हर शाम...उनके नाम!
काल मैत्रीण भेटली, हट्टून बसली - म्हणे माझ्यावरही एक कविता कर!
मी क्षणभर गोंधळलो, विचारात पडलो -
"चालत्या-बोलत्या कवितेवर कसली कविता करायची?" असं काहीसं साहित्यिक वगैरे पुटपुटलो...
एकवेळ गर्लफ्रेंडची समजूत काढणं सोपे आहे,
हे इतरांच्या अनुभवावरून माहित होतं..
पण हिची समजूत कशी काढायची?
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे -
या मैत्रीला वय नाही, त्यामुळे चढ-उतारांचं भय नाही.
इथे आहे फक्त नितळता आणि निखळता..
ती कशी मोजायची?
पण म्हटलं - ’बघुया शोधून आतमध्ये, काही सापडतंय का?’
मग शिलकीत साठलेलं एक एक सापडायला लागलं...
मग आठवले चहाचे कप, फाटक्या नोटा,
बोलण्यातले हट्ट, अर्धवट गप्पा,
हरवलेलं गिफ़्ट, विसरलेले बर्थडे,
चुकलेले रस्ते, संपलेलं पेट्रोल,
भर दुपार, गोंधळ फार!
मिस न करताही उगाच मिस कॉल्स,
आणि कुठलीही स्कीम नसताना एका तासातले ६० मेसेजेस् - मग त्यावरून भांडण!
पण नाकावरचा राग नाकावरच रहायचा,
कितीही भांडलो तरी एकमेकांवरच निघायचा...
कदाचित मैत्री व्याख्येच्या बंधनात तेव्हा अडकली नव्हती
"स्वत:ची स्पेस" नावाची पोकळी आयुष्यात तोपर्यंत शिरली नव्हती..
बरेचदा संध्याकाळ अंगावरून मोरपीसासारखी निघून जायची...
खिसे रिकामे पण मनं भरलेली असायची...
हां.. त्या आषाढवयात एकमेकांना एकमेकांबद्दल
कधीतरी काही वेगळं वाटलंही होतं - पण तेवढ्यापुरतंच.
त्या आषाढातलं ते वादळ सहज पेलल्यामुळे
नातं श्रावणासारखं टवटवीत झालं होतं...
आठवल्या मग खूपशा पुसलेल्या रेघा - वहीमधल्या, पाटीवरच्या, वाळुवरच्य़ा...
ती हातावरची रेघ मात्र पुसून हवी तिथे नाही काढता आली कधी...
यालाच नियती म्हणतात हे तेव्हा गावीही नव्हतं...
आणि आता नातं तर व्याख्येपलीकडे पोहोचलेलं.
भाग्याचा स्पर्श, सहवासाचं कोंदण,
ओंजळभर तहान, ढगभरून दान!
अजून काय हवं?
शेवटी आठवला - तिचं लग्न ठरल्यावर सगळ्यांत आधी मला आलेला फोन.
फोनवर तिच्यापेक्षा मीच जास्त एक्साईट झालो होतो..
आणि फोन ठेवताना दोघांच्या तोंडून एकदम आलेलं वाक्य -
"तो? आजसे हर शाम, उनके नाम, हं?"...
मग खूप वर्षांनंतर काल भेटली ती! आणि हट्टून बसली -
म्हणे, माझ्यावरही एक कविता कर!
- नचिकेत जोशी
गणेश, हेम्स, सुमती, सीमा,
गणेश, हेम्स, सुमती, सीमा, प्रकाश thanks...
रूनी, क्षमस्व...
ITGirl, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल "ऋणी" आहे...
जाम आवडली. मस्तच. धनु.
जाम आवडली. मस्तच.
धनु.
अतिशय छान ....ब्रिलीयंट!!!
अतिशय छान ....ब्रिलीयंट!!! मला यातला ओघवतेपणा खुपच आवडला... अन हो... उशीरा वाचल्याच जाम वाईट वाट्ल....
सस्नेह... गिरीश
अजून काय हवं?
अजून काय हवं?
फार च छान!!
फार च छान!!
धुंद, गिरीश,
धुंद, गिरीश, मानसी
धन्यवाद...
सूर्यकांत, खरंय तुमचं... अजून काय हवं?
धन्यवाद..
एक नंबर...
एक नंबर...
सुरेख, नचिकेत. खूप
सुरेख, नचिकेत. खूप आवडली.
-मुकुंद कर्णिक
खूपच छान कविता!! ती निसटून
खूपच छान कविता!!
ती निसटून गेली वेळ
तो संपून गेला काळ
स्मरणात अजूनही माझ्या
ती गुंफीत राहते माळ
खूपच छान
खूपच छान
ओंजळभर तहान, ढगभरून
ओंजळभर तहान, ढगभरून दान!
मस्त!
कल्प, मुकुंद, राहुल, अश्विनी,
कल्प, मुकुंद, राहुल, अश्विनी, चिन्नु
Thanks...
