गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग २०

Submitted by बेफ़िकीर on 6 December, 2010 - 06:36

'गुड मॉर्निंग मॅडम' हे कथानक संपत आले आहे. फार तर आणखीन एक किंवा दोनच भाग! मायबोली प्रशासन, सर्व वाचक, प्रतिसादक, स्पष्टपणे व आपुलकीने चुका नमूद करणारे या सर्वांचा मी आभारी आहे.

हे कथानक आवडले असल्यास, नसल्यास अवश्य कळवावेत.

-'बेफिकीर'!
=================================================

मोजून बारा दिवस मागे पडले आणि आता मात्र मोनालिसाने आशाच सोडली. रोज किमान चार तास हेलिक्समध्ये जायलाच लागायचे. ते चार तास आणि चार तास झोप असे दिवसातील आठ तास सोडले तर उरलेल्या सोळापैकी चवदा तास ती फक्त बंगल्याचा कानाकोपरा चाळणी घेऊन तपासत होती.

जिवाचा प्रश्न होता तो! कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकले असते. आत्तापर्यंत ज्याच्यावर विश्वास ठेवला त्या सिवाला लोहियांनीही पेमेंट केलेले दिसत होते. आता सिवा आपल्याशी प्रामाणिक आहे की लोहियांशी हेच समजत नव्हते. आणि मुख्य म्हणजे ते तपासता येण्यासारखेही नव्हते. तो जर लोहियांशी प्रामाणिक असला तर आपण केव्हाही मरू शकतो हे मोनाला समजत होते. आणि त्यामुळे आता तिने सिवाचीही दिशाभूल करायला सुरुवात केलेली होती. ती जे काही करायची त्याच्यापेक्षा तिसरेच त्याला सांगत होती. पॅकेज्ड फूडशिवाय ती काहीही खात नव्हती. बंगल्यावर स्वयंपाक झालाच तर तो केवळ मधुमती आणि काही इतर सर्व्हंट्सपुरता होत होता. मोनालिसाला आता प्रचंड घाई होती. जीव वाचवण्याची आणि त्या रॅकेटला उद्ध्वस्त करण्याची! आणि मुंबईहून आल्याच्या दिवसापासून तिने रंगकामाचे कॉन्ट्रॅक्ट पोस्टपोन करून स्वतःच बंगला तपासायला सुरुवात केली होती. मात्र हेही अती सावधानतेने करावे लागत होते. मधुमती बावळट होती. ती कुणालाही काहीही बोलली असती. शामा तर लक्ष ठेवणारच होती सतत! आणि त्या दिवशी मोनाच्या टाळक्यात प्रकाश पडला होता. सायराला तेच शोधण्यासाठी लोहियांनी इथे डेप्युट केलेले होते. बिचारे डॅड! किती इनोसन्ट होते ते!

अत्यंत सतापलेली, काहीशी बिचकलेली आणि सुडाच्या भावनेने अंतर्बाह्य पेटलेली मोनालिसा आता एक क्षणही वाया न घालवता सरळ बंगल्याचा चप्पाचप्पा तपासू लागली होती.

आणि बारा दिवस खर्च करूनही काहीही हाती लागलेले नव्हते.

आणि या क्षणी मोनालिसा अत्यंत निराश होऊन पुन्हा पुन्हा सर्व डिटेल्स तपासत होती.

डॅडचा वॉर्डरोब, क्लीअर! त्यांची स्टडी .. क्लीअर! त्यांची लायब्ररी ... क्लीअर! प्रत्येक म्हणजे प्रत्येक पुस्तक क्लीअर आहे.

आपली खोली, सायरासाठी असलेली खोली, इतकेच काय अगदी मधुमतीचीही खोली क्लीअर आहे.

शामाच्या खोलीत काही असते तर ते केव्हाच अर्देशीरांना मिळालेले असते. आणि आत्तापर्यंत आपण स्वर्गातही पोचलेलो असतो. आपण जिवंत आहोत याचाच अर्थ ते त्या रॅकेटला मिळालेले नाही आहे. आणि मुख्य म्हणजे 'ते' जे काही आहे ते नेमके काय आहे तेही आपल्याला माहीत नाही आहे.

डॅडनी किती वेळा माफ केले या सगळ्यांना! फिरोज मॉड्यूल काढले.. सोडून द्या! बझट त्या एजन्सीला विकली... सोडून द्या! जडेजांना फारुख ऑटोसाठी प्लॉट दिला.. सोडून द्या! काय आहे काय??

आता काय आणि कुठे शोधायचे तेच समजत नाही आहे. आणि या प्रकरणात कुणाची मदतही घेता येत नाही.

बारा दिवस गेले. अजून किती दिवस या अठरा खोल्या तपासायच्या? की बंगल्यावर काही नाहीच आहे? नाहीतर असायचे तिसरीकडेच! डॅडच्या काही कमी इस्टेट्स नव्हत्या! पण त्या सगळ्या रिकाम्या किंवा कमर्शिअल झालेल्या होत्या. जसे महाबळेश्वरचे ते हॉटेल उदय! खरे तर आपला बंगला होता तो! पण नंतर त्याचे हॉटेल करून टाकले डॅडनी!

अवघड आहे सगळे! इतके मात्र निश्चीत आहे की 'ते' जे काय आहे ते 'आहे' म्हणूनच आपण जिवंत आहोत आणि हे आपल्याला माहीत आहे हे त्या चौकडीला अजिबात माहीत नाही आहे.

निराश मनाने मोना उठली आणि बंगल्यातील बागेत शोध घ्यायला निघाली. बागेत काय सापडणार आहे म्हणा! उगाचच पाण्याचा पाईप हातात घेऊन ती सगळ्या रोपांना वगैरे पाणी घालण्याचे नाटक करत प्रत्येक सेन्टिमीटर स्क्वेअर तपासत चाललेली होती.

