मुडदुशांचे (नगली) कालवण

Submitted by शैलजा on 12 November, 2010 - 23:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ ताज्या नगली, मोठ्या मिळाल्या तर मज्जाच!नाहीतर जरा मध्यम आकाराच्या चालतील. काय करणार?
वाटपासाठी : २ टीस्पून धणे, १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा तिखट, छोट्या आकाराचा एक कांदा - चिरुन, ५-६ मिरी, १ नारळाचे खोबरे (कोकणी/मालवणी पद्धतीमध्ये नारळाचा सढळ हस्ते वापर असतो, तुम्हाला कमी वापरायचा असल्यास, त्याप्रमाणे घ्या. चवीत मात्र फरक पडेल. )
इतर: किंचितसे आले - छोटा तुकडा अगदी बारीक चिरुन, १ टेबलस्पून तेल.
मीठ, थोडासा चिंचेचा कोळ.

क्रमवार पाककृती: 

ताज्या नगल्या ओळखायची खूण म्हणजे त्या अगदी चकचकीत दिसतात. अतिशय देखणी आणि स्वच्छ अशी ही मासळी आहे. साफ करण्यासाठीही अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत.

खवले काढून टाकून नगल्या साफ करुन घ्याव्यात. दुकानातूनच माशांचे खवले साफ करुन, कल्ले काढून आणि मासे कापून देतात, पण घरी साफ करायचे असतील, तर सुरीची बिनाधारीची बाजू, खवल्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवली असता खवले निघतील. विळीच्या पात्यावर जमिनीला समांतर असे मासे फिरवले असताही खवले निघतात, पण ह्याला प्रॅक्टीस लागेल. डोके व पोटात काही घाण असेल तर काढून टाकावी. कल्लेही काढावेत. नगलीचे २ वा ३ तुकडे करावेत व थोडा वेळ मीठ लावून ठेवून द्यावे. चिंचेचा कोळ वगैरे लावायची गरज नाही, कारण नगलीला उग्र वास नसतो.

१ वाटी खोबरे, चिरलेला अर्धा कांदा, मिरी, धणे हळद व तिखट ह्यांचे वाटप करुन घ्यावे.
उरलेल्या खोबर्‍याचा पहिला जाड रस काढून घ्यावा. पुन्हा एकदा वाटून अजून रस काढून घ्यावा. हा दुसर्‍यांदा काढलेला रस जरा पातळ असतो.

हे झाले की नगल्या व्यवस्थित धुवून घ्याव्यात.

१ टेबलस्पून तेल तापवून त्यात थोडा बारीक कांदा व बारीक चिरलेले आले टाकून चांगले नरम गुलाबी रंगावर परतावे. त्यवर धुतलेल्या नगल्या टाकाव्यात. वाटप व नारळाचा रस घालावा. चवीनुसार मीठ घालावे. अर्धा टीस्पून चिंचेचा कोळ घालून व नारळाचा रस व वाटप ह्यांचे मिश्रण अगदीच जाडसर झाले असेल, तर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर व्यवस्थित उकळी आली, की गॅस बंद करायला हरकत नाही.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जण.
माहितीचा स्रोत: 
आज्जी, आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटवर मिळालेली माहिती

Fish Curry Rice

* 586, Gangadhar aprt., Near Kanya Shala, Narayan Peth, Pune
* Landmark: Next to SNDT kanyashala narayan peth
* Phone: 9011010102, 9689891819, 64011082

पाटील, तुंगामधे खरच मिळतात?? माझे क्लायंट आहेत ते. मलाच माहित नाहीये. Happy

जागा कित्या गो घरात्सून चालू कर... आणि भांडवलाची काळजी कित्या करतस एक बाफ उघडशीत आरामात भांडवल गोळा होयत. Proud
भ्रमा शैलूक हातभार लावक चालू केलस. कॉम्पिटीटरांची नावा टाकलस ती. Happy

माझी पण फोडणी -
*रत्नागिरी- चिपळूण भागात या मासळीला "रेणव्या" म्हणतात;
* बाजारातून घेताना मध्यम आकाराच्या घ्याव्या; फार मोठ्या असतात त्या चवीत मार खातात;
*नविनच मासे खायला लागलेल्यांसाठी आदर्श मासा;
*कृति : कांदे-आले यावर मासे टाकल्यावर वाटप टाकण्याआधी [ किंवा वाटप लावून पण रस न टाकतां] जरा वेळ तेलात परतून घ्यावे; माझ्या बल्लवाचार्य मित्राच्या/गुरूच्या सल्ल्यानुसार असं केल्यावर शोषून घेतलेलं कालवण माशाच्या तुकड्यांत तसंच रहातं; नाहीतर, कालवणातले मासे नुसतेच धुवून उकडल्यासारखे लागण्याची शक्यता असते. नारळाचा रस घातल्यावर कालवण ढवळत रहाणं आवश्यक आहे,नाही तर कालवण "फुटण्या"ची शक्यता असते. मासे पटकन शिजतात व अधिक शिजल्यास त्यांचा नरमपणा व चवही कमी होते, हे कटाक्षानं लक्षात ठेवावं.[तिखटाऐवजी सुक्या मिरच्या भिजवून वाटपात वापरल्या तर स्वाद अजूनही वाढतो ]
[शैलजा, या माझ्या अक्षम्य आगाऊपणाबद्दल शिक्षा म्हणून एखादी नवीन रेसिपी - फक्त मासे असलेलीच - सुचवावी- ही नम्र विनंति ! काय करू, माश्याचो विषय काढलो की ओगी रवावणांच नाय ! आणि हां, ह्या सगळां बायलेन सांगलेलां नाय तर माझा सोताचां श्यानपन आसा !! ]

