गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १७

Submitted by बेफ़िकीर on 29 November, 2010 - 07:46

"यू हॅव बीन स्टेयिंग हिअर.... डुईंग व्हॉट????"

मोनालिसा गुप्ता भारतातून गायब झाल्याच्या सतराव्या दिवशी रेजिनाल्डो रिकार्डो डिसूझा अचंबीत होऊन तिच्याकडे पाहात सिंगापूरमधील त्या भव्य आणि अती आलिशान स्विटमध्ये स्तब्ध बसलेला होता. ती गायब झाल्याच्या चवदाव्या दिवशी तिनेच त्याला फोन करून गुप्तपणे येथे बोलवून घेतले होते. तमाम हेलिक्सच्या मते मोनालिसा यु.के.ला गेलेली होती. सुट्टीसाठी!

"अ‍ॅबॉर्शन"

मोनाचे हे उत्तर त्याच्या कानांमधून मेंदूत प्रवेशून मेंदूला ते नीटपणे जाणवायला दहा सेकंद लागले.

अवाक झालेला रेजिना तिच्याकडे पाहात असताना उदासपणे मोनालिसा खिडकीतून बाहेरच्या अनेक फ्लाय ओव्हर्स असलेल्या रस्त्यांच्या जाळ्यांकडे पाहात होती.

रेजिना - मी... म्हणजे...

मोना - ....????

रेजिना - मी विचारू शकतो का?? ...की... का केलेस अ‍ॅबॉर्शन?? जगाला घाबरून???

मोना - जगाला घाबरणे ही अपमानास्पद बाब आहे का??

रेजिना - तुझ्यासारख्या सामर्थ्यवान स्त्रीसाठी तरी नक्कीच!

मोना - जवळ पैसा आहे, मी एका कंपनीची एम्.डी. आहे, याचा अर्थ मी एक इतर स्त्रियांसारखी स्त्री नाही असे वाटते का तुला?

रेजिना - आर वुई नॉट गोईंग टू बी मॅरिड??

मोना - लग्नाआधी मूल असते?

रेजिना - आपण आत्ताच लग्न करू शकलो असतो....

मोना - तेच जमत नव्हते...

रेजिना - म्हणजे??

मोना - आत्ता माझ्या प्रायॉरिटीजच वेगळ्या आहेत...

रेजिना - वेगळ्या म्हणजे अश्या... ज्या आपल्या दोघांच्या कॉमन नाही आहेत ... हो ना??

मोना - रेजिना.. आपण दोघे एकमेकांचे आहोत.. आहोतच.. पण... ते समाजापुढे मांडायला अजून काही कालावधी जायला हवा आहे...

रेजिना - मला... मोनालिसा.. मला तू समजतच नाहीस...

मोना - मूल परत होऊ शकेल... आणि.. मुख्य म्हणजे.. मूल होणे हा आपल्या प्रेमसंबंधांचा उद्देश कधीच नव्हता... तू आणि मी एक संसारी दांपत्य होणे हा आपला अतीम उद्देश कधीच नव्हता... आपल्याला फक्त एकमेकांचे प्रेम, तेही निर्मळ आणि प्रामाणिक प्रेम हवे आहे.. ते आहेच... वेळ आली की लग्न करू... आणि नंतर संसार होईलच!

रेजिना - हे म्हणजे.. हे म्हणजे त्या अनिल कपूर श्रीदेवीच्या पिक्चरसारखे चाललेले आहे... चालबाझ का कुठला तो... ही गोष्ट तुला इतकी साधी वाटली??

मोना - अगदी साधी... कारण माझ्यापुढे फार भयंकर समस्या आहेत रिकोह...

रेजिना - समस्या! अश्या समस्या ज्यांचे निवारण करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग अपेक्षितच नाही आहे...

मोना - तू एकांगी विचार करतो आहेस... तुझा सहभाग आधीच आहे त्याच्यात... माझ्या मनाला एक खूप मोठा विरंगुळा, एक मोठे आपलेपण, एक मानसिक आधार तू आधीच देत आहेस... ही बाब माझ्यासारखे आयुष्य जगणार्‍या स्त्रीसाठी अत्यंत महत्वाची आहे.. साधी गोष्ट लक्षात घे... तूच नको असतास तर मी सगळ्यांना सोडून तुलाच इथे कशाला यायला सांगीतले असते??

रेजिना - मोनालिसा... पहिली गोष्ट म्हणजे तू माझी बॉस आहेस... यू ओन डॅनलाईन इन्डिया अ‍ॅन्ड हेलिक्स... मी डॅनलाईनमध्ये फक्त एक जॉब करतो... आपले नाते निर्माण व्हावे असा स्वार्थी हेतू माझ्या मनात कधीच नव्हता... ते फक्त आपोआप निर्माण झाले होते.... आणि ते आपल्या दोघांनाही आवडले... आपण ते पुढे नेले.. मात्र त्यातील या महत्वाच्या टप्यावर तू मला... म्हणजे.. तसे म्हणणे एक एम्प्लॉयी म्हणून जरी उचित नसले तरीही एक मित्र म्हणून म्हणतो... की त्या टप्यावर तू मला विश्वासातच घेतलेले नाहीस...

मोनालिसा खिडकीतून रेजिनाच्या जवळ आली. खुर्चीवर बसलेल्या रेजिनाच्या मागून त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकत त्याच्या कानांपाशी ओठ नेऊन कुजबुजत म्हणाली...

मोना - आपल्या दोघांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतला आहे डिअर... मला निश्चीतपणे माहीत नव्हते की याबाबत तुझी भूमिका काय असेल... आणि एकदा तुला ही गोष्ट सांगीतल्यानंतर मला स्वतंत्र भूमिका घेणे अशक्य झाले असते म्हणून मी न सांगताच हे सगळे केले... पण विश्वास ठेव... मला माझे आयुष्य तुझ्यासारख्या सहृदयी मित्राबरोबरच व्यतीत करायचे आहे... मला एक संसारी स्त्री वगैरेच व्हायचे आहे असे मुळीच नाही... किंवा केवळ तू नवरा आहेस म्हणून बिझिनेस तुझ्याकडे सोपवून मी बोट क्लबला आरामात वावरेन असा माझा विचार अजिबात नाही.. पण.. पण तरीही आपण एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र आणि लाईफ पार्टनर्स बनणार आहोत... फक्त... एखाद दोन वर्षे मात्र लागतील त्या सगळ्याला!

रेजिना तसाच बसला होता. त्याच्या पाठीवर मोनालिसा झुकलेली असल्याने त्या स्पर्शाने तो काहीसा विचलीत झालेला होता. तिची कानात ऐकू येणारी लाडीक कुजबुज आणि तिच्या केसांचा मस्त गंध त्याला अधिक बेचैन करत होता. त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिले आणि मोनाने झुकलेल्या अवस्थेतच त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. रेजिनाने मात्र स्वतःचे ओठ बाजूला करून तिच्याच कुजबुजत्या स्वरात तिला विचारले...

"तू असे का करतेस मोना?? मी कोणी नाही का??"

"असे कसे म्हणतोस?? आत्ता मी काही महिने बिझिनेसपासून दूर राहिले असते तर किती समस्या झाल्या असत्या..."

"माझा आत्तापर्यंतचा सगळा काळ गिअर्सच विकण्यात गेला आहे मोना... मी हेलिक्सची परिस्थिती आहे त्यापेक्षा सुधारू शकतो... अर्थात, यात मला तुला किंवा तुझ्या टीमला खिजवायचे नाही आहे अजिबात.. पण मला जागेवर बसून समजते की तुझ्या डॅडच्या काळात घेतले गेलेले डिसीजन्स किती ग्रेट होते आणि आत्ता कसे डिसीजन्स घेतले जात आहेत... चुका समजत असूनही मी एक अक्षर मध्ये बोलत नाही कारण तो माझा आता प्रांतच उरलेला नाही... पण या कालावधीत तुझ्यामते होऊ शकणार्‍या समस्या मात्र तू माझ्यावर सोपवू शकली असतीस... हवे तर मी पार मेहरांनाही रिपोर्ट केले असते तुझ्यासाठी... लोहियांना तर केलेच असते... "

मोना आता पुढे येऊन रेजिनाच्या मांडीवर बसली. स्वतःच्या छातीवर रेजिनाचा चेहरा घुसळत म्हणाली...

" नाही रे... तू समजतोस तशा समस्या नाही आहेत त्या... फार.. फार भयंकर समस्या आहेत..."

"मी... मला तू जर हे सांगणारच नसलीस.. तर .. तर मग काही अर्थ आहे का आपल्या सो कॉल्ड मैत्रीला??"

"ही मैत्री सो कॉल्ड नाही आहे रिको... आय लव्ह यू... पण..."

"पण ते सांगायची वेळ आलेली नाही.. होय ना??"

"रिको... एक वचन देशील???"

"कसलं??"

"देशील का?? आधी सांग...."

"असं कसं देता येईल?? तू म्हणशील तुला मी सोडून द्यावे... असे वचन कसे देता येईल??"

"वेडा आहेस का?? विश्वास ठेव... दिलं म्हण..."

"..... .... हं.... दिलं..."