'कशाला आपण हे आयुष्य जगतोय' असे विचार पुर्वी यायचे तिच्या मनात! हल्ली येतच नव्हते. हल्ली मनात सारखे हेच यायचे की 'मोहन गुप्ता आणि जया गुप्ता यांच्या खुनाचा आणि आपल्याबाबत केल्या जाऊ शकणार्‍या कटाचा सूड घ्यायचा म्हणजे घ्यायचा'! ड्राय आईसचा रेफ्रिजरेटर आणायचा डिसीजन तिने रद्द केला होता. नाहीतरी फॉर्म्युला लोलकांमध्येच बंदिस्त होता. करायचाय काय फ्रीज आणून? अरे?? खरच की!

बागेतून चालता चालता हा विचार मनात आला आणि मोना एकदम चमकलीच! हं! ड्राय आईस रेफ्रिजरेटर... नाही का?... हं!

वरच्या बाथरूममधून येणारे पाईप्स आणि काही वेली सोडल्या तर बंगल्याच्या भिंतींवर इतर काहीही नव्हते. हिरवळ मखमलीसारखी असली तरी आत्ता तिच्या पायात स्लीपर्स होत्या. चालता चालताच तिच्या मनात रिकोहचा विचार आला. त्या दिवशी तिने त्याला दुखावल्यापासून तोही तिच्याशी जरा कामापुरतेच बोलत होता. एखाद्या प्रेयसीप्रमाणे त्याचे मन वळवणे किंवा रुसवा घालवणे असल्या छचोर गोष्टींसाठी आत्ता वेळच नव्हता. 'बघू नंतर' हा एकच उपाय राहिलेला होता सध्या!

आपण बागेतून का चालतोय हे पुन्हा आठवले तिला! काय मिळणार आहे बागेत! नुसते पाने अन फुले! खाली हिरवळ! समजा जमीनीत काही पुरले असले तरी आपण एकट्या ते खणून शोधू शकणार नाही आणि आपण असे काही करायला इतरांना बोलावले की समोर बसलेला सिवाचा पानवाला आणि चोवीस तास बंगल्यावर वावरणारी शामा या दोघांचे चार डोळे लगेच रोखले जाणार तिथे!

भंकस! भकस आहे सगळी! तो रणजीत म्हणतो म्हणून आपण समजतो आहोत की डॅडकडे लोहियांना ब्लॅकमेल करता येण्यासारखे काहीतरी आहे. नसलेच तर?

इन्टर ट्रॅक्टर इन्डिया! लोहिया इतका इन्टरेस्ट का घेतायत या प्रपोजलमध्ये? काय माहीत! आपल्याला कोण सांगणार? एक सिवा काहीतरी सांगेल असे वाटायचे पण.. तोही त्यांनाच सामील निघाला!

आणि हेलिक्समध्ये आता त्यांच हस्तक्षेप नाही आहे याचे त्यांना वाईट वाटले तर नक्कीच आहे, पण... पण इन्टर ट्रॅक्टर या प्रपोजलकडे बघून ते अधिक खुष का होत आहेत कुणास ठाऊक!

बागेतील फेरफटका सरळ बंद करून मोना पुन्हा बेडरूममध्ये आली. हल्ली मधुमतीला ड्रिन्क कसे बनवायचे ते समजायला लागले होते. संध्याकाळचे साडे सहा वाजले होते. सूर्य क्षितीजापलीकडे जाऊन पाच मिनिटे झालेली होती. हवेत एक बोचरा गारवा आलेला होता.

एकटी! एकटी आहे मी! आहे तशी समर्थच, पण तरीही एकटी! वडिलांनी ठेवलेला हा अमाप पैसा आणि जीवाची भीती या दोन भांडवलांवर तग धरून आहे...

"मधु.... स्कॉच......"

मधुमतीने मोहन गुप्तांच्या आवडत्या ब्रॅन्डचा, ब्लॅक लेबलचा एक पेग बनवून मोनापुढे ठेवला.

स्कॉच! किती पितोय आपण! मूर्खासारखे पितोय अक्षरशः! रोज किमान दोन अडीच ड्रिन्क्स घ्यायला लागलो आहोत. बरे वाटते ड्रिन्क घेतले की! असे वाटते की 'या, बघू कसे मारताय मला, हरामखोरांनो, मीच तुम्हाला मारते'! आपोआप आत्मविश्वास दुणावतो. आणि मग??

सकाळि उठले की एक जडपणाची काहीशी भावना! मग नारळाचे पाणी आणि संत्र्याचा ज्यूस यांची मदत घेऊन ती भावना घालवण्यात एक तास घालवायचा! मग ब्रेकफास्ट! आणि मग हेलिक्स! संध्याकाळी पुन्हा ब्लॅक लेबल!

एखादा अट्टल पियक्कडही रोज घेत नसेल... आपण मात्र घेतो...

आय हेट यू मोनी... आय जस्ट हेट यू... आय जस्ट हेट बिंग यू.. आय डोन्ट वॉन्ट टू बी यू अ‍ॅट ऑल मोनी... मला एक घरगुती, कौटुंबिक वातावरणात रमणारी, लाडक्या आणि गर्भश्रीमंत नवर्‍याने डोक्यावर बसवून घेतलेली, मुलांना जन्म देऊन मातृत्वाचा अनुभव घेणारी, फॅशन म्हणून अनेक फॅडे करणारी, इतर बायकांसमोर भाव खाणारी अशी स्त्री व्हायचं होतं!