भाऊ,
>>
*रत्नागिरी- चिपळूण भागात या मासळीला "रेणव्या" म्हणतात;
* बाजारातून घेताना मध्यम आकाराच्या घ्याव्या; फार मोठ्या असतात त्या चवीत मार खातात;<<<

ह्याला एकदम १०१ % अनुमोदन. Happy

जागू, hypercity (inrobit mall, vashi) जा मस्त मिळतात रेणव्या. (इति आईची नवीन माहीती).

आम्ही रेणव्याचे असे बनवतो कालवणः

१.सुक्या लाल मिरच्या व कोरडे धणे भिजत घालायचे. मग ते इतके बारीक वाटायचे की एकदम पातळ.
२.मग कांदा , ओले खोबरे व लसूण एकदम एकजीव वाटून झाली की वरचे मिक्स करायचे. जराशी ताजी कोथींबीर शेवटी वाटून घेवून ह्यातच घ्यायची.

३.रेणव्या धूवून स्वच्छ घेतल्या की त्याला हळद व मीठ चोपडले की बाजूला ठेवायचे.

टोपात तेल तापले की एक लसूण असेच वासाला ठेचून टाकली की रेणव्या परतून घेतो व काढतो बाजूल.
मग तेलावर ते वाटण शिजवतो मग पुन्हा रेणव्या सोडतो त्यात. कोकमं टाकतो १-२ . ह्याला काही वास नसतोच.

चवदार लागतो पापलेटपेक्षा हा.(मलातरी)

भ्रमा, खरा रे.. माका गावची आठवण इली. पाणी सुटलां तोंडाक.
शैलजा, नुसती माहिती नको हैसर. कधी बोलवतस ते सांग. Happy

रच्याकने पापलेटा माका पण आवडता. Happy

लोकांक इतको इंटरेस्ट आसा तर आणखी जरा ज्ञान पाजळतंय -
मुबईत कांही जण याला "सुळे"पण म्हणतात. हल्ली समुद्रातल्या मासेमारीत खोलवर जाणारी जाळी खेंचत
नेण्याचं तंत्र आल्यापासून हा मासा समुद्रातूनही मोठ्या प्रमाणावर आणतात. पण मुख्यतः हा खाडीतला मासा म्हणूनच ओळखला जायचा व तिथेही तो जाळ्यात नव्हे तर गळाला लावूनच पकडावा लागतो; कारण, पाण्याच्या तळाशी जाऊन वाळूत तोंड खुपसून तो जाळ्यापासून बचू शकतो. कोंकणात रात्रीच्यावेळी खाडीच्या किनारी पेट्रोमॅक्स दिव्यानी दीपून हे मासे पाण्यात स्तब्ध असताना तलवारीसारख्या पात्यानेही यांची शिकार केली जाते.
खवलं असलेले मुडदुशांसारखे मासे ताजे आहेत याची हमखास कसोटी म्हणजे चकाकी, ताठपणा व वरचा बुळबुळीत द्रव. हा बुळबुळीतपणा बर्फामुळे निघून जातो त्यामुळे मुंबई -पुण्यात इतर दोन कसोट्यांवरच भागवावं लागेल.
<<आम्ही रेणव्याचे असे बनवतो कालवणः>> एकदम ताज्या रेणव्या असतील तर तु़कड्याना फक्त हळद, तिखट व मीठ लावून लसणीच्या अख्या पाकळ्यांच्या फोडणीत ते परतवून घेतले, वर चिंचेचा कोळ/कोकम, कोथिंबीर व किंचित पाणी टाकलं तर भाकरीबरोबर खायला पटकन चमचमीत जाडसर कालवण होऊं शकतं. [खाडीकिनारच्या खोपटात बसून हे खाण्यात अर्थात स्वर्गसुख आहे !]
मुंबईत हंगामात छान रेणव्या सर्वत्र मिळतात. पुण्यात कुंभारवेसला तारीच्या दुकानात व कर्वे रस्त्यावर सुपेकरच्या दुकानात [दशभुजा गणपतिच्या बाजूच्या गल्लीत] मला बर्‍यापैकी रेणव्या मिळाल्या होत्या.

>>मुबईत कांही जण याला "सुळे"पण म्हणतात.>> हो आम्ही पण सुळेच म्हणतव. आणि आमची करण्याची पध्दत मन:स्विनीन सांगितल्यासारखी आसा.
रच्याकने माकाव पापलेटा आवाडतत Happy
किरु मालवणी ईतक्या बरा बोलूक येता तर गजालेर पाय लावक काय जाता रे???

<<उद्या त्येका आफ्रिकेत जावान रवाक सांगशीत ?>> आफ्रिकेत आत्ता क्रिकेटचां जां काय शिजताहा, तां बघून किरू, तु नकोच जांव त्या वाटेक सध्या तरी ! पण बर्‍याच दिसान इलस ह्यां खरां .

Pages