बदला का बदल? एका राष्ट्राची कैफीयत

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बदला का बदल? एका राष्ट्राची कैफीयत
-२९/११/२००८

मि काही "यातला" तज्ञ नाही, किव्वा संख्या, आकडे, अभ्यास या मार्गाने या परिस्थीतीवर प्रकाश टाकू पाहणारा सन्माननीय वाटाड्याही नाही. ते काम मि आदरपूर्वक तुमच्यावर सोपवतोय. पण मलाही हा "चकवा" गेले तीन दशके लागलेला असल्याने फार तर जे जवळून पाहिलय, अनुभवलय, सारासार विवेक बुध्धीला आकलन झालय त्याचा उपयोग करून इथे काही विचार मांडत आहे. नाही म्हणायला स्थापत्त्य शास्त्रातील पद्व्युत्तर शिक्षण अन एक दशकावर अनुभव गाठीशी असल्याने हे मात्र निश्चीत माहित आहे की "पाया पक्का असेल तर डोलारा शाबूत रहातो". अन नेमके हा पायाच कमकुवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुन्हा ही राष्ट्राची पायाभरणि करायची तर अनेक युगेही लोटतील पण सुरुवात स्वतापासून होणे आवश्यक आहे अन तिही अत्ताच, डोलारा कोसळायच्या आत, तसाही हा राष्ट्राचा डोलारा "धोकादायक इमारत" या पालिकेने वर्षानुवर्षे लटकवलेल्या नोटीस बोर्डासकट तग धरून आहे पण आता तो कधिही कोसळेल यात तिळमात्र शंका नाही.

तेव्हा त्या अनुशंगाने हे विचारमंथन तटी आंदोलन समजून घा.

२६/११/२००८ ही तारीख मुम्बईकरांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या, भारताच्या लक्षात राहील.. राहील न?
संसद भवनावर हल्ला झाला ती तारीख लक्षात आहे? त्यात किती अतीरेकी मारले गेले, निदान कोण जवान शहीद झाले लक्षात आहे?
अगदी अलिकडे (अलिकडे कुठल्या काळाच्या ओघाने म्हणाव? आजकाल सर्वच अलिकडे भासतय..) मुम्बईमधे लोकल ट्रेनस मधे
कधी, किती बाँबस्फोट झाले, किती जण मेले लक्षात आहे?
याउलट बाबरी मशीद पडली ती तारीख बहुतेक सर्वांच्या लक्षात आहे..आहे न?

या प्रश्णांना राजकीय गंध येण्या आधीच हे नमूद करू इच्छीतो की हे माझे मला पडलेले प्रश्ण आहेत्.. अगदी तसेच जसे या क्षणी "बदला का बदल" हा प्रश्ण पडलाय.

ऐन तिशीतील तरूण शहीद मेजर उन्नीक्रीश्णन च्या आईला काय सांगायचे? माऊली, आता तुझे उरले आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे, कधीतरी तुझ्या मुलाच्या बलीदाना चा बदला घेतला जाईल?
पोलिस खात्यातील निष्णात, हुषार, अनुभवी, तेजस्वी कारकीर्दीचे अधिकारी केवळ दोन मिनीटात अतीरेक्यांच्या गोळ्यान्ना बळी पडतात, त्या पोलिस खात्याला काय सांगायचे? बाबानो याचा "बदला" घ्या, तुमच्या जुन्या पुराण्या शस्त्र चिलखतात लवकरच "बदल" करण्यात येत आहेत..?
जे शहीद झाले, मृत वा जखमी झाले त्यांच्या कुटूम्बियान्ना काही लाखांचा मोबदला जाहीर करून बदला अन बदल या दोन्हीचे मायनेच बदलून टाकायचे?

प्रश्ण अनेक आहेत.. येत्या दिवसात अनेक प्रश्ण, संवाद, परिचर्चा, परीषदा, सर्व काही होईल.. निषेध होईल, नारे होतील, घोषणा होतील..पण बदला का बदल याच उत्तर आपल आपल्यालाच शोधायला हव.

भय, दुख्ख, अन उत्कटता सम्पून त्याची जागा उद्वीग्नता, चीड, संताप, हतबलता, घेतात तेव्हा त्या मनस्थितीत "बदला" हा एकच ठोस पर्याय समोर उभा रहातो. ज्यांनी हे भ्याड अन निर्घृण कृत्त्य केले त्यांचा बदला घ्यायचा? त्यांच्यामागे जे आहेत त्यांचा बदला घ्यायचा? वर्षानुवर्षे त्यांन्ना जे खतपाणि घालत आहेत त्यांचा बदला घ्यायचा? हा बदला कधि संपणारा असेल का कारण एका बदल्यातून दुसरा बदलाच जन्माला येतो हे जगाचा इतीहास सांगतो. अगदी अलिकडे ९/११ नंतर अमेरीकेचा अफगाण, इराक वरील बदला अजूनही चालूच आहे. त्यातून किती इराकी अन अफगाणि पिढ्या अमेरिकेविरुध्ध जन्माला येतील हे वेगळे सांगायला नको. अन इतके होवूनही शेवटी अमेरीकेत सत्तांतर व्हायला हे युध्ध मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले आहे. तेव्हा बदला अन बदल हा एक विचीत्र गुंता आहे, अमेरीकेसारख्या व इतरही मोठ्या राष्ट्रालाही न सुटलेला.