... खरच व्हायचं होतं?? आपण.. आपण कधी ठरवलंच कसं नाही की आपल्याला नेमकं व्हायचंय काय??

का नसेल ठरवलं आपण?? आणि... हेलिक्सचे यश आकाशापर्यंत दुमदुमवणार्‍या आपल्या डॅडना.. आपल्या मुलीचे नेमके काय व्हावे याची यत्किंचितही काळजी नव्हती??

जीवाची भीती, हेलिक्सबद्दल रक्तातच असलेली स्वत्वाची भावना आणि रेजिनासारखा उमद्या स्वभावाचा माणूस आपला असावा असा स्वार्थ सोडला तर... मोनालिसा तुझे आयुष्य आहे काय?? नथिंग! सिम्पली नथिंग!

हा रंगू, संजय, शामा, मधुमती, तुझा शब्द झेलतात याचे कारण तुझ्या बापाने मिळवून ठेवलेला आणि तुझ्या नावे केलेला पैसा आहे. आपण स्वतः हेलिक्सच्या माध्यमातून काय वाढीव फायदा मिळवला आहे?? उलट आपण तर गो स्लो पॉलिसी स्वीकारली बावळटासारखी! हेलिक्समध्ये आपण 'नोकरीला' असतो तर मोहन गुप्तांनी एका मिनिटात हाकलून दिले असते आपल्याला!

म्हणे कर्तृत्ववान स्त्रीच लग्न करेल रेजिना तुझ्याशी! वा वा कर्तृत्ववान... व्वा! काय पण कामगिरी केलीत तुम्ही! रणजीतला भेटलात, उस्तादला भेटलात, जगमोहनला भेटलात, रेजिनाशी शरीर संबंध प्रस्थापित करून गर्भ धारण केलात आणि तो पाडलात! सायरा हकनाक गेली तरी बसून राहिलात. आई वडिलांचा मृत्यू हा खून आहे हे माहीत असूनही केस री ओपन करण्याची हिम्मत नाही दाखवलीत! व्वा!

आणि आता ट्रॅफिकमध्ये सापडलेल्या मांजरच्या पिल्लासारख्या पॅकेज्ड फूड खाऊन बंगल्यावरच बसून राहता... ब्लॅक लेबल ढोसता! फारच कर्तृत्ववान आहात मिस गुप्ता!

तुम्ही दिलेल्या पगारावर घर चालते म्हणून जोशी, बिंद्रा मेहरांसारखी माणसे तुमच्यासारख्या अननुभवी व्यक्तीचे वाट्टेल ते बोलणे ऐकून घेतात. तुम्ही एखाद्या शामा, सायराच्याच पोटी जन्माला यायला हवे होतात. मग दिसले असते कर्तृत्व तुमचे!

त्यापेक्षा डॅड दररोज एक तास पूजा करायचे तशी पूजा चोवीस तास करून एखादी साध्वी तरी व्हा...

.... दररोज एक ता.....एक तास... पूजा.. क... रायचे डॅ....ड...

मोनाने बसल्या बसल्याच ते वाक्य मनाशी घोळले आणि....

.... ताडकन उठून बसली ती बेडवर....!!!!

देव्हारा!

ओह माय गॉड! देव्हारा...!!!! ... खरच की... आपण नेहमी डॅडना विचारायचो... साईबाबांच्या मूर्तीला हात का लावू देत नाही तुम्ही मला... तर म्हणे ... 'अंहं... डोन्ट एव्हर टच इट ... अनलेस यू ग्रो अप... आफ्टर दॅट आय विल मायसेल्फ टेल यू एव्हरीथिंग... '...

..... का?? का नसतील हात लावू देत आपल्याला???

आत्ता?? आत्ता पाहूयात??

का नको?? ड्रिन्क घेतलं आहे म्हणून काय??? आपण चांगल्या मनाच्या आहोत म्हणून तर साईबाबांनीच हे सुचवले असले तर???

आणि शामाला बाहेरचे काहीतरी काम सांगून आणि मधुमतीला तिच्याबरोबर पाठवून देऊन देव्हार्‍यातील साईबाबांची मूर्ती मोनालिसा सरळ उचलून बेडरूममध्ये घेऊन आली.

आणि शामा आणि मधु वीस मिनिटांनी घरी परत आल्या तेव्हा...

..... साईबाबांची मुर्ती जागच्याजागी होती....

.... मात्र... त्या वीस मिनिटांमध्ये ब्लॅक लेबलचे नवीन दिड पेग कन्झ्यूम करून....

.. मिस एम एम गुप्ता... बारा दिवसांचा वैताग झटकून देऊन मनमोकळ्या हासत होत्या...

------------------------------------------------------

Date - 17th March, 1986

Dear Mohanjee,

I am extremely ashamed to confess that I did that sin in my life. I did sell BAZAT to Muhammad Aarif at hefty price of Rs. 25000 a tablet. I do not know what made me act like that. However, I confirm, that in future, I, Ratnakar Lohiya, will not get invloved in any such criminal act at all.

This letter is to further concretise my dedication to Helix & I am aware that it could be used against me at any point of time when you feel it is called for. I have complete faith in you & once again offer my honest apologies & sincere devotion in making Helix a leading Gear Maker. While on this, I also apologize for having influenced your nephew Subodh to be involved in this criminal act.

I have issued & signed this letter & am giving it to you as per your instruction, so that my honesty is proved in your mind.

I have no stocks of BAZAT any more with me and assure that you will never have to see such things again. Kindly forgive & please do not let law reach this letter. I have already donated the entire amount of Rs 5,00,000 to Lifeline Ambulance Services in order to compensate for the sin that I committed in my life, once & the last time.

I request you to continue trusting me & keep my job at Helix as JMD.