मी खरंच 'फिदा' झालेय या
मी खरंच 'फिदा' झालेय या कवितेवर !
कितीही वेळा वाचली तरी मन भरत नाहीए !
क्या बात है! बापू
क्या बात है!
बापू
सुमति, बापू धन्यवाद...
सुमति, बापू
धन्यवाद...
हे वाचुन प्रत्येकाच्या
हे वाचुन प्रत्येकाच्या आयुश्यात अश्या घड्लेल्या घटनांचि जखम भळ्भळु लागते.डोळ्यात आठवणिंचे पाणि आणते.
अ प्र ति म...शब्द न् शब्द
अ प्र ति म...शब्द न् शब्द खूप्पच सुंदर !
कशी निखळ अन नितळ!! आवडली!!
कशी निखळ अन नितळ!!
आवडली!!
सुनिलजींना अनुमोदन.. झटकन तो
सुनिलजींना अनुमोदन.. झटकन तो साखरपुड्याचा अल्बम समोर आला अन लख्ख प्रकाशातही अंधाराने झडप घालावी तसे काहीसे घटलेले आठवले.
खुपच
खुपच छान.......................
सुनील, अंजली, प्रज्ञा,
सुनील, अंजली, प्रज्ञा, सूर्या, उमेश - धन्यवाद!!
लख्ख प्रकाशातही अंधाराने झडप घालावी तसे काहीसे>>>>
सूर्या, it seems ही कविता वाचताना गतकाळातल्या कुठल्यातरी जखमेवर घाव बसला आहे...
पण अशा अंधारामध्येच प्रकाशाचे कवडसे लपलेले असतात... अर्थात हे सांगण्याइतका मी मोठा नाही आणि काही वेगळं सांगतोय असंही नाही... पण मला स्वतःला नेहमी असं वाटतं, की अशा सगळ्या 'काल'मुळे 'आज' आणि 'उद्या'ची किंमत टिकून आहे..
आनंदयात्री, बित गई वोह तनहाई
आनंदयात्री,
बित गई वोह तनहाई भरी शाम, अब तो हर पल सवेरा हि सवेरा है.. दरीया हमारा, कश्ती हमारी ओर किनारा भी हमारा है ! असोत मस्त मस्त कविता. पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल.
वाह गुरू सूर्यराव!!!
वाह गुरू सूर्यराव!!!
नचिकेत, किती छान मांडलिस रे
नचिकेत,
किती छान मांडलिस रे मैत्री. अगदी अलवार, अलगद उलगडणारी पण तेवढीच भक्कम आणि परिपुर्ण.
मस्त. खुप आवडली.
कविता खूप आवडली. विशेषतः
कविता खूप आवडली. विशेषतः स्वतःची स्पेस नावाची पोकळी, आषाढ श्रावण...
तो? आजसे हर शाम, उनके नाम, हं?
हे प्रश्नार्थी वाक्य दोघांच्या तोंडुन का निघावे ते कळले नाही. त्याच्या तोंडुन निघावे हे समजण्यासारखे. पण तिच्या का? त्याची काही प्रत्येक संध्याकाळ उनके नाम होणार नाही (होप सो !)
त्या आषाढातलं ते वादळ सहज
त्या आषाढातलं ते वादळ सहज पेलल्यामुळे
नातं श्रावणासारखं टवटवीत झालं होतं... > खल्लास!! आषाढवय शब्द आवडला!
वा सुरेख ! >>>"स्वत:ची स्पेस"
वा सुरेख !
>>>"स्वत:ची स्पेस" नावाची पोकळी आयुष्यात तोपर्यंत शिरली नव्हती..
बरेचदा संध्याकाळ अंगावरून मोरपीसासारखी निघून जायची...
खिसे रिकामे पण मनं भरलेली असायची.>>><<< वा...... !
कदाचित मैत्री व्याख्येच्या
कदाचित मैत्री व्याख्येच्या बंधनात तेव्हा अडकली नव्हती
या मैत्रीला वय नाही, त्यामुळे चढ-उतारांचं भय नाही.
हां.. आषाढवयात एकमेकांना एकमेकांबद्दल
ती हातावरची रेघ मात्र पुसून हवी तिथे नाही काढता आली कधी...
ओंजळभर तहान, ढगभरून दान!
हे हे आणि एकंदरीत सर्वच अप्रतीम
मस्त...!!!
मस्त...!!!
सर्वांनाच thanks!! भरत,
सर्वांनाच thanks!!
भरत, "उनके" हा शब्द त्या तिसर्या एकालाच उद्देशून आहे. फक्त या दोघांचे भाव वेगळे आहेत!
typical प्रश्न नाहीये तो.. "हं" यात काहीसा अर्थपूर्ण शेवट आहे... याउपर समजावू नाही शकणार मी.
धन्यवाद!
Pages