तरिही, "कृती" आवश्यक आहे.. ती कृती "बदला", सूड, नाही हे पटतय अन कदाचित हाच पहिला "बदल" ठरेल..

आणि बदल आवश्यक आहे तो बर्‍याच अनुशंगाने...

इतक्या भयानक प्रसंगी देशाचा नेता जर स्क्रीन वरील वाक्ये वाचणार असेल तर "अशा वेळी"निदान ती वाक्ये अधिक conviction ने अन समोरच्याला थेट भिडतील असे वाचणारा एखादा angry young man अमिताभ मला नेता म्हणून चालेल. नेतृत्व नाही तर किमान कागदावरचे उतारे वाचणे तरी बदलायलाच हवे. या देशाला प्रवक्ते नको आहेत.

कालबाह्य झालेली प्रजास्त्ताक-घटना, ब्रिटीशांच्या काळातील कायदा बदलणे गरजेचे आहे जेणेकरून निदान नीच अपप्रवृत्ती राज्यकर्ते म्हणून निवडून येवू शकणार नाहीत अन जीवावर उदार होवून पकडलेल्या गुन्हेगाराला कमकुवत कायद्यामुळे सोडावे लागणार नाही. rules, regulations and protocals यात मि तज्ञ मुळीच नाही पण जे सद्द्य परिस्थीतीत अस्तिवात आहे ते कुचकामी ठरतय हे गेले तीन दशके आपण पहात आहोत.

हवालदार हाही पोलिसच आहे, जीवावर उदार होवून तोही आपली ड्युटी करतच असतो.. त्याला किव्वा इतर कुठल्याही जवानाला तोच सामाजिक मान वा दर्जा द्यायला हवा जो एका वरिष्ठ अधिकार्‍याला दिला जातो. या केवळ एकाच गोष्टिने निदान त्याला त्याच्या कामाबद्दल अधिक निष्ठा, अभिमान, जागरुकता येवू शकेल. तस पाहिल तर आपण सर्वच कुणा ना कुणाची तरी चाकरी करतच असतो मग हवालदार तरी वेगळा कसा..? सिस्टीम मधील एकाला पांडू म्हणून आयुष्यभर हिणवायच तर दुसर्‍याला बाबू म्हणून चाटायच हे बंद व्हायला हव. मान कर्तुत्वाला द्यायला हवा पदाला नको.

राष्ट्रीया सुरक्षा हे काही पोलिस, लष्कर वा कमाडोन्ना कंत्राट रुपात दिलेले outsourcing project नव्हे. ती आपल्या सर्वांची जबाबदारी नाही का? आणि सुरक्षा ही अगदी घरापासून चालू व्हायला हवी. सुरक्षा ही एक service, facility आहे हा दृष्टीकोनच बदलायला हवा. सुरक्षा ही दैनंदीन जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवा, ती मुलतः अंगी भिनायला हवी मग ती कसलिही असू शकते: रस्त्यावर चालताना पादचार्यांची सुरक्षा, शाळेत लहान मुलाना सोडणार्‍या रिक्षा, बस, वाहनांची सुरक्षा, इमारतीत राहणार्‍या निवसीयांची प्राथमिक सुरक्षा, आपल्या आजू बाजूला घडणार्‍या घटनांकडे डोळसपणे पहाणे, इत्त्यादी. जेव्हा इतक्या प्राथमिक स्तरावर सुरक्षा जतन केली जाईल तेव्हाच समाज, प्रांत, राज्य अन पर्यायाने राष्ट्र सुरक्षेसाठी तयार असेल. Safety and Security , किव्वा धोका अन सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दैनंदीन जिवनात धोके कसे कमी करत येईल हे एक सुजाण नागरीक म्हणून आपण नक्कीच पाहू शकतो, धोका कमी झाला तर सुरक्षा अपोआप वाढते हे इतक सोप गणित आहे. आणि safety security चे धडे लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना सक्तीचे करावेत. या गोष्टिबद्दलच एकंदर शिक्षण, ज्ञान, अन त्या अनुशंगाने येणारी जागरुकता, नैतीक जबाबदारी यात आपण अजूनही मागासलेले आहोत. ते बदलायला हव.