I and my family will be grateful to you for being given one more opportunity to live life like a human.

Sincerely Yours...

Ratnakar Lohiya

--------------------------------------------------------------

मोनालिसा गुप्ता! वीस वर्षांपुर्वीच्या तरुण लोहियांचा, लहान दिसणार्‍या सुबोधचा, आणखीन एका तरुणाचा आणि मुहम्मद आरिफचा एकत्रित फोटो पाहून आणि ते पत्र पुन्हा पुन्हा वाचून 'येस आय गॉट इट' या भावनेतून पलंगावर बुक्या मारत होत्या. त्यातच लाईफलाईन अ‍ॅम्ब्युलन्स सर्व्हिसेसच्या रिसीटची कॉपीही होती.

... मात्र... काही केल्या त्या फोटोतील चवथा तरुण कोण होता ते लक्षात येत नव्हते... हितेश, म्हणजे लोहियांचा मुलगा निश्चीतच नव्हता. जतीनही नव्हता. अर्देशीरांना तर कुणी नव्हतेच! रणजीतही नव्हता!

.... ओह... बराच वेळ पाहून समजले...

इट वॉज ... सिवा.... !!! सिवा.... द बॅस्टर्ड!

एक अत्यंत महत्वाचे अस्त्र मोनाच्या हातात या क्षणी होते. ज्याचा वापर करून ती लोहियांना बरबादही करू शकत होती.

.... पण आता... वाघिणीला एका फटक्यात लांडग्याला यमसदनी पाठवायचे नव्हते... खेळवत खेळवत, तूच जिंकतोयस असं दाखवत आणि हारण्याला मी किती घाबरते असे दाखवत दाखवत लिटरली सोलायचे होते... कोंबडी सोलतात तसे... !

द रॅकेट वॉज ऑन इट्स वे टू बी एक्स्पोज्ड....

.... हेलिक्सच्या एम डी चे बारा दिवस सत्कारणी लागलेले होते...

आणि... लवकरच मोनाच्या आयुष्यातील हा भयानक काळ संपणार होता...

================================================

"ओह यू आर सो स्वीट... अ‍ॅन्ड ब्युटिफुल.. एक्सलंट चॉईस हितेश...."

राधाराणी पथेजा! बावीस वर्षांची तारुण्याने मुसमुसलेली आणि नखशिखांत नटलेली ती मुलगी मोनालिसाच्या त्या जाहीर स्तुतीमुळे अगदीच लाजून गेली होती आणि ती काय लाजली असेल असा हितेश लाजत होता.

आणि आजूबाजूला जमलेल्या बावीसच्या बावीस जणांनी हासून त्या दोघांच्या लाजण्याला दाद दिली.

ग्रीन पार्क!

हैदराबादमधील एक पंचतारांकीत हॉटेल! पथेजांनी आज त्या होटेलचे टेरेस बूक केलेले होते. त्याशिवाय चार स्विट्स आणि दहा रूम्सही! अर्थातच, तितकेच महत्वाचे गेस्ट्स येणार होते म्हणा!

आणि फंक्शनही साधेसुधे नव्हते.

गुप्ता हेलिक्सचे जॉईंट एम डी आणि इन्टर ट्रॅक्टर इन्डियाचे सी. ई. ओ. रत्नाकर लोहिया यांचा कर्तबगार उद्योगपती मुलगा हितेश लोहिया.... आणि....

... सिंगारेनी कोलियारीजच्या सिनियर जी एम पदी गेली सात वर्षे राहून अख्या भारतातील कोलफिल्ड्सना जमला नसेल इतका परफॉर्मन्स काढणारे नेवीचंद पथेजा यांची उच्चशिक्षित मुलगी राधाराणी...

यांचे रिसेप्शन होते आज!

मोनालिसाला साईबाबांच्या मुर्तीचे रहस्य समजल्यानंतर तब्बल पस्तीस दिवसांनी!

आणि या पस्तीस दिवसात लोहियांनी तिचे मन वळवण्यासाठी अमाप प्रयत्न केलेले होते. अर्देशीर येऊदेत, जतीन येऊदेत आणि सुबोधही येऊदेत! तुझे आणि त्यांचे मतभेद कामाच्याबाबतीत होते ना? वैयक्तीक तर काही नाही आहे ना? मग काय? आलंच पाहिजे तुला!

आणि 'कित्येक'वेळा नकार देऊन शेवटी आठ दिवसांपुर्वी मोनाने 'कसाबसा' होकार दिला होता त्यांना!

अर्थात, त्यांना हे माहीतच नव्हते की तिला मुळातच होकार द्यावासा वाटत होता, फक्त ती अभिनय करत होती.

रिसेप्शन अत्यंत 'जवळच्याच' माणसांच्या उपस्थितीत केले जाणार होते.

आणि आज त्या रिसेप्शनला खालील 'अगदी जवळचीच' मंडळी उपस्थित राहिली होती.

पथेजांकडचे चौदा जण!

आणि लोहियांकडून, स्वतः लोहिया, हितेश, अर्देशीर, जतीन, सुबोध, रेजिनाल्डो डिसूझा, चक्क शर्वरी आणि... मिस एम. एम.!

अपेक्षित असल्याप्रमाणेच रेड वाईन, तकिला या शिवाय हायलॅन्ड पार्क, ब्लॅक लेबल आणि ग्लेनफिडिश अशी संपूर्ण तयारी होती. हैदराबादी बिर्याणीचा घमघमाट सुटलेला होता. किमान तीस पदार्थ असलेला तो बुफे गर्भश्रीमंतीचे जितेजागते उदाहरण होता. डेझर्ट्सच सहा प्रकारची होती. पण बुफेकडे अजून माणसे वळतच नव्हती. कारण ड्रिन्क्सच्या राउन्ड्स तर संपायला हव्यात??

