माझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं

Submitted by मामी on 3 December, 2010 - 06:39

गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.

एकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे? हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्‍याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."

आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......

सकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय? दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. "वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली? किती उशीर होतो!" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा "मॅडम, आम्ही काय करणार? ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार? मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास?" अन गेला तो.

दुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे?... म्हणजे?? .... माझा पहिला विबासं झाला की काय? अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते! अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.

घरातली कामं झटपट आवरून, नवर्‍याला ऑफिसला पाठवून, दुसर्‍या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, तसं बघायला गेलं तर तुझे आता २४ काय २४०० विबासं झालेत...... Rofl

तू इथे आपले विबासं शेअर करून आपलं मन मोकळं केलस....... आम्हीही ते आवडीने वाचलं, आणि क्षणभर तुझ्या बुध्दीचातुर्याचं कौतुकच वाटलं...... कसं काय सुचतं हिला सगळे...... आम्ही एंप्रेस झालो......... आणि हे असं कितीतरी जणांचं झालं असणार........ झाला की नाही फक्कड "विबासं"

याला म्हणतात, सर्वसमावेषक "विबासं" Lol Biggrin Rofl

मामी तुस्सी ग्रेट हो...... एका दगडात किमान २४०० माबोकर मारलेस...... !!!!!!!!! Rofl

मामी............त्या गडाबडा लोळणार्‍या, हसणार्‍या, खुदुखुदु हसणार्‍या सर्व बाहुल्या!
मस्तच!

मामी तू आता मामी पदाची अनभिषिक्त राणी आहेस.

मी आजच सकाळी एणडीटीवी वर गुर्मे सेंट्रल मध्ये विकी रत्नानीचे पाकाक्रुतीचे प्रयोग पाहिले. मला तो कैच्या कै आवड्तो. दमुन भागून घरीआल्यावर असला स्वैपाकी घरी असावा असे नेहमी वाट्ते. पण आपल्या नशीबी चूल आहेच कायमची. ते रत्न आपल्या नशीबी नाही. Happy त्याला मेल करून पाहू का?

पंत, त्यासाठी एखादं पोर्टल उघडलत तर मला लाईफटाईम मेंबरशीप द्या...... Proud
जिवाभावाचे मित्र आपण... विसरू नका..... एकाच नावेतले सहप्रवासी आपण...... Proud

धन्यवाद मामी आणि आगाऊ,

पोथीच पारायण करण्यापेक्षा मी पण एखाद विबास करुन पहातो.

स क्रियावान असा काहिसा संस्कृत श्लोक आहे ना ?

हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."
मामी,
म्हणजे एका बाईंनी अनेक बायका (कामानिमित्त) ठेवल्या तरीही "विबासं" या विषयात भारी गम्मत येतेच !
Lol

मामी, विबासं ची वर्गवारी केलीत हे बरे झाले.

मी पूर्वीच श्री. वाडेकरांचे एक भक्तिगीत ऐकले होते. त्यात त्यांनी म्हंटले होते, 'हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी?'

मी पण तसेच 'विबासं ची गणना कोण करी' असे ठरवले.

शिवाय अव्वल खेळाडू म्हणतात, मी नुसता खेळतो, त्याचे मोजमाप दुसर्‍या कुणि करावे.
तेंव्हा २४ की जास्त की कमी याचा हिशोब दुसर्‍या कुणाला तरी ठेवू दे. लोकहो, तुम्ही सर्व आपले 'सकाम कर्म' करत रहा. कारण श्रीमद्भगवद्गीतेतहि तसेच काहीसे म्हंटले आहे म्हणे (चु. भू. द्या घ्या).

म्हणजे कसे, विबासं ला एक आध्यात्मिक झालर येईल, नि त्यामुळे तुमच्या डोक्यामागे एक तेजोवलय दिसू लागेल. मग जे विबासं ठेवू इच्छितात त्यांना मार्ग सापडेल, तेव्हढेच लोककल्याण पण!!

मामी मस्त. मायबोली वर येखादा agony aunt सारखा बीबी उघडा , मनीचे गुज सांगणार्‍यांची रांग लागेल आणि २४ चा आकडा कधी पार झाला ते कळणार ही नाही Happy

माझ्या लग्नाआधी, आईनं एका ज्योतिषाला माझी पत्रिका दाखवली होती. तेव्हा त्यानं सांगितलं होतं की, तुमचा जावई तुमच्या दाराशी चालून येईल म्हणून. पण त्यावेळी तिने माझ्या विबासंबद्दल काहीच विचारलं नव्हतं. काही दूरदर्शीपणा, धोरणीपणा नाहीच तो. पण काय योगायोग बघा, जर्रा कुठं विबासंला सुरवात केली अन सगळे विबासं दाराशी चालून यायला लागले. त्याच असं झालं की आजच ते pecopp वाले झुरळं मारायचं औषध लावायला आले. चांगले दोघे जण होते. घरबसल्या आणखी दोन-दोन विबासं. काय वाचलंत? हो, दोन-दोन विबासं. आहात कुठं!!! आणि कित्ती नॉलेजेबल होते ते..... झुरळं आणि घरातील मुंग्या यांबद्दल खूपच चर्चा केली आम्ही. मी तर बाई इंप्रेस होऊन चहाही पाजला त्यांना. ते गेल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला ..... एक गिरकी घेऊन मी गात सुटले ...

'विबासं आले माझ्या दारी ..... मज काय कमी या संसारी'

मामी , पोथीपेक्षाही हे पोथीवरचे निरुपण का टीका का काय असेल ते , फारच उत्तम , रसाळ आणि वाचनीय झाले आहे. विषयाची खोली,आपला गाढा अभ्यास लगेच लक्षात येतो. खुपच सुन्दर.
तुम्ही नक्कीच अतिशय सुंदर मनाच्या आहात. त्याशिवाय का एव्हढा मोठा प्रेमसागर आपल्या मनात दडलाय.
रच्याकने,तज्ञांचे शिष्यगण कसे काय आले नाहीत अजुन या निरुपणाचा रसास्वाद घ्यायला.

लवकरच होतील तुझे २४!
--- दोनाचे चार हात होतील अशी बुळसट म्हण प्रसिद्ध आहे... आता दोनाचे पन्नास Happy हात होवो असे म्हणायचे दिवस आले आहेत.

जगातील प्रत्येक व्यक्ती दुसर्‍या व्यक्ती पर्यंत कमाल ५ विबासच्या साखळीने गाठता येणे सहज शक्य आहे हे प्राध्यापक जिआन ली यांच्या नुकत्याच प्रकाशीत झालेल्या शोध निबंधात सप्रमाणात सिद्ध केले आहे. क्लिष्ट व गुंतागुंतीचा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने हाताळल्या बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार श्रीमती हिलरी क्लिंटन पासुन सुरवात केल्यास श्री ओसामा लादेन गाठायला कमाल पाच विबास-साखळ्या पुरशा आहेत. सर्व जग एकमेकांशी विबासं च्या नैसर्गिक साखळीने घट्ट बांधलेले आहे याचा अजुन एक पुरावा.

Pages