"मग ऐक... मी जे सांगते ते फक्त ऐकायचं.. मला त्या बाबतीत तुझा सहभाग किंवा सहाय्य फक्त इतक्याच कारणासाठी नको आहे की मला हे सिद्ध करायचे आहे की एक अननुभवी स्त्री या पाताळयंत्री विश्वाला नेस्तनाबूत करू शकते... तेही एका पुरुषाच्या मदतीशिवाय... कारण... अनेक महिन्यांपुर्वी जतीन मला म्हणाला होता.... अ फिमेल कान्ट सर्व्हाईव्ह विदाऊट अ मेल... आणि ते मला सहन होत नाही... स्त्री आणि पुरुषांचे नाते... असे असावे की त्यात... त्यात निखळ प्रेम असावे... शारिरीकदृष्ट्या पुरुष अधिक ताकदवान असतो किंवा त्याला शिकायच्या, कर्तबगारी दाखवायच्या संधी सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे अधिक प्रमाणात मिळतात या एकाच भांडवलावर तो स्त्रीला गुलाम बनवू शकत नाही... तिला दुय्यम लेखू शकत नाही... प्रेग्नंसी ही बाब निसर्गाने स्त्रीला प्रदान केलेली आहे... त्या गोष्टीचे प्रेशर घेतल्यामुळे स्त्री खुलेपणाने चारचौघात वागू शकत नाही आणि हे शतकानुशतके... किंवा कदाचित युगानयुगे चालत आलेले आहे... काही प्रमाणात ते ठीकही असेल.. रस्त्यातून चालताना आम्ही वाटेल तसे कपडे परिधान करणे योग्य नाही... रस्त्यातच काय.. इव्हन घरातही आम्ही व्यवस्थितच वावरायला पाहिजे हे मान्य आहे.. कारण त्यामुळे नालायक माणसांची दृष्टी वळत नाही ... इथपर्यंत ठीक आहे... पण.. पण हेलिक्सची एम डी एक स्त्री आहे ही काय थट्टेची बाब आहे?? तिला गिअर्समधले ओ का ठो कळत नाही हा तिचा दोष आहे?? सायरासारख्या सुंदर आणि सुशिक्षित स्त्रीला कुणीही नाही म्हणून श्रीमंतीची आमीषे दाखवून वासनेच्या जाळ्यात ओढणे असे प्रकार होतात म्हणून स्त्रीने नेहमीच दबून राहायचे हा निसर्गाला अभिप्रेत असलेला प्रकार आहे?? मी दिलं होतं उत्तर जतीनला... की माझ्यामते स्त्री पुरुषाशिवाय नक्कीच राहू शकते... पण पुरुष मात्र स्त्रीशिवाय जन्मालाही येऊ शकत नाही... पण एकट्या जतीनला उत्तर देऊन काय होणार? मानसिकता कशी बदलेल?? आणि मी ती बदलयाच्या प्रयत्नात आहे असा माझा दावाही नाही... पण.. पण मी केवळ एक स्त्री आहे म्हणून मी एम डी होऊ नये.. मला गिअर्समधले.. ऑपरेशन्समधले... मार्केटमधले काहीही कळत नाही असाच चेहरा घेऊन का सगळ्या मीटिंग्ज होतात?? एक कुत्सित, छद्मी असे हास्य का कायम विलसते प्रत्येक थोबाडावर?? तू तसा नाही आहेस हे मला माहीत आहे.. कदाचित म्हणूनच आपली इतकी जवळीक झाली असेल रेजिना... पण.. पण सगळे असे मुळीच नसतात.. सगळे नेमके पुरुषप्रधान विचारांचे असतात.. जडेजांच्या पायाखालची जमीन सरकली मी हेलिक्सची जागा परत मागीतली तेव्हा.. कळले असेल नालायकाला.. एक स्त्री किती सामर्थ्यवान असू शकते ते... माया हा स्त्रीचा एकच गुण आहे का? क्षमाशीलता इतकेच वर्णन का म्हणून एका स्त्रीचे? स्त्रीला सूड घ्यावासा वाटत नसेल? लज्जा हाच का म्हणून दागिना स्त्रीचा? कर्तबगारी हा दागिना का होऊ शकत नाही? आणि लज्जा हा फक्त स्त्रीचाच दागिना का? पुरुषांना निर्लज्जपणे वागता यावे म्हणून??

रेजिना... तुला वाटत असेल माझ्यावर कोणत्यातरी स्त्री मुक्ती संघटना वगैरे स्वरुपाच्या विचारांचा प्रभाव आहे की काय! मुळीच नाही... माझ्यावर तसला काहीही प्रभाव नाही.. मोनालिसा गुप्ता एका विशिष्ट क्षणापर्यंत एक आम स्त्री, एक आम मुलगी, भले गर्भश्रीमंत असेल पण सामान्यपणेच जगत होती तिचे आयुष्य... पण केवळ एक स्त्री आहे म्हणून मला गृहीत धरले गेले... ही काय? आपण सांगू त्यवर मान डोलावणारच.. थोडीशी नटणार... मुरकणार.. हासणार आणि माना डोलावणार आणि म्हणणार की मला त्यातले काही समजत नाही.. तुम्ही म्हणाल तसे... रेजिना... एकवेळ यालाही माझी हरकत नसतीसुद्धा! पण परिस्थिती तशी नव्हती... मला गृहीत धरून धंद्याचा बट्याबोळ करायला निघाले होते सगळे... आणि माझ्या डॅडचे स्वप्न असल्या नालायक आणि स्वार्थी माणसांमुळे भंगवे हे मला का म्हणून सहन व्हावे??

माझ्या सध्याच्या प्रायॉरिटिज वेगळ्या आहेत असे मी जे म्हणाले ना?? ते हेच... मला हेलिक्स प्रचंड यशस्वी करायची आहे असे मुळीच नाही.. ती यशस्वी आहेच.. तिच्या स्वतःच्या स्ट्रेन्थ्समुळे... मला फक्त इतकंच दाखवायचं आहे की एक लहान वयाची स्त्री... या असल्या हरामखोर पाताळयंत्री माणसांना पूर्णतः नष्ट करू शकते व तेही केवळ बुद्धीवर विसंबून... मला हिंसा नको आहे... मला ओरडाआरड नको आहे.. मला भांडणे, वादावादी, मारामार्‍या, सूड नको आहे... मला हवी आहे एक अशी मानसिक अवस्था.. जेथे एक काबील लीडर म्हणून माझ्याकडे पाहिले जाईल आणि त्याचवेळेस मी ज्या संस्थेची लीडर आहे त्या संस्थेवर जगणारे तरी त्या संस्थेला स्वार्थासाठी रसातळाला नेऊ शकणार नाहीत मी असताना... त्यांना काय शिक्षा व्हावी याचाही माझा विचार केव्हाच झालेला आहे... पण रेजिना.. एक शत्रू असला आणि तो शत्रू आहे हे माहीत असले तर फार बरे असते... पाच पाच शत्रू असले आणि माहीतच नसले की ते शत्रू आहेत की नाही आणि असले तर नेमके किती ताकदवान... तर कसे सांभाळायचे स्वतःला?? तरीही मी टिकून आहे... नुसती टिकूनच नाही आहे तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.. मी त्यांच्याशी पंधरा दिवसांपुर्वी जाहीर युद्ध पुकारले आहे... या अत्यंत अनप्रेडिक्टेबल परिस्थितीतमध्ये मला तुझे सहाय्य केवळ एकाच कारणासाठी नको आहे.. ते म्हणजे उद्या कोणी म्हणायला नको... मोहन गुप्तांच्या मुलीला एका डिसूझा नावाच्या माणसाने वाचवले आणि जगवले.. मोनालिसा स्वत:च्याच हिंमतीवर किंवा किंमतीवर लढेल... मात्र... या सर्व घटनाक्रमामध्ये.. तुला एक विशिष्ट स्थान आहे माझ्या मनात... एक मोठा मानसिक आधार.. बास.. सध्या तितकीच अपेक्षा... तुला वाईट वटेल ऐकून कदाचित.. पण तुझ्यावर पराकोटीचे प्रेम असतानाही आणि तू मला आणि मी तुला प्राप्य असतानाही मी लग्न करणे पुढे ढकलते आहे .... याचे कारण एकच... तुझ्याशी 'मोनालिसा गुप्ता' लग्न करेल रेजिना.. आणि कर्तबगार म्हणून सिद्ध झालेल्या 'मोनालिसा गुप्ता'लाच तुझ्यापासून अपत्यप्राप्ती होईल... एक आम स्त्री तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही... आर यू विथ मी???

रॉथमन्सच्या घमघमाटाने स्विट भरलेला होता. दोन रॉथमन्स ओढून झालेल्या होत्या रेजिनाच्या! शुन्यात पाहात तो फक्त ऐकत होता. त्याला स्वतःचे स्थान बरोब्बर समजलेले होते. तो कमी महत्वाचा अजिबात नव्हता. फक्त या सूडाच्या यज्ञात त्याला काहीही स्थान नव्हते इतकेच! आणि... त्याच्या दिलखुलास आणि रॉयल स्वभावानुसार त्याचे मन त्याला निक्षून सांगत होते...