मात्र! पिणे एखाद्या अड्यात असते तसे मुळीच नव्हते. एक पेगच तास तासभर चालत होता. हितेश आणि राधाराणी अर्थातच रेड वाईन घेत होते. बाकी सगळे स्कॉचवर तुटून पडलेले होते. प्रॉन्स खास वैझॅगहून आणलेले होते. हे एवढाल्ले मोठाल्ले! रसरशीत! ग्रीन पार्कसारखी सर्व्हिस कुहेच नसेल असेच प्रत्येकाच्या मनात येत होते.

राधाराणी अक्षरशः परी भासत होती. आणि हितेश अत्यंत देखणा दिसत होता. लोकांचे डोळे या 'वुड बी' जोडप्यावरून हटतच नव्हते. थट्टा मस्करी चाललेली होती.

संध्याकाळचे साडे आठ वाजले तसा पार्टीचा मूड चांगलाच क्रिएट झाला.

आता कुणीही कुणाचीही थट्टा करू लागले. मुख्य म्हणजे आता अर्देशीर, जतीन आणि सुबोध एका टेबलवर बसले. आत्तापर्यंत ते पथेजांशी, म्हणजे त्यांच्या 'पुर्वीच्या' एका कस्टमरशी असे बोलत होते जणू तिघेही अजून हेलिक्समध्येच होते. पण आता ते वेगळे जाऊन बसले. रेजिनाला सर्वांसमोर सतत मोनाशी बोलणे प्रशस्त न वाटल्यमुळे तो सतत इकडे तिकडे फिरत होता. जिकडे जाईल तिकडे तो लोकप्रियच होत होता. अत्यंत उमदं व्यक्तीमत्व!

मोना मात्र पथेजांकडच्या एक दोन बायकांशी बोलत बसली होती.

तेवढ्यात लोहियांनी येऊन मोनाच्या पाठीवर हात ठेवला..

"कम ऑन बेटा... ऑल आर वेटिंग... ओल्ड गुड फ्रेन्ड्स..."

चेहर्‍यावर 'अत्यंत आनंद' झाल्यासारखे भाव आणून मोनालिसा तडक त्या ग्रूपमध्ये येऊन बसली.

मोना तिथे जाऊन बसल्यावर स्वतःच्या पोझिशनची जाणीव होऊन पटकन शर्वरी उठली आणि इतर ग्रूपमध्ये मिसळली.

एक विषारी कडवटपणा होता त्या टेबलवर त्या क्षणी!

अत्यंत विषारी! अगदी 'फुरसे' या सापासारखा!

अर्देशीर अगदी बापाच्या भूमिकेतून वगैरे मोनाकडे पाहून हासले होते. मात्र जतीन हासू शकला नव्हता. नुसतेच 'हाय' म्हणाला होता. आणि सुबोध तर स्वतःचे घारे डोळे पेगकडेच रोखून बसला होता. रत्नाकर लोहिया इतरत्र फिरत होते. रेजिना आता लांब, टेरेसच्या एका कोपर्‍यात उभा राहून हैदराबादची गर्दी पाहात होता.

भीषण आणि वादळापुर्वीची शांतता! इतकेच वर्णन होऊ शकले असते त्या दहापाच क्षणांचे!

मात्र कुणीतरी बोलायला हवेच होते. काही झले तरी एकेकाळी जिच्या बापाच्या पैशावर आरामात सगळे जगत होते ती तिथे येऊन बसलेली होती आणि दिड वर्षात तिने अफलातून परफॉर्मन्सही दाखवलेला आहे हे सगळे जाणत होते. खरे तर इतका तिच्या बापालाही जमला नसता हेच सगळे मनात म्हणत होते. त्यात पुन्हा या तिघांची बेधडक हकालपट्टी हा वर्मावर बसलेला घाव होता.

त्यातल्या त्यात जतीनच अधिक बोलका होता. कायम सूत्रसंचालनाचीच सवय!

जतीन - कोणत्या फ्लाईट्ने आलीस??

मोना - सहारा.... तू??

जतीन - मी सकाळी आलो... किंगफिशर...

मोना - आणि तू????

सुबोधने व्यथित आणि कडवट नजरेने मोनाकडे पाहिले.

सुबोध - मी अन हा एकत्रच आलो...

मोना - अंकल आज तुम्ही व्होडका घेताय???

अर्देशीर - हा हा हा! आठवतंय वाटतं तुला.. अर्देशीर कधीच व्होडका घ्यायचा नाही ते...

मोना - ऑफकोर्स अंकल...

अर्देशीर - स्कॉचचा त्रास व्हायला लागला मला.. तेव्हापासून व्होडका सुरू केली...

मोना - त्रास?? कसा काय??

अर्देशीर - वाईट साइट अनुभव आले बेटा आयुष्यात.. मग स्कॉच जास्ती घेतली जायला लागली.. मग अ‍ॅसिडिटी.. उष्णता...

मोना - अरे बापरे... ... ओह... मग ... मी तर....

तीनही चेहरे मोनाकडे वळले.

मोना - मी तर काही घ्यायलाच नको ... नाही का???

खळखळून हासताना मोना आज एखाद्या जहरी नागिणीसारखी दिसत होती. तिचा पेहराव पार्टीतील कोणत्याही स्त्रीच्या, अगदी राधाराणीच्या पेहरावापेक्षाही महागडा होता. तो तिला दिसतही मस्तच होता. आणि त्यात स्कॉच पोटात जाऊन चेहर्‍यावर उमललेली! ग्रीन पार्कच्या हिरवट निळ्या लाईट्समध्ये मोना आता खरे तर अत्यंत मादक दिसत होती. पण ते फक्त रेजिनालाच! बाकीच्यांना, ज्यांना ती नीटशी माहीतच नव्हती ते तिला बिचकून होते कारण ती एका मोठ्या कंपनीची मालकीण होती हे त्यांना समजलेले होते. आणि जे तिला नीट ओळखत होते त्यांना ती आत्ता विषारी नागीण वाटत होती.

