रामायणातल्या रामापेक्षा, लंका माझी खास
रावणाला त्या भेटायची, लागली मला आस
एकदा मला रावणाकडुन, आले इन्विटेशन
भेटण्या त्याला वेळ होता, ठरले दुपारचे सेशन
रावणाकडे आले होते, खुप खुप पाहुणे
काय, कसं, कुठे, केव्हा दहा तोंडांनी तो म्हणे
चालतो जेव्हा रावण, तेव्हा काय सांगु दणका?
थरथर थरथर कापत होती, एवढी मोठी लंका
बघुन मधे कुंभकर्णा रावणा लागली डुलकी
भावाच्या त्या पोटाची केली त्याने उशी
रावण जेव्हा बोलतो तेव्हा चॅनल लागतात दहा
नेहमी कार्टुन बघायच, पण आता काय पहा??
चिंटुच्या त्या जोकवर, रावण हसला जोरात
बाहेर येवुन बघतो, पण गडगड नव्हती ढगात
काढता चिमटा मुंगीताईने, रावण खुप रडला
आई नको भरु पाणी, भरल्या सार्या बादल्या
प्रगती माझी सांगता, रावणाने दिली शाबासकी
सहा महिन्यानंतर तरी, थांबणार का पाठदुखी?
रावण जेवढा मोठा, तेवढी विशाल त्याची काया
तेवढच दिल बक्षिस त्याने आणि भरपुर माया
जाता जाता सांगतो आता कान देवुन ऐका
रामाशपथ मी मारल्या थापा, मी मारल्या थापा
हा "रावण" चालणार हो...
हा "रावण" चालणार हो...
अमितला अनुमोदन.. सहीये
अमितला अनुमोदन..
सहीये कविता..
मनीरत्नम्चा "रावण" सुद्धा असाच थापाड्या निघाला...
रामूचा नव्हे.. मणीरत्नमचा..
रामूचा नव्हे.. मणीरत्नमचा..
मस्त जमलिये... रावण चालला
मस्त जमलिये...
रावण चालला नाही तर चांगलाच बोलता झालाय
छान आहे. अंगभूत मॅडपणा आहे
छान आहे. अंगभूत मॅडपणा आहे यात.
ही पण छान
ही पण छान
चांगली वाटली
चांगली वाटली
फार्फार पुर्वी एक आई आपल्या
फार्फार पुर्वी एक आई आपल्या लहान मुलाला भावार्थ रामायण ऐकवायची ....त्यातुन एक छत्रपति घडले .
आजकालच्या आया पोरांना रावण ...बाबर ( ते कुठल्या तरी अॅड मधे आहे ना ! ) याच्या गोष्टी ऐकवतात ....ही पोरं पुढं जावुन काय होणार देव जाणे !
शुकु, लेट वाचली मी. मस्तचे
शुकु, लेट वाचली मी. मस्तचे
प्रगो तू नीट कविता वाचलिस
प्रगो तू नीट कविता वाचलिस का??
ह्यात फक्त गंमत आहे आणि रावणाच्या सगळ्याच मोठ्या गोष्टींच असणार कुतुहल स्वत:च्या बालबुद्धीने मांडलय.
बादवे फार्फार पुर्वी पण शिवाजीबरोबर औरंगजेब, अफजल्खान,रामाबरोबर -रावण आणि पांदवांबरोबर कौरव जन्माला आलेच होतेच की.
आणि जिजाउंनी रामायणाच्या गोष्टी सांगीतल्या म्हणुन शिवाजी राजा झाला अन्यथा झाला नसता अस म्हणायचय का तुला??
छान आहे
छान आहे
मस्तंय ही पण!! काय बाई तुझं
मस्तंय ही पण!! काय बाई तुझं डोकंय!! कुठनं शोधून काढतेस इतकी धमाल गाणी काय माहीत!
छान.रावणाच्या आईनेदेखील
छान.रावणाच्या आईनेदेखील त्याच्यावर एव्हढी चांगली कविता नसती केली.
मस्त ! लय भारी रावण
मस्त ! लय भारी रावण
रावणा
रावणा ला........................................................................................................नमस्कार..........