'मोनालिसा गुप्ता इज अ ग्रेट लेडी... अ‍ॅन्ड मोर इम्पॉर्टन्टली... शी डिझर्व्हस टू बी अलोन इन धिस'

रेजिना - मोना... आय अ‍ॅम टोटली विथ यू... मी तुझा एक मोठा मानसिक आधार म्हणून आणि एक प्रियकर म्हणून नेहमीच राहीन... मात्र तुझ्या त्या संकल्पामध्ये तू म्हणाल्याशिवाय मी काहीही हालचाल करणार नाही... अर्थात... मला जर काही महत्वाची माहिती मिळाली... तर एक मित्र या नात्याने मी ती तुला जरूर पुरवीन.. आशा आहे की त्यात तुला काहीही हरकत नसेल...

मोना - अजिबातच नाही रिकोह.. आय लव्ह यू...

रेजिना - आय लव्ह यू टू मोना...

मोनालिसाला गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रचंड मानसिक यातना झालेल्या होत्या. आई होण्यापासून तिने स्वतःला वंचीत ठेवलेले होते. त्यातच, रेजिना तिथे नव्हताच! ती एकटीच होती या सर्व प्रसंगामध्ये! आणि हे सर्व कधी? तर रेजिना आणि ती सहज लग्न करू शकत असतानाही! अत्यंत त्रासदायक मनस्थितीत गेले काही दिवस ती वावरत होती. आज रेजिना आल्यानंतर सुरुवातीला त्याचाही गैरसमज झाला होता. पण मोनाने त्याला एक पर्स्पेक्टिव्ह दिला होता जो रेजिनाला पूर्णपणे पटलेला दिसत होता.

बरीचशी काळजी आता नष्ट झाली होती. परिणामतः मोनालिसा पुन्हा येऊन रेजिनाच्या मांडीवर बसली. एक प्रदीर्घ किस घेऊन तिने स्पष्ट केले की तिला आता त्याचा सहवास हवा होता. रेजिना अर्थातच त्याच मताचा होता!

तिच्या मनस्थितीची योग्य जाण ठेवून कोणताही धसमुसळेपणा न करता रेजिनाने तिला अलगद उचलून बेडवर ठेवले. काही क्षणातच दोन प्रेमी जीव मीलनाच्या सर्वोच्च आनंदबिंदूकडे वाटचाल करू लागले.

तो एक तास! तो एक तास मोनालिसाला आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदावर स्वार करवून संपत होता. रेजिनाच्या रॉथमन्सच्या दर्पात भिजलेल्या ओठांचा स्पर्श मोनालिसाच्या सर्वांगावर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत होता. त्याच्या मस्क्युलर पाठीत रुतलेल्या मोनाच्या नखांनी त्याचे रक्त काढलेले होते. आणि ती जाणीव त्याला सुखदच वाटत होती. हेलिक्स, अर्देशीर आणि लोहिया ही नावे त्या मीलनामुळे मोनाच्या खिजगणतीतही उरलेली नव्हती. फक्त एकच अस्तित्व त्या स्विटमध्ये उरलेले होते. प्रेम, प्रेम आणि प्रेम! या प्रेमाच्या अस्तित्वामुळे भोवतालच्या जगाचा केव्हाच विसर पडलेला होता.

दोही शरीरे धपापत होती तरीही विलग होत नव्हती. एकमेकांच्या विळख्यात पहुडण्यातच कित्येक मिनिटे गेली. दोघेही नुकत्याच प्राप्त केलेल्या सुखाचा आणि आधीच्या संवादांचा आपापल्या परीने विचार करत होते. मात्र मिठ्यांचे विळखे तसेच राहिलेले होते. शेवटी शांततेचा भंग रेजिनाने केला.

रेजिना - मला.. मला नेमके काय आहे ते... सांगायला तुझी काही हरकत नाही ना????

कित्येक सेकंद मोनालिसा स्तब्ध नजरेने रेजिनाकडे पाहात होती. तिने त्या सेकंदामंध्ये खूप विचार केला. त्याचे सहाय्य जरी घ्यायचे नसले तरीही जगात निदान एक माणूस तरी असा असावा ज्याला सर्व काही माहीत आहे अशा निष्कर्षाप्रत ती शेवटी पोचली.

मोना उठून बसली आणि बेडखाली पडलेली एक रजई तिने अंगावर घेतली. तिथून उठून ती एका खुर्चीवर जाऊन बसली. पाठोपाठ रेजिनाही उठला. त्याने एक टॉवेल कंबरेभोवती गुंडाळला आणि तो समोरच्या खुर्चीवर बसला! मात्र तोवर मोनाने कार्ल्सबर्गच्या दोन बॉटल्स ओपन केलेल्या होत्या.

बीअरचा पहिला घुटका घेऊन आणि घटनाक्रमांचा सांगोपांग विचार करून, तसेच, रेजिनाला काय आणि कसे अधिकाधिक प्रभावीपणे सांगायचे याचा विचार करून मोनाने तोंड उघडले.

दिड तास! दिड तास मोना अव्याहत बोलत होती. बीअरच्या प्रत्येकी दोन दोन बॉटल्स संपलेल्या होत्या. आणखी मागवायच्या होत्या पण ते सुचतही नव्हते इतके सुसूत्रपणे मोना सगळे सांगत होती. सतत तिच्या मनात हीच धाकधूक होती की आपले डॅड असते तर त्यांनी असे त्यांच्या लाईफ पार्टनर होऊ पाहणार्‍या व्यक्तीला हे सगळे सांगीतले असते का? पण एकदा निर्णय घेतल्यामुळे आता मागे फिरता येत नव्हते.

संपूर्ण दिड तासात रेजिना स्तब्धपणे फक्त मोनाच्या चेहर्‍याकडे पाहात होता. रॉथमन्सचा धूर स्विटमध्ये किंचित अधिक डेन्स होऊ लागलेला होता. रेजिनाच्या चेहर्‍यावरची सुरकुतीही बदलत नव्हती. मोना मात्र जमीनीकडे पाहात होती. एकदाही तिने रेजिनाकडे पाहिले नाही.

पाचगणीच्या आयुष्यापासून ते इकडे सिंगापूरला येईपर्यंतचा सर्व इतिहास तिने कव्हर केला होता दिड तासात! अर्देशीर सर, लोहिया, जतीन, सुबोध आणि सायरा यांच्या व्यक्तीमत्वाचे सर्व कंगोरे तिने अत्यंत प्रभावीपणे नोंदवले होते. सिवा ही बाब मात्र तिने गुप्त ठेवण्यात कमालीचे प्रावीण्य दाखवले होते. काही गोष्टी तिला कशा कळल्या असा प्रश्न रेजिनाच्या मनात डोकावू नये यासाठी तिला प्रचंड कसरत करावी लागत होती. पण तिने ती लीलया केली. मोनाने सांगीतलेली स्टोरी म्हणजे जणू इस्टेटीसाठी चाललेल्या मोठ्या सूडनाट्यासारखीच होती. मात्र त्य अकथानकाचे दोन सरळ सरळ स्पष्ट भाग पडत होते व कसा कुणास ठाऊक, त्या दोन भागांचा काही संबंधच लागत नव्हता. मोनाच्या आईचा आणि रणजीतच्या आई वडिलांचा करवण्यात आलेला मृत्यू आणी हेलिक्सच्या दौलतीसाठी अर्देशीर आणि लोहिया या दोघांचे चाललेले प्रयत्न यात काही संबंधच नव्हता. तो संबंध खरे तर मोनालाही प्रस्थापित करता आलेला नव्हता किंवा तिने तसा प्रयत्नही केल्याचे जाणवत नव्हते तिच्या बोलण्यातून! सरळ सरळ दोन स्वतंत्र कथनके वाटत होती ती!

सगळे सांगून झाल्यानंतर मोनाने अक्षरशः पाच मिनिटे फक्त श्वासच घेतला.

दमली होती ती! जितकी बोलण्यामुळे दमली होती त्यापेक्षा जास्त एकदाचे मन मोकळे केल्यामुळे दमलेली होती. ओठांना कोरड पडलेली असूनही तिने रेजिनाची एक रॉथमन्स आता पेटवलेली होती.

संपूर्ण रॉथमन्स संपवायला तिला दहा, बारा मिनिटे लागली. तोवर दोघेही चुपचाप होते. एक अक्षरही कुणी बोलत नव्हते. फक्त श्वासांचा आवाज ऐकू येत होता एकमेकांच्या!

तब्बल पंधरा मिनिटाने मोनालिसाने तोंड उघडले.

"तुला काय वाटते जे झाले त्याच्याबद्दल?????"

हा प्रश्न ऐकून कुठे रेजिना जरासा तरी जिवंत असल्यासारखा वाटला. त्याने मान हालवून समोरच्या पाण्याच्या बाटलीतील अर्धे पाणी घटाघटा पिऊन टाकले. मोना त्याच्या चेहर्‍याकडे निरखून पाहात होती.

रेजिना - ... आता... कसे सांगू मी तरी???

मोना - .... बोल ना???

रेजिना - काय बोलू????

मोना - हे जे झाले त्याच्याबद्दल तुला काय वाटते???

रेजिनाचा चेहरा कधी नव्हे इतका गंभीर झालेला होता. अत्यंत विचारमग्न चेहरा करून त्याने उत्तर दिले.