सुबोध स्वभावाप्रमाणे भिडलाच तिला!

सुबोध - का?? तुलाही अ‍ॅसिडिटी होते??

मोना - छे छे! मला वाईट साईट स्वप्नं पडतात...

सुबोध - हं हं?? जशी???

मोना - अं... .. जसं एखादा माणूस दारावर भीक मागायला आलाय... आणि आपण दया वाटून त्याला खायला दिले.. तर जाताना तो आपल्याच घरात चोरी करून जायला बघतो...

बाहेरून या संवादाकडे पाहणार्‍या कुणालाही हे चौघेही अत्यंत हास्यविनोदाच्या मूडमध्ये आहेत याबाबत खात्री पटलीच असती. एक लोहिया सोडून! ते मात्र लांबून या ग्रूपकडे लक्ष ठेवून होते. आणि अर्थातच शर्वरीलाही काहीसा अंदाज होता आणि रेजिनालाही! पण चौघे बर्‍यापैकी बोलतायत आणि मोनालिसा हासतीय त्या अर्थी तात्पुरती दिलजमाई झालेली असावी अशी कल्पना होती त्या दोघांची!

सुबोध - ओह.... मग अशा वेळेस तू काय करतेस???

मोना - .. म्हणजे.. स्वप्नात की रिअ‍ॅलिटीमध्ये???

सुबोध - स्वप्नंच पडतं ना तुला असं?? की खरंच घडतं??

मोना - वेल.. खरंही घडतं.. पण स्वप्नात मी त्या भिकार्‍याला माफ करते...

सुबोध - आणि प्रत्यक्षात????

मोना - ................. .... तुकडे करते त्याचे तुकडे... प्रत्यक्षात!

मोनाच्या त्या स्वरात असलेली धार जतीनला अत्यंत अस्वस्थ करून गेली. काही झाले तरी तो आणि ती लहानपणी खेळलेले होते. तो कितीही मोठा असला तरीही! कायम तो तिला चिडवून बेजार करायचा आणि शेवटी रुसली की चॉकलेट्स द्यायचा! किती प्रेम होते दोघांचे एकमेकांवर त्याकाळी! सगळे संपलेले होते आता... तरीही...

.... जतीनला ते संवाद सहन होणे शक्यच नव्हते.

त्याने एकदम विषय बदलला.

जतीन - पथेजांना आधी भेटली होतीस तू???

मोना - नाही... का रे??

जतीन - अंहं... मी कायम भेटायचो त्यांना...

'कधी, हेलिक्सला असताना का' असा प्रश्न तोंडावर आला होता तिच्या! पण जतीनबाबत तिच्याही मनात एक सॉफ्ट कॉर्नर होता. ती काहीच बोलली नाही.

अर्देशीर - साधा ऑफीसर होता तो... जॉईन झाला तेव्हा... मी त्याला कधी भेटायचोच नाही..

मोना - खरंय सर... आपल्याला अत्यंत कमी महत्वाची वाटणारी माणसे किती महत्वाची होऊन बसतात नाही आयुष्यात??

एका सव्वीस वर्षाच्या मुलीच्या बोलण्यावर आजपर्यंत अर्देशीर सरांनी दात ओठ खाल्लेले नव्हते. पण आज खाल्ले! फक्त ती हालचाल व्होडकाचा पेग ओठांना लावून केल्यामुळे दिसली नाही इतकेच!

सुबोध - कसं काय चाललंय?? ... हेलिक्स????

अत्यंत उपरोधाने भरलेला सुबोधचा हा प्रश्न मोनालिसाला बयानक संताप आणून टेरेसेच्या थंड हवेत विरला.

मोना - मस्त चाललंय...

सुबोध - हं??

हा 'हं' आणखीनच उपरोधिक आणि छद्मी होता.

आता मात्र मोनाला गप्प बसवेना!

मोना - स्वच्छ स्वच्छ वाटतं आता... साफसफाई झाल्यानंतर...

एवढे बोलून तिने ब्लॅक लेबलचा एक मोठा घोट घेतला. साहसीच विधान होतं ते! साफसफाईमध्ये एक मोठा मासा मारला गेला होता आणि आत्ता तो पुन्हा जिवंत होऊन समोर व्होडका पीत बसला होता..... ... ... अर्देशीर सर!

अर्देशीर - अरे हो.. यावरून आठवलं.. पुर्वीच्या बायका घरात तिन्हीसांजेनंतर केर काढायच्या नाहीत.. इलेक्ट्रिसिटी नसायची ना?? .. त्यामुळे अंधारात केर काढताना काही वेळा काहीतरी अत्यंत महत्वाचंही त्या केराबरोबर चुकून झाडलं जायचं... आणि मग पस्ताव्याची पाळी यायची...

मोना - हं! बरं झालं म्हणा... हल्ली इलेक्ट्रिसिटी असते ते... नाही का???

सुबोध - दिवे असूनही दिसत नाही असे काही लोक जगात असतातच म्हणा...

मोना - किंवा दिसायला हवं होतं ते आधीच दिसलं नाही असे...

सुबोध - हं! मग?? प्रॉफिट बराच झाला यावेळी...

मोना - हं.. त्याचं काय आहे.. प्रॉफिट आधीसुद्धा होऊ शकला असता.. इच्छा पाहिजे..

