फजीती

नगारा बजा

Submitted by शुभांगी. on 25 November, 2010 - 23:55

ऑफिसला उशिर झाला होता आणि ड्रायव्हरचा दोनदा फोन येवुन गेला होता.तरी बर गाडी सोसायटीच्या गेटजवळच थांबते. तो बिचारा नेहमी वैतागतो, मी वेळेवर जात नाही म्हणुन. पण त्याला काय माहित सकाळचा वेळ किती अपुरा असतो नोकरी करणार्‍या बायकांसाठी. साडेसात वाजले तस आता जर गेले नाही तर ड्रायव्हर गाडी दारात ठेवुन निघुन जाईल अस वाटल्याने मी धावत खाली आले. जिन्यात जोशीकाका भेटले (सोसायटीचे अध्यक्ष) चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह्, 'कशाला बाई नोकरी करते काय माहित?? एक दिवस वेळेवर जाता येत नाही आणि वर महाराणी असल्यासारखी सोसायटीच्या दारात गाडी उभी करुन स्वतः १५ मिनिटांनी उगवणार.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - फजीती