"फ्रंट ओपन ब्रा बरी पडते"

तो काय बोलला ते डोक्यात शिरायलाच मोनाला वेळ लागला. मात्र त्या क्षणी ती चवताळून उठली. संतापातिरेकाने अंगावरची रजई दूर फेकून तिने बेडवरची एक उशी उचलली आणि रेजिनाच्या टाळक्यात आपटली.

"नालायक... इरसाल कुठला... मतलबी... "

प्रत्येक शिवीला ती उशी मोना रेजिनाच्या डोक्यात घालून प्रहार करत होती त्याच्यावर!

"हरामखोर आहेस तू... आचरट... अक्कलशुन्य.... "

रेजिना शांतपणे 'उश्या खात' खुर्चीवर बसून मोनाच्या अवताराकडे बघत होता.

"बदमाष.... आणि लुच्चा... लुच्चा आहेस तू लुच्चा.... आणि ते काय ते...

रेजिना - मवाली...

मोना - मवाली... गुंड आहेस...

रेजिना - विकृत...

मोना - एक अत्यंत घाणेरडा आणि विकृत माणूस आहेस तू...

त्याच क्षणी तिला समजले. हा आपल्यालाच शिव्या सुचवतोय आणि या उशीमुळे या ढिम्म माणसाला काहीही होत नाही आहे. आपण मात्र मूर्खासारख्या पूर्ण नग्नावस्थेत त्याच्यासमोर उभ्या राहून त्यालाच दर्शन देत बसलो आहोत.

त्याचक्षणी मोनाने पटकन रजई गुंडाळून घेतली अंगाभोवती!

खुर्चीवर बसल्यावर तिने बीअरची एक रिकामी बाटली अत्यंत रागाने रेजिनाच्या अंगावर फेकली. ती त्याला चुकवताच आली नाही. त्याच्या हातावर फटकन बसली ती! तो झालेल्या वेदनेपेक्षा अधिक जोराने कोकलू लागला मुद्दाम! त्यामुळे मोनाला चूक जाणवली स्वतःची! ती त्याच्याकडे धावली आणि रेजिनाने तिला मिठीत ओढले.

फटाफटा त्याच्या पाठीत बुक्या मारत त्याला पुन्हा शिव्या देत असतानाच मोनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. एकदम हालचाली थांबवून रेजिनाकडे पाहात ती आसवांनी ओथंबलेल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली...

"का रे थट्टा केलीस??? तुला हे सगळे अगदीच फालतू वाटले ना?? मी तुला मित्र म्हणून सगळे सांगीतले हीच चूक झाली...."

रेजिनाने तिच्या पाठीवर थोपटायला सुरुवात केल्यावर मात्र ती त्याचा हात झटकून धावत बेडवर गेली आणि उशीत डोके खुपसून रडू लागली.

खरे तर रेजिनाला तिला रडताना पाहून खूप वाईट वाटत होते. पण त्याने मुद्दाम ही थट्टा केली होती. जेणेकरून तिचे डोळे उघडावेत! तिच्याकडे पाहात म्हणाला...

"शोभतीयस हो गुप्तासाहेबांची मुलगी... साधे सुचत नाही तुला??? यात काही माझे सहाय्य वगैरे घेत नाही आहेस तू... पण जर तुझ्याजागी गुप्तासाहेब असते... तर ... शेवटी लोहिया शेअर होल्डर असले तरीही हेलिक्सचे फुलटाईम एम्प्लॉयीच आहेत.. हे गुप्तासाहेबांच्या सहज लक्षात आले असते... तुझ्या येत नसले तरीही... "

तो नेमके काय म्हणतोय हेच मोनाला समजत नव्हते. मात्र रडणे थांबवून तिने मागे वळून पाहिले.

रेजिनाने तिच्याकडे बघत वाक्य उच्चारले...

"त्यांनी लोहियांना डॅनलाईनवर नेमले असते... आणि एलेकॉनला नंबर वनवर मेंटेन करणारा आर आर डिसूझासारखा गिअर्सचा दादा माणूस त्यांनी कधीच डॅनलाईनमध्ये कुजवला नसता... त्याला हेलिक्सला ओढलाच असता.... "

गालांवर वाळलेल्या अश्रूंच्या सरी, ओठांवर सुखदरीत्या चकीत झाल्यामुळे आलेले मंद स्मितहास्य, डोळ्यांमध्ये आश्चर्याचा धक्का आणि शरीरामध्ये पुढील मीलनासाठी असलेले आव्हान घेऊन मोनालिसा रेजिनाकडे पाहात असतानाच रेजिना तिच्यावर पुन्हा झेपावला होता...

मात्र... त्या क्षणापुर्वी असलेल्या मोनाच्या स्थितीत एक सुक्ष्म बदल झालेला रेजिनाला जाणवलाच नाही...

मगाशी ओठांवर सुखदरीत्या चकीत झाल्यामुळे आलेले मंद स्मितहास्य जाऊन आता त्या जागी कडवटपणाची स्पष्ट झाक आली होती... त्याला कारणही तसेच होते... उत्साहाच्या भरात रेजिना काहीतरीच बोलून गेला होता....

'गुप्तासाहेबांनी मला डॅनलाईनमध्ये कधीच कुजवले नसते' या विधानातील 'कुजवले जाणे' या शब्दप्रयोगामुळे ... रेजिनाच्या मिठीत कुस्करली जाणारी मोनालिसा गुप्ता... भयानक भडकलेली होती... असे विधान करून अप्रत्यक्षरीत्या आपली अक्कल काढणार्‍या रेजिनाल्डोला 'बौद्धिक' धडा शिकवायचा निर्णय कधीच झाला होता तिचा!

=================================================

"आय डोन्ट बिलीव्ह धिस"

"आय अ‍ॅम शुअर.. यू वोन्ट ऑल्वेज हॅव सिच्युएशन्स दॅट आर बिलिव्हेबल..."

मिश्कील स्मितहास्य चेहर्‍यावर ठेवून डोळे रोखून सिवा मोनालिसाकडे पाहात होता. आणि मोनाला त्याने सांगीतलेल्या माहितीमुळे चांगलाच धक्का बसलेला होता.

तिच्याकडे बझट गोळ्या आहेत हे सुबोधनेच दिल्ली पोलिसांना निनावी फोन करून सांगीतल्याचे समजल्यावर ती हादरलेली होती. सरळ होते! रणजीतचे तिच्याशी काय बोलणे झाले हे जगमोहनला समजलेले असणार होते आणि ते समजण्यासाठी जगमोहनने रणजीतचा निश्चीतच छळ केलेला असणार होता हे अनुमान मोनाने काढले. ती रणजीतला प्रामाणिक समजत होती याचे महत्वाचे कारण होते. त्याला भरपूर पैसे मिळण्याची शक्यता असूनही त्याने बझट मोनाला विकली नव्हती. पण आता तिला असेही वाटत होते की आपल्याला अडकवण्यासाठीच तर त्याने गोळ्या फुकट दिलेल्या नसतील ना? कदाचित तसे करण्यासाठी त्याला सुबोधने पैसे दिलेले असतील. शेवटी सख्खे भाऊ आहेत दोघे! विश्वास ठेवावा कुणावर नेमका?

पाचगणीच्या रॅव्हाईनमधील त्याच टेबलवर बसलेल्या मोनालिसाला एक गोष्ट सतत खात होती. सिंगापूरहून आल्यापासून गेल्या चार दिवसात ती एकदाही ऑफीसला गेलेली नव्हती आणि मुख्य म्हणजे या सर्व वीस बावीस दिवसांमध्ये लोहियांचा साधा एकही फोन किंवा मेसेज तिला आलेला नव्हता.

याचा अर्थ उघड होता. 'हे युद्धच आहे' हे दोन्ही पार्टींनी जाहीररीत्या मान्य केल्याची पावतीच होती ती!

बंगल्यावर रात्री परत आलेल्या मोनाने नेहमीप्रमाणे तिच्यासाठी बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थांमधील पिझा खाऊन घेतला. मधुमतीला काही समजतच नव्हते. इतके दिवस मॅडम बाहेर गेल्यावर आपली नेमकी ड्युटी काय या बगल्यावर? तिने कसातरीच वेळ घालवलेला होता.

रात्री स्वतःच्या बेडवर बसून मोना टीव्ही बघत होती. कुठलातरी हिंदी पिक्चर होता. अ‍ॅक्शनपट! त्यामुळे मधुमतीही उत्साहाने टीव्ही पाहात होती.

अचानक तिच्याकडे वळून मोनाने विचारले.

मोना - काय गं?? काय काय झालं पंधरा दिवसात???

आता विचारतायत! मधुच्या मनात हा विचार अगदी नैसर्गीकपणे आला. पण तसे बोलण्याची अर्थातच हिम्मत नव्हती.

मधु - काही नाही...

मोना - म्हणजे?? काय काय झालं काय काय इतक्या दिवसात? तू काय काय केलंस?

मधु - मी सगळ्या खोल्या आवरल्या... शामामावशींना मदत केली... सामान आणून ठेवलं...

मोना - कोण कोण आलं होतं बंगल्यावर???

मधु - अं... म्हणजे नेहमीचे लोकच येत होते...

मोना - म्हणजे??

मधु - म्हणजे दूधवाला, पेपरवाला वगैरे....

मोना - बाकी कुणीही नाही आलं??

मधु - नाही.....

