi Amor असावे बहुधा
नेहमीसारखीच होपलेसली
नेहमीसारखीच होपलेसली रोमॅन्टिक ट्यु... मस्तच मस्तच!!
हे काही कळत नाही मला .. पण
हे काही कळत नाही मला .. पण ट्युलिप चंच असेल हे वाचून कळतं ..
Mi Amor असावे बहुधा >> असामी, Mee amour ही डच phrase आहे आणि त्याचा अर्थ amour them असा आहे हे गुगल ट्रांस्लेट वर कळलं ..
amour (in English) => noun
1. a love affair.
2. an illicit or secret love affair
वॉव स ही ये! मस्त.
वॉव स ही ये! मस्त.
सशल, अर्थ सांगितल्याबद्दल
सशल, अर्थ सांगितल्याबद्दल धन्स

माझ्या एका मैत्रिणीच्या पुण्यातल्या घराचं नाव होतं MEE AMOUR
सहीए!!
सहीए!!
Mee amour ही डच phrase आहे >>
Mee amour ही डच phrase आहे >> spanish/italian मधे my love अशा अर्थाने वापरतात (एक शब्द इटालियन नि दुसरा स्पॅनिश). असे बाजूच्या काकूने सांगितले.
Mee amour ही डच phrase आहे >>
Mee amour ही डच phrase आहे >> spanish/italian मधे my love अशा अर्थाने वापरतात (एक शब्द इटालियन नि दुसरा स्पॅनिश). असे बाजूच्या काकूने सांगितले.
>> असेल .. मी फक्त गुगल ट्रान्स्लेट वरचं ज्ञान पाजळलं .. पण ते गॅम्बलर मधलं गाणं आहे "दो लफ्जों की है .." त्यात जे इटालियन शब्द आहेत त्यात ही फ्रेज आहे बहुतेक ..
सशल, 'दो लफ्जों की है'मधे
सशल, 'दो लफ्जों की है'मधे 'Amore Mio' असं आहे. म्हणजे 'my darling / sweetheart'.
मला वाटतं 'धूम-२' मधे हृतिक रोशन पडद्यावर असतांना (बास्केटबॉल खेळत असतानाचा सीन आठवा - तो ऐश्वर्याला सोबत काम करायची ऑफर देतो तो. त्यात) मागे "Mi amore, mi corazon" (my love, my heart) असं काहीतरी गाणं वाजत असतं.
छान लिहिलयसं !
छान लिहिलयसं !
छान लिहिलयसं !
छान लिहिलयसं !
छान लिहिलयसं !
छान लिहिलयसं !
Amore Mio >> Variation?
Amore Mio >> Variation?
>>होपलेसली रोमॅन्टिक अगदी
>>होपलेसली रोमॅन्टिक
अगदी अगदी !
वेल्कम बॅक ट्यू !
मलापण 'अमोरे मियो'च आठवलं पहिलेप्रथम. उच्चारात फरक होता म्हणून सोडून दिले.
ज-ब-र-द-स्त!!!
ज-ब-र-द-स्त!!!
वेलकम बॅक ट्यु. लाल जर्द
वेलकम बॅक ट्यु. लाल जर्द बनारसी सारखी भाषा आहे तुझी. Timeless n classy!
सुंदर!
सुंदर!
जबरदस्त. मधली ती इंग्रजी
जबरदस्त. मधली ती इंग्रजी शब्दांची गुंफण जास्तीच भारी.
तुझं नाव खुप दिवसांनी पाहीलं
तुझं नाव खुप दिवसांनी पाहीलं आणि हावरटासारखं वाचुन काढलं हे सगळं. जाम आवडलं मला.
!!!
!!!
छानच लिहिलय!!
छानच लिहिलय!! आवडलं!!
पुनरागमन एकदम जोरदार!!
रच्याकने, ब्लॉग लिहित नाहीस का आजकाल??
परत वाचलंय, कितव्यांदा कोण
परत वाचलंय, कितव्यांदा कोण जाणे !
फारच खास !
ट्यु वाचतेय... परत
ट्यु वाचतेय... परत परत....निव्वळ सुंदर
छान मुक्तक. आवडले. @सशल : दो
छान मुक्तक. आवडले.
@सशल : दो लफ्जों की है मधील Amore Mio, dove sai tu इटालियन आहे.
अमोरे मियो, दोव्हे साय तू = माय लव्ह*, तू कुठे आहेस?
*इथे खरेतर माझिया प्रिया असा प्रतिशब्द हवा, पण त्यावरून एक भयाण मालिका आठवते.
भारी.
भारी.
मस्त
मस्त
Pages