सुबोध - डिफरन्शिअल बनवणार आहात का??

मोना - म्हणजे???

फस्सकन हासला सुबोध! ते हासणे पाहून अर्देशीर मोनाची कीव केल्यासारखे हासत टेरेसबाहेर पाहू लागले. मोनाला 'डिफरन्शिअल' म्हणजे काय तेही माहीत नाही आणि शहाणपणा करतीय हे दाखवून देण्याचा किरकोळ फायदा उपटायचा होता सुबोधला!

सुबोध - क्रॅन्कशाफ्ट आणि व्हील्समध्ये पॉवर ट्रान्स्मिशनसाठी वापरला जाणारा गिअर...

मोना - वेल.. मला इतकंच कळतं की जे डॅडना अपेक्षित होते ते बरोब्बर चाललेले आहे कंपनीत... त्यांना शेव्हिंग मशीन्स अपेक्षित नव्हती.. ती मात्र येऊन पडली... मात्र तेव्हा... मी एम डी नव्हते... आणि महत्वाच्या पदावर त्यावेळेस जी माणसे होती... त्यातील एकच आहेत आता तिथे.. लोहिया अंकल..

कानसुलात मारली तरी कमी अपमान होईल अशी विधाने केली होती मोनाने! चौघांचेही चेहरे मात्र अगदी जवळचे मित्र भेटल्यासारखे हासरे होते.

सुबोध - सर?? ती गोष्ट कुठली हो?? बेडकांना राजा हवा होता...

अर्देशीर - हां! एका बेडकाला राजा केले तर त्याला सगळ्यांनी मारले... मग शेवटी ओंडका पाठवला.. तर त्याला घाबरून आधी बाजूला झाले आणि शेवटी त्यावर चढून धिंगाणा घालू लागले.. काही किंमतच नाही राहिली त्या ओंडक्याला..

सुबोध जोरात हासतानाच मोनाने हवेत पाहून ते वाक्य उद्गारले.

मोना - मला आठवतंय त्या प्रमाणे ओंडका पाठवायच्या आधी साप पाठवला होता राजा म्हणून... त्याने बेडूकच फस्त केले..

सुबोध - अच्छा.. म्हणजे तो साप होता हे तुला मान्य आहे...

मोना - असल्य मूर्ख बेडकांसठी सापच हवा.... नाही का???

मोनाच्याही जोक्सवर अर्देशीर हासतच होते. कारण नाहीतर पार्टीत त्यांची इमेजच बिघडली असती. सुबोध आणि जतीन मात्र तिच्य जोक्सवर हासू शकत नव्हते.

"हे गाईज.. द म्युझिक इज ऑन.... डान्स फ्रेन्ड्स..."

लोहियांचे ते वाक्य कानांवर आदळले आणि पाठोपाठ ती ट्यून! का कुणास ठाऊक, रेजिनाने लांबून आणि मोनाने इथूनच, आपोआपच पटकन एकमेकांकडे पाहिले.

पण आज डान्स करणे योग्य दिसणार नव्हते. पण काय झाले कुणास ठाऊक, पथेजांबरोबर आणि जतीनब्रोबर डान्स करत असतानाच लोहिया स्वतःच आले आणि रेजिना आणि मोनाला घेऊन फ्लोअरवर गेले.

मोनाला जुने दिवस आठवले. याच सगळ्या ट्यून्सवर ती बेभान होऊन नाचायची! त्यावेळेस मोहन गुप्ता होते! मोना नाचता नाचता लोहिया आणि अर्देशीर सरांबरोबरही नाचायची! जतीन आणि तिचा डान्स तर ठरलेलाच!

आज मात्र काय झाले होते कुणास ठाऊक! मोनाने आल्यापासून ड्रिन्क्सशिवाय एक अन्नाचा तुकडाही तोंडात टाकलेला नव्हता. तिने ठरवलेले होते. रात्री स्विटवर गेल्यानंतर स्वतःसाठी पॅकेज्ड फुड मागवायचे म्हणून! मूडच नव्हता तिचा! रेजिनाला ते समजले होते. एकमेकांबरोबर दोन मिनिटे काही स्टेप्स घेऊन दोघे पुन्हा बाहेर आले. आणि आत्ता मोनाच्या ते लक्षात आले. असे करून लोहियांनी काय साधले ते! त्यांनी तिच्या आणि रेजिनाच्या नात्यावर शिक्का मारून टाकला होता जाहीररीत्या!

मग तो पुसण्यासाठी मोना पुन्हा फ्लोअरवर आली. यावेळेस ती स्वतः हितेशबरोबर नाचली. बहीण भावाचे रिलेशन होते ते! त्यामुळे मोठीच मजा आली दोघांनाही! त्यानंतर अचानक काय वाटले तिला कुणास ठाऊक! तिने जतीनला ओढले आणि....

... दॅट वॉज द बेस्ट डान्स ऑफ दॅट इव्हिनिंग... इट लास्टेड फॉर अल्मोस्ट फिफ्टीन मिनिट्स..

सगळे बघतच बसले होते त्या दोघांकडे...

.. रेजिना आणि शर्वरी थक्क होऊन पाहात होते... आणि त्यापेक्षा थक्क होऊन... अर्देशीर सर, लोहिया अंकल आणि सुबोध गुप्ता 'श्रीवास्तव'!

दोघांनाही लहानपण आठवले होते. बेभान होऊन मोनालिसा नाचली आज! कित्येक म्हणजे कित्येक दिवसांनी पहिल्यांदाच! कारण आज मृत्यूचे किंवा भयाचे, यापैकी एकाचे तांडव होणार होते थोड्याच वेळात!