मोना - .......

मधु - हां... म्हणजे आऊट हाऊसमध्ये एक माणूस येउन राहिला होता एक दिवस... शामामावशींकडे...

मोना - कोण??

मधु - माहीत नाही... त्या म्हणत होत्या भाचा आहे म्हणून...

मोना - नांव कळलं का त्याचं??

मधु - विचारलं नाही मी...

मोना - बोलव तर तिला वर...

मधु - गेल्या त्या घरी...

मोना - अगं बोलव ना? गेली घरी म्हणजे काय? मी बोलावल्यावर येणार नाही का??

लगबगीने मधु उठली आणि खाली गेली.

मोनाने पटकन सिवाला फोन लावला.

मोना - हॅलो... बंगल्यावर कुणी आलं नव्हतं म्हणालात.. पण सर्व्हंट क्वार्टरमध्ये एक माणूस आला होता एक दिवस...

सिवा - तो केसमधला नाही... तो वेगळाच होता... त्याचे नाव भाऊ...

मोना - हो पण शामाकडे आला होता...

सिवा - मला माहीत आहे... मी तुम्हाला बरोब्बर योग्य तीच माहिती देईन.. त्याला आम्ही नंतर ट्रॅकही केला.. तो विदर्भातला आहे... पुण्यात त्याचा एक मित्र वारला म्हणून आला होता.. बाकी काही नाही.. इव्हन तो पुण्यातच पाच वर्षांनी आला होता...

मोना - हं... ओक्के... कारण शामा इन्व्हॉल्व्ह्ड आहे ना.. म्हणून विचारले...

सिवा - नाही नाही... एकही माणूस सुटणार नाही नजरेतून... समोर पानवाला बसायला लागलाय का?

मोना - पानवाला?? म्हणजे??

सिवा - तुमच्या घरासमोर एक टपरी काढलीय.. ती आपलीच आहे.. वास्तविक त्या रस्त्यावर दिवसाला दिडशेपेक्षा जास्त कमाई होणार नाही हे माहीत आहे... पण ठेवलाय एक माणूस चोवीस तास तिथे... तो झोपतोही टपरीतच....

मोना - ओह वॉव्ह.. बरं झालं... कारण माझे बॉडीगार्ड्स टिकतच नाहीत... काम नाही असे म्हणून कंटाळून निघून जातात... दोनदा ठेवले...

सिवा - मी करू का प्रोव्हाईड...???

मोना - वेल दॅट विल बी ग्रेट??

सिवा - ठीक आहे... दोन दिवसात अ‍ॅरेंज करतो.. फीस वेगळ्या...

मोना - आय नो सिवा... तुम्हाला कधी पैशाचा प्रॉब्लेम आलाय का??

सिवा - हा हा हा! नाही नाही.. तुम्ही एखादवेळेस पैसे नाही दिलेत तरी गुप्तासाहेबांचे इतके उपकार आहेत की मी तसेही एखादे काम करून टाकीन...

मोना - ओके.. ती आलीय.. नंतर बोलते...

सिवा - गुडनाईट...

मोना - गुडनाईट...

दारात तोवर पाय वाजलेच! पहिल्यांदा मधु आणि मागून शामा आत आली.

मोना - शामा? बंगल्यावर काय काय झालं पंधरा दिवसात??

शामा - नेहमीचंच सगळं झालं मॅडम... काही विशेष नाही..

मोना - कोणी आलं वगैरे नव्हतं ना?

शामा - नाSSSय... तुम्ही नसलात की बंगला सुना सुनाच वाटतोय...

मोना - हं... फोन वगैरे??

शामा - फोन लय आले... तुम्ही कुठे गेला होतात?? मला काही सांगताच येत नव्हते....

मोना - मी दिल्लीला होते...

शामा - हा.. पण मला माहीत नव्हतं... मी सांगायची की तुम्ही ट्रीपला गेलायत...

मोना - कुणाचे फोन होते??

शामा - पूना क्लब, बोट क्लब, टर्फ क्लब...

मोना - आणि??

शामा - नाय... तेवढेच... !

मोना - जडेजासाहेब म्हणून फोन आला होता का??

शामा - हाSSSSSSSSSSS विसरलेच की... त्यांचा मात्र फोन आला होता...

मोना - काय म्हणाले??

शामा - तुमचीच चौकशी करत होते... आणि परदेशातून एक आला होता... काहीतरी डॉन डॉन म्हणत होता...

मोना - डॅनलाईन असेल.. ठीक आहे... जा तू...

शामा जायला वळली.

मोनाने पुन्हा हाक मारली...

मोना - शामा????

शामा - ... जी...

मोना - हे तुझं.... हे गळ्यातलं नवं केलंस का??

चेहरा पडलाच शामाचा!

शामा - नाय.. भावाने पाठवलं... भाचा घेऊन आला होता...

मोना - तुला भाऊ आहे??

शामा - होय... अमरावतीला असतोय..

मोना - हं.. ठीक आहे... जा...

शामाचे नेमके काय करावे या विचारात असतानाच मोनाला झोप लागली. मात्र झोपताना तिला ती आठवण झालीच होती. उद्या कंपनीत जायलाच हवं होतं! लोहिया आणि जडेजा दोघेही मीटिंगला येणार होते. युद्धाचा पांचजन्य बहुतेक उद्याच फुंकायला लागणार होता. आणि ती वेळ जास्त दिवस टाळणे हे रक्तातही नव्हते मोनाच्या!

===============================================

लोहिया - मला वाटते की ही जागा आपण घेतली तरी तिथे आपण नेमके करणार काय हेच ठरलेले नाही आहे.. त्यापेक्षा फारुखवाले जास्त भाडे द्यायला तयार आहेत... तर हे अ‍ॅग्रीमेन्ट रिनीव करूयात...

मोना - नो प्रॉब्लेम.. पण शेव्हिंग मशीन्सचे काय?

लोहिया - तो विषयच वेगळा आहे... वुई शूड अ‍ॅड्रेस इट सेपरेटली...

मोना - त्यालाही हरकत नाही... पण ती मशीन्स यांनाच डेडिकेटेड आहेत... यांनी आणि आपण मिळूनच तो निर्णय घ्यायला हवा आहे

जडेजांनी पहिल्यांदाच तोंड उघडले.

जडेजा - मिस गुप्ता... सी.. मला हे मान्य आहे की ती मशीन्स आम्हाला डेडिकेटेड आहेत... पण ते अ‍ॅग्रीमेन्ट जसे आहे तसेच आपण फॉलो करतो आहोत ना??

मोना - हो ना.. पण मग हे जागेच अ‍ॅग्रीमेन्टही जसे आहे तसेच फॉलो नको का व्हायला???

जडेजा - अ‍ॅग्रीमेन्ट करू ना रिनीव.. मी तेच सुचवत होतो...

मोना - दोन्ही अ‍ॅग्रीमेन्ट्स रिनीव करू... मशीन्सचे पण...

जडेजा - त्या मशीन्सना अ‍ॅप्लिकेशनच नाही आहे आता...

मोना - पण हे माहीतच होतं आपल्याला आधीपासूनच... मग तुम्ही कसं काय अ‍ॅग्रीमेन्ट स्वीकारलंत??

जडेजा - वेल.. माझ्यासाठी ते अ‍ॅग्रीमेन्ट सुटेबल होतं.. म्हणून स्वीकारलं...

मोना - पण ते अ‍ॅग्रीमेन्ट आमच्यासाठी सुटेबल नव्हतं....

लोहिया मध्ये पडले.

लोहिया - एक मिनिट, एक मिनिट... मोना... ते अ‍ॅग्रीमेन्ट आणि फारुखच्या जागेचे अ‍ॅग्रीमेन्ट हे दोन्ही विषय आपण स्वतंत्रपणे डिस्कस करूयात... पहिल्यांदा फारुखचा प्रश्न मिटवू...

मोना - अंकल... स्वतंत्रपणेच डिस्कस करूयात... मलाही मान्य आहे... पण माझं इतकंच म्हणणं आहे की दोन्ही अ‍ॅग्रीमेन्ट्स म्युच्युअली अ‍ॅग्रीएबल असायला हवीत...

लोहिया - शुअर... ऑफकोर्स आय मीन... हां... तर जडेजा.. आम्हाला ती जागा तरी हवी आहे किंवा तुम्ही भाडे तरी वाढवा..

जडेजा - नाही नाही.. आय एन्टायरली अ‍ॅग्री... रेन्ट इन्क्रीजला मी तयार आहेच.. फक्त ते इतकं एक्झॉर्बिटंट नसावं इतकंच म्हणतोय मी...

लोहिया - कुठे काय आहे? आधी वर्षाला बारा लाख होतं... आता वीस करतोय...

जडेजा - वीस इज टू मच सर... तेरा साडे तेरा लाखात तेवढी जागा मिळतीय कुठेही....

मोना - घेऊन टाका ना मग??

चरकले पुन्हा दोघेही मोनाच्या या वक्तव्यावर!

जडेजा - मॅडम...

आता 'मिस गुप्ता'चे 'मॅडम' झालेले होते.

जडेजा - .... मला वाटते तुमचा थोडा राग आहे आमच्यावर... वास्तविक पाहता हे एक बिझिनेस प्रपोजल आहे... मी रास्त किंमत द्यायला तयार आहेच...