राजकारण अन त्या अनुशंगाने आवश्यक बदल हा मानवाच्या जन्मापासून आजतागायत चालत आलेला एखाद्या theory of evoluation सारखा विषय आहे.. न सम्पणारा अन कायम संक्रमणातून जात असणारा. ही संक्रांत कधिही न सम्पणारी आहे असे मानून चालले तरी मग काही किमान गोष्टी सुधारता येतील. शेवटी सरकार, नेते अन पार्टी म्हणजे कोण? आपल्यातीलच आपणच निवडून दिलेले लोक किव्वा आपल्या आवडीला न अनुसरून निवडून आलेले लोक, पण शेवटी माणूसच! अक्षरशः मूठभर लोक करोडोंवर हुकुमत करतात हा दोष सिस्टिम चा नाही, तर हे करोडोंच असामर्थ्य दर्शवत. divide and rule हे तंत्र ब्रिटीशांन्नी वापरून आपल्यावर शम्भर वर्षे राज्य केले. आजचे राजकारणी नेते तेच करत आहेत..धर्म, जात, भाषा, प्रांत या अशा विविध मार्गाने आम्हाला विभाजित केल जातय. आमच्या पीढीला आयतं मिळालेल स्वातंत्र्य आता पुन्हा वैचारीक क्रांती करून आपल्याच कातडीच्या लोकांकडून हस्तगत करायची वेळ आली आहे. हा वैचारीक बदल फार फार आवश्यक आहे.

स्पर्धा अन मार्केटींग च्या युगात पत्रकारीता, प्रसार माध्यमे यांची नैतीक जबाबदारी हजार पटीने वाढली आहे पण 24x7 राईचा पर्वत करण्यात अन चूकीची समाजिक, पारंपारीक अन सांसकृतीक मूल्ये पसरवण्यातच यांची सारी शक्ती वेळ अन पैसा वाया जातोय. जर स्वता: समजून उमजून समाज हिताची धोरणे हे राबवणार नसतील तर त्यांचे प्रसारण स्वातंत्र्य जपतानाच त्यांच्यावर कडक निर्बंध लादणे आवश्यक आहे. प्रसार माध्यमात खूप मोठी शक्ती आहे.. पण तो प्रवाह नियंत्रीत करायला हवाय, कौटुंबीक हित ते समाज अन देश हितास परिपोषक अशी bottom up and top down policy set up and implementation इथे खूप गरजेची आहे. त्याच बरोबर यातले अव्वल दर्जाचे प्रशीक्षण आवश्यक आहे अन्यथा गोळीबारात आपल्या तडफदार पोलिस ऑफिसर्स ना गमावलेल्या जवानाला "आता तुम्हाला काय वाटते"? असे मूर्ख अन संतापजनक प्रश्ण विचारणारे वार्ताहर अनेक काळ पहायला मिळतील त्याच बरोबर प्रत्येक छोट्या गोष्टीचे भांडवल करून, भावनांशी खेळून, संशय उपस्थित करून, प्रसार माध्यमाचा गैररवापर करून अखिल समजात फक्त कल्लोळ, गोन्धळ, अविश्वास निर्माण करणारे बादल, बिजली, बरखा रिपोर्टर्स नाचत रहातील. हे बदलायला हवे.

आजची लहान पिढी उद्या या देशाचे सुजाण(?) नागरीक, कर्तेधर्ते असणार आहेत. आम्ही फक्त मुले अन पिढी घडवत नाही आहोत तर पर्यायाने एक राष्ट्र घडविण्यची जबाबदारी आम्ही घेतली आहे हे प्रत्त्येक पालकाने मनात पक्के बिम्बवायला हवे. आम्हाला सचिन, धोनि, शाहरूख, अमिताभ, सोनू निगम, असे अनेक "नामवंत" पैदा करायचे नाहीयेत किव्वा निर्माण करायचे नाहियेत, आम्हाला निर्माण करायचे आहेत ते यांच्यासारखे गुण असणारे , जिद्द असणारे, प्रखर तेजस्वी, शक्तीशाली, बुध्धिवंत, कष्टकरी, जबाबदार नागरीक. हे ध्येय असेल तर "अंधानुकरण" अन पर्यायाने पोकळ स्पर्धा यात आम्ही पालक अन आमची मुले बळी पडणार नाहीत. खर तर प्रत्त्येक शाळेत लष्करी प्रशिक्षण, समाजसेवा, हे कायद्याने सक्तीचे केले पाहिजे. आमच्या पाठ्यपुस्तकात केवळ इतीहासाचे ठसे नकोत, तर येणार्‍या भविष्य काळाची पावलेही हवीत.

