गवत फुला रे गवत फुला

Submitted by जिप्सी on 2 December, 2010 - 11:46

=================================================
=================================================
कुंडित, बागेत किंवा इतरत्रः लावलेल्या शोभेच्या,फुलांच्या झाडांपेक्षा मला हि इवली इवली गवत फुले फार आवडतात. थोड्या दिवसांसाठीच जन्माला आलेल्या या लाल, पिवळ्या, जांभळ्या, पांढर्‍या निळ्या, हिरव्या, गुलाबी शलाका पावसाळ्यानंतर जमिनीवरच्या हिरव्या तारांगणात लखलखत असतात. निसर्गाची अशी हि सतरंगी उधळण करीत फक्त काही दिवसांचेच आयुष्य घेऊन आलेली हि रानफुले आपल्याला निखळ आनंद देऊन जातात आणि मग आपले मनही लहान होऊन शांताबाईंच्या कवितेसारखेच गाऊ लागते. Happy

रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा

मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
– शांता शेळके
=================================================
=================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

गुलमोहर: 

माझी खूप आवडती कविता. सगळी प्रचि सुंदरच.
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
असे फूल नाही का मिळाले?
मी बघितलेले गवतफूल त्याला काही रंग नसायचे, नुसत्च हिरवे तुरे. पण त्यावरून हात फिरवताना काय छान वाटायचे.

प्रिती, भरत, बेफिकीरजी धन्यवाद. Happy

नुसते हिरवे तुरे. पण त्यावरून हात फिरवताना काय छान वाटायचे.>>>>भरत, हे तुरे का?
रायगडवारीत सकाळी काढलेले हे फोटो. पहाटे दवांत भिजल्यावर छान दिसतं होते. माबोकर नीलवेद आणि किरू यांनी तर अक्षरश: झोपून त्या गवतफुलांवर (त्यावर पडलेल्या दवांवर) चेहरा फिरवला होता. Happy

अप्रतिम प्रचि. यातल्या कितीतरी फुलांमुळे बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. नवरात्र, दिवाळीच्या सुमारास आमच्या बंगल्याभोवती मस्तपैकी, गवत उगवलेल असायचं...त्याचा तो उग्र गंध, ही गवतफुलं, चिमणचारा, त्यावर उडणारी फुलपाखरं, वातावरणात दरवळणारा तो दिवाळीच्या तळणाचा वास, किशोरच्या दिवाळी अंकाची उत्सुकता ..... भरकटले माझे मन!

छान फोटो. कित्ती दिवसांनी वाचली ही कविता Happy
प्रचि ४,प्रचि ६ सुंदर.

ते खालचे तुरे आहेत त्यांना आम्ही चिमणीचे दाणे म्हणायचो.

योग्या, निव्वळ अप्रतिम आहे कविता अन अन सगळीचे प्रकाशचित्रे. खरोखर तू एक वेगळा फोटोग्राफर आहेस. Happy

मफो... नेहमीप्रमाणेच... अ प्र ति म प्रचि Happy

कित्ती दिवसांनी वाचली ही कविता<<< ... हो ना.. विसरुनच गेले होते... आता परत पाठ करायला हवी Happy

प्रतिसादाबद्दल धन्स Happy

किशोरच्या दिवाळी अंकाची उत्सुकता ..... >>>>मामी, अगदी अगदी. किशोरबरोबरच चंपक आणि ठकठक सुद्धा. Happy

ते खालचे तुरे आहेत त्यांना आम्ही चिमणीचे दाणे म्हणायचो.>>>>>सावली, हे घे चिमणीचे पोहे Happy (हे नाव मात्र दिनेशदांनी सांगितले :-)).

योगेश, नेहमीप्रमाणेच मस्त प्र.चि.

प्रचि ३ - काँग्रेस गवत
प्रचि ४/५ - सफेद गेंद (Eriocaulon)
प्रचि ७ - तारागुच्छ (Neanotis montholonii)
प्रचि १५ - रानवांगी ??
प्रचि १६ - आभाळी (Cyanotis Tuberosa)
प्रचि १८ - कुर्डू

माधव, खुप खुप धन्यवाद फुलांची नावे सांगितल्याबद्दल. Happy

प्रचि १६ आभाळीला "निलवंती"पण म्हणतात ना? आणि प्रचि ३ मधल्या कांग्रेस गवताला एक उग्र वास आणि कडवटपणा असतो ना?

निलवंतीबद्दल बघून नक्की सांगतो.

हो, काँग्रेस गवताला काहिसा उग्र वास असतो. त्याच्या स्पर्शाने खाजही येते. ते मूळ भारतीय उपखंडातले झाड नाही. स्वातंत्र्यानंतर जेंव्हा भारत सरकारने (काँग्रेसने तेंव्हा सत्तेत होती) अमेरिकेतून गहू आयात केला तेव्हा त्याच्याबरोबर हे पण इकडे आले.

नेहमीप्रमाणे फोटो मस्तच,
प्रचि ०१ व ०९ चे फोटो काढण्यासाठी मी खुप प्रयत्न केला पण मला जमले नाहीत.
इडीट केले का?

सुंदर..खुप आवडले.. Happy

शेवटच्या फोटोत आहेत हे तुरे कोल्हापुराकडे पाडव्याच्या दिवशी जे 'पांडव' घालतात त्यावर खोचलेले असतात ना? कोणाला माहीतेय का?

Pages