नगारा बजा

Submitted by शुभांगी. on 25 November, 2010 - 23:55

ऑफिसला उशिर झाला होता आणि ड्रायव्हरचा दोनदा फोन येवुन गेला होता.तरी बर गाडी सोसायटीच्या गेटजवळच थांबते. तो बिचारा नेहमी वैतागतो, मी वेळेवर जात नाही म्हणुन. पण त्याला काय माहित सकाळचा वेळ किती अपुरा असतो नोकरी करणार्‍या बायकांसाठी. साडेसात वाजले तस आता जर गेले नाही तर ड्रायव्हर गाडी दारात ठेवुन निघुन जाईल अस वाटल्याने मी धावत खाली आले. जिन्यात जोशीकाका भेटले (सोसायटीचे अध्यक्ष) चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह्, 'कशाला बाई नोकरी करते काय माहित?? एक दिवस वेळेवर जाता येत नाही आणि वर महाराणी असल्यासारखी सोसायटीच्या दारात गाडी उभी करुन स्वतः १५ मिनिटांनी उगवणार. तोपर्यंत ड्रायव्हरने ४-५ वेळा हॉर्न वाजवुन साखरझोपेतल्या लोकांची झोप मोड केलेलीच असते."
त्यांच्याकडे कसनुस हसुन मी खाली आले तर दारात गाडी नाही.
"अरे देवा, आता काय करु?? " पुणे ते चाकण अंतराची मनात आकडेमोड केल्यावर पुनः जिन्यावरुन घरी जाण्याचा मार्ग मला त्यातल्यात्यात सोईस्कर वाटला. पण अगदीच कोडगेपणा नको म्हणुन ड्रायव्हरला फोन लावला. त्याच उत्तर,"मॅडम या कोपर्‍यावर आता. मी चहा नाष्टा उरकतो तोपर्यंत." मनातल्या मनात चार शिव्या हासडुन चालायला सुरवात केली. जाउदे आता जरा आपणपण निवांतच जाउ म्हणुन चालण्याचा वेग कमी केला. समोर बरेच जण मॉवॉला चाललेले दिसले. हातात दुधाची पिशवी, भाजी किंवा तत्सम गोष्टी नसल्या की सुज्ञ पुणेकरान समजावं की मॉवॉला चालले आहेत. शंभरातले १० जण सुदृढ तब्येतीसाठी तर बाकीचे आजारातुन उठल्यामुळे तब्येतीची काळजी म्हणुन, किंवा कॉर्पोरेट कल्चर मधे अगदीच गावंढळ वाटायला नको म्हणुन किंवा आम्ही अगदी जीम नाही पण मॉवॉतरी करतो हे सहकार्‍यांना दाखवण्यासाठी मॉवॉला जातात हे आपल माझ मत. Happy

तर सांगायची गोष्ट ही की माझ्यापासुन ५० मिटर अंतरावर एक जोडपे दिसले मॉवॉला चाललेले. ओळखिचे नसले तरी रोज दिसतात मला ते. काकु स्थुल, गोलमटोल तर काका तुडतुडीत. नवर्‍याचा चालण्याचा वेग मॅच करण्याच्या नादात बाईच्या होणार्र्‍या शीघ्र आणि दुसर्‍यांना हसु दाबायला लावणार्‍या हालचाली लांबुन पाहुनच माझी करमणुक होत होती. कितीही कमी असला तरी माझा चालण्याचा वेग त्यांच्यापेक्षा थोडा जास्तच होता. आमच्यातल अंतर हळुहळु कमी होत आणि त्यांच्या बोलण्याचे आवाज कानावर आदळण्याच्या आधीची स्टेप म्हणजे पोचत होते.

काकुंनी एकदा मागे आणि आजुबाजुला बघितल. मला वाटल की त्यांच बोलण मी चोरुन ऐकतेय अस वाटल की काय त्यांना पण माझी शंका पुढच्या १० सेकंदातच मोडीत निघाली कारणच तस होत.
मी जागच्या जागीच दचकले कारण एकदम नगारा वाजला, 'ढरृर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र'.
पुर्णपणे ५ ते १० सेकंद तो आवाज आसमंतात घुमत होता आणि त्या ५-१० सेकंदातच आमच्यातल अंतर शुन्य झाल होत. आता माझ्या चेहर्‍यावरचे भाव मी कितीही लपवण्याचा निष्फळ प्रयत्न केला तरी माझ तोंड काय माझी दादागिरी सहन करणार नव्हत. माझ्या दंतपंक्ती आणि घश्यातली खळखळ एकदमच बाहेर पडली. पण मला हे समजायला थोडा उशीर लागला. समजल तर हसाव की कुठे तोंड लपवाव कळेनाच. शेजारुन जाणार्‍याने माझ्याजवळ आल्यावर गाडी थोडी स्लो केली आणि फुसकला व पुढे गेला. समोरच्या खिडकीतली बाई माझ्याकडे बघुन नवर्‍याच्या कानात फिदकताना दिसली.
अरे देवा, ती मी नव्हेच अस सांगायला पण वेळ नव्हता कारण एव्हाना ड्रायव्हरचा चहा नाष्टा आणि दुसरा चहा पण संपला असण्याची दाट शक्यता होती.
मनात चरफडत व नगारा काकुंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत मी त्यांना वळसा घालणार इतक्यात कानावर शब्द आदळले," अहो जरा आजुबाजुला बघत जा की, वेळ नाही, काळ नाही" काकुंनी काकांवर बाजी उलटवली होती आणि चेहर्‍यावर मघाच्या सत्कर्माचा लवलेशही नव्हता.
काका बिचारे अवाक "आता मी कुठे काय केल?? जे केल ते " आणि त्यांच्या तोंडावर मुष्ठीप्रहार झाला.
"राहुदे आता, पण थोडी काळजी घ्यावी माणसान, आजुबाजुला बघाव" माझ्याकडे बघत काकु पुटपुटल्या. माझी पण काकांसारखीच अवस्था. Sad

एक टीप - वरील घटना हा निव्वळ योगायोग आहे. साधर्म्य आढळल्यास पुन्हा एकदा फुदफुदुन घ्यावे Lol
मॉवॉ - मॉर्निंग वॉक

गुलमोहर: 

माझी एक राजस्थानी मैत्रिण सांगायची,"हमारे ह्जबंड कुछ एकसर्साईज नही करते. उनको बडी गॅस होति है.छुट्टी के दिन पर जब वे घर पे होते है तो दिन्भर बस आवाजें निकालते रहते है.मेरे मम्मि पापा उनकि इतनि इज्जत करते है ,अब वे जी.सी. के लिये हमारे यहा आके रहने वाले है,अगर उन्होने इनकि टूट सुनी तो कैसे लगेगा!"( तेव्हा तिचे नुकतेच लग्न झाले होते.लग्नात सासर कडच्यानी प्रचंड हुंडा,आणी वर लग्नात खूप भाव खाऊन त्रास दिला होता.):)
त्या पार्श्व्भूमीवर तर तिचे ऐकून खूप हसू आले.