मोना - मला वाटते 'राग, लोभ' हे मुद्दे आपण सध्या बाजूलाच ठेवूयात... वीस लाख ही प्राईस आहे...

जडेजा - पण तुम्ही मार्केट रेट बघा ना.. व्हॅल्यूअर बोलवा हवं तर...

मोना - मी कशासाठी व्हॅल्यूअर बोलवू? माझ्याकडे आहेत ना बायर्स वीस लाखाला...

लोहिया - मोना... तुझ्याकडे इतर काही प्रपोजल्स आली आहेत का??

मोना - होय... एकवीस लाखाचंही एक आहे... त्याला का देऊ नये आपण??

जडेजा - नाही पण शेवटी हेलिक्स आणि फारुखचे पुर्वापार संबंध आहेत... आमच्यामुळेच तो तुमचा प्लॉट कामालाही आला...

मोना - एक मिनिट... माझ्या माहितीप्रमाणे तो प्लॉट मिळावा अशी तुमची इच्छा होती... डॅडची नव्हती... अ‍ॅप्लिकेशन्स तुमची आलेली होती...

हे फारच कडवट वाक्य होतं! वास्तविक पाहता तिच्याकडे एकही प्रपोजल नव्हतं फारुखशिवाय! आणि दुसरं म्हणजे बाराचे साडे तेरा होतायत तर क्लोज करायला हरकत नव्हती. पण मासिक बारा लाखांचे नुकसान झाले तरी चालेल पण लोहिया आणि अर्देशीरांना लॉस व्हावा अशी 'मी मरेन, पण तुला विधवा करेन' भूमिका आत्ता घेतली होती मोनाने!

लोहिया - आपण एक काम करू... व्हॅल्यूअर बोलवूयात... व्हॅल्यू काढू प्लॉटची. मार्केटरेटप्रमाणे डील करून टाकू...

जडेजा - चालेल ना??

मोना - मार्केटच्या प्रणालीप्रमाणे शेव्हिंग मशीन्सचे अ‍ॅग्रीमेन्ट का झाले नाही मग???

हा प्रहार सरळ सरळ लोहियांवर होता आणि उपस्थित असलेल्या जोशी, मेहरा आणि साहनी पैकी जोशीच्या पायाखालची वाळू सरकलीच! पण लोहियांवरच जिथे ही बया आरोप करतीय तिथे आपण राजीनामा मागण्याची तरी कशाला वाट पाहायची असा विचार केला जोशीने!

मोनालिसाचे अधिकार खूपच जास्त असल्यामुळे लोहियांना हा आरोप कुणावर तरी ढकलायला लागणारच होता.

लोहिया - दॅट्स व्हॉट आय हॅव बीन आस्किंग मेहरा अ‍ॅन्ड जोशी..

मेहरा - एक्स्क्यूज मी... आय अ‍ॅम नॉट अ‍ॅट ऑल इन्व्हॉल्व्ह्ड इन दॅट अ‍ॅग्रीमेन्ट...

लोहिया - धिस इस व्हॉट आय कॉल ब्युरोक्रॅटिक अ‍ॅप्रोच... तुमची सही नाही म्हणजे तुम्ही त्यात सहभागी नाही का? हे आपले काम आहे असे समजून प्रोअ‍ॅक्टिव्हली खरे तर तुम्ही सजेशन्स द्यायला हवीत.. मार्केटिंगचे जरी काम असले तरी यू आर एक्स्पीरिअन्स्ड...

मोनाने नेमका हाच धागा उचलला आणि पुढचा प्रहार केला..

तो होता प्रत्यक्ष जोशीवर... पण अप्रत्यक्षरीत्या लोहियांवरच होता..

मोना - म्हणजे काय? जोशी? तुम्ही मेहरांना न दाखवता स्वतःच अ‍ॅप्रूव्ह केलेत अ‍ॅग्रीमेन्ट... ????

आता मात्र कातडी वाचवण्यासाठी जोशीला उसळायलाच हवे होते आणि नेमके त्याच प्रतीक्षेत होती मोना...

जोशी - छे छे... अ‍ॅग्रीमेन्ट सरांनी अ‍ॅप्रूव्ह केले आहे...

मोनाने खटकन लोहियांकडे बघितले आणि क्षणात 'त्यांची पडती बाजू सावरल्याचा' साळसूद अभिनय करत जडेजांकडे बघत म्हणाली..

मोना - ओह... बर ते जाऊदेत... मिस्टर जडेजा.. तुमचं नाही माझं नाही.. अठरा लाख.... करून टाका रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने...

पार्श्वभागात लवंगी फटाका उडाल्यासारखा उडला जडेजा जागच्याजागी!

जडेजा - रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट??

मोना - होय...

जडेजा - का???

मोना - का म्हणजे?? गेले दोन वर्ष जुन्याच कॉस्टवर थोडीच देणार आम्ही जागा.. मागच्या दोन वर्षांचा डिफरन्सही लागेलच ना पे करायला...

याला 'सुरनळी' असे म्हणतात हे तेथील प्रत्येकाला माहीत होते. फक्त सभ्यपणे बोलण्याची मर्यादा आड येत होती.

मोना ढुंकूनही पाहात नव्हती जडेजांकडे! जणू दारात भिकारी उभा आहे.

जडेजा अगतिकपणे लोहियांकडे बघत होते. पण लोहियांची स्वतःचीच अवस्था बालवाडीसारखी झालेली होती. कारण ज्या कारणासाठी मोनाने सर्वांसमक्ष जोशीला शिव्या दिल्या ते काम खरे तर लोहियांनी केलेले आहे हे जोशीने नमूद करताच तिने लोहियांकडे खटकन पाहून लगेच विषयच बदलला होता. त्यामुळे 'खरे तर लोहियांची अक्कल मी काढू शकले असते, पण सिनियर आहेत म्हणून गप्प बसले' हा मोनाच्या चेहर्‍यावरील भाव लोहियांसकट सगळ्यांनी वाचला होता आणि त्यामुळे लोहियांचा गेल्या चाळीस वर्षात गिअर्स इन्डस्ट्रीमध्ये झाला नाही असा अपमान झाला होता. पण ते बोलताही येत नव्हते. आणि मोनाने काय गेम टाकली हे लोहियांना बरोबर समजलेले होते. ती सर्वांसमक्ष खरे तर त्यांनाही सौम्यपणे का होईना पण बोलू शकली असती. पण न बोलून तिने जे साध्य केले ते 'बोलून जे मिळाले असते' त्यापेक्षा हजारपट महत्वाचे होते. साहनी, जोशी, जडेजा आणि मेहरांच्या दृष्टीने मोनाने लोहियांची बेइज्जती होऊ दिली नव्हती इतकेच! आता लोहियांना आवाजच राहिला नव्हता त्या विषयात! ते गुळमुळीतपणे म्हणाले...

लोहिया -हो मग?? आता दोन वर्षे म्हणजे काय कमी आहे का?? आणि तसा फारसा डिफरन्स नाही होणार जडेजा...

जडेजा - असं कसं? काहीही काय? बारा लाख... हा काय कमी डिफरन्स आहे??? बारा लाख दिले तर आम्हाला काय कपाळ प्रॉफिट होणार आहे??

लोहिया - हो पण हे आधी करायला गेलो असतो तर तेव्हाच वाढवून दिले असतेतच ना??

जडेजा - मिस्टर लोहिया... यू गाईज आर सिम्पली कॉर्नरींग अस.. जागा तुमची आहे याचा गैरफायदा घेताय तुम्ही... माझं असं म्हणणं आहे की सहा महिन्यांची नोटीस द्या आणि आम्ही जागा सोडून देतो... सहा महिन्याचे भाडे आम्ही वाढीव रेटने देतो...

मोना - नोटीस दोन महिन्यांची आहे असा क्लॉज आहे पण...

चारही बाजुंनी शिकार्‍यांनी घेरलेल्या डुकरासारखी अवस्था झाली होती जडेजांची!

जडेजा - तो क्लॉज चुकीचा आहे..

मोना - म्हणजे काय??

जडेजा - अशी दोन महिन्यात कधी इन्डस्ट्री हलते का???

मोना - हो पण आपण नेहमी अ‍ॅग्रीमेन्टच नाहीका फॉलो करत??

जडेजा - एक मिनीट.. माझं इतकंच म्हणणं आहे की दोन वर्षे आम्ही प्रॉपर भाडे चुकते केलेले आहे... आता आज मीटिंगला बसला आहात तर असे डिसीजन्स अचानक घेणे हे काही फेअर बिझिनेसचे लक्षण नाही आहे... आम्ही यापुढे साडे तेरा लाख द्यायला तयार आहोत ना??

वास्तविक फारुखला बारा लाख देऊन टाकणे शक्य होते. पण ध्यानीमनी नसताना ही कॉस्ट कुट्।ए अ‍ॅडजस्ट करणार? आणि बारा लाख अ‍ॅडजस्ट करायचे म्हणजे आपणच खिशात कमी पैसे स्वीकारायचे हे जडेजांना माहीत होते.

मोना - ठीक आहे.. व्हा तुम्ही स्थलांतरीत...

मोना ही एक महाभयानक वृत्तीची स्त्री आहे आणि मोहन गुप्ता परवडले असते अशी बोलते हा अनुभव आज लोहियांसकट सगळे घेत होते. चुपचाप होते सगळे!