शेवटी कुठलेही हत्त्यार वा गुन्हा यापेक्षा त्यामागील विचार हा अधिक कारणीभूत असतो. मनुष्याला मारायला अगदी दगडाचा मारही पुरेसा आहे, किव्वा एखाद्या शस्त्राचा वर्मी घाव. अशा छोट्या शस्त्राने मेलेला किव्वा ak47 च्या गोळीबारात मेलेला यात एक पोस्ट्मार्टेम चे विश्लेषण सोडले तर काही फरक आहे असे मला वाटत नाही. यात शहीद झालेल्या मृत झालेल्या अनेकांचा कुठलाही उपमर्द करायचा अजीबात हेतू नाही. पण ही लढाई शस्त्रांची नाहीये.. विचारांची आहे. अन म्हणूनच फारच विचारपूर्वक ही लढाई खेळायची आहे. इथे "पायावर" पक्षी "मुळावर" घाव घालणे आवश्यक आहे नुसते शीर छाटून उपयोग नाही. त्याही अर्थाने एक पायाभूत बदल हवा आहे.

असे कितीतरी बदल, लहान, मोठे आवश्यक आहेत, काही सहज शक्य आहेत, काही काळाच्या ओघात घडतील तर काहींन्नी अत्ताच बाळसे धरले आहे. एका रात्रीत सर्व काही सुरळीत होईल ही अपेक्षा फोल आहे हे आम्हा सर्वानाच ठावुक आहे. करोडोंच्या मुर्दाड देशाला उशीरा जाग आली आहे हे मान्य करायलाच हव, नाहितर हा सर्व बदल पहिला बाँबस्फोट वा पहिला दहशतवादी हल्ला झाला तेव्हाच व्हायला हवा होता.

त्या अर्थाने मुम्बई वरील या निर्घृण हल्ल्याने असंख्य मुर्दाड मनांन्ना पुन्हा गदा गदा हलवून जागे केले आहे हे काय ते त्यातून चांगले घेता यईल. पण ही "जाग" शिल्लक आहे तोवरच हा जागरही कायम ठेवायला हवा, नाहीतर आयुष्याच्या दैनंदीन धकाधकीत आम्ही पुन्हा कधी वैचारीक कोमा मधे जावू हे सांगता येत नाही. अन पुन्हा त्यातून बाहेर येईपर्यंत हे जग किती विचीत्र बदलले असेल याचा नेम नाही.

तेव्हा मनाला कुठेतरी पटतय, बदला हा तात्पुरता मार्ग (?) आहे श्रेयस मार्ग आहे, बदल हा कायमचा, दूरदर्शी मार्ग आहे, प्रेयस मार्ग आहे. जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीची शोकांतीका ही आहे की जे राष्ट्राचे गौरव आहेत (क्रीडावीर, अभिनेते, पदक विजेते, संगीत शिरोमणी वगैरे..) त्यांच्या दारी सोन्याचे झाड लावायला रांगा लागल्या आहेत, जे या राष्ट्राची गरज आहेत (पोलिस, लष्कर, जवान, सेना) त्यांच्याकडे मरणोत्तर वीरचक्र दिले जात आहे, अन जे या राष्ट्राचा मुख्ख्य घटक आहेत (मि, आम्ही, तुम्ही, सर्व लोक) ते मदतीसाठी दुसर्‍याकडे पहात आहेत..

An eye for an eye makes the world blind.. बापू तुमचे हे उद्गार अगदी खरे आहेत पण त्यात सर्वांना दृष्टि आहे हे गृहीत धरल गेलय.. इथे वैचारीक अन तात्विक दृष्ट्या अंधळे आहेत त्यांच्याशी मुकाबला आहे, हे जग आधीच आन्धळ आहे.

तूर्तास, ही लेखणि इथेच म्यान करतो. आता तुमची पाळी...

ता.क.: मला अतीशय समाधान आहे आणि आनंद आहे की या वरील लेखातील बर्‍याचश्या गोष्टींची, "बदलाची" सुरुवात झाली आहे. मि सर्व मायबोलीकराना नम्र विनंती करू इच्छीतो की, या खालील आन्दोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
हे पहा:

http://www.rediff.com/news/2008/dec/03mumterror-wednesdays-will-be-days-...

विषय: 
प्रकार: 

योग, तुम्ही दिलेली लिंक "पान सापडत नाही" असे दाखवतेय..

अरे... बर परत एकदा प्रयत्न करून बघ.

सध्या तरी प्रत्येक जण बदल कि बदला ह्याच चक्रव्युवात अडकलेला दिसतोय. बदल घडवण्यबद्दल अनेक पोस्ट मायबोलीवर ही आलेली आहेत. बदला घेण्याची काही इस्रायली उदाहरणे ही काहींनी वाचली असतील.