कारण पार्टी संपल्यानंतर अर्देशीरांच्या स्विटमध्ये या सर्वांना खास आमंत्रित केले होते लोहियांनी! रेजिना, सुबोध, जतीन, स्वतः लोहिया, अर्देशीर सर आणि मोनीबेटी!

आणि त्या आमंत्रणाबाबतच मोनाला काहीतरी इन्ट्यूशन झालेली होती. जे काय आहे ते तिथे होणार होते! या पार्टीत नाही.

आणि म्हणूनच ती जतीनबरोबर घालवलेले लहानपण आठवून आणि पुढे होऊ घातलेल्या भयानक सिक्वेन्सच्या ताणामध्ये बेभान होऊन नाचत होती.

थंड हवेतही घामाघुम झालेल्या दोघांनी नृत्य आवरते घेतले आणि सर्वांच्या कॉप्लिमेन्ट्सचा स्वीकार करत, अगदी ग्रीनपार्कचा स्टाफही टाळ्या वाजवत होता हे पाहून.. बुफेकडे वळले दोघे!

अर्थातच, मोनाने पुन्हा फक्त सॅलडच घेतले. काहीतरी कारण सांगीतले.

आणि शेवटी एकदाची ती पार्टी रात्री सव्वा बारा वाजता संपुष्टात आली.

डोळ्यांवर झोप असूनही... लोहिया सगळ्यांना अर्देशीरांच्या स्विटमध्ये जमायचे आवाहन करत होते.

आणि स्वतःच्या स्विटमधील टबमध्ये बाथ घेतानाच शेजारच्याच फोनवरून मोनाने मोजून चार फोन लावलेले होते. चारही कॉल्सवरील संभाषण हवे तसे झाल्याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर झळकले तशी ती उठली. टी शर्ट आणि जीन्स हा आवडता पोषाख करून ती स्विटबाहेर आली.

आजवर मृत्यूच्या आणि अस्तित्वावर घाला होण्याच्या भयात वावरत असलेली मोनालिसा गुप्ता...

..... एखाद्या हरिणीऐवजी... एखाद्या सिंहिणीच्या थाटात अर्देशीरांच्या स्विटमध्ये प्रवेश करत होती...

... आतमध्ये मृत्यूचा किंवा भयाचा सापळा आहे हे तिला पूर्णपणे ज्ञात होते...

.... पण... आपण जिची वाट पाहात आहोत... ती किती तयारीने आत येत आहे हे आतल्यांना अजिबातच ठाऊक नव्हते...

'गुड मॉर्निंग मॅडम' या कथानकाचा क्लायमॅक्स पुढच्या दोन तासांमध्ये घडणार होता...

गुलमोहर: 

फार छोटा भाग. पण वेगवाण.

पूढचा भाग मात्र लवकर येऊ द्या.

मोनी best of luck.......

पूढचा भाग मात्र लवकर येऊ द्या.

भन्नाट जमलाय हा भाग....
प्लिज पुढ्चा भाग लवकर लिहा..... आता पहायच आहे हि कॉन्फसंस कशि होतेय....
सिवा ग्रेट आहे यार, ज्याचा हि प्लॅन होता, तो माणुस ग्रेट होता. पण... मोहब गुप्ता कडे ह्या लोकांचा फोटो होता म्हणजे त्यांना हि माहित होते आणि ते सिवा चि दिशाभ्ल करत होते, बाप होता म्हणजे... आणि मोना हि तर ग्रेटच...... शेवटि हुशारी रक्तातच आहे......

प्लिज लवकर पोस्टा पुढ्चा भाग.... प्लिज, प्रेमळ विनंति....

मी पण धडधडत्या हृदयाने पुढच्या भागाची(आणि पुढच्या कथानकाची) वाट पाहतोय!!!!
आणि तुमच्य सगळ्या कथानकाप्रमाणे 'गुड मॉर्निंग मॅडम' हे कथानकही खु$$$$प आवडले.

खुपच छान हा ही भाग....
आणि महाबळेश्वर च्या उदय हॉटेल मधे राहिलोय आम्ही महाबळेश्वर पिकनिक ला...

"'गुड मॉर्निंग मॅडम' या कथानकाचा क्लायमॅक्स पुढच्या दोन तासांमध्ये घडणार होता..."

हा जर का खरच पुढच्या दोन तासांमध्ये वाचायला मिळाला असता तर............

वेगवान कथानक......अप्रतिम्...लवकरच येउदे ..........प्रतिक्शेत.

एकादमात दोन भाग वाचले. ही कादंबरी त्यामानाने लवकर संपतेय असं वाटतंय... पण पहिल्या भागापासून आत्तापर्यंत थ्रिल कायम ठेवण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात. आता शेवटचे दोनच भाग!!!! Sad दु:ख होतंय, पण सस्पेन्स तुम्ही कसा उलगडता याची खुप उत्सुकता आहे.
लवकर पुढचा भाग प्रकाशित करा.

बेफिकिरजी,
खतरनाक.....
लवकर येउदेत पुढचा भाग.....................
त्या दोन तासाची वाट पाहता पाहता कित्येक तास झालेत, आता येऊ दया.

मी काय म्हणतो ... मस्त कॉपी करून घ्यावे ... पुस्तक छापावे ...
एखाद्या नॉन - मायबोलीकर वाचनवेड्याला भेट देण्यासाठी मस्त साहित्य बनतंय ना इथे .. ?
येऊ देत भूषणराव ....

आता पुस्तके लिहा भूषणराव ...
मायबोलीच्या जाहिराती / खरेदी सेक्शन मध्ये विक्री पण करता येईल ..
सद्ध्या जाहिराती सेक्शन बंद आहे ... पण तोपर्यंत उघडून जाईल ...

Pages