जडेजा - काय ठरतंय मग लोहियासाहेब??

लोहिया - मोना.. मला वाटते एक्स्ट्रीम स्टेप घेण्यापेक्षा आपण असं करू... गेल्या दोन वर्षांचा डिफरन्स वेव्ह करू... आणि आता वीस लाखाने बिलिंग सुरू करू...

जडेजा - आणि या वेळेस अ‍ॅग्रीमेन्ट पिरियड दहा वर्षे पाहिजे... सारख्या सारख्या त्याच त्याच कटकटी नकोयत मला...

'दुर्गावतार' म्हणजे काय याचा अनुभव मिळाला सगळ्यांना! लोहियाही थक्क होऊन बघतच बसले मोनाकडे! अक्षरशः चवताळून ओरडली मोना जडेजांवर! घशाच्या शिरा ताणून!

जडेजा - सारख्या सारख्या कटकटी? आमच्या जागेवर वर्षाला बारा लाख देऊन गेली सात वर्षे खिसे भरताय स्वतःचे? आणि आम्हालाच कटकटी करतात म्हणताय? शेव्हिंग मशीन्सचे कॉन्ट्रॅक्ट करून ती कुजवलीयत.. आणि आम्ही कटकट करतोय? कुणाशी बोलताय ते समजतंय का तुम्हाला? हेलिक्सच्या जीवावर तुंबड्या भरताय सात वर्षे! रावीचे सासरे म्हणून नीट बोलत होते मी! तुमची गुर्मीच जात नाही??? साहनी.. उद्या माझ्या टेबलवर पेपर्स हवे आहेत मला! काय समजलास?? जडेजा... दोन महिने म्हणजे दोन महिने! एकसष्टाव्या दिवशी फारुख ऑटोचे स्क्रॅपसुद्धा दिसता कामा नाही मला माझ्या प्लॉटवर.. नाहीतर लीगल अ‍ॅक्शन घेईन... अंकल.. द मीटिंग इज ओव्हर नाऊ..

कॉन्फरन्समधून खाड खाड हाय हील्स वाजवत मिस एम एम गुप्ता, द एम डी ऑफ गुप्ता हेलिक्स... सगळ्यांची थोबाडे बंद करून स्वतःच्या केबीनमध्ये चाललेल्या होत्या.

============================================

सायराची उणीव फार फार जाणवत होती मोनाला आत्ता!

लोहिया साहेब येणार म्हणून मुद्दाम पुढे पुढे करणार्‍या शामाला तिने दटावले होते. आज महत्वाचे बोलायचे आहे. तू आत येऊ नकोस. आऊट हाऊसवरच बस! मधुमती आणि सुधा सगळे बघतील.

आणि प्रत्येक ड्रिंक भरताना मधुमती दोघांनाही विचारत होती... आता सोडा घालू का?? बर्फ अजून घालायचा का? पाणी हवे की नको??

वैताग आला होता नुसता! या मुलीला आधीच ट्रेन करून ठेवायला पाहिजे होते असे वाटले मोनाला!

डिनर! फक्त दोघेच! मोनालिसा आणि लोहिया!

आणि तीन पेग्ज होईपर्यंत लोहिया एक अक्षरही बोललेले नव्हते. त्यामुळे मोनाही!

मधुमतीला समजतच नव्हते की महत्वाचे बोलायचे म्हणून जमलेले हे दोघे नुसतेच काय पितायत? आणि किती पितात हे लोक? बोलत तर अक्षरही नाही आहेत.

हायलॅन्ड पार्क! लोहियांचा फेव्हरीट ब्रॅन्ड! ज्याची अख्खी बाटली आपण सायरावर उपडी करायचो तो! लोहियांना या बंगल्यात आल्यावर सायराची आठवण आली आणि त्यासोबत हायलॅन्ड पार्क उपडी करण्याचीही!

आजही जेवण म्हणून पिझ्झाच होते.

हे सजेशन लोहियांचे होते. 'आज तुझ्या घरी आपण जरा डिस्कशन करूयात'. आणि मोना त्वरेने 'हो' म्हणाली होती. मधुमती आणि सुधा आजूबाजूला असल्यामुळे उघडच सगळे संभाषण इंग्लीशमध्येच होते.

मोना - बोला अंकल..

लोहिया - हंSSSSS .. तर बेटा... बरच काय काय बोलायचं आहे मला...

मोना - ... हं...

लोहिया - बेटा... कित्येक महिन्यांपासून मी बघतोय... काहीतरी बिनसलंय सगळंच...

मोना - म्हणजे??

लोहिया - बघ ना! आता अर्देशीर गेले.. ते खरे तर तसे उगाचच गेले.. त्यांच्या नॉलेजची आजही जरूर आहे हेलिक्सला.. पण.. ते एक डॅनलाईनचे प्रकरण झाले त्यात ते बाहेर पडले..

मोना - खरे आहे अंकल..

लोहिया - काय चाललंय काही कळत नाही... सुबोध गेला.. जतीन गेला... जुने सगळेच गेले... आता तो डिसूझा आलाय...

मोना - डिसूझा इज अ‍ॅक्च्युअली फ्रॉम गिअर्स ओनली...

लोहिया - आय नो हिम पर्सनली सिन्स ही वॉज इन एलेकॉन.. पण... तू आणि तो... खूप चांगले मित्र असावात असे मला वाटते...

मोना - नॉट एक्झॅक्टली.. पण म्हणजे.. तसे आहोत आम्ही मित्र...

लोहिया - आता जुना असा मी एकटाच आहे.. आता आज तू जडेजावर भडकलीस.. असं पेशन्स घालवून बिझिनेसमध्ये चालत नाही बेटा... सगळ्यांवरच रागवलीस तर रिलेशन्स कशी मेन्टेन होतील?? उद्या समजा काही कारणाने फारुखची आपल्याला गरज भासली तर ते आपल्याला मदत करतील का? आता शत्रूच झाले ते आपले... अर्देशीरही मदत करणार नाहीत.. जतीन, सुबोध.. कुणीच करणार नाहीत मदत.. अर्थात, आपण स्ट्राँग आहोतच ... आणि मुख्य म्हणजे मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे बेटा... तो प्रश्न नाही.. पण... मला तुझ्या वर्किंग स्टाईलबद्दल जरा बोलायचे होते.. बेटा.. मोहन असे नव्हते.. ते फार शांतपणे डील करायचे प्रत्येकाशी... तू अशी चिडतेस... तडकाफडकी निर्णय घेतेस.. माणसे दुखावली जातात.. तू लीडर आहेस हेलिक्सची.. तुझ्या वागण्यावरून मार्केटमध्ये हेलिक्सची इमेज गेज केली जाणार... हे लक्षात घ्यायला पाहिजेस की नाही तू?? आता मी कसा बोलत होतो जडेजाशी.. आपल्याला जे हवे आहे तेच करायचे... पण शांतपणे.. रागवारागवी केली की तात्पुरता फायदा पदरात पडतो.. पण एकदा रिलेशन्स बिघडली की पुढे फर अवघड जाते मोना...

मोना - खरे आहे अंकल.. आय विल ट्राय टू बी पेशंट हिअर ऑन...

लोहिया - आणि आणखी एक... तो डिसूझा सतत आपल्या माणसांशी बोलत असतो... मला तरी वाटते की दासप्रकाशांशी त्याचे अजूनही संबंध आहेत.. कशावरून तो एलेकॉनला माहिती पुरवत नसेल.. असे एकदम परक्या माणसांच्या इतके क्लोज होतात का? मोना बेटा.. लक्षात घे... मी आणि अर्देशीर तुझ्या वडिलांसारखेच आहोत म्हणून मी इतका हक्काने बोलतोय.... तुझी दिल्लीला ती चौकशी झाली... सगळं प्रकरण दाबलं ते अर्देशीरांनी... पण पाच सात जणांना समजलंच की नाही?? तुम्ही दोघे एकत्र होतात ते? आता तुझं वय आहे...त्यात काही चुकीचं आहे असे मला मुळीच वाटत नाही... पण मग.. निदान लग्नाचं तरी बोल त्याच्याशी.... असं रिलेशन नेमकं एक्स्प्लेन करता येत नाही बेटा.. मोहन गुप्तांचे नांव सांभाळण्याची सगळी जबाबदारी तुझ्या एकटीवरच आहे की नाही? मी जरा जास्त बोलतोय हे मला माहीत आहे... पण .. शेवटी तू माझीच मुलगी आहेस...

मोना - अंकल.. लग्नाचा वगैरे तसा काही विचार नाही आहे.. खरे तर... तुम्हाला मी कधी सांगीतलेच नाही.. पण.. आमचे जरासे... मतभेद झाले आहेत... डॅनलाईनवरून.. त्यामुळे.. खरे तर आम्ही नंतर भेटलोही नाही आहोत...

लोहिया - नाही नाही.. ते वेगळे.. पण जरी भेटलात.. तरीही... त्या नात्याला काहीतरी समाजमान्य नाव मिळेल हे बघायला हवे की नको?? अं? आता आणखी एक मुद्दा मला बोलायचा आहे.. तू अधूनमधून एकदम गायबच होतेस.. काही कळतच नाही.. इतकीमहत्वाची मॅटर्स असतात.. तू माझ्याहीपासून अशी लपून वावरतेस याचे इतके वाईट वाटते मला... तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर?? तसे असेल तर मी सरळ हेलिक्सचा सगळाच चार्ज सोडायला तयार आहे.. पण फार मानसिक यातना होतात गं...