आंध्र प्रदेशातील नक्षलवादाचे कंबरडे मोडणारा एक आय पी एस अधिकारी श्री उमेश्चंद्र ह्यांना त्यांच्या पोलीटीकल बॉसेस नी त्या कामावरुन हटवले. त्यानंतर नक्षल्यांनी त्याची दिवसाढवळ्या हत्या करवली. त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या पोलीसांनी ती अंतयात्रा हत्येच्या ठिकाणी आल्यावर्...एक सुरात प्रतिज्ञा केली कि एक महिन्यात ह्याचा बदला घेउ... अन एकाच महिन्यात नक्षल्यांच्या एरीया कमांडर ला ठार केले गेले....

महाराष्ट्र पोलीसांकडुन अश्या काही दिलाश्या चे अपेक्षा होती...पण हसमुख राय कंपनीला सहकारी गमावल्याचे ही दु:ख झालेले दिसत नाहीये.... अगदीच मुळ्मुळीत प्रतिक्रिया आहेत.

चम्पक,
राजकारणापासून पोलिस आणि कायदा हे दोन घटक वेगळे अन स्वतंत्र कार्यरत होत नाहीत तोवर हे "दुष्टचक्र" चालूच रहाणार..
धुतल्या तान्दळासारखे प्रत्त्येकाचे चारित्र्य असेल त्या देशाला पोलिसांची गरजच नाही पण ते शक्य नाही त्यामूळे करोडोंच्या आबादी असलेल्या देशात निदान पोलिस अन कायद्याचा धाक, निव्वळ जरब जरी बसवता आली तरी तो एक मोठा "प्रतिबन्धक" उपाय ठरतो. आपल्या नेत्यांची, "वरून" ऑर्डर देणार्‍यांची अन "साहेब" लोकांची "जी हुजूर" करण्यात या पोलिसांच नाण घासून इतक गुळमुळीत झालेल आहे की त्याची किम्मत शून्य आहे.

यापेक्षा त्यामागील विचार हा अधिक कारणीभूत असतो >>
इथे वैचारीक अन तात्विक दृष्ट्या अंधळे आहेत त्यांच्याशी मुकाबला आहे, >>

पंचेस. आवडला लेख. पण ही लढाई एकाच बाजुने लढून थांबनारी नाही, त्यासाठी सर्व बाजूंनी ( राष्ट्रीय सुरक्षा, धार्मीक सुरक्षा, आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि राजकारण) एकाच वेळेस तेवढ्याच तिव्रतेने लढा द्यावा लागेल तेव्हा काहीतरी हाती लागेल. नाहीतर भारतातील पाकीस्थाने आपला नाश करायला टिपून बसली आहेतच.
___________________________________
"अहिंसेची नशा दारूपेक्षाही घातक असते. अट्टल अहिंसाबाज नशेत वाट्टेल ते बरळत सुटतो"
आमचे प्रेरणास्थान प्र.के.अत्रे

अत्यंत सुंदर लेख. गेल्या काही दिवसात माय्बोलीवर ज्या प्रकार्ची फॅनॅटीक मतं व्यक्त होत होती ते पाहुन मी वैतागलोही होतो आणी अस्वथही. तुमचा लेख वाचुन अजुनतरी सारसारविवेक शिल्लक आहे याची खात्री पटली.
मायबोलीवर १००% जनता हिंदु आहे त्यामुळे बर्याच वेळा एकांगी विचार पुढे येतात यात आश्च्रय नाही पण हा कडवटपणा आपल्याच धर्माला कोठे घेउन चालला आहे याचे भान राहिलेले नाही.
पुढील काही ग्रुहितके मांडून त्याप्रमाणे क्रुतीची अपेक्षा केली जात आहे
१]हिंदू हा नेहमीच देशभक्त असतो. त्यामुळे तो देशदोही असूच शकत नाही
२]जे हिंदू नाहीत त्यांची देशभक्ती संशयास्पद असते.
३]हिंदू आणि मुस्लिम हे दोघे परस्परांचे नैसरगिक्े शत्रू आहेत,
४] मुस्लिमांच्या हेतूबद्दल संशय आणि त्यांच्या कृतीला प्रतिकार हा केलाच पाहिजे.यासाठी पुढील कार्यक्रम राबवला जात आहे.
१]मुस्लिम कट्टरपंथी आहेत म्हणून आपणही कट्टर झाले पाहिजे.
२] सहिष्णुतेचे मुळ हिंदु तत्वञान आणि संस्कार यात अडथळा बनत असल्याने ते षंढाचे असल्याचा प्रचार करणे.मग यात उठसुट म.गांधींना झोडपणे हे सर्वात महत्वाचे.
३] मुस्लिमांप्रमाणे हिंदूंनाही आक्रमक करणे.
हा सगळा एका प्रकारे हिंदूंच्या इस्लामीकरणाचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तो बदल घडवुन आणायचा असेल तर सुरुवात आपल्यापासुनही व्हायला हवी.
दुसरा मुद्दा म्ह्णजे ज्याप्रमाणे ्भारतात हिंदु समाज एकसंध नाही तसाच 'मुस्लिम समाज' अशीहि काही एक सलग ओळख नाही त्यांच्यातही अनेक पंथ,उच्च-नीच भेदभाव आहेतच त्यामुळे एकजात सगळ्या मुस्लिमांना झोडपण्यात काहिच फायदा नाही,उलट त्यांच्यातील पुढारलेल्या गटांना हाताशी धरुन हा बदल जास्त पुढे नेता येईल.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

