बालसाहित्य - ढुमढुम ढुमाक (गोष्ट जुनीच पण नव्या रुपात)

Submitted by शुभांगी. on 9 December, 2010 - 23:35

जेरीची चाल जशी धमाल धमाल
त्याला सापडला मळका रुमाल
'काय बर कराव याच?' कळेना
रुमाल काही फेकवेना

डोक्यात आली नामी युक्ती
पळत गाठली परटाची भट्टी
परटाला दाखवली चीजची लालुच
त्याने धुवुन दिला रुमाल हळुच

शिंप्याकडे नेहमी गर्दी फार
माझ्या टोपीचा करेल का विचार
त्याला दिले शेंगदाणे दोन
त्याने शिवला टोपीला कोन

गोंडेवाल्या आजीबाई खडुस फार
दुध पिता टॉमचा करती उद्धार
साळसुदपणा जेरीने केला फार
टोपीला गोंडे लावले मोजुन चार

आता कसं सगळ छानछान
वाकेल आता राजाची मान
जेरीची बघता सगळी शान
सैनिकांनी टवकारले आपले कान

ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक
ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक

माझी टोपी छान छान
राजाची टोपी घाण घाण
रागाने वळवली राजाने मान
जेरीच्या टोपीचे केले संधान

त्याला पकडायचा निघाला हुकुम
टोपीशिवायच जेरीने ठोकली धुम

गुलमोहर: 

Wink

मस्तच गं Happy

पण जेरीची टोपी राजा काढून घेतो व त्याला हाकलतो, तेव्हा जेरी "राजा भिकारी... माझी टोपी घेतली.." असं काहीसं चिडवतो ना राजाला?

गोड गोड.
त्यात ते अश्विने म्हटलंय तसं "राजा भिकारी... माझी टोपी घेतली.." वाला पार्ट पण जमव ना शेवटी, गुब्बे!!

त्यात ते अश्विने म्हटलंय तसं "राजा भिकारी... माझी टोपी घेतली.." वाला पार्ट पण जमव ना शेवटी, गुब्बे!!>> अगदी अगदी!! त्याच तर वाक्याने मी जाम खुश व्हायचे.. लहानपणापासूनच अशी आसुरी आहे ना... Proud मज्जा वाटायची तेव्हा राजाला चिमुरडा उंदीर भिकारी म्हणतो नी कौतुक पण वाटायचं त्या धिटुकल्याचं!! Happy

गोडंय कविता शुभांगी! नी ते जेरी टॉम वगैरे आल्यामुळे तर जास्त अपिल होईल मुलांना!