मोना - नाही नाही अंकल.. काहीतरी काय.. काही ना काही कारणाने जावे लागते इतकेच... कोणताही गैरसमज नका ठेवू अंकल मनात...

लोहिया - छे छे बेटा.. मीकाय तुला आज ओळखतो का?? गैरसमज वगैरे काहीही नाही... पण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे.. त्या तुझ्याकडे कसल्यातरी गोळ्या वगैरे सापडल्या.. हे सगळं काय आहे मोना??

मोना - ओह.. मला माहीतच नव्हतं की त्या गोळ्या अशा अशा आहेत.. मी मनालीला रस्त्यावर सहज विकत घेतल्या होत्या त्या... म्हणे केसांसाठी चांगल्या असतात.. म्हणून....

लोहिया - असं कशाला काहीतरी करतेस??? आणि तुझा बॉयकट आहे... मग कशाला उगाच घ्यायच्या त्या गोळ्या??

दोघांनाही माहीत होते की दोघेही खोटे बोलतायत! पण पर्याय नव्हता..

लोहिया - आता त्या फारुखच्या प्लॉटचं काय करायचं ठरवलंयस???

मोना - नाही ठरवलं अजून काही...

लोहिया - मग चलनी नाणं आहे तर चालू तरी देत ना ते? आपलाच फायदा आहे..

मोना - ठीक आहे... विचार करते...

लोहिया - डॅनलाईनही नीट चालत नाहीये...

मोना - का? गेली की तेवीस मशीन्स..

लोहिया - ते ठीक आहे.. पण फार व्हॉल्यूम्स नाही आहेत त्यात...

मोना - व्हॅल्यू तर आहे...

लोहिया - असो... निघू मी आता??

मोना - मुंबईला जाणार??

लोहिया - खरं तर रात्र झालीय...

मोना - मग थांबा इथेच.. सकाळी जा...

लोहिया - अंहं... निघतो... अकरा वाजता मीटिंग आहे एक्साईजची...

मोना - ठीक आहे मग.. टेक केअर...

लोहिया - यॅह.. यू टू... बाय देन.. गुड नाईट..

नेहमीच्या रिवाजाप्रमाणे लोहियांनी मोनाला जवळ घेतले आणि ते जायला निघाले.

दारात पाठमोरे असताना मोनाने अचानक हाक मारली...

"अंकल...."

लोहिया मागे वळून तिच्याकडे पाहू लागले...

"फारुख ऑटो..... आपण विकत घेऊ शकतो???"

बापाचाच नमुना असलेल्या मिस एम एम गुप्तांच्या धडाडीकडे अचंबीत होऊन विचारमग्न चेहर्‍याने बघताना लोहियांची हायलॅन्ड पार्क पार लोलॅन्ड झाली होती.....

गुलमोहर: 

बेफिकिरजी, तुम्हाला सलाम.....

याही अवस्थेत तुम्ही डेडिकेशनने लिहिताय...... वाचकांचा विचार करून...... ग्रेट....!!!!

आम्ही सर्वच आपल्या दु:खात सहभागी आहोत...... आपली आईवरील कविता आता पूर्ण वाचेन आधी.
आणि काय बोलावे शब्द नाहीत...!!!!

खरंच तुम्हाला सलाम बेफिकिरजी!!!
आई बद्दल वाचुन वाईट वाटलं.....स्वत:ची काळजी घ्या...आणि घरच्यानां पण सांभाळा....

ती कविता वाचल्यापासून मला तर हा भाग वाचायची पण इच्छा होत नाहीये... कसे काय लिहू शकलात तुम्ही??? तुमच्या मनाच्या स्थैर्याची, स्थितप्रज्ञतेची आणि तटस्थतेची कमाल आहे आणि कौतुकही...आणि लेखनामुळे तुम्हाला दु:ख विसरायला मदत होत असेल, तर तुम्ही लिहिताय हे चांगलेच आहे...
माझाही सलाम तुम्हाला...

वरील सर्वांना अनुमोदन...
बेफिकीरजी काय बोलू शब्द नाहीत...
मला नविन भाग पाहून केवळ धक्का बसला....
आणि कथेत, मांडणीत कुठेही विस्कळीतपणा नाही...त्याच तडफेने लिखाण सुरु...
तुम्ही खरेच महान आहात...

मी कमीत कमी १ महिना तरी आजुन वाट बघावी लागेल पुढच्या भागाची अश्या समजामधे होतो..

बेफिकीर - तुमच्या आईच्या आत्माला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..
आणी आपण हा भाग लिहिला हे खरच कौतुकास्पद आहे..

पु.ले.शु.

आपण हा भाग लिहिला हे खरच कौतुकास्पद आहे..
खरच हॅट्स ऑफ यु बेफिकिरजी

तुमच्या आईच्या आत्माला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..

लेखनामुळे तुम्हाला दु:ख विसरायला मदत होत असेल हे नक्कीच , तुम्ही लिहिताय हे चांगलेच आहे...
आणि कथेत, मांडणीत कुठेही विस्कळीतपणा नाही, छान ---- पु. ले. शु.

मस्त चालु आहे कथा...........

तुमच्या आईच्या आत्माला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..

बेफिकीरजी, बोलायला शब्दच नाहीत.
<<<कसे काय लिहू शकलात तुम्ही??? तुमच्या मनाच्या स्थैर्याची, स्थितप्रज्ञतेची आणि तटस्थतेची कमाल आहे आणि कौतुकही...आणि लेखनामुळे तुम्हाला दु:ख विसरायला मदत होत असेल, तर तुम्ही लिहिताय हे चांगलेच आहे...>>>>अनुमोदन.
माझाही तुम्हाला सलाम..

सर्वांचे मनःपुर्वक आभार!

(हा भाग ठीक होता की नाही तेही प्रतिसादात मांडले गेले असते तर मला कथा अधिक सुसूत्रपणे नेता आली असती अशी अपेक्षा! अर्थातच, वरील प्रतिसादांमधील उत्स्फुर्तता व आपुलकी मला ज्ञात असल्यामुळे मी हा कथाभाग ठीक असेल असे गृहीत धरत आहे.)

पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकीर साहेब खर सांगायचं झाल तर हा भाग विस्कळीत झाला आहे. पण तुम्ही ज्या परिस्थितीत लिहला आहे त्याच्यापुढे हा भागही छान लिहला आहे.
लिखाण तुमची शक्ती आहे. आईची कवितांची आवड तुमच्यात उतरली आहे. त्यामुळे लिहित राहण्याने तुम्हाला नेहमी तुमची आई जवळ असल्याचाच भास होत असेल.
आईना परमेश्वर शांती देवो, बाकी माझ्या सदभावना आणि प्रार्थना नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत.

धन्यवाद नितीनसाहेब,

आपल्या स्पष्ट प्रतिसादाने मी आता पुन्हा कथेत अधिक इन्व्हॉल्व्ह होऊ शकेन.

पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

ह्या भागात जास्त प्रसंग ऊभे केले आहेत, मला तर हे खरच आवडल, कारण नेहमि २-३ प्रसंग असतात, आज जास्त होते. Happy

पण शेवटच्या २ ओळिचा (बोल्ड वालि आणि त्या आधिचि एक) क्रम जर ईटरचेंज केला असता तर अजुन थ्रिलिंग वाटल अस्ते. तसहि आत्ता मोना फारुख अ‍ॅटो च काय करते ह्याचि ऊस्तुकता आहेच.

साहेब,
लाजवाब लिहलात हाही भाग.
केवळ अप्रतिम. कुठेच जाणत नाही तुम्ही तणावग्रस्त अवस्था.
कथा लिहताना अशा वेळेस तटस्थता कशी काय आणलित राव ?
तुम्ही मनाला हवं तसं वळण देण्यात दादा आहात दादा!

यु आर दादा.............

बेफिकीरजी,
मोना चे अबॉर्शन झाल्या नंतर १४ दिवसांनी प्रणय ???

बाकी मोना चे कॅरेक्टराईझेशन (तिचा प्रणया साठी आततायी पणा सोडुन) फार छान रंगवले आहात आपण. २५-२६ व्या वर्षी तिने बिझनेस संदर्भात घेतलेले अचुक निर्णय (Go Slow चा अपवाद) हे तिच्यातले Matured / Shrewd Businesswoman ची चुणुक दाखवतात.

पुलेशु.

धन्यवाद राजेसाहेब आणि म्हमईकर साहेब,

अ‍ॅबॉर्शननंतर सहा ते सात दिवसांनी प्रणय करणे शक्य असते व मोनाच्या अ‍ॅबॉर्शनला सतरा दिवस झाले आहेत या माहितीवर आधारीत कथाभाग होता. काही चुकले असल्यास सांभाळून घ्यावेत.

पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी, << हा भाग ठीक होता की नाही >> ठीक काय? छानच लिहीला आहे. आधी लिहायच राहील, त्याबद्दल क्षमस्व! आता पुढ्चा वाचते.