योग. लेख आवडला आणि १००% टक्के पटला. आगाऊ, तुमचं मत ही एकदम पटेश. खरंच हे जे हिदुत्वाचं इस्लामीकरण चाललं आहे तेही तितकंच धोकादायक आहे..

चांगले मुद्दे मांडलेत. विशेषतः पायाभूत बदल, वैचारिक लढाई, प्रेयस-श्रेयस हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत.
पायाभूत बदलाच्या संदर्भात 'मूल्यशिक्षण' मला फार आवश्यक वाटते, जे शाळेत तास ठेऊन होत नाही. मुलांसाठी ते आपोआप आणि प्रत्येक क्षणी घडत असते, याची जाणीव आपण सर्वांनीच ठेवणे अत्यावश्यक ठरते. गांधींच्या विचारांचा अवलंब करण्याआधी अंधत्वाचे उदात्तीकरण थांबवावे लागेल.

    blackribbon1.jpg

    "मूल्यशिक्षण्".. ह्ह्म्म्म मह्त्वाचा मुद्दा आहे. गरजेचा आहे.

    योग, बदलाचे मुद्दे चांगले आहेत. पण हा सगळा बदल जरी समाजात झाला तर काय दहशतवाद थांबेल?

    अमेरिका सारख्या देशात काय अजुन बदल अपेक्षित असायला पाहीजे होता म्हणजे त्यांच्यावर ९/११ चा हल्ला झाला नसता?

    दहशतवादाचा प्रश्न बिकट झाला जेंव्हा त्याला धार्मिक बेस मिळाला. तसाही इस्लामांमधे कडवेपणा हा हिंदु आणि इतर धर्मांपेक्षा जास्त आहे याच कारण ते त्यांच्या धर्मात काहीही बदल करायला तयार नाहीत. दहशतवादी तयार करताना तु हे सगळ धर्मासाठी अल्लासाठी करतोयेस अस सांगुन त्याच उदात्तीकरण करायचा पुर्ण प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे हे अतिरेकी फिदायीन होण्याच्या तयारीनेच या दहशतवादी लढ्यात उतरतात.

    खरा धार्मिक व्यक्ती कुठल्याही धर्माचा असला तरी माणुसकी (human rights)चे अवमुल्यन होईल असे काहीही करणार नाही. धर्म हा तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती कशी करता येईल याचा मार्ग दाखवतो मग तो अल्ला असला काय आणि गॉड असला काय.

    जर दहशतवादी वृत्तीचा पुर्ण बीमोड करायचा असेल तर दोन गोष्टी करता येतील. हिंदुनी संघटीत होउन आपल्या स्वताच्या हिंदु धर्माच उदात्तीकरण (आपलाच धर्म आपण नीट समजुन घ्यायला पाहिजे आधी ) आणि प्रसार करण(यात दुसर्यांवर जबरदस्ती असा अर्थ नाही, ज्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी हिंदु धर्माची मुल्य त्या काळात परदेशातही नेउन पोचवली तसा प्रसार अपेक्षित आहे.) आणि दुसर म्हणजे या मुस्लिम लोकांनमधेच त्यांच्या धर्माचा योग्य प्रसार करण. धर्माचा गैरवापर करुन मदरशांमधे तयार होणारे दहशतवादी थांबल्या शिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

