मर्म

Submitted by कौतुक शिरोडकर on 21 August, 2010 - 14:55

(डॉ. कैलास यांच्या या http://www.maayboli.com/node/18860 गझलेने प्रेरणा दिली. याबद्दल डॉक्टरांचे आभार. चांगल्या रचनांची 'चिरफाड करणे' हा जन्मसिद्ध अधिकार असल्याने हल्ली आम्ही कर्त्यांची माफी मागणे सोडून दिले आहे. )

कोण म्हणतो 'चापणे' हा धर्म नाही ?
याविना आणिक मुखाचे कर्म नाही

सोपताना 'पद' तयांना शपथ देती
"हे तुझे 'खा ते'... चरावे... शर्म नाही"

'वेल्थ कॉमन' स'कल मांडी' बेहिशोबी
'राष्ट्र' 'कुsssल'; ही 'न्युज' तितकी गर्म नाही

बोलती गेंडे पहाता या ठकांना
"आमचे जाडे इतुके चर्म नाही"

यांस आहे ना जनांची वा मनाची
हेच तर यांच्या भिकेचे मर्म नाही ?

गुलमोहर: 

वेल्थ कॉमन' स'कल मांडी' बेहिशोबी
'राष्ट्र' 'कुल'; ही 'न्युज' तितकी गर्म नाही
.
बोलती गेंडे पहाता या ठकांना
"आमचे जाडे इतुके चर्म नाही"

Rofl

वा वा कौतुका....... मूळ गझलेपेक्षा विडंबन फर्मास झाले आहे......

बोलती गेंडे पहाता या ठकांना
"आमचे जाडे इतुके चर्म नाही"

हा शेर खूप आवडला.

डॉ.कैलास

मित्रानो, धन्यवाद ! मधुकरजी, टुक्कार का असेना याला तुम्ही कविता म्हणालात हेच खुप. आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल आभार.

कौत्या. मस्तच रे...
मधुकरजी..., आपले मत ऐकुन अंमळ हसु आले. (आजकाल आपली मते ऐकुन, वाचुन हसुही येत नाही तरीदेखील Wink )

>>बोलती गेंडे पहाता या ठकांना
"आमचे जाडे इतुके चर्म नाही"

है शाब्बास !
मी विचार केला की शिर्षकात 'ग' राहिला असावा. पण तसे नाही आहे Proud

ही कविता आज वाचली... नजरेतून कशी काय सुटली कोण जाणे.
(याचा अर्थ खूप जास्ती कविता टाकतोस असा ही होतो :फिदी:)

आवडली..

यांस आहे ना जनांची वा मनाची
हेच तर यांच्या भिकेचे मर्म नाही ? >> १००% अनुमोदन..

बोलती गेंडे पहाता या ठकांना
"आमचे जाडे इतुके चर्म नाही"

सहिच् रे.. Happy

कविता मस्तं आहे...पण ती original कवितेचे विडंबन न रहाता वेगळा विषय धरते असं वाटून जातं...

-परीक्षित