मेणबत्त्या......१

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

Pink75.jpgAboli75.jpgAqua75.jpgBeercandle0175.jpg

माझा मेणबत्त्या प्रपंच Happy Gel Candles

विषय: 

मस्तच आहे! Happy कशा बनवतेस ते पण लिही ना..

मस्तच आहेत मेणबत्त्या!!!
कृती पण लिही ना..

अगो ताय, कसले मस्त!! हेच बनवत होतस की काय?? जीडीक अनुमोदन, कृती पण लिही बघू Happy

वॉव! काय दिसत आहेत नीलू या मेणबत्त्या! सुरेख.. कलावान आहे मुलगी Happy

खरंच कृति लिही ना.. वारली चित्रांमधे माहिती देत होतीस तर कसं परीपूर्ण वाटत होतं..

सुरेख ! सुंदर ! ह्या पेक्षा वेगळे काही शब्द नस्तीलच ह्या तुम्च्या प्रपंच्यासाठी Happy

निलु, तु रंगिबेरंगी झालीस याची मला खबरच नव्हती. आजच पाहिलं आणी... शब्दच नाहीत तुझे कौतुक करायला. मेणबत्ती झकासच. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा.

मस्त आहेत मेणबत्त्या. माझ्याकडेही होत्या अश्याच होममेड जेल कँडल्स. शो म्हणून मस्त वाटतात. फक्त माझ्याकडच्यांची काच अगदी पातळ होती. वाईन ग्लासची असते ना तशीच. त्यामुळे मला वापरायला जरा भिती वाटायची. वेळ मिळाल्यास कृतीपण लिही ना.

सायोनारा, भ्रमा, दीप, पूनम, शैलु, प्राची, जीडी खूप धन्यवाद!!!
भ्रमा म्हणजे बघ तू किती गैरहजर आहेस ते Happy
सायोनारा मी जेल कँडल्साठी जरा जाड काचेचे ग्लास वापरते.
आता कृती म्हणजे जेल कँडल बनवायला खूप सोपे आहे. पण एवढीच खबरदारी घ्यायला पाहिजे जेलचा उत्कलन बिंदू साध्या मेणापेक्षा जास्त असल्याने प्रमाणापेक्षा जास्त उकळ्ल्यास ते पटकन पेट घेऊ शकते.
यासाठी साहित्य लागते जेल, मेणबत्तीचा रंग, सजावटीचे साहित्य, वात, भांडे, ग्लास
प्रथम एका ऍल्युमिनियम अथवा स्टीलच्या भांड्यात जेल घेऊन ते पातळ करावे. भांडे डायरेक्ट विस्तवावर न ठेवता
उथळ पातेल्यात पाणी घेऊन त्यात हे भांडे ठेवावे. पाणी ऊकळ्ल्यावर त्याच्या उष्णतेने जेल वितळते. जेल पुर्ण पातळ झाल्यावर त्यात हवा तो रंग टाकून ढवळावे. ग्लासात वात घालून त्यात हे जेल ओतावे.
ग्लासाच्या तळाशी काही देखावा हवा असल्यास तो आधी मांडून घ्यावा आणि मग जेल हळ्हळू ओतावे. मणी, शंख, शिंपले असे काही वापरू शकता. आपण करु तसे अजून काही कलात्मक सुचत जाते.
आहे ना सोपे. Happy

नीलुताय,
क्काय सही मेणबत्त्या आहेत!!!!!!!!!!!!
Happy
(त्या चौथ्या चित्रातली मेणबत्ती ही हुबेहुब बिअरच्या ग्लाससारखी दिसते.... अगदी सेम टु सेम!!!!)
Lol

गोबु Happy
नीलुताय सुरेख आहेत कँडल्स.

मस्त च ..खुप खुप आवडले
मी पण तयार करुन फोटो लवीन.कसे बनवतेस ते लिहिल्या बद्दल धन्यवाद ....

निलु, छानच आहेत ग ह्या मेणबत्त्या!!
एक सांग, जे काही डेकोरेशनचे सामान असेल ते फक्त ग्लासच्या तळाशीच लावता येते की आधी थोडा जेल टाकुन मधे डेकोरेशन अन परत वरती जेल असे करता येईल?

गोबुदा, पन्ना, क्रांती, चिन्नु धन्यवाद !!
हो पन्ना तसे पण येते करता. Happy
गोबुदा कसचे हुशार आहात तुम्ही!!!!! ती कँडल तीच आहे.. अगदी तीच Proud

नीलु सुरेख आहेत .. कृती पण सोपी वाटतेय करुन बघयला हवे..

नीलु माझा बाळबोध प्रश्न: या वस्तु मेणबत्ती लावल्यावर जळत नाहित का?
त्यापण मेणबत्तीच्याच बनलेल्या असतात का?

नीलु, छानच आहे! एक प्रश्ण्(म्रुखासारखा चवाटेल तरीपण), ह्या वापरु शकतो का?

पुर्ण मेणबत्ते मध्ये फक्त जेल असल्याने मेण्बत्ती फक्त जेल वापरून जळते?

करायला हव्यात.

निलू, मस्तच एकदम.... ती पहिली मेणबत्ती भारीच आहे.. अशी dual रंगसंगती कशी काय साधलीस?

ह्या अश्या मेणबत्त्यांना परदेशात खुप मागणी आहे ना? माझी नणंद भेट म्हणून सगळ्यांसाठी आफ्रिकेहून अश्याच जेल मेणबत्त्या घेऊन आली..

ट्टाय,
लै भारी मेणबत्त्या !! कसल्या झकास बनवतंस गो !!!
लाश्टवाल्या ग्लासातल्या मेणबत्तीत्सून वात काडान तां (ग्लास) दारूबाजाक दिल्यार "दारू गावली" म्हणान तां नक्कीच खूष होऊन जाईत Happy एवडो हुबेहूब जमलां हा...
लय कलागुणाची बाय ही... Happy अजून तुका ज्या काय जमतां तां सगला हय सांग..
तुका लय लय शुभेच्छा!!!
एक प्रश्नः जेलच्या अन् साध्या मेणबत्त्यात काय फरक गो बाय? खंयचा जास्त वेळ जळ्ता

सहि जमल्यात जेल मेणबत्त्या... (जेल कुठे मिळेल?)
(मला वाटत या शोपिस म्हणुनच वापरत असतिल..)

चिन्नु बहुतेकांना हा प्रश्न असतोच.. या वस्तु जळतात म्हणून मग काहीजण फक्त शोपीस म्हणून वापरतात. पण ह्या वस्तु तळाशी असल्यामुळे कँड्ल पुर्ण जळेपर्यंत तरी असतात एव्हढच. वर वातीचा प्रकाश पड्ल्यावर खाली त्या छान दिसतात.:)
मनुस्विनी, मंजु, महेश, लोपा,प्राजक्ता धन्यवाद
मनु जेल हे एकप्रकारचे मेणच असते. उलट साध्या मेणापेक्षा जेल जास्तवेळ जळते.
मंजु ते शिक्रेट हाय Happy
महेशा उत्तर गावला मा आणि मुख्य फरक म्हणजे जेलमध्ये लाश्टवाल्या ग्लासाचो असो ईफेक्ट देता येता Proud
प्राजक्ता नॉव्हेल्टी जिथे सगळे सजावटीचे सामान मिळते तिथे मिळते जेल. नाही तर क्रॉफर्ड मार्केट मध्ये मेणबत्त्यांच्या सामानाचे दुकान आहे.

गावला गो बाय उत्तर गावला... धन्स मरे... Happy

नीलु,
खुप म्हणजे खुपच अप्रतीम आहेत तुझ्या मेणबत्तया. एकदम हात शिवशिवताहेत करुन बघायला. Happy

मस्तच गं नीलू. कलाकार आहेस बाई. ती पहिली मेणबत्ती खाऊन टाकावीशी वाटतेय. (बर्‍याच जणांना शेवटची पिऊन टाकावी वाटत असणार Happy )

टाय बेष्टच Happy
सगळ्याच मस्त आहेत.
त्यातली शेवटची एखाद्या "डोलकर" बुधवारकराची तंद्री लागल्यावर खेचायला मस्तच आहे. फक्त वात काढुन टाकायची Proud
बर टाय मला एखादी असलीच गिफ्ट देवुन टाक. माझ्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय बघ Proud

रुनी, संघमित्रा, झकास धन्यवाद.
रुनी नक्की कर. तुझे ते पॉट्स पाहिलेत मस्त केलयत ग.
संघमित्रा Happy
झकासा छान नाव सुचवलस Happy

मेणबत्त्या अप्रतीम !!

@psg : कलावान !! Uhoh
( हा शब्द योग्य असेल तर ) धन्यवाद !!
मला नव्हतं वाटलं की हा शब्द वापरात आहे !!
-- शकुन

छान आहेत मेणबत्त्या... पण एक शन्का... या मेणबत्त्या ग्लास मध्येच ठेवतात की तयार करताना मेण घट्ट झाल्यानन्तर ग्लास्मधून काढताही येतात? ग्लास मध्येच मेणबत्ती पेटवली तर ग्लास तडकत नाही का?

तुझी ही कलाकुसर बघत असतांना माझा लेक जवळ उभा होता. मला आवडल्याच तुझ्या कँडल्स पण त्याने दिलेली दाद माहितीय का... मला ब्ल्यु आणि पिंक कँडल आत्ताच हवी Happy त्याला सांगितलय की एका मावशीने बनवलीय तर तो मलाही बनवायला सांगतोय. कलाकृतीच्या नावाने एकही गोष्ट माझ्या खात्यात जमा नाहीये Sad (माझ्या हातात नाहीच बुवा ते...) त्यामुळे मला जमणार नाही. तू विकत असशील तर पुढच्या भेटीत भेटुया का? खरच खुप सुंदर बनवल्यायेत.
आणि हो, झकासची कल्पना छान आहे. Lol
-प्रिन्सेस...

शकुन, प्रिन्सेस, जगमोहन धन्यवाद
प्रिन्सेस तुझ्या लेकाला पण ठांकु सांग. Happy कितवीत आहे तो? आणि भेटायला काहीच हरकत नाही Happy मुंबईत तुझा कुठे मुक्काम?

माझा लेक चार वर्षांचा आहे. मुंबईत मी गोरेगांवला असेन.-प्रिन्सेस...

Pages