    हा प्रश्न युद्धाने सोडवला जाउ नये हे मात्र मला मनापासुन वाटत. आता जर युद्ध झाल तर ते धर्म आणि अधर्म (धर्माचा गैर्वापर करणारे) यामधे असेल. जरी वरवर यात भारत पाकिस्तान हे दोन देश दिसत असले तरी एकदा युद्ध पेटल कि त्याची व्याप्ती वाढत जाईल. जवळ जवळ सगळेच देश या ना त्या कारणाने या युद्धात ओढले जाउ शकतात. आणि अस जर झाल तर यात सगळ्या जगाचा विनाश होइल कदाचीत युगान्तच असेल. दुसर्या महायुद्धात झालेल्या हिरोशिमा नागासाकी वरच्या हल्ल्यांचे त्या काळचे परिणाम बघता, आजच्या काळातील अण्वास्त्रे काय विध्वंस करु शकतात याची कल्पना न केलेलीच बर. तुम्ही भले ही अण्वास्त्रांचा उपयोग करणार नाहीत पण दहशतवादी करणारच नाहीत याची खात्री काय? जे लोक धर्मासाठी म्हणुन फिदायीन होण्याच्या तयारीत आहेत ते त्यांची हार व्हायला लागली तर ते अण्वास्त्रांचा वापर करुन बाकीच्या जगाला संपवताना जराही विचार करणार नाहीत. त्यामुळे अस युद्ध झाल तर त्यात कोणी फारस वाचेल अस वाटत नाही. जरी वाचले तरी त्यांना शुद्ध हवा, पाणी, अन्न या साध्या गरजा तरी भागतील अस वातावरण पृथ्वीवर राहील का शंका आहे.

    >>योग, बदलाचे मुद्दे चांगले आहेत. पण हा सगळा बदल जरी समाजात झाला तर काय दहशतवाद थांबेल?

    >>अमेरिका सारख्या देशात काय अजुन बदल अपेक्षित असायला पाहीजे होता म्हणजे त्यांच्यावर ९/११ चा हल्ला झाला नसता?

    दिव्या,
    या दोन्ही प्रश्णात तुम्ही स्वताच याच उत्तर दिल आहे. जर अमेरिका सर्वात बलाढ्य आहे असे मानले अन त्यांचे anti terror model हे post 9/11 सर्वात अधिक सफल आहे असे मानले तरी दहशतवाद थांबेल वा नाही याची guarantee कुणीच देवू शकत नाही. तेही नाहीत. पण अमेरि़केवरील ९/११ हल्ला हा त्यांच्या overconfidence चा परिणाम होता..they never thought that something like that on that scale could happen on their own soil...thats it. पण ते failure accept करून त्यांन्नी अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत जे अमूलाग्र बदल घडवून आणले ते वाखाणण्याजोगेच आहेत.. मि स्वता: १९९८-२००८ अमेरीकेत वास्तव्याला असल्याने अगदी जवळून ते सर्व पाहिले, अनुभवले होते. इथल्या इतरही बर्‍याच लोकान्नी तो अनुभव घेतला असेल.

    असो. माझ्या या लेखाचा मूळ हेतू introspection हा होता. भारताने, भारतीय जनतेने आत्मपरिक्षण निदान आता तरी करायलाच हवे. व्यक्तीगत अन सामजिक सुरक्षेबद्दलची जागरूकता acts like deterrent, meaning the prevention, but there is no guarantee that it can "eliminate" the problem, i..e. terrorism.
    म्हणूनच मि शेवटी म्हटले आहे की हा लढा अधिक करून विचारांचा आहे... आणि तो लढा आजतागायत कायम आहे, फक्त कालानुसार त्याच प्रकट रूप, परिमाण आणि व्याप्ती बदलतीये इतकच. त्या अनुशंगाने तुमचे शेवटचे दोन परिच्छेद योग्य आहेत.

    असो. एकंदरीत या प्रश्णाचे बरेच अंग आहेत्...जमेल तसे एक एक विषय घेवून लिहीण्याचा विचार आहे.

    >>overconfidence
    >>पण ते failure accept करून
    बर.
    >>अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत जे अमूलाग्र बदल घडवून आणले
    मला याची उदाहरणे पाहिजेत. (ते बदल झाले नाहीत असं म्हणायचं नाही आहे) कारण ते कोणते बदल हे मला माहित नाही कारण सामान्य माणसाला त्याची काळजी करण्याची गरज भासली नाही एवढे ते पारदर्शी होते. विमानतळावर सिक्युरिटी वाढली आणि त्याला सहकार्य करणे हा एकच ठळक बदल झाला जो सामान्य लोकांना जाणवला.

    म्हणूनच..
    >>राष्ट्रीया सुरक्षा हे काही पोलिस, लष्कर वा कमाडोन्ना कंत्राट रुपात दिलेले outsourcing project नव्हे. ती आपल्या सर्वांची जबाबदारी नाही का?
    याचे उत्तर मला 'नाही' असे द्यावे वाटते. ते त्यांचे काम आहे आणि त्यात सामान्यांची जबाबदारी ही सहकार्य करण्यापुरतीच मर्यादित असली पाहिजे! त्याच पॅरा मध्ये तुम्ही जी बाकी दैनंदिन जीवनातली उदाहरणे दिली आहेत त्याबद्दल दुमत नाही पण त्याचा दहशतवाद रोखण्याशी काही संबंध नाही आणि उपयोगही नाही.

    कारण ते कोणते बदल हे मला माहित नाही >> लालू तू खरेच म्हणत आहेस की उगीच? अग तो कायदा नाही का पास केला होता ( U.S.A. Patriot Act ) ज्यात कोणीही कुठेही काय करत ह्याची वितंबातमी सरकार ठेवेन. NSA ( National Security Agency) वॉरंट शिवाय कुठेही electronic surveillance operations करु शकते. तूमच्या व माझ्या घरातही. हाच खुप मोठा बदल नाही का? भारतात एवढे जरी चार वर्ष केले तर खुप झाले अनेकांचा घरातून बॉम्ब आणि पिस्तूल मिळतील व काही मिनी पाकीस्थाने नष्ट होतील.

    सर्व इमीग्रंटस वर खुप कडक नजर त्यांचा नकळत ठेवल्या गेली. (त्यात आपन सर्व आलो). माझ्या पाकी मित्र नविद कुरेशीला त्या काळात विमान प्रवासाचा खुप त्रास झाला. दरवेळी थरो चेकींग व प्रश्न. तो त्या काळात फॅमीली मॅटर मूळे ३ वेळेस पाक मध्ये गेला होता. नो फ्लायर लिस्ट प्रत्येक ऐअर पोर्ट वर प्रकाशित करन्यात आली व अनेकांना संशया खाली उचलले.

    >>कोणीही कुठेही काय करत ह्याची वितंबातमी सरकार ठेवेन
    >>खुप कडक नजर त्यांचा नकळत ठेवल्या गेली
    exactly
    हे सगळे करण्यात तू आणि मी कुठे आलो?

    >>विमान प्रवासाचा खुप त्रास झाला. दरवेळी थरो चेकींग व प्रश्न
    हा त्रास नव्हे. ते तपासाचे काम करतायत आणि त्यांना चेकिन्ग करु देणे हे आपण केलेले सहकार्य!

    हां तू आणी मी नाही आलो त्यात. पण सरकारने आमुलाग्र बदल केले असे म्हणायचे होते. आपल्या दैंनदिनीत काहीच फरक नाही व न्हवता.
    आणि नविदला तो त्रास होता. त्याचा नावा व देशा मूळे. आता तो नाहीये, पण तेव्हा नक्कीच होता.
    बर्‍याच देशी कंपन्यातून ऑनसाईट येनारे नाव जर 'ते' असेल तर व्हिजा रिजेक्ट व्हायचा. मी तेव्ही टि सी ऐस साठी काम करायचो. आणि माझ्या टिम मध्ये मला 'त्या' नांवापेक्षा वेगळे घ्या असे सांगन्यात आले होते कारण कितीही लायक माणूस असला तरी तेव्हां नावा वर सगळ होत. आता ते बंद झाले. आणी हा माझा स्वतचा अनुभव ऐकीव नाही त्यामूळे रेशीअल प्रोफाईलिंग तेव्हा अमेरिकेनेही केले होते असे समजन्यास हरकत वाटत नाही.

    मी देखील ट्रॅव्हलर आहे. दर आठवड्यात फिरत असतो पण मला एवढा झाला नाही. सहकार्य केले की झाले.

    >>>>>मला याची उदाहरणे पाहिजेत. (ते बदल झाले नाहीत असं म्हणायचं नाही आहे) कारण ते कोणते बदल हे मला माहित नाही कारण सामान्य माणसाला त्याची काळजी करण्याची गरज भासली नाही एवढे ते पारदर्शी होते. विमानतळावर सिक्युरिटी वाढली आणि त्याला सहकार्य करणे हा एकच ठळक बदल झाला जो सामान्य लोकांना जाणवला.
    >>रेशीअल प्रोफाईलिंग तेव्हा अमेरिकेनेही केले होते असे समजन्यास हरकत वाटत नाही.

    लालू,
    जमेस तशी उदाहरणे देतो..वेगळ्या लेखातून हे लिहायचा विचार आहे. (खर तर सरकारने काय बदल करायला हवेत हा पूर्ण वेगळाच विषय आहे.. मि फक्त दिव्याच्या प्रश्णावर उत्तर देत होतो.)
    पण केदार म्हणतोय तसे रेशीयल प्रोफाईलींग हा एक मोठा बदल होता.

    >त्याच पॅरा मध्ये तुम्ही जी बाकी दैनंदिन जीवनातली उदाहरणे दिली आहेत त्याबद्दल दुमत नाही पण त्याचा दहशतवाद रोखण्याशी काही संबंध नाही आणि उपयोगही नाही.

    हा एक सर्वसामान्य गैरसमज आहे असे मि म्हणेन.. दुसरा लेख त्याच विषयाला धरून लिहीत